हरभजन सिंग मराठी माहिती Harbhajan Singh Biography in Marathi

Harbhajan Singh Biography in Marathi – Harbhajan Singh Information In Marathi हरभजन सिंग मराठी माहिती भारतातील क्रिकेट खेळाडू बद्दल सांगायचं झालं तर भारतामध्ये एकापेक्षा एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू आहेत ज्यांनी भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवलं. त्यातीलच एक म्हणजे हरभजन सिंग होय. हरभजन सिंग हे भारतीय क्रिकेट क्षेत्रातील एक सर्वोत्तम क्रिकेटपटू आहेत ज्यांनी कधीच हार मानली नाही. हरभजन सिंग हे भारतीय माजी क्रिकेटपटू व क्रिकेट समालोचक आहेत ज्यांचा भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये समावेश होता. ते एक विशेषज्ञ फिरकी गोलंदाज आहेत. या ब्लॉगमध्ये आपण हरभजन सिंग यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Harbhajan Singh Biography in Marathi
Harbhajan Singh Biography in Marathi

हरभजन सिंग मराठी माहिती – Harbhajan Singh Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)हरभजन सिंग
जन्म (Birthday)११ ऑक्टोंबर १९९३
जन्म गाव (Birth Place)गुजरातच्या सुरत
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

Harbhajan Singh Information In Marathi

जन्म व वैयक्तिक आयुष्य

पंजाब येथील जालंदर येथे हरभजन सिंग यांचा जन्म झाला. ३ जुलै १९८० रोजी हरभजन सिंग जन्माला आले. त्यांचे वडील सरदार सरदेव सिंग हे व्यापारी होते आणि त्यांचा बाॅल बेरिंग चा स्वतःचा कारखाना होता. त्यांची आई अवतार कौर एक उत्तम गृहिणी होत्या त्यांच्या वडिलांनी हरभजन सिंग यांना क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायला सांगितलं. हरभजन सिंग यांना पाच बहिणी आहेत.

एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांना कौटुंबिक व्यवसाय करण्याची संधी मिळत होती परंतु वडिलांचा आग्रह होता की त्यांनी क्रिकेट मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करावं. पुढे हरभजन सिंग यांच प्रशिक्षण रणजीत सिंग भुललर यांच्याकडे फलंदाजीचे शिक्षण घेत होते परंतु त्यांच्या मृत्यूनंतर पुढे हरभजन सिंग यांनी फिरकी गोलंदाज म्हणून प्रशिक्षक दविंदर अरोरा यांच्या हाताखाली प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली.

पुढे त्यांनी ऑफ स्पिन गोलंदाजी च प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. वडिलांच्या मृत्यूनंतर हरभजन सिंग यांनी घरातले कर्ता म्हणून आपल्या तीन बहिणींची लग्न लावून दिली. २९ ऑक्टोंबर २०१५ मध्ये हरभजन सिंग यांनी बॉलिवूड अभिनेत्री गीता बासरा यांच्याशी जालंधर येथे विवाह केला. या दोघांचा प्रेमविवाह झाला. त्यांना हिनाया नावाची मुलगी आहे. व एक मुलगा देखील आहे. हरभजन सिंग यांना लाडाने भज्जी असे नाव ठेवण्यात आले आहे. ते संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये याच नावाने ओळखले जातात.

क्रिकेट कारकीर्द

सन २००० मध्ये हरभजन सिंग यांच्या वडिलांचं निधन झालं परंतु त्यांच्या वडिलांची भरपूर इच्छा होती की हरभजन सिंग यांनी क्रिकेटमध्ये करियर करावं.

वडिलांच्या सांगण्यावरून हरभजन सिंग यांनी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. अतिशय सराव करून पंधरा वर्षाचे असताना हरभजनसिंग पंजाब राज्याच्या अंडर सिक्सटीन संघासाठी १९९५ मध्ये हरियाणा विरुद्ध देशांतर्गत खेळले. तेव्हा त्यांच क्रिकेट क्षेत्रात पहिल पाऊल पडलं. बत्तीस विकेट आणि ९६ धावा अशी उत्तम खेळी रचल्यामुळे त्यांची निवड उत्तर विभागीय अंडर सिक्सटीन संघासाठी केली. कालांतराने त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी राष्ट्रीय अंडर नाईन्टीन युवा संघात समाविष्ट करून घेतले.

पुढे त्यांना पंजाब अंडर नाईन्टीन मध्ये पाठवण्यात आले आणि त्यांनी रणजी ट्रॉफी १९९७- १९९८  प्रथम श्रेणी पदार्पण केलं. १९९८ मध्ये हरभजन सिंग यांनी अंडर नाईन्टीन वर्ल्डकप मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. हरभजन सिंग १८ वर्षाचे असताना त्यांनी वन-डे आणि कसोटीत पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांचा पहिला कसोटी सामना १९९८ साली रंगला या सामन्यात त्यांनी दोन विकेट घेतल्या. १९९७ मध्ये कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन साठी खेळण्यासाठी हरभजन सिंग यांची निवड करण्यात आली.

सराव सामन्या मध्ये त्यांची कामगिरी उत्कृष्ट नव्हती त्यामुळे पहिल्या दोन कसोटीत त्यांचा समावेश नव्हता परंतु तिसऱ्या कसोटीत त्यांना घेतलं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरभजन सिंग यांचे पदार्पण झालं परंतु त्यांनी एकच विकेट घेतली. शारजहा मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळताना हरभजन सिंग यांनी वनडे पदार्पण केलं. २००१ मध्ये हरभजन सिंग यांची बॉर्डर गावस्कर ट्राफित निवड झाली बत्तीस विकेट घेत हरभजन सिंग संपूर्ण कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारे फिरकीपटू ठरले. यासोबतच त्यांनी कसोटीत हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज हा रेकॉर्ड देखील तयार केला.

क्रिकेट क्षेत्रातील त्यांची कारकीर्द पाहून पंजाब सरकारने २००२ मध्ये हरभजन सिंग यांना मानद पंजाब पोलीस उपअधीक्षक पद दिले. त्यांना तत्कालीन पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग यांनी पंजाब का पुत्तर या नावाने संबोधलं. २००३ च्या विश्‍वचषक स्पर्धेत हरभजन सिंग यांच्या बोटाला थोडे दुखापत झाली होती ज्यामुळे त्यांना कालांतराने एक शस्त्रक्रिया करावी लागली व सात महिने क्रिकेटपासून लांब राहावे लागले. या घटनेनंतर ते अनेक वादग्रस्त घटनांमध्ये सामील होते. २००७ मध्ये अँड्रयू सायमंडची वर्णद्वेषावरून बदनामी केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हरभजनसिंग यांच्यावर बंदी घातली होती.

एका सामन्यांमध्ये शांताकुमारन श्रीसंत ला कानाखाली मारल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ओडीआय संघातून हरभजनसिंग यांना निलंबित केले. शस्त्रक्रियेनंतर त्यांना खेळण्यांमध्ये थोडाफार अडचणींचा सामना करावा लागला म्हणून २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करू शकले नाहीत आणि त्यांना स्पर्धेतून वगळण्यात आले. कालांतराने आईसीसी विश्व ट्वेंटी-ट्वेंटी ही स्पर्धा जिंकून त्यांनी मोलाची भर घातली. संपूर्ण मोसमात त्यांनी बऱ्याच वेळा मॅच विनिंग परफॉर्मन्स सादर केले.

आयपीएल मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केल्यामुळे २०११ मध्ये विश्वचषक संघात त्यांचं पुनरागमन झाल. हरभजन सिंग यांनी त्यांच्या पुढील क्रिकेट कारकिर्दीमध्ये भारतीय क्रिकेट कार्निवल मध्ये यश संपादन केलं. आयपीएल मध्ये खेळत असताना ते मुंबई इंडियन्स टीम मध्ये होते. मुंबई इंडियन्स आयपीएल मधली सर्वात शक्तिशाली संघांपैकी एक आहे. या संघाने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे आणि त्यामध्ये हरभजन सिंग यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

२००८ पासून हरभजन सिंग हे संघाचे नियमित खेळाडू व कर्णधार देखील राहिले आहेत. २०१३ मध्ये घडलेल्या आयपीएल मोसमात २४  विकेट्स घेतल्या. एक संपूर्ण दशक‌ मुंबई इंडियन्स मध्ये योगदान दिलं आणि कालांतराने चेन्नई सुपर किंग्स सोबत करार केला‌. आयपीएल मधील हरभजन सिंग यांची कारकीर्द सगळ्यात उत्कृष्ट ठरली.

मुंबई इंडियन्स कडून खेळत असताना त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत १४७ विकेट घेतल्या आहेत त्यामुळे मुंबईकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत हरभजन सिंग यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. २००८ ते २०१७ पर्यंत त्यांनी मुंबई इंडियन्स मध्ये आपली आयपीएलची कारकीर्द रचली. हरभजन सिंग यांच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०११ चॅम्पियन्स लीग टी-२० जिंकली होती. २०१९ मध्ये हरभजन सिंग यांनी विश्‍वचषक सामन्यांमध्ये समालोचना चे काम केले.

२०१२ आणि २०१३ रणजी ट्रॉफी हंगामासाठी पंजाबचे कर्णधार हरभजन सिंग यांच्याकडे होते. ऑफ स्पिनर म्हणून कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे हरभजन सिंग हे श्रीलंकेतील मुथय्या मुरलीधर यांच्या नंतरचे दुसरे खेळाडू आहेत. २००३ मध्ये हरभजन सिंग यांना अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. भारतातील सर्वोच्च पुरस्कारपैकी एक मानला जाणारा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार हरभजन सिंग यांना २००९ मध्ये प्रदान करण्यात आला. पा

ठोपाठ कसोटी शतके झळकावणारा हरभजन सिंग हे पहिल्या आठ फलंदाजंपैकी एक आहेत. कसोटी सामन्यांमध्ये चारशे विकेट घेणारे हरभजन सिंग हे सर्वात तरुण भारतीय आहेत. तीन हा  हरभजन सिंग यांचा लकी नंबर आहे म्हणून ते कोणत्याही संघात खेळत असले तरी तिसऱ्या क्रमांकाचीच जर्सी घालायचे. आपल्या भारताला अनेक उत्कृष्ट क्रिकेटपटू लाभलेले आहेत आणि त्यातीलच एक म्हणजे हरभजनसिंग व त्यांनी भारताच्या क्रिकेट क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय‌ योगदान दिले आहे.

एक प्रतिष्ठित क्रिकेट पटू म्हणून ओळखले जातात. २०२१ मध्ये हरभजन सिंग यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान स्थापन केलं. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ते नावाजले जातात. हरभजन सिंग यांनी भारतातर्फे १०३ कसोटी सामने आणि २३६ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

राजकीय कारकीर्द

क्रिकेटव्यतिरिक्त हरभजन सिंग यांनी राजकीय क्षेत्रात देखील पाऊल टाकले. २०२२ मध्ये आम आदमी पार्टीने पंजाब राज्यातील त्यांच्या पाच उमेदवारांपैकी एक म्हणून हरभजन सिंग यांची राज्यसभेवर निवड केली त्यांनी बिनविरोध विजय प्राप्त करून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले.

आम्ही दिलेल्या harbhajan singh biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर हरभजन सिंग मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या harbhajan singh information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of harbhajan singh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!