hartalika vrat katha in marathi – haritalika puja marathi हरतालिका व्रत कथा मराठी, भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सन आणि उपवास हे खूप श्रध्देने आणि प्रेमाने केले जातात आणि हे सन आणि उपवास वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या कारणांच्या साठी केले जातात. भारतामध्ये उपवासाला देखील खूप महत्व आहे आणि भारतातील अनेक लोक उपवास करतात आणि स्त्रियांतर वेगवेगळे उपवास हे खूप कडक आणि श्रध्देने करतात. वटपौर्णिमेचा आणि हरतालिकेचा उपवास हा भारतातील स्त्रिया अगदी श्रध्देने करतात आणि या उपवासांच्या मागे काही ना काही कथा जोडलेल्या आहेत.
आज आपण या लेखामध्ये हरतालिका उपवास विषयी माहिती घेणार आहोत. हरतालिका हा एक उपवास आहे जो वर्षातून एकदा असतो आणि हा उपवास भारतामध्ये सर्वत्र स्त्रिया भक्तिभावाने आणि श्रध्देने करतात. हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्ष्याच्या तृतीयेस हे व्रत केले जाते आणि हे व्रत चांगला नवरा मिळावा, नवऱ्याला उदंड आयुष्य लाभावे तसेच पाप आणि कौटुंबिक चिंता दूर व्हाव्यात म्हणून केले जाते.
त्याच बरोबर हा उपवास स्त्रिया तर करतातच परंतु हा उपवास कुमारिका मुली देखील करतात आणि याचे कारण म्हणजे त्यांना चांगला नवरा मिळावा म्हणून या व्रताद्वारे त्या प्रार्थना करतात. या व्रतामध्ये स्त्रिया किंवा कुमारिका ह्या आठ प्रहर कडक उपवास करतात आणि मग त्यानंतर अन्न सेवन करून उपवास मोडतात. आपण वर सांगितल्या प्रमाणे हा उपवास भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्ष्याच्या तृतीयेस केले जाते आणि या व्रताला हस्तगौरी किंवा कोटेश्वरी व्रत म्हणून देखील ओळखले जाते.
हरतालिका व्रत कथा मराठी – Hartalika Vrat Katha in Marathi
हरतालिका उपवासाची कथा – hartalika puja katha in marathi
देवी पार्वती ह्या पूर्वकालीन पर्वतराजाची मुलगी होती आणि राजाने त्यांचा विवाह नारदांच्या सल्ल्याने भगवान विष्णूसोबत ठरवला होता परतू हे पार्वती देवींना आवडले नाही कारण त्यांना भगवान शंकर यांच्याशी विवाह करायचा होता त्यामुळे ती विष्णूंच्यासोबत लग्न करण्यास तयार नव्हती. एके दिवशी त्यांनी आपल्या सखीकडून आपल्या वडिलांच्याकडे निरोप पाठवला कि जर मला भगवान विष्णूंच्या पदरी बांधले तर मी माझ्या प्राणाचा त्याग करीन त्यावेळी पर्वतराजा थोडे चिंतीत झाले.
परंतु पार्वती देवी इतकेच करून गप्प बसल्या नाहीत तर त्यांनी आपल्या सखीची मदत घेतली आणि ती घर सोडून एका घनदाट जंगलामध्ये गेली. त्यांनी भगवान शिवाचा लाभ व्हावा म्हणून एक वर्त करण्याचे ठरवले आणि तिने त्या जंगलामध्ये शिवलिंगाची पूजा करण्यास सुरुवात केली आणि तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील तृतीया दिवस होता.
त्यांनी त्या दिवशी पूर्ण भक्तीने आणि श्रध्देने शिवलिंगाची पूजा आणि दिवसभर कडक उपवास केला. या सर्व गोष्टींच्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीचा स्वीकार आपली पत्नी म्हणून केला. सध्या याच कथेवर आधारित हरतालिका पूजा आणि उपवास हा स्त्रिया आणि कुमारिका करतात.
हरतालिका उपवास विधी – hartalika puja vidhi marathi
How to do Hartalika Pooja in Marathi
हरतालिका हा उपवास भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष्याच्या तृतीयेस स्त्रिया आणि कुमारिका करतात. या पूजेमध्ये वाळूचे शिवलिंग बनवले जाते किंवा मग पार्वती आणि सखी ची शिवलिंगासह असणारी मूर्ती आणली जाते आणि त्याची पूजा केले जाते. हि पूजा एका चौरंगावर नवीन कापड आठरले जाते आणि त्यावर शिवलिंग आणि सखी आणि पार्वती यांच्या मुर्त्या पुजल्या जातात.
पूजा करताना प्रथम संकल्प केला जातो मग त्यांनतर सोळा उपचार केले जातात तसेच कथेचे वाचन पुजेसमोर केल जाते आणि हरतालिकेची आरती आणि शेवटी फळे आणि पंचामृत या सारखा नैवैद्य दाखवला जातो. हरतालिका हि व्रत स्त्रिया दिवसभर कडक करतात तसेच रात्री जागरण करतात आणि देवीची आराधना करतात.
उपवासाच्या दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडायचे असते आणि हे व्रत सोडताना स्त्रिया किंवा कुमारिका रुयीच्या पणाला तूप लावतात आणि ते चाटतात आणि मग त्यानंतर अन्नाचे सेवन करून आपली व्रत समाप्ती करतात. अश्या प्रकारे भक्तीने आणि श्रध्देने स्त्रिया आणि कुमारिका हे व्रत वर्षातून एकदा करतात.
हरतालिका व्रताविषयी काही महत्वाची माहिती – haritalika puja marathi
- हरतालिका पुजेचा असा एक नियम आहे कि जर एकाद्या वर्षी पहिल्यांदा हे व्रत केले तर ते तिला दरवर्षी सुरूच ठेवावे लागते कारण त्याचा त्याग करायचा नसतो.
- हरतालिका पूजा आणि उपवास हे कुमारिका मुली, विवाहित स्त्रिया आणि विधवा स्त्रिया देखील करू शकतात. हे व्रत कोणी करावे असे काही बंधन नाही.
- या व्रतामध्ये स्त्रिया किंवा कुमारिका ह्या आठ प्रहर कडक उपवास करतात आणि मग त्यानंतर अन्न सेवन करून उपवास मोडतात.
- हरतालिका हे व्रत खूप कडक असते म्हणजेच हे व्रत खूप निर्जल रित्या केले जाते आणि या व्रताचा पुढचा सूर्योदय होईपर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत पाण्याचा एक थेंब देखील घेतला जात नाही.
- जर एखाद्या स्त्रीने हे व्रत केले असेल तर तिला व्रताची पूजा करणे देखील आवश्यक आहे, कारण उपवास आणि पूजा केली तरच या व्रताचा लाभ आहे.
- हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्ष्याच्या तृतीयेस हे व्रत केले जाते आणि हे व्रत चांगला नवरा मिळावा, नवऱ्याला उदंड आयुष्य लाभावे तसेच पाप आणि कौटुंबिक चिंता दूर व्हाव्यात म्हणून केले जाते.
- हे व्रत मोडताना सर्वप्रथम रुयीच्या पणाला तूप लावून ते चाटले जाते आणि मग त्यानंतर अन्न सेवन करून व्रत समाप्ती केली जाते.
आम्ही दिलेल्या hartalika upvas information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर हरतालिका उपवासाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या hartalika vrat katha in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि hartalika vrat in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट