गुजरात विषयी माहिती Gujarat Information in Marathi

Gujarat information in Marathi गुजरात विषयी माहिती, गुजरात हे भारतातील एक राज्य आहे आणि आज आपण या लेखामध्ये गुजरात या राज्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. गुजरात हे राज्य भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्राच्या जवळ स्थित आहे आणि हे एक समृध्द राज्य म्हणून ओळखले जाते. गुजरात या राज्याचे क्षेत्रफळ हे १९६०२४ इतके आहे आणि या राज्याची संख्या ६.४८ कोटी इतकी आहे आणि या राज्यामध्ये एकूण ३३ जिल्हे आहेत. गुजरात हे भारतामधील पश्चिम किनारपट्टीवर स्थित असलेले एक राज्य आहे. हि राज्याजवळ असणारी किनारपट्टी १६०० कि मी लांब आहे आणि हि सर्वात लांब किनारपट्टी आहे.

गुजरात राज्याच्या वायव्येला पाकिस्तान आणि उत्तरेला राजस्थान आणि पूर्वेला मध्य प्रदेश आणि अग्नेयला महाराष्ट्र अश्या राज्यांनी वेढले आहे आणि या राज्याची राजधानी गांधीनगर हे शहर असून या राज्यातील अहमदाबाद हे शहर सर्वात मोठे शहर आहे.

गुजरात ह्या राज्याची खूप प्राचीन काळापासून ओळख आहे. कारण इंग्रजांनी भारतामध्ये या राज्यामधील सुरत या शहरामधून १८१८ मध्ये प्रवेश केला होता आणि त्यांनी त्यांची पहिली कंपनी म्हणजेच इस्ट इंडिया कंपनी देखील सुरत मध्ये स्थापन केली होती आणि म्हणून या राज्याला एक ऐतिहासिक ओळख लाभली आहे.

gujarat information in marathi
gujarat information in marathi

गुजरात विषयी माहिती – Gujarat Information in Marathi

राज्याचे नावगुजरात
क्षेत्रफळ१९६०२४
राज्याची संख्या६.४८ कोटी
जिल्हे३३ जिल्हे
राजधानीगांधीनगर

गुजरात मधील उद्योग – industries

डेअरी, पेट्रोकेमिकल्स, ड्रग्स, रसायने, फार्मास्युटिकल, रत्ने, दागिने, सिरॅमिक्स, कापड, अभियांत्रिकी आणि सिमेंट या सारख्या अनेक वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये गुजरात हे राज्य आघाडीवर आहे. ४ लाख हून अधिक लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग आहेत तर ८०० हून अधिक मोठे उद्योग आहेत.

गुजरातमध्ये ३३०० पेक्षा जास्त फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चारिंग युनिट्ससह विकसित फार्मास्युटिकल क्षेत्रे आहेत आणि २०१८ – २०१९ मध्ये भारताच्या एकूण फार्मा क्षेत्रातील उलाढालीमध्ये सुमारे ३० टक्के आणि भारताच्या फार्मा निर्यातीमध्ये सुमारे २८ टक्के योगदान गुजरात राज्याने दिले आहे. त्याचबरोबर गुजरात हे राज्य प्रक्रिया केलेल्या हिऱ्यांचे जगातील सर्वात मोठे उत्पादक असल्याचे नोंदविले जाते.

जगातील प्रक्रिया केलेल्या हिऱ्यांचा वाटा ७२ टक्के आणि भारताच्या हिऱ्यांच्या निर्यातीपैकी ८० टक्के इतका आहे. त्याचबरोबर गुजरातच्या डेनिम उत्पादनाचा भारताच्या एकूण उत्पादनात ६५ ते ७० टक्के वाटा आहे आणि यामुळे गुजरात राज्य हे देशतील सर्वात मोठे डेनिम उत्पादक आहेत आणि हे जगामध्ये डेनिम उत्पादनामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

गुजरात पाहाण्यासारखी ठिकाणे – gujarat paryatan sthal

अरबी समुद्राच्या किनार्यावर असलेले गुजरात हे राज्यामध्ये पाहण्यासारखे म्हटले तर निसर्गरम्य समुद्रकिनारा, राजवाडे, मंदिरे, वन्यजीव अभयारण्ये, टेकडी रिसॉर्ट आणि अनेक प्रकारे नैसर्गिक भव्यता आपल्याला गुजरात या राज्यामध्ये पहायला मिळते.

राज्याच्या प्रमुख आकर्षणापैकी भारतातील आशियाई सिंहाचा एकमेव अधिवास म्हणून गुजरात ह्या राज्याला ओळखले जाते तसेच जंगली गाढव अभयारण्य, अहमदाबादचे इंडो सारासेनिक वास्तुकला यांचा समावेश आहे. कच्छमधील रंगीबेरंगी आदिवासी गावे देखील लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत तसेच गुजरातचा विस्तीर्ण किनारा हा अद्वितीय सागरी प्रजातींचे घर आहे.

गुजरात संगीत – music

गुजरातचे लोकसंगीत हे सुगम संगीत म्हणून ओळखले जाते आणि त्याची जगभरामध्ये ख्याती आहे आणि तसेच गुजराती लोकसंगीतामध्ये वापरल्या जाणार्या वाद्यांच्या श्रेणीमध्ये एकतारो, झांज पॉट ड्रम, डोल, प्रभाती, जंतर, मंजिरा या सारख्या संगीत वाद्यांचा समावेश आहे. गुजरातच्या लोकसंगीतामध्ये भजनाचा समावेश केलेला आहे.

नृत्य प्रकार – dance

गुजरातमध्ये संगीताचे वेगवेगळे प्रकार तर आहेतच परंतु गुजरातमधील नृत्य देखील तितकेच लोकप्रिय आहे आणि गुजरातमध्ये चार प्रमुख प्रकार आहेत ते म्हणजे दांडिया, गरबा, गरबी आणि पधार.

  • गरबा : गरबा हा गुजरात मधील एक लोकप्रिय प्रकार आहे आणि गरबा हा सामन्यता स्त्रिया गोलाकार स्वरुपात सदर करतात. हे देवत्वच्या स्त्रीलिंगी रूपाच्या आदराने केले जाते.
  • दांडिया : दांडिया रस हि स्त्री आणि पुरुष दोघेही करतात आणि यामध्ये छोट्या छोट्या बाम्बुंच्या काठ्यांचा वापर हा दांडिया खेळण्यासाठी केला जातो आणि याला दांडिया म्हणतात. दांडिया हा नृत्य प्रकार हा प्राचीन काळापासून खूप लोकप्रिय आहे आणि ती भगवान श्री कृष्नांच्या प्रिय गोपींनी खेळली होती.
  • पधार : हे मुख्यता नल तलावाजवळील ग्रामीण समुदाय करतात.
  • गरबी : गरबी हा नृत्य प्रकार पारंपारिकपणे फक्त पुरूषच करतात आणि त्यामध्ये ढोल आणि मंजिरासारख्या वाद्यांचा वापर केला जातो.

गुजरात राज्याविषयी काही विशेष तथ्ये – facts

  • ज्यावेळी इंग्रजांनी १८१८ मध्ये गुजरात मधील सुरात या शहरातूनच भारतामध्ये प्रवेश केला म्हणजेच त्यांनी भारतामध्ये सुरत या शहरामध्ये पहिले पाऊल ठेवले होते.
  • गुजरात हे भारताच्या राज्यामधील एक सुरक्षित राज्य आहे म्हणजेच या राज्यामध्ये भारतातील इतर राज्यांच्यापेक्षा खूप कमी अपराध होतात.
  • गुजरात या राज्याचे क्षेत्रफळ हे १९६०२४ इतके आहे आणि या राज्याची संख्या ६.४८ कोटी इतकी आहे आणि या राज्यामध्ये एकूण ३३ जिल्हे आहेत. गुजरात हे भारतामधील पश्चिम किनारपट्टीवर स्थित असलेले एक राज्य आहे.
  • गुजरात राज्याच्या वायव्येला पाकिस्तान आणि उत्तरेला राजस्थान आणि पूर्वेला मध्य प्रदेश आणि अग्नेयला महाराष्ट्र अश्या राज्यांनी वेढले आहे.
  • निसर्गरम्य समुद्रकिनारा, राजवाडे, मंदिरे, वन्यजीव अभयारण्ये, टेकडी रिसॉर्ट आणि अनेक प्रकारे नैसर्गिक भव्यता आपल्याला गुजरात या राज्यामध्ये पहायला मिळते.

आम्ही दिलेल्या gujarat information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गुजरात विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gujarat state information in marathi या gujarat vishe mahiti article मध्ये update करू, मित्रांनो हि information about gujarat in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये gujarat paryatan sthal Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!