Narmada River Information in Marathi नर्मदा नदी narmada nadi mahiti ही दक्षिण भारतातील वाहणारी प्रमुख नदी आहे. या नद्यांना प्रामुख्याने पावसाच्या पाण्याचा पुरवठा होतो. पावसाळ्यात या नद्यांना भरपूर पाणी असते तर उन्हाळ्यात त्यांचे रक्त पात्र रोडावते किंवा कोरडे पडते. भारताच्या दक्षिण भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना क्रमाने नर्मदा, तापी, महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या मोठ्या नद्या लागतात. यांपैकी तापी व नर्मदा या नद्या पश्चिम वाहिनी आहेत, तर बाकीच्या सर्व पूर्ववाहिनी आहेत.
नर्मदा नदीची माहिती – Narmada River Information in Marathi
नर्मदा नदी | माहिती |
लांबी | सुमारे 1312 किमी |
राज्य क्षेत्र | मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात |
नदीप्रणाली ते क्षेत्र | 98,795 चौरस किमी |
उपनद्या | हिरण, बाराणा. कोलार |
उगमस्थान | मध्य प्रदेशात मैकल पर्वतश्रेणीतील अमरकंटक |
उगमस्थान – birth place of narmada river
मध्य प्रदेशात मैकल पर्वतश्रेणीतील अमरकंटक या सर्वात जास्त उंचीच्या शिखरातून या नदीचा उगम होतो. उगमाचा हा भाग डोंगराळ व जास्त पजरण्याचा आहे. उगमापासून पासून काही अंतर नदी उत्तरेकडे वाहत जाऊन नंतर पूर्व- पश्चिम दिशेत विंध्य व सातपुडा पर्वतामध्ये वाहते.
विस्तार:-
नर्मदेच्या खोऱ्यात चा विस्तार (जलसंग्राहक क्षेत्र) 98,795 चौकिमी असून तिची लांबी 1312 किमी आहे. त्यापैकी जास्तीत जास्त म्हणजे सुमारे 1077 किमी लांबीचा प्रवाह मार्ग मध्य प्रदेशात येत असून तो मांडला, जबलपुर, नरसिंगपूर, होशंगाबाद, खांडवा, खरगांव जिल्ह्यातून जातो; त्या पुढे मध्य प्रदेश व महाराष्ट्र आणि नंतर महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमेवर अनुक्रमे 35 किमी व 39 कमी वाहते पुढे 161 कीमी अंतर गुजरात राज्यातून वाहत जाऊन शेवटी भरूच जिल्ह्यात भरुच शहरापुढे खाडीतून वाहत अरबी समुद्राला जाऊन मिळते.
वैशिष्ट्य:-
- मुखाजवळ तिच्या पात्राची रुंदी सुमारे 28 किमी आहे. नर्मदा नदीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा प्रवाह कधी खोल अरुंद तर कधी रुंद दरीतून वाहतो.नदीने कधी तीव्र वळणे घेतली आहे तर कधी ती अगदी सरळ वाहते. तिचा प्रवाहात लहान-मोठे धबधबे आहेत.
- उगमापासून थोड्याच अंतरावर ती नदी खोल व अरुंद दरीतून वाहते. मांडला शहराजवळ तिच्या प्रवाह मार्गातील एक अत्यंत तीव्र असं वळण आहे. जबलपूर पासून सुमारे 20 किमी अंतरावर नर्मदेवरील प्रसिद्ध असा धुवांधार हा धबधबा आहे.
- संगमरवरी खडकातील हा धबधबा अत्यंत प्रेक्षणीय आहे.
- या धबधब्याची उंची सुमारे 15 मीटर आहे. त्यापुढे नदीने घळई तयार केली असून तिची लांबी सुमारे ३ किमी आहे.
- या घळीत दोन्ही तीरांवर चे खडक कडयांसारखे अगदी सरळ उभी असून त्यांच्यातील अंतरही कमी आहे.
- ‘मंकीज लीप’ येथे नदीच्या दोन्ही तीरांवरील अंतर सुमारे 13 मीटरच आहे. याखेरीज मांदार व दारदी या दोन ठिकाणी नर्मदेवर धबधबे असुन त्यांची प्रत्येकाची उंची सुमारे 12 मीटर आहे. ये
- थे नदीचा वरचा टप्पा संपतो. त्यानंतर मधला प्रवाहातही माहेश्वरजवळ सहस्त्रधारा हा धबधबा असून त्याची उंची 8 मीटर आहे.
- नर्मदेचा प्रवाह मार्गातील शेवटची घळई हरिंगपाल शहराजवळ आहे. गुजरात राज्यात मात्र नदी सपाट अशा भागातून वळणे घेत घेत वाहते. तिच्या खालच्या टप्प्यातील प्रदेशात वारंवार आणि प्रलयंकारी पूर येतात.
उपनद्या :-
नर्मदा नदीच्या उपनद्या उत्तरेकडून विंध्य पर्वतराजीतून तर दक्षिणेकडून सातपुडा पर्वत रांगातून वाहत येतात. विंध्य पर्वतातील जास्त उंचीची शिखरे हेच तेथील पाणलोटाचे प्रदेश होत. या शिखरांपासून उत्तरेकडे उतार मंद स्वरुपाचा आहे, तर दक्षिणेकडे तीव्र आहे. त्यापुढे नर्मदेला उजव्या तीरावर मिळणाऱ्या उपनद्या लहान असून त्या विशेष महत्त्वाच्या नाहीत. त्यातला त्यात हिरण, बाराणा. कोलार या उपनद्या महत्त्वाच्या आहेत. नर्मदा नदीच्या दक्षिणेस सातपुडा पर्वताची लांबट व रुंद अशी श्रेणी आहे. या पर्वतश्रेणीच्या उत्तर उतारावरून वाहत येणाऱ्या उपनदयांत तवा, छोटा तवा, कुंडि या महत्त्वाच्या आहेत.
- नक्की वाचा: गोदावरी नदी माहिती
महाराष्ट्रातील स्थान:-
आपल्या महाराष्ट्रातुन नर्मदा नदीचा काहीं भाग वाहतो; हे नेहमी सर्वसामान्य लोकांकडून विसरले जाते. महाराष्ट्राच्या वायव्य कोपऱ्यात नंदुरबार जिल्ह्याची सुमारे ५४ किमी सरहद्द नर्मदा नदीच्या प्रवाहामुळे तयार होते. ती अतिशय खोल घळईतून होते आणि सातपुडा रागांत असलेल्या अक्राणी टेकड्यामुळे तापी नदीपासून अलग झालेली आहे.भौगोलिक दृष्टया या भागातून नर्मदा नदी पार करणे अवघड असते.
नर्मदेच्या खोऱ्यातील नैसर्गिक साधनसंपत्ती:-
नर्मदेच्या खोऱ्यातील मृदा ही सुपीक काळी व गाळा ची मृदा असल्यामुळे येथे अनेक मुख्य पिकांचे उत्पन्न घेतले जाते. वरच्या डोंगराळ भागात तांदूळ व भरड धान्ये, वरच्या सपाट भागात गहू व ज्वारी आणि खालच्या भागात कापूस तेलबिया व ज्वारी ही मुख्य पिके घेतली जातात.
नर्मदेच्या खोऱ्यात घळईत चुनखडक, वालुकाश्म, ग्रॅनाइट व नाईस, डोलोमाइट, संगमरवर इत्यादी प्रकारचे खडक आढळतात. या खडकांमध्ये मुख्य:त लोखंड, मॅग्नीज, कोळसा, डोलोमाइट, संगमरवर, चुनखडक इत्यादी प्रकारची खनिजे सापडतात.
नर्मदा बचाओ आंदोलन:-
नर्मदा बचाओ आंदोलन हे भारतातील पर्यावरणीय चळवळींच्या परिपक्वतेचे उदाहरण आहे. यामुळे पर्यावरण आणि विकासासाठी संघर्ष प्रथमच राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय झाला; ज्यामध्ये विस्थापित लोकच नव्हे तर वैज्ञानिक, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य लोक देखील सहभागी झाले होते. नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरण प्रकल्पाचे उद्घाटन 1961 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. परंतु गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या तीन राज्यांमधील योग्य पाणी वितरण धोरणावर एकमत होऊ शकले नाही.
1969 मध्ये सरकारने पाण्याचा वाद मिटवून प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी नर्मदा जल विवाद न्यायाधिकरण स्थापन केले. 1979 मध्ये न्यायाधिकरणाने एकमत केला आणि नर्मदा खोरे प्रकल्प सुरू झाला ज्यामध्ये नर्मदा नदीवर नदीकाठी दोन विशाल धरणे व त्यातील नद्यांचा समावेश होता.
गुजरातमधील सरदार सरोवर धरण आणि मध्य प्रदेशातील नर्मदा सागर धरण, मध्यम धरणे आणि 3000 जल प्रकल्पंचा समावेश होता. 1985 मध्ये जागतिक बँकेने या प्रकल्पासाठी 450 दशलक्ष डॉलर्स कर्जाची घोषणा केली, सरकारच्या मते या प्रकहल्पातून मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमधील दुष्काळग्रस्त 2.27 दशलक्ष हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल, वीज निर्माण होईल, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल आणि परिसरात पूर टाळता येईल.
- नक्की वाचा: तापीनदी माहिती
नर्मदा प्रकल्पाने गंभीर वादाला जन्म दिला आहे. एकीकडे हा प्रकल्प समृद्धी आणि विकासाचे सूचक मानला जात आहे, परिणामी सिंचन, पिण्याच्या पाणीपुरवठा, पूर नियंत्रणरोजगाराच्या नवीन संधी, वीज व दुष्काळ निवारण इत्यादी फायद्यांविषयी बोलले जात आहे. असा अंदाज आहे की यामुळे तीन राज्यात 37000 हेक्टर जमीन बुडेल, ज्यात 13000 हेक्टर वनक्षेत्र आहे.
याद्वारे 248 गावांतील एक लाखाहून अधिक लोक विस्थापित होतील असा अंदाज आहे. त्यापैकी 58 टक्के लोक आदिवासी भागातील आहेत. त्यामुळे बाधित गावांमधील सुमारे 2.5 दशलक्ष लोकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा प्रथम स्थानिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला होता. स्थानिक स्वैच्छिक संस्थांनी स्वत: ला नर्मदा बचाओ आंदोलन म्हणून स्थापन केले तेव्हा 1988-89 दरम्यान या कामांना चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले.
नर्मदा बचाओ आंदोलन- मेधा पाटकर (संस्थापक)
पौराणिक महत्त्व:-
पवित्र मध्ये पवित्र गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी आणि नर्मदा ही पाच पवित्र नद्या आहेत. नर्मदा सर्वात पवित्र आहे. तिला रेवा आणि पूर्वागंगा असेही म्हणतात. असे म्हणतात की नदीचे दृश्य आपल्या पापांपासून शुद्ध होते. विशेष म्हणजे आख्यायिका अशी आहे की जेव्हा गंगाला स्नान करणार्या तिच्या उपासकांचे आभार मानतात, तेव्हा ती नर्मदामध्ये शुद्ध स्नान करण्यासाठी काळ्या गाईच्या रूपात येते! पौराणिक काळात, विनाशांचा देव शिव ध्यान करीत बसला. त्याच्या तीव्र एकाग्रतेमुळे त्याला घाम फुटला. ते खाली उतरताच ते एका खड्यात जमा झाले. अखेरीस, ही शंकराची कन्या नर्मदा किंवा शंकरी म्हणून ओसंडून वाहू लागली. नदीकाठावरील प्रत्येक खडे एखाद्या शिवलिंगाचे आकार घेतात.
धोरणे अथवा प्रकल्प :-
नर्मदा नदी, ज्याला भारतीय मध्य प्रदेश राज्याची जीवनरेखा म्हणून ओळखले जाते, राज्यासाठी पाण्याचे स्त्रोत आहे, तसेच नदीच्या काठावर विविध प्रकारचे वनसंपत्ती व प्राणी आहेत. Trees for Water™ या प्रकल्पाचे उद्दीष्ट नर्मदा नदीच्या परिसंस्थेला बळकटी देण्याचे असून नदीच्या अजिनाल, सुखनी आणि बकुड उपनद्यांच्या काठावर पसरलेले आहे. प्रकल्प साइटच्या आसपासच्या खेड्यांमध्ये राहणा समुदायांच्या सहभागाने एकूण 5०,००० झाडे लावली जातील.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि नर्मदा नदी कोठून कोठे वाहते तिची लांबी किती आहे त्याचबरोबर नदीचे ऐतिहासिक व भौगोलिक महत्व कसे आहे तसेच नदीची वैशिट्ये कोणती आहेत. narmada river information in marathi pdf हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about narmada river in marathi language हा लेख कसा वाटला व अजून काही नर्मदा नदी विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या narmada parikrama in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट