गोदावरी नदीची माहिती Godavari River Information in Marathi

Godavari River Information in Marathi दक्षिण भारतातील व आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी असून ती  दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटात पासून पूर्व घाटापर्यंत वाहून पुढे बंगालच्या उपसागरास मिळते. godavari nadi महाराष्ट्रातील नव्हे, तर भारतातील गंगा नदीच्या खालोखाल ही एक पवित्र नदी मानले जाते; तिला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात. प्राचीन काळी या भागात गौतम ऋषींचा आश्रम होता. त्यांनी गोहत्येच्या पातकाच्या निवारणार्थ शंकराची आराधना करून गंगा आणली, अशी कथा आहे.

सध्या येथे लहानशा कुंडात थोडेसे पाणी असते. नंतर डोंगराच्या पूर्व कुशीत गंगाद्वार येथे लहानशा झऱ्यातून ते बाहेर येते. तेथपर्यंत ६९० पायऱ्या चढून जाता येते. तेथे कुंड व गंगेचे लहानसे देऊळ आहे. पायथ्याशी त्र्यंबकेश्वर क्षेत्र आहे. ह्या ठिकाणी अनेक पूजा – विधी केले जातात. येथेल ब्राह्मण मंडळी हे सर्व विधी पार पाडतात जवळपास संपूर्ण भारतातील लोक येथे दर्शनासाठी येतात. गोदावरी म्हणजे पाणी किंवा गाई देणारी___गाईचे पोषण करणारी___असा अर्थ आहे.

godavari river information in marathi
godavari river information in marathi

गोदावरी नदीची माहिती – Godavari River Information in Marathi

गोदावरी नदीमाहिती
लांबीसुमारे 1456 किमी
राज्य क्षेत्रमहाराष्ट्र तेलंगण व आंध्र प्रदेश
नदीप्रणाली ते क्षेत्र313301 चौरस किमी
उपनद्यादारणा, मुठेचा, मांजरा, कडवा

गंगेच्या खालोखाल हिचा क्रमांक लागतो तिच्या खोऱ्याने भारताचा सुमारे दहा टक्के भाग व्यापला आहे. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत व काही प्रमाणात सातपुडा पर्वतरांगा तीन टेकड्या प्रमुख जलविभाजक आहे. सह्याद्री पर्वतातून दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे पसरलेला सातमाळा-अजिंठा डोंगररांगा, हरिश्र्चंद्र बालाघाट डोंगररांगा आणि शंभू महादेव डोंगररांगा या दुय्यम जलविभाजक आहे. कारण सह्याद्री पर्वतात उगम पावणाऱ्या मुख्य नद्यांना या डोंगरावर मिळणाऱ्या उपनद्या मिळतात . या जलविभाजकामुळे दोन मुख्य विभाग होतात.

१.पूर्ववाहिनी नद्या

2.पश्चिम वाहिनी नद्या

गोदावरी नदिचे खोरे पूर्ववहिनी नद्यांमध्ये येते. सह्याद्री पर्वतात उगम पावून दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या नदयांना पूर्ववाहिनी नद्या असे म्हणतात.

गोदावरी नदी कोठून कुठे वाहते

नदीप्रणालीचे क्षेत्र:-  सह्याद्री पर्वत नाशिक जिल्ह्यात त्रंबकेश्वर ब्रह्मगिरी टेकडीवर गोदावरीचा उगम झालेला आहे व बारा ज्योर्तिलिंगापैकी एक ज्योर्तिलिंग आहे गोदावरीचे उगमस्थान अरबी समुद्र असून पूर्वेकडे फक्त 80 किलोमीटर अंतरावर आहे. गोदावरी नदीच्या प्रवाहाची सर्वसाधारण दिशा पूर्व व आग्नेय आहे. दख्खनच्या पठारावरून वाहणारी ही नदी महाराष्ट्र तेलंगण व आंध्र प्रदेशातून वाहत जाऊन मुखाजवळ त्रिभुज प्रदेशात निर्माण करून पूर्वेस बंगालचा उपसागर आत जाऊन मिळते .गोदावरीची एकूण लांबी सुमारे 1456 किमी असून तिचे नदीप्रणाली ते क्षेत्र 313301 चौरस किमी आहे. गोदावरी खोरे मधून दर वर्षी सुमारे 37 हजार 130 दशलक्ष घनमीटर पाण्याचा प्रवाह होतो.

नदी उगम – birth place of godavari river

नदीची वाहिनी प्रणाली:-बिलोली शहराच्या थोड्या उत्तरेस गोदावरी नदी तेलंगणा प्रवेश करते; तेथून महादेवपूरपर्यंत ती पश्चिम- पूर्व दिशेने वाहते. नंतर ती आगनेस वळते. भद्राचलमजवळ हिच्या  प्रवाहाने जवळपास काटकोनात वळण घेतले आहे. याच भागात पूर्व घाट ओलांडताना नदीचे पात्र अरुंद झाले आहे. इथेच नदीच्या सभोवतालचा भाग डोंगराळ झाला आहे. हा भाग ओलांडून नदी परत मैदानी भागात येते. राजमुंदरीच्या थोड्या दक्षिणेस नदीच्या दोन शाखा होतात. पूर्वेकडील शाखा गौतमी – गोदावरी व पश्चिमेकडील शाखा वशिष्ठी – गोदावरी या नावाने ओळखल्या जातात. या दोन्ही शाखांनी गोदावरील बंगालच्या उपसागरास मिळते.

गोदावरी नदीला दोन्ही तीरांवर मोठ्या उपनद्या येऊन मिळतात. नाशिकपासून दक्षिणेस सुमारे 24 किमी अंतरावर उजव्या तीरावर तिला दारणा नदी मिळते. पुढे या तीरावर तिला अनुक्रमे नेवासे शहराजवळ प्रवरा मुठेचा  संयुक्त प्रवाह येऊन मिळतो. बिलोली शहराच्या थोड्या उत्तरेस मांजरा नदी येऊन मिळते. डाव्या तीरावर तिला प्रथम नांदेडजवळ दिंडोरी जवळून वाहत येणारी कडवा नदी मिळते.

परभणी जिल्ह्यात परभणी शहराजवळ पूर्णा व दुधना या नद्यांचा संगम होतो. या दोघांचा संयुक्त प्रवाह पूर्णा (दक्षिण पूर्णा) या नावाने काही अंतर दक्षिणेस वाहत जाऊन गोदावरीला मिळतो. सिरोंचा शहराच्या दक्षिणेस गोदावरीस वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या प्राणहिता नावाने ओळखला जाणारा संयुक्त प्रवाह मिळतो. पुढे बस्तर जिल्ह्यातून वाहत येणारी इंद्रावती नदी तिला मिळते. साबरी नदी ही तिच्या डाव्या तीरावरची शेवटची मोठी उपनदी आहे.

गोदावरी खोऱ्यात विभाग महाराष्ट्र गोदावरी नदीच्या खोऱ्याचे विभाग पुढील प्रमाणे:-

 1. गोदावरी नदीचे खोरे
 2. गोदावरी पूर्णा नदीचे खोरे
 3. मांजरा नदीचे खोरे
 4. पैनगंगा नदीचे खोरे
 5. वर्धा नदीचे खोरे
 6. वैनगंगा नदीचे खोरे
 7. प्राणहिता नदी चे खोरे
 8. इंद्रावती नदी चे खोरे

गोदावरीच्या उपनद्या :-

 1. उजव्या किनार्‍याने मिळणाऱ्या उपनद्या :-

 • दारणा ,प्रवरा, मुळा ,बोरा ,सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती.
 • अजना, गिरीजा ,काबरा ,दुधना.
 • तावरजा, तेरणा, गिरणा.
 • क्याधू.
 • वेमला, निरगुडा ,विदर्भ.
 • कन्हान( पेंच कोलार )नाग, मूल,अंधारी, पठारी.

२. डाव्या किनार्‍याने मिळणाऱ्या उपनद्या :-

 • कादवा, शिवना ,खाम.
 • खेळणा .
 • मन्याड ,लेंडी .
 • पूस ,आरना,वाघाडी ,खुनी.
 • कार, बोर ,नंद ,इरइ,.
 • सूर, चुलबंद, गाढवी, खोब्रागडी, बाघ, कतराणी, फुअर, बंदिया, डोंगरी.
 • कोठारी.

भौगोलिक महत्व

राजकीय क्षेत्र :-

 • नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग;
 • अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर भाग;
 • मराठवाड्यातील सर्व जिल्हे;
 • विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हे.

गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-

 • मुख्य गोदावरीचे खोऱ्यात नाशिक, नेवासे, औरंगाबाद ,जालना, पैठण, परभणी, बीड, नांदेड, उदगीर वगैरे महत्वाची शहरे आहेत.
 • नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.

गोदावरी नदीवरील धरणे:-

 • गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.
 • महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात.
 • जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती.

जायकवाडी प्रकल्पअंतर्गत :-

अ) पैठण (नाथ सागर जलाशय ,औरंगाबाद जिल्हा):गोदावरी नदी

ब) दारणा धरण (नाशिक) दारणा नदी

क)  भंडारदरा धरण (अहमदनगर ):प्रवरा नदी

ड) सिंदफणा धरण :सिंदफणा नदी

इ)  येलदरी व सिद्धेश्वर धरण (हिंगोली): दक्षिण पूर्णा नदी

ई) मन्याड धरण (नांदेड): मन्याड नदी

नदीची तथ्ये:

 • गोदावरी आणि तिच्या उपनद्यांनी नदीच्या खोऱ्यातील दख्खनच्या लाव्हाची झीज केलेली आहे. त्याची सरासरी उंची 350 ते 550 मीटर दरम्यान आहे. गोदावरी खोऱ्यात जसजसे पूर्वेकडे जावे तसतसा तिचा विस्तार कमी होत जातो. नांदेड जवळ खोऱ्याची रुंदी फक्त 50 किमी आहे . तर त्या मानाने खोऱ्याच्या वरच्या बाजूस त्याची रुंदी 150 200 किमी आहे. गोदावरी खोऱ्याचे उत्तर व दक्षिण जलविभाजक स्पष्टपणे दिसतात. आणि ते तीव्र उताराचे आहेत.
 • उत्तरेकडील सातमाळा-अजिंठा डोंगररांगा ची मोठ्या प्रमाणे झीज केलेली आहे. दक्षिणेस बालाघाट रांगेमध्ये लहान लहान नद्या देखील नद्यांचे उगमाच्या क्षेत्रात अपक्षरंनाचे कार्य मोठ्या प्रमाणात करतात व काही ठिकाणी नदीचोर्यदेखील पहावयास मिळते .
 • उदाहरणार्थ ,आंबेजोगाई जवळ मांजरा नदीच्या काही फा टण्याचं नदीचौर्य वाण नदीने केलेले आहे.

गोदावरी खोऱ्यातील सुपिकता:-

गोदावरीचे कालवे एलुरूजवळ कृष्णा कालव्यास जोडले असल्यामुळे दक्षिणेकडे शेतीचे प्रमाण वाढले आहे.काळी गाळाची मृदा गोदावरीच्या खोऱ्यात जास्त प्रमाणात आहे त्यामुळे जमिनीची सुपिकता चांगली आहे. आणि भरपूर पाणीपुरवठ्यामुळे गोदावरीचा त्रिभुज प्रदेश अत्यंत सुपीक झाला असून त्यात तांदूळ, डाळी, कडधान्ये, तेलबिया, भुईमूग, तंबाखू, ऊस, नारळ, केळी, आंबे इत्यादींचे मोठे उत्पन्न येते. फुलबागाही पुष्कळ आहेत. अमलापूर व काकिनाडा ही सागरी मत्स्यकेंद्रे आहेत. बलभद्रपुरम् येथे अंतर्गत मत्स्यकेंद्र आहे. महाराष्ट्रातील  तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, कडधान्ये, कापूस, केळी, द्राक्षे, मिरची, ऊस, मोसंबी, पेरू,अंजीर, डाळिंबे इ. पिकांचे उत्पन्न घेतले जाते. सुती व लोकरी कापड विणण्याचे व साखरेचे अनेक कारखाने आहेत.

नदीचे ऐतिहासिक महत्व:-

रामचंद्रांनी स्वतः गोदातीरी निवास केल्यामुळे तिचे पावित्र्य अधिकच वाढले. तिचे गौतमीमुख विशेष पवित्र मानतात. तिला वृद्धगंगा म्हणतात; कारण गंगेचा व गोदेचा उगम एकच असून गोदावरी भूगर्भातून दक्षिणेत आली अशी कथा आहे. गोदावरीच्या काठी त्र्यंबकेश्वर, नाशिक, नेवासे, पैठण, भद्राचलम्, राजमहेंद्री व कोटिपल्ली ही प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. नाशिक मध्ये सन २००३ व २०१५ ला कुंभमेळा झाला होता. प्रसिद्ध देवस्थाने, संतांची निवासस्थाने यांमुळे महाराष्ट्रातील गोदातटाकीचा भाग संतभूमी म्हणून ओळखला जातो.

गोदावरी नदी नकाशा – Godavari River Map

लवकरच आम्ही नकाशा उपलब्द करून देऊ.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि गोदावरी नदी कोठून कोठे वाहते तिची लांबी किती आहे त्याचबरोबर नदीचे ऐतिहासिक व भौगोलिक महत्व कसे आहे तसेच नदीची वैशिट्ये कोणती आहेत. godavari river information in marathi pdf हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about godavari river in marathi language हा लेख कसा वाटला व अजून काही गोदावरी नदी विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या godavari river in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!