गूगल विषयी माहिती Google Information in Marathi

google information in marathi गूगल विषयी माहिती, गुगल हि एक शोधयंत्र कंपनी असून हि एक अमेरिकन कामाप्नी आहे जी गुगल शोधयंत्र, युट्यूब, अॅडसेन्स, ऑर्कुट आणि यासारख्या अनेक सेवा पुरवते आणि आज आपणया लेखामध्ये गुगल विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. आज गुगल या कंपनी विषयी ओळख करून देण्याची काहीच गरज नाही कारण लहान मुलांच्या पासून ते प्रौढांच्यापर्यंत सर्वांना माहिती आहे कि गुगल काय आहे आणि ते काय करते आणि ते कसे काम करते.

गुगल हे एक सर्च इंजिन म्हणजेच एक शोधयंत्र आहे ज्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची माहिती मिळवू शकतो आणि सध्या या शोधयंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. गुगल हि एक अमेरिकन कंपनी असून या कंपनीची स्थापना ४ सप्टेंबर १९९८ मध्ये सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांनी अमेरिकेतील कॅलीफोर्नियामधील मेलों पार्क या ठिकाणी झाली आणि या कंपनीचे मुख्यालय देखील माउंटन व्ह्यू कॅलीफोर्निया या ठिकाणी आहे आणि या कंपनीमध्ये दहा हजारपेक्षा अधिक लोक काम देखील करत आहेत.

google information in marathi
google information in marathi

गूगल विषयी माहिती – Google Information in Marathi

कंपनीचे नावगुगल
स्थापना४ सप्टेंबर १९९८
संस्थापकसर्जी ब्रिन आणि लॅरी पेज
मुख्यालयअमेरिकेतील कॅलीफोर्नियामधील मेलों पार्क
प्रकारगुगल शोधयंत्र, युट्यूब, अॅडसेन्स, ऑर्कुट आणि यासारख्या अनेक सेवा पुरवणारी कंपनी

गुगल कंपनीचा इतिहास – google meaning in marathi

गुगल या कंपनीची सुरुवात १५ सप्टेंबर १९९७ रोजी नोंदणीकृत झाले आणि मग या कंपनीची खरी स्थापना हि ४ सप्टेंबर १९९८ मध्ये झाली आणि हि स्थापना सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांनी अमेरिकेतील कॅलीफोर्नियामधील मेलों पार्क या ठिकाणी झाली.

गुगल आपल्याकडून माहिती का घेते ?

आपल्याला गुगलवर कोणतेही अकाऊंट बनवत असताना किंवा काहीही करत असताना आपल्या कडून आपली माहिती घेतली जाते आणि त्यावेळी आपल्याला असा प्रश्न पडतो कि गुगल आपल्याकडून माहिती का घेतो तसेच गुगल आपल्या माहितीचे काय करत असेल.

तर गुगल ह्या माहितीचा वापर तुम्हाला चांगल्या सेवा देण्यासाठी तसेच सुधारणा करण्यासाठी आणि तुमचा अनुभव संकुलीत करण्यासाठी वापरतात म्हणजेच हि माहिती गुगल ची सेवा आपल्यासाठी अधिक उपयुक्त बनवण्यात मदत करते.

गुगलची इतर उत्पादने आणि सेवा – products and services

गुगलचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये शोधयंत्र किंवा सर्च इंजिन म्हणून जरी केला जात असला तरी त्याचा वापर इतर सेवा पुरवण्यासाठी देखील केला जातो जसे कि युट्यूब, अॅडसेन्स, ऑर्कुट, गुगल ट्रान्सलेशन, क्रोम, जीमेल, गुगल अॅड्स, गुगल अॅवर्ड, गुगल ब्लॉग, गुगल कॅलेन्डर या सारख्या अनेक सेवा गुगल मार्फत मिळतात आणि आता आपण खाली गुगलचे उत्पादने आणि सेवा पाहणार आहोत.

 • गुगल क्रोम : गुगल क्रोम हे सर्वात लोकप्रिय आणि प्रसिध्द डेस्कटॉप इंटरनेट ब्राऊझर आहे.
 • गुगल डेव्हलोपर : सर्व गुगल विकसक, दस्तऐवज, कार्यक्रम, संसाधने आणि उत्पादने शोधण्याचे ठिकाण म्हणून गुगल डेव्हलोपर काम करते.
 • अॅड्रॉइड : अॅड्रॉइड हे देखील गुगलचे उतपादन आहे आणि स्मार्टफोनसाठी सर्वाधिक वापरलेली ऑपरेटिंग सिस्टीम आहे.
 • जीमेल : १ जीबी पेक्षा जास्त स्टोरेज आणि उपलब्ध सर्वोत्तम स्पॅम संरक्षणासह विनामूल्य इ-मेल सेवा.
 • गुगल अॅड्स : गुगल अॅड्स हि अशी सेवा आहे जी वापरकर्त्यांना गुगल अॅडसेन्स वापरून गुगल शोध इंजिन आणि इतर वेबसाईटवर जाहिरात करण्यासाठी पैसे देण्यास सक्षम करते.
 • गुगल अॅडसेन्स : हि अशी एक सेवा आहे जी वेबसाईट प्रकाशकांना किंवा ब्लॉग विकसकांना त्यांच्या साईटइर जाहिरात दाखवण्यासाठी पैसे देते.
 • ब्लॉगर : ब्लॉगर हे देखील गुगलचे उत्पादन आहे आणि यामध्ये आपण इतर वैयक्तिक ब्लॉग पाहू शकतो आणि आपले स्वताचे ब्लॉग तयार करू शकतो.
 • गुगल पुस्तके : गुगल पुस्तके हि गुगलची आणखीन एक विलक्षण सेवा आहे आणि ज्यामध्ये शेकडो हजारो पुस्तके आहेत जी जी शोधली जाऊ शकतात.
 • गुगल ड्रायव्ह : गुगलने २४ एप्रिल २०१२ मध्ये सादर केलेली क्लाऊड स्टोरेज सेवा आहे जी वापरकर्त्यांना त्यांचे दस्ताऐवज त्यांचे दास्ताऐवज आणि फाईल्स गुगल क्लाऊडमध्ये पाहण्यासाठी, संपादित करण्यासाठी आणि संचयित करण्यासाठी अनुमती देते.
 • गुगल माय मॅप्स : गुगल माय मॅप्स मधील वैशिष्ठ्ये जे त्यांच्या वापरकर्त्यांना वैयक्तिक वापरासाठी सानुकूल नकाशे तयार करण्यास किंवा इतरांसह सामायिक करण्यास अनुमती देते.
 • गुगल लेन्स : गुगल लेन्स हे एक प्रतिमा ओळख तंत्रज्ञान आहे जे वस्तू ओळखते आणि गुगल शोध वापरून त्याच्याबद्दल माहिती प्रदर्शित करते.
 • गुगल मिट : गुगल मिट हे एक व्हिडीओ कॉलिंग अॅप आहे जे गुगल चाट, समकलीत होते होतो आणि हँगआऊट्समध्ये आढळलेल्या कार्यक्षमतेची जागा घेते.
 • गुगल फोटोज : फोटो आणि व्हिडीओसाठी ऑनलाईन क्लाऊड स्टोरेज, वापरकर्त्यांना अपलोड, व्यवस्थापित आणि इतर वापरकर्त्यासोबत शेअर करण्याची अनुमती देते.
 • गुगल प्ले म्युझिक : गुगल प्ले म्युझिक हे एक सेवा आहे जी वापरकर्त्यांना एखाद्या व्यक्तीच्या लायब्ररीमध्ये संगीत प्रवाहित करण्यास, डाऊनलोड करण्यास, अपलोड करण्यास आणि रेडीओ स्टेशन तयार करण्यास आणि ऐकण्यास मदत करते.
 • गुगल पत्रक : गुगल कडून एक विलक्षण विनामूल्य समाधान जे तुम्हाला स्प्रेडशीट तयार करू देते, मायक्रोसॉफ्ट एक्सेल स्प्रेडशीट उघडू देते आणि इंटरनेट प्रवेश असलेल्या इतर वापरकर्त्यांसहतुमची स्प्रेडशीट शेअर करू देते.
 • गुगल साईट्स : गुगल साईट्स एक सेवा जी वापरकर्त्यांना वेबसाईट तयार करण्यास आणि सामायिक करण्यास सक्षम करते.
 • गुगल व्हाईस : तुमचा आवाज वापरून फोनवर गुगल शोध वापरू शकतो.
 • यु ट्यूब : व्हिडीओ सेवा जी वापरकर्त्यांना मुक्तपणे व्हिडिओ अपलोड करण्याची आणि इतरांचे व्हिडीओ पाहण्याची परवानगी देते.

FAQ

Q1. गुगल ची मातृ कंपनी कोणती?

गुगलची मातृ कंपनी अल्फाबेट ही आहे.

Q2. गुगल कंपनी कुठे आहे?

अमेरिका कॅलीफोर्नीया.

Q3. गुगलचा शोध कोणी लावला?

गुगलचे संस्थापक सर्जी ब्रिन आहेत व सहसंस्थापक लॅरी पेज हे आहेत.

Q4. गुगलचा मालक कोण आहे?

गूगलची स्थापना लॅरी पेज व सर्गेई ब्रिन यांनी सप्टेंबर ७, १९९८ रोजी केली. 

आम्ही दिलेल्या google information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गूगल विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या google meaning in marathi या google in marathi information article मध्ये update करू, मित्रांनो हि google chi mahiti माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये google manje kai Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!