हार्मोनियम वाद्याची माहिती Harmonium Information In Marathi

harmonium information in marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण हार्मोनियम म्हणजेच मराठीत आपण त्याला सुरपेटी म्हणतो, त्याची थोडक्यात harmonium marathi mahiti माहिती पाहणार आहोत. भारतीय संगीत हे मूलतः बैठकीचे असल्यामुळे खाली बसून वाजिवण्यासाठी भरपूर वाद्ये वापरात आली. त्यापैकीच हार्मोनियम harmonium meaning in marathi म्हणजेच संवादिनी हे एक. संवादिनी हे नाव भारतीय वाद्याचे आहे असे वाटते, पण ते तसे नाही. हार्मोनियम या मूळ पाश्चात्त्य वाद्याचे ते भारतीय नाव संवादिनी आहे. इ. स. १७७० च्या आसपास आँर्गन या रीङवाल्या वाद्यामध्ये काही नवे प्रयोग होण्यास सुरुवात झाली. मुळात तीन स्वरांचा मेळ जो पाश्चात्त्य संगीतात आवश्यक असतो, तो साध्य करण्याचे उद्दिष्ट ज्या वाद्याने साध्य होते, तशा वाद्यांची आवश्यकता नव्या रीङ वाद्यांमध्ये निर्माण होऊ लागली. म्हणून १८४० मध्ये अलेक्झांर दिबेन (फ्रान्स) याने अशा स्वरपट्ट्या असणारे हे हलक्या वजनाचे वाद्य शोधून काढले. ज्याला आपण आज हार्मोनियम असे म्हणतो.

harmonium-information-in-marathi
harmonium information in marathi/harmonium marathi mahiti/harmonium in marathi

हार्मोनियम विषयी माहिती harmonium information in marathi

रसिक प्रेक्षक हो आपण या लेखामध्ये हर्मोनियम या वाद्याबद्दल माहिती पाहणार आहोत, यामध्ये हर्मोनियमचा इतिहास, वाद्याची जडणघडण हार्मोनियम कसे शिकावे भारतात हार्मोनियमचे स्थान याबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत.

माऊथ ऑर्गनची विषयी माहिती 

हार्मोनियमचा इतिहास 

हार्मोनियम म्हणजेच बाजाची पेटी हिचा शोध पॅरिस मध्ये अलेक्झांडर डिबेन यांनी इ.स. १७७० मध्ये लावला. भारतात हे वाद्य युरोपीय लोकांनी इ.स.१८०० नंतर आणले. हाताने किंवा पायाने भात्याद्वारे हवा भरून पितळी कंपन तयार करणाऱ्या शिट्ट्यांच्या मार्फत सुरेल ध्वनी निर्माण होतो. या मध्ये डावीकडील बाजूकडून सुरुवात केल्यास पहिला २ व नंतर ३ असे काळ्या पट्ट्यांचे तीन समूह असतात. भारतीय संगीतात हार्मोनियमचा गायकाला साथ देण्यासाठी किंवा एकलवादनासाठी उपयोग होतो. कीर्तने, सुगम संगीत इत्यादी ठिकाणी हार्मोनियम साथीला असतो.

हार्मोनियम म्हणजे काय? harmonium meaning in marathi

 • हार्मनी म्हणजेच याचा अर्थ स्वरांच्या मिश्रणाने साधला जाणारा संवाद होय. याला सहज भाषेत स्वरमिश्रण म्हणतात. एकमेकाना अनुकूल असणाऱ्या स्वरांच्या संवादामुळे भारतीय संगीतकारांनी या वाद्याचे नाव संवादिनी ठेवले. हार्मोनियम विदेशातून आलेले हे पहिलेच वाद्य नाहीये तर यापूर्वी व्हायोलिन हे वाद्य भारतात आले होते. हार्मोनियम या वाद्यामध्ये मूलभूत बदल झाले ते बंगालच्या कारागिरानी बनविलेल्या हातपेटीमुळे.
 • १८७५ मध्ये कलकत्त्याच्या द्वारिकानाथ घोष यांनी सर्वप्रथम भारतीय संगीताला उपयुक्त हार्मोनियमची निर्मिती केली. द्वारिका दास या त्यांच्या फर्मने आधुनिक हातपेटीची भारतात पहिल्यांदा निर्मिती आणि विक्री केली व त्यानंतर टी. एस्. रामचंद्र ॲन्ड कंपनीने महाराष्ट्रात याची निर्मिती सुरू केली त्यापाठोपाठ गुजरातमध्ये अहमदाबाद येथे गणपतराव बर्वे यांनी हार्मोनियम बनवले.
 • दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधून आँर्गनची आयातही बंद झाली आणि मग भावनगरमध्ये आणि पालिटाणामध्ये पेट्यांसहित ध्वनिपट्ट्यांचीही निर्मिती सुरू झाली. त्यानंतर मग दर्जेदार हार्मोनियम महाराष्ट्र, गुजरात, बंगाल आणि पंजाब प्रांतात बनविले जाऊ लागले. झीलु सुतार आणि रामचंद्र हुदलीकर यानी बेळगावमध्ये उत्तम दर्जाचे हार्मोनियम बनविले. हुदलीकर यांचा २२ श्रुतियुक्त हार्मोनियम बनिवण्यात हातखंडा होता.

हार्मोनियम या वाद्याची जडणघडण

पाश्चात्त्य हार्मोनियम हिंदुस्तानी संगीतासाठी कधी उपयोगात आणले जाईल याची शक्यताच नव्हती; परंतु उस्ताद अब्दुल करीमखाँ यांचे शिष्य बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी यानी गंधार ट्यून्ङ हार्मोनियम बनवून ते हिंदुस्तानी गायकीला योग्य बनविले व ते पुढे उपयोगाला आणले जाऊ लागले. गं. बा. आचरेकर यानी श्रुति हार्मोनियम बनविले अन् त्यांचेच चिरंजीव बा. गं आच्ररेकर यानीही ते कार्य पुढे चालविले. ङाँ. विद्याधर ओक यानीही २२ श्रुतींची मेलोङियम बनविली आहे तसेच बेळगावचेच हरी गोरे यानी पितळेचा रस तयार करुन रीड्स बनविण्याचा कारखाना सुरू करून स्वदेशी चळवळीला प्राधान्य देऊन संपूर्ण भारतीय बनावटीचे हार्मोनियम बनविले. त्यांच्या हार्मोनियमला कलकत्ता, दिल्ली आणि इतर संगीतपेठांत मागणी होती. ते वाद्यसंगीताला आवश्यक स्वरपेट्याही उत्तम बनवीत. म्हैसूरच्या महाराजानी त्यांचा या कार्याबद्दल गाैरवही केला होता. हरिभाऊ गोरे यांनी चार स्वर असणाऱ्या वाद्यांना षड्ज-पंचम- मध्यमाचा स्वरपुरवठा करणाऱ्या छोट्या तंबोरापेट्याही निर्माण केल्या. पंडित पन्नालाल घोष, पंडित व्ही जी. जोग या महान वादक कलाकारांनी या सुलभ तंबोरा पेट्यांचा वापर सुरु केला आणि वजनाने हलक्या व प्रवासात सहज नेऊ शकणाऱ्या या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून दिली.

हार्मोनियम कसे शिकावे 

मराठीमध्ये हार्मोनियम कसे शिकावे या वरती लवकरच आम्ही माहिती घेऊन येऊ जर तुमच्याकडे याबद्दल योग्य माहिती असेल तर या
harmonium information in marathi विषयाचा विस्तार करण्यास मदत करावी.

तबला वाद्याबाद्द्ल माहिती 

भारतीय संगीतामध्ये सुरपेटीचे स्थान!

 • भारतीय संगीतासाठी या वाद्याचा प्रथम प्रयोग झाला तो मराठी संगीत नाटकांच्या माध्यमातून १८८२ साली.
 • संगीत शाकुंतल या पहिल्या संगीत नाटकाने आँर्गनचा उपयोग केला व त्यानंतर संगीत साैभद्र हे नाटकही त्यातल्या संगीतासाठी आणि ऑर्गनच्या साहाय्याने गाजले.
 • मराठी संगीत नाटकानी शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींचाही पदांसाठी उपयोग केला आणि त्यातूनच हार्मोनियमचे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामधले स्थान बळकट होत गेले.
 • या नाट्यसंगीताच्या माध्यमातूनच एका स्वतंत्र स्वरवाद्याची देणगी म्हणजेच हार्मोनियम ची देणगी भारतीय संगीताला मिळाली. किर्लोस्कर नाटक मंडळी चे दादा मोडक ह्यांनी 1882 मध्ये सर्व प्रथम हार्मोनियम वादक बनण्याचा मान मिळवला तर प्रथम स्वतंत्र वादकाचा मान हा ग्वाल्हेर च्या भैया गणपतराव शिंदे ह्यांना जातो.
 • एकोणीसाव्या शतकाच्या आरंभापासून हार्मोनियम हे साथीचे वाद्य म्हणून सर्वमान्य झाले.
 • सर्व गायकानी या वाद्याला अगदी खुशीने स्विकारिले. ज्यांचे गायन श्रुतियुक्त असे त्यानीही हार्मोनियम साथीला घेतले आणि गायकांचे सुर सहजपणे सामावून घेऊन त्याना जोरकसपणा देण्याचे कामही हार्मोनियमने केले.
 • परंतु मींडकाम करता न येणे, गमक न निघणे अशा काही कारणांमुळे स्वतंत्र वाद्य म्हणून त्याची मान्यता आकाशवाणीने बाळकृष्ण केसकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या कारकिर्दीत रद्द केली होती.
 • रामभाऊ विजापुरे हे बेळगावचे हार्मोनियमवादक यानी १९४५ साली हैदराबाद आकाशवाणीवर स्वतंत्र वादनाचा सर्वात पहिला कार्यक्रम केला. तिथले निजाम सरकारचे कायदे कानून इतर परगण्यांपेक्षा वेगळे असल्याने हे सहज शक्य झाले. पण इतरत्र कुठेही आकाशवाणीवर हार्मोनियमला मान्यता नव्हती.
 • पुण्याचे हार्मोनियमवादक डाँ. पाबळकर, बेळगावचे विठ्ठलराव कोरगावकर यांच्यासारख्यानी स्वतंत्र वादनाच्या मागणीसाठी केंद्रसरकारकडे जोर लावला होता. अनेक वर्षांनंतर (सुमारे २० वर्षांनंतर) त्या प्रयत्नांना यश मिळाले व १९७२मध्ये हार्मोनियमला आकाशवाणीची मान्यता मिळाली.
 • त्यानंतर बऱ्याच वादकांचे स्वतंत्र वादनाचे कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून प्रसारित झाले. १९७२ आणि ७३ मध्ये रामभाऊ विजापुरे आणि वसंत कनकापूर यांचे धारवाड केंद्रावर अनेकवेळा वादन झाले. व त्यानंतर पुन्हा एकदा एका वादकाच्या बेसुर वादनामुळे हार्मोनियमवर पुन्हा बंदी आली.
 • त्यानंतर परत कित्येक वर्षांनी म्हणजे सध्याचं १ एप्रिल २०१८ रोजी बेळगावचे रविंद्र काटोटी यांचा रविवारच्या राष्ट्रीय संगीत प्रसारणात स्वतंत्र हार्मोनियम वादनाचा कार्यक्रम झाला.
 • पं.विश्वनाथ कान्हेरे ,अजय जोगळेकर, अप्पा जळगावकर (पुणे), अरविंद थत्ते, आदित्य ओक, एकनाथ ठाकुरदास, केदार नाफडे, गणपतराव पुरोहित, गुलाम रसुल बशीरखाँ (बडोदा), गोविंदराव टेंबे (कोल्हापूर-१८८१-१९५७), गोविंदराव पटवर्धन, चिन्मय कोल्हटकर, चैतन्य कुंटे, जयंत बोस, तन्मय देवचक्के,मिलिंद कुलकर्णी,वरद सोहनी तुळशीदास बोरकर, श्रीराम हसबनीस, दिनकर शर्मा, दीपक मराठे, नन्हेबाबू कुंवर (बिदर), निर्मला काकोडे, ङाॅ. पाबळकर, पी. मधुकर (मुंबई-१९१६-१९६७), पुट्टराज गवई, पुरुषोत्तम वालावलकर (मुंबई), पु. ल. देशपांडे, प्रमोद मराठे हे काही हार्मोनियम चे पट्टीचे वादक म्हणून लोकप्रियता मिळवलेले कलाकार होय. harmonium information in marathi 

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा हार्मोनियम हे वाद्य कसे आहे त्याची रचना व त्याचे कार्य कसे आहे.
harmonium information in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच harmonium marathi mahiti हा लेख कसा वाटला व अजून काही हार्मोनियम या वाद्याबद्दल काही राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या information about harmonium in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “हार्मोनियम वाद्याची माहिती Harmonium Information In Marathi”

 1. मला तुम्ही दिलेली महितिखुप आवडली.अशीच पूर्ण सुरपेटी कशी शिकावी या बद्दल मार्गदर्शन करा .खूप खूप आभार.

  उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!