टोळ कीटक माहिती Grasshopper Information in Marathi

Grasshopper Information in Marathi टोळ कीटक माहिती आज या लेखामध्ये आपण grasshopper म्हणजेच टोळ या किटका विषयी माहिती घेणार आहोत. टोळ हा जगभरामध्ये आढळणारा एक कीटक आहे आणि या कीटकाच्या जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. या कीटकाच्या एकूण ६ प्रजाती आहेत आणि या सर्व प्रजाती ह्या गवताळ भागामध्ये पाहायला मिळतात. टोळ हे कीटक हे शाकाहारी प्राणी आहेत म्हणजेच ते वनस्पती संबधित अन्न खातात. या किटकाला लहान शिंगे असणारा कीटक म्हणून देखील ओळखले जाते आणि या कीटकांचा आकार आणि रंग हा त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असतो.

टोळ हा असा कीटक आहे जो त्याच्या शरीराच्या लांबीच्या २० पट झेप घेऊ शकतो आणि हे कीटक उडताना ते ताशी ८ मैल वेगाने पोहोचू शकतात. टोळ हा सर्वात जुन्या कीटकांच्या गटामधील एक आहे कारण हा कीटक २५० वर्षापूर्वी पासून पृथ्वीवर अस्तित्वात असल्याचे मानले जाते.

grasshopper information in marathi
grasshopper information in marathi

टोळ कीटक माहिती – Grasshopper Information in Marathi

नाव टोळ
आकार मध्यम ते मोठा
लांबी १ ते ७ सेंटी मीटर
रंग हिरवा, राखाडी किंवा तपकिरी
वर्णन टोळांचे डोळे सहसा मोठे असतात आणि त्यांचा रंग वातावरण पूरक असतो म्हणजेच हिरवा, राखाडी किंवा तपकिरी असतो आणि या किटकाला पंखाच्या २ जोड्या असतात आणि त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारण्यासाठी लांब पाय असतात.

माहिती

टोळ हे कीटक शक्यतो मध्यम ते मोठ्या आकाराचे असतात आणि त्यांचा आकार हा त्यांच्या प्रजातींवर अवलंबून असतो पण सामन्यात टोळ हे कीटक १ ते ७ सेंटी मीटर लांबीचे आतात. या किटकाला पंखाच्या २ जोड्या (एक अरुंद आणि कठीण असतो तर दुसरा रुंद आणि लवचिक असतो)असतात आणि त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारण्यासाठी लांब पाय असतात.

टोळांचे डोळे सहसा मोठे असतात आणि त्यांचा रंग वातावरण पूरक असतो म्हणजे त्यांचा रंग वातावरणाशी जुळवून घेणारा असतो जसे कि हिरवा, राखाडी किंवा तपकिरी. प्रजातींमध्ये नरांच्या पंखांवर चमकदार रंग असतात जे ते मादींना आकर्षित करण्यासाठी वापरतात. काही प्रजाती विषारी वनस्पती खातात आणि त्यांच्या शरीरात विषारी पदार्थ ठेवतात.

मादी टोळ हे नरांपेक्षा मोठे असतात आणि त्यांच्या पोटाच्या शेवटी टोकदार बिंदू असतात जे त्यांना जमिनीखाली अंडी घालण्यास मदत करतात.

शारीरक वैशिष्ट्ये 

 • टोळ या किटकाचे वजन हे त्यांच्या प्रजातींवर अवलंबून असते परंतु सामान्य टोळ किटकाचे वजन हे २५० ते ३०० मिली ग्रॅम इतके असते.
 • टोळ किटकाचा रंग हा राखाडी, तपकिरी किंवा हिरवा असतो पण काही टोळांचा रंग हा अधिक रंगीबेरंगी किंवा चमकदार असतो.
 • टोळ या किटकाची लांबी १ सेंटी मीटर ते १५ सेंटी मीटर इतकी असते.
 • टोळ या कीटकाला २ पंक असतात त्यामधील एक अरुंद आणि कठीण असतो तर दुसरा रुंद आणि लवचिक असतो.
 • त्यांचे लांब पाय त्यांना उडी मारण्यास मदत करतात.

टोळ हे कीटक काय खातात

टोळ हे कीटक शाकाहारी कीटक आहे आणि तो फक वनस्पती संबधित आहार खातात. हे कीटक बहुधा गवत, पाने आणि तृणधान्ये या सारखा आहार खातात आणि त्यांचे गवत हे आवडते अन्न आहे. त्याचबरोबर ते कोणत्याही प्रकारची इतर वनस्पती देखील खाऊ शकतात.

टोळ कीटक कोठे राहतात 

टोळ हे कीटक शेतात, कुरणात किंवा गवताळ भागामध्ये राहतात आणि जवळपास कुठेही त्यांना खायला भरपूर अन्न मिळेल त्या ठिकाणी राहतात.

टोळ या किटकाचे वर्तन कसे असते 

टोळ या कीटकांना गवताळ भागामध्ये राहायला खूप आवडते कारण या किटकाचा गावात हा आवडता आहार आहे आणि हे कीटक गवतासोबत पाने आणि तृणधान्य देखील खातात. हे कीटक शक्यतो दिवसा जास्त प्रमाणात सक्रीय असतात आणि ते काही वेळेस रात्री देखी सक्रीय असतात.

टोळच्या प्रजाती ह्या एकाच ठिकाणी राहत नाहीत किंवा आपले घरटे एकाच ठिकाणी बनवत नाहीत तर ते अन्नाच्या शोधात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतात. जेव्हा टोळ एक ठिकाणाहून उठून दुसऱ्या ठिकाणी उठून जातात तेंव्हा ते उठलेल्या ठिकाणी एक तपकिरी रंगाचा द्रव सोडतात.

टोळ या कीटकांना मोठ्या माश्या, लहान पक्षी आणि उंदीर या प्राण्यांच्या पासून धोका असतो. सहसा, टोळ कीटक माद्यांना आकर्षित करण्यासाठी घासून आवाज काढता  परंतु काही प्रजातींमध्ये, मादी देखील घासून आवाज काढतात तसेच या कीटकांचे मागचे पाय मजबूत आहेत जे त्यांना भक्षकांपासून वाचण्यास मदत करतात.

टोळ कीटकांचा उपयोग 

 • टोळ हे कीटक चीन, जपान इंडोनेशिया आणि इतर काही देशांमध्ये आहारामध्ये वापरले जातात.
 • टोळ या कीटकांना स्वातंत्र्य, ज्ञान आणि अध्यात्मिक इत्यादींचे प्रतिक मानले जाते.

टोळ कीटक चावतात का ?

टोळ या कीटकाच्या काही प्रजाती चावतात ज्यावेळी त्या गटामध्ये असतात त्यावेळी जर तुम्ही टोळ कीटकांशी छेडछाड केली तर ते चावतात. हे कीटक शक्याती विषारी नसतात त्यामुळे चावलेल्या ठिकाणी जास्त इजा होत नाही पण थोडे दुखते.

टोळ या किटकाविषयी काही मनोरंजक आणि अनोखी तथ्ये 

 • कॅलिफेरा या उपखंडामध्ये एकूण ११००० ज्ञात प्रजातींचे टोळ कीटक आढळतात.
 • टोळ हे कीटक त्यांना असणारी दोन शिंगे, चार लहान पाय आणि दोन मोठे पाय त्यांच्या लांब लचक शरीर रचनेमुळे लगेच ओळखता येतात आणि हे टोळ शक्यतो हिरव्या रंगामधेच मोठ्या प्रमाणात आढळतात आणि हिरव्या रंगाचे टोळ सामान्य आहेत.
 • अनेक देशामध्ये टोळ हे कीटक आहारामध्ये वापरले जातात.
 • टोळ हा कीटक शाकाहारी असल्यामुळे तो वनस्पती संबधित आहार खातात जसे कि गावात आणि झाडाची पाने.
 • आकाराने मोठे असणारे टोळ त्यांच्या पंखांच्या मदतीशिवाय त्यांच्या शरीराच्या १० ते २० पात लांब उडी मारण्यास सक्षम असतात.
 • इंद्र धनुष्य रंगाचे टोळ देखील काही ठिकाणी आढळतात.
 • टोळ या किटकाचे आयुष्य फक्त ३० दिवसाचे असते
 • मादी टोळ आणि नर टोळ दिसायला थोडे वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्यामधील फरक लगेच समजण्यासारखा असतो.
 • टोळ या कीटकांचा थवा मोठ्या क्षेत्रावरील पिकाचे नुकसान करू शकतात.
 • टोळच्या प्रजाती ह्या एकाच ठिकाणी राहत नाहीत किंवा आपले घरटे एकाच ठिकाणी बनवत नाहीत तर ते अन्नाच्या शोधात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतात.
 • टोळ हे कीटक शक्यतो दिवसा सक्रीय असतात पण काही प्रजाती रात्री देखील सक्रीय असतात. सामान्य टोळ हे दिवसा आपले अन्न शोधतात आणि रात्रीच्या वेळी विश्रांती घेतात.

आम्ही दिलेल्या grasshopper information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर टोळ कीटक माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या grasshopper insect information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about grasshopper in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये grasshopper information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!