Green Energy Essay in Marathi हरित ऊर्जा मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये ग्रीन एनर्जी म्हणजेच हरित ऊर्जा या विषयावर निबंध लिहिणारा आहोत. अनेकांना असा प्रश्न पडतो कि हरित ऊर्जा (green energy ) म्हणजे काय तर हरित ऊर्जा म्हणजे सूर्यप्रकाश, पाणी किंवा वारा या नैसर्गिक स्तोत्रांच्यापासून जी ऊर्जा निर्माण होते अश्या उर्जेला हरित ऊर्जा असे म्हणतात. सूर्यप्रकाश, पाणी किंवा वारा या सारख्या नैसर्गिक स्तोत्रांच्यापासून पासून निर्माण झालेल्या ऊर्जेपासून वातावरणामध्ये किंवा पर्यावरणामध्ये कोणत्याही प्रकारची हानी पोहचत नाही तर हि ऊर्जा चांगलीच असते.
हरित उर्जेचे स्तोत्र म्हणजे सौर ऊर्जा, भू औष्णिक ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा आणि बायोमास यासारख्या स्तोत्रातून हरित ऊर्जा निर्माण होते. यामधील प्रत्येक स्तोत्र हे वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते जसे कि जसे कि सूर्यापासून ऊर्जा घेवून सौर पॅनेल सुरु केले जाते किंवा चालवले जातात तसेच वायू ऊर्जा वापरून वायू टर्बाइन चालवले जाते आणि अश्या प्रकारे नैसर्गिक ऊर्जा स्तोत्रांचा वापर अनेक प्रकारे करता येतो.
कोळसा, तेल आणि रॉकेल या सारक्या स्तोत्रांच्या पासून देखील ऊर्जा मिळवता येते परंतु कोळसा, तेल आणि रॉकेल यामुळे वातावरणामध्ये विषारी वायू निर्माण होतात आणि म्हणून जर आपण कोणत्याही उपयोगासाठी ऊर्जा मिळवण्यासाठी आपण जर हरित उर्जेचा वापर केला तर प्रदूषण रोकले जाईल आणि आपल्यला वेगवेगळ्या कारणासाठी वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होई.
हरित ऊर्जा मराठी निबंध – Green Energy Essay in Marathi
आता आपण वेगवेगळ्या प्रकारातून ऊर्जा कशी तयार केली जाते हे आपण पाहणार आहोत. सौर ऊर्जा म्हणजेच आपण सूर्याच्या किरणच्या पासून जी ऊर्जा मिळवतो त्याला सौर ऊर्जा म्हणतात आणि हा नैसर्गिक रित्या ऊर्जा मिळवण्याचा एक महत्वाचा आणि चांगला स्तोत्र आहे. हरित ऊर्जा स्तोत्र हा फोटोव्होल्टेक पेशींचा वापर करून बनवला जातो आणि या पेशी सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि मग त्याचे विजेमध्ये रुपांतर होते आणि आपण जी वीज वापरतो ती अश्या प्रकारे तयार केली जाते आणि अनेक प्रकारे नैसर्गिक ऊर्जा वापरून वीज बनवली जाते.
सौर ऊर्जा हि सध्या खूप स्वस्थ झाली आहे म्हणजेच हि सर्वांना परवडण्यासारखी आहे त्यामुळे याचा वापर हा अनेक घरगुती कारणांच्यासाठी केला जातो. जलविद्युत ऊर्जा हि देखील एक हरित ऊर्जा आहे आणि या उर्जेला हायड्रोइलेक्ट्रिक ऊर्जा म्हणून देखील ओळखले जाते आणि या प्रकारची ऊर्जा हि नद्या, नाले, धरणे यासारख्या पाण्याच्या प्रवाहापासून निर्माण केली जाते.
पवन ऊर्जा किंवा वायू ऊर्जा हि देखील एक महत्वाची नैसर्गिक ऊर्जेपासून तयार झालेली ऊर्जा आहे आणि हि उंच भागावरून निर्माण केली जाते उदाहरणार्थ पवन चक्की ह्या आपल्याला माहित आहेत या येणाऱ्या वाऱ्यापासून वीज निर्मिती करतात आणि या प्रकारच्या ऊर्जा निर्मितीला पवन ऊर्जा म्हणून ओळखले जाते. हरित ऊर्जा स्तोत्र म्हणून ओखले जाणारे बायोमास ह्या हरित ऊर्जा स्तोत्राचा वापर हा खूप चांगल्या प्रकारे आणि काळजी पूर्वक करणे खूप अवश्यक आहे.
बायोमास ऊर्जा प्रकल्पामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी लाकडाचा भुसा, लाकडाचा कचरा, ज्वलनशील सेंद्रिय आणि कृषी कचरा वापरण्यात येतो. या प्रकारचे साहित्य जाळल्यामुळे या मधून हरितगृह वायू बाहेर पडतो. वर नमूद केल्याप्रमाणे बायोमास जाळण्याऐवजी या सेंद्रिय पदार्थांचे इथेनॉल आणि बायोडिझेलसारख्या इंधनात रूपांतर करता येते.
२०१० मध्ये वाहतुकीसाठी जगातील फक्त २.७ टक्के इंधनाचा पुरवठा केल्यामुळे २०५० पर्यंत जागतिक वाहतूक इंधनाच्या २५ टक्के पेक्षा जास्त मागणी पूर्ण करण्याची क्षमता जैवइंधनांमध्ये आहे. अश्या प्रकारे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक उर्जेचा वापर हा वेगवेगळ्या कारणांच्यासाठी होते तसेच जास्तीत जास्त हरित उर्जेचा वापर हा वीज निर्मितीसाठी केला जातो.
हरित उर्जेचे फायदे – benefits of green energy
हरित ऊर्जा म्हणजे सूर्यप्रकाश, पाणी किंवा वारा या नैसर्गिक स्तोत्रांच्यापासून जी ऊर्जा निर्माण होते अश्या उर्जेला हरित ऊर्जा असे म्हणतात. सूर्यप्रकाश, पाणी किंवा वारा या सारख्या नैसर्गिक स्तोत्रांच्यापासून पासून निर्माण झालेल्या ऊर्जेपासून वातावरणामध्ये किंवा पर्यावरणामध्ये कोणत्याही प्रकारची हानी पोहचत नाही तर आपल्याला त्याचे फायदेच होतात. ते आता आपण खाली पाहूयात.
- हरित ऊर्जा हि एक स्वच्छ ऊर्जा आहे आणि यापासून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.
- शाश्वत जैवइंधन आणि नवीकरणीय वीज अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये वाहतुकीसाठी वापरात आहे. ऑटोमोटिव्ह हे एक स्पष्ट उदाहरण आहे कारण जीवाश्म इंधन बदलण्यासाठी विद्युतीकरण प्रगती करत आहे
- हरित ऊर्जा हे अक्षय ऊर्जा स्तोत्र आहे.
- मोठ्या ऑफिस मध्ये तसेच लोकांच्या घरांपर्यंतच्या इमारतींसाठी ग्रीन एनर्जी सोल्यूशन्सचा वापर केला जात आहे. यामध्ये सोलर वॉटर हीटर्स आणि बायोमास इंधनावर चालणारे बॉयलर.
- या ऊर्जेमुळे कोणत्याही प्रकारचे कार्बन उत्सर्जन होत नाही त्यामुळे या ऊर्जेमुळे हवेमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होते नाही.
- हरित ऊर्जा हि एक स्वातंत्र्य, स्वयंपूर्ण आणि टिकवू ऊर्जा आहे जी मानवासाठी उपयुक्त ठरते.
- औद्योगिक प्रक्रियांसाठी अक्षय उष्णता बायोमास किंवा अक्षय वीज वापरून चालविली जाऊ शकते. हायड्रोजन आता सिमेंट, लोखंड, पोलाद आणि रासायनिक उद्योगांसाठी नूतनीकरणक्षम उर्जेचा एक मोठा प्रदाता आहे.
- हरित ऊर्जा हि पर्यावरणास अनुकूल असते.
- पवन ऊर्जा किंवा वायू ऊर्जा हि देखील एक महत्वाची नैसर्गिक ऊर्जेपासून तयार झालेली ऊर्जा आहे आणि हि उंच भागावरून निर्माण केली जाते उदाहरणार्थ पवन चक्की ह्या आपल्याला माहित आहेत या येणाऱ्या वाऱ्यापासून वीज निर्मिती करतात आणि या प्रकारच्या ऊर्जा निर्मितीला पवन ऊर्जा म्हणून ओळखले जाते.
आम्ही दिलेल्या Green Energy Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर हरित ऊर्जा मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Green Energy Essay in Marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Essay on Green Energy in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट