भारतीय संस्कृती आणि परंपरा निबंध Essay on Indian Culture And Tradition in Marathi

Essay on Indian Culture And Tradition in Marathi भारतीय संस्कृती आणि परंपरा निबंध आज आपण या लेखामध्ये भारतातील संस्कृती आणि परंपरा या विषयावर निबंध लिहिणार आहोत. भारतामध्ये अनेक समृध्द परंपरा आणि संस्कृती आहे आणि आपल्या देशाला एक संस्कृती प्रधान आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा जपणारा देश म्हटले जाते म्हणजेच चांगली संस्कृती आणि खूप जुन्या परंपरा भारतामध्ये पाळल्या जातात त्यामुळे भारताचे नाव चांगल्या संस्कृतीसाठी आणि परंपरेसाठी संपूर्ण जगामध्ये आहे. मला खूप गर्व आहे कि मी भारतासारख्या एक चांगली संस्कृती आणि दृढ परंपरा असणाऱ्या देशामध्ये राहते आणि आपल्या देशाची एक संस्कृती आणि परंपरा प्रधान देश म्हणून ओळख देखील आहे.

भारतामध्ये पूर्वीच्या काळी अनेक आकारमाणे झाली आणि त्यावेळी भारतामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, विविध भास बोलणारे लोक भारतामध्ये येवून राहिले त्यामुळे भारतामध्ये जाती आणि धर्म यामध्ये आपल्याला विविधता पाहायला मिळते म्हणजेच आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे.

आपण एकाद्या व्यक्तीसोबत कसे वागतो किंवा कसे बोलतो यावर आपली संस्कृती दिसून येते तर आपण जरी आधुनिक होत असलो तरी पूर्वीच्या रिती न मोडता त्या त्याच अनानादाने साजर्या करतो त्यामध्ये आपली परंपरा दिसून येते आणि भारतामध्ये हे दोन्हीही चांगल्या प्रकारे पार पाडले आणि म्हणूनच चांगल्या संस्कृतीसाठी आणि परंपरेसाठी भारताचे नाव संपूर्ण जगामध्ये ओळखले जाते.

 essay on indian culture and tradition in marathi
essay on indian culture and tradition in marathi

भारतीय संस्कृती आणि परंपरा निबंध – Essay on Indian Culture And Tradition in Marathi

Indian Culture And Tradition Essay in Marathi

भारतामध्ये खूप जुनी संस्कृती आणि परंपरा आहे अजून देखील जोपासली जाते आणि ह्या जुन्या संस्कृती बद्दल आपल्याला आपल्या घरातील वडीलधाऱ्या लोकांच्याकडून शिकायला मिळते किंवा ऐकायला मिळते आणि त्यामुळे आपली संस्कृती पुढची पिढी देखील जोपासली जाते. भारतीय संस्कृती म्हणजे भारतामध्ये अनेक जातीचे, धर्माचे, अन्न, स्थापत्य, कला, वस्त्र, भाषा जरी भिन्न असली तरी लोक अगदी आनंदाने राहतात तसेच एकमेकांच्या अनेक उत्सवामध्ये अगदी उत्साहाने भाग घेतात.

तसेच भारतामध्ये अनेक सन जसे कि गणेश चतुर्थी, दिवाळी, दसरा, रक्षा बंधनहोळी, नागपंचमी, लोहरी यासारके पारंपारिक सन आजही अगदी आनंदाने साजरे केले जातात तसेच महाभारत आणि रामायण या सारख्या महाकाव्यामधील अनेक गोष्टी आजही तितक्या आवडीने सांगितल्या जातात आणि त्यामुळे आपली परंपरा जपली जाते.

आपल्या भारतामध्ये २८ राज्ये आहेत आणि या २८ राज्यांमध्ये आपली आपली वेगळी संस्कृती आणि वेगळी परंपरा आहे आणि त्या प्रमाणे भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये त्यांची संस्कृती आणि परंपरा अगदी काटेकोरपणे पाळली जाते आणि त्यामुळे जगासमोर भारताची संस्कृती आणि परंपरा चांगल्या प्रकारे दिसू शकते.

भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात तसेच भारतातील प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या भाष्या बोलल्या जातात जसे कि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते तसेच कर्नाटक राज्यामध्ये कन्नड, तामिळनाडू मध्ये तामिळी, गुजरात मध्ये गुजराती अश्या प्रत्येक राज्याच्या त्यांच्या त्यांच्या अधिकृत भाषा आहेत.

तसेच संपूर्ण भारताची अधिकृत भाषा हि हिंदी आहे तसेच भारतामध्ये प्रत्येक राज्याच्या स्वयंपाक पध्दती मध्ये देखील आपल्याला विविधता दिसून येते जसे कि महाराष्ट्र राज्यामध्ये पुरण पोळी आणि आंबोली हे पारंपारिक पदार्थ आहेत आणि ह्या पदार्थांना महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणून ओळखले जाते तसेच जलेबी, खमण ( ढोकळा ) या पदार्थांना गुजराती पदार्थ म्हणून ओळखले जाते.

त्याचबरोबर इडली, डोसा, आप्पे, मेदू वडा हे पदार्थ दक्षिण भारतीय पदार्थ म्हणून ओळखले जातात. तसेच भारतातील वस्त्र संस्कृती हि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी पाहायला मिळते आणि त्यामुळे भारतातील विविधता आणि संस्कृती अधिक स्पष्ट होते. भारतामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये स्त्रिया गोल साडी किंवा कासूटा घालतात तसेच पुरुष धोतर आणि सदरा हा पारंपारिक पोशाख घालतात. कर्नाटकात स्त्रिया साड्या घालतात, कर्नाटकात सिल्कच्या साड्या आणि पुरुष लुंगी घालतात आणि त्यावर शर्ट घालतात. अश्या प्रकारे भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे. 

भारतामधील कुटुंब पध्दती हि एक तर एकत्र कुटुंब पद्धती किंवा विभक्त कुटुंब पद्धती आहे आणि आपल्या भारताच्या ग्रामीण भागामध्ये शक्यतो एकत्र कुटुंब पद्धती अजून देखील जपली जाते आणि अनेक असे लोक आहेत जे एकत्र कुटुंबामध्ये राहतात आणि भारतामध्ये अशी अनेक मोठी कुटुंब पाहायला मिळतात ज्यामध्ये आजी – आजोबा, आई – वडील, काका – काकी, सखे भाऊ, चुलत भाऊ हे सर्वजण अगदी आनंदाने एकत्र राहतात तर काही ठिकाणी म्हणजे भारताच्या शहरी भागामध्ये विभक्त कुटुंब पध्दती आहे ज्यामध्ये आई – वडील आणि मुले असे कुटुंब असते.

भारतामध्ये अनेक पारंपारिक सन साजरे केले जातात जसे कि दसरा, दिवाळी, गणेश चतुर्थी, महाशिवरात्री, जन्माष्टमी यासारखे सन साजरे केले जातात आणि हे सन साजरे करण्यापाठीमागे काही ना काही कारण आहे, दसरा हा सन जरी भारतामध्ये सर्व ठिकाणी साजरा केला जात असला तरी हा सन मोठ्या प्रमाणात भारतामध्ये साजरा केला जातो आणि या सणाला विजयादशमी असे देखील म्हणतात हा सन साजर्या करण्यापाठीमागे दोन पारंपारिक कारणे आहेत ज्यामधील पहिले म्हणजे या दिवशी दुर्गा देवीणे महिषासुराचा वध केला होता आणि म्हणून भारतामध्ये काही ठिकाणी हा सन साजरा केला जातो.

तर असे काही ठिकाणी असे म्हंटले जाते कि प्रभू श्री रामांनी या दिवशी रावणाला मारून वाईटावर सत्याचा विजय मिळवला होता आणि म्हणून विजयादशमी दिवशी रावणाचा पुतळा जाळला जातो. तसेच भारतामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने देशभर सर्व ठिकाणी गणेश चतुर्थी साजरी केली जाते आणि गणेश चतुर्थी भारतामध्ये ५ ते ६ दिवस साजरी होते.

ज्या दिवशी श्री कृष्णाचा जन्म झाला त्या दिवशी जन्म अष्टमी साजरी केली जाते त्याच बरोबर भारतामध्ये अनेक सन साजरे केले जातात आणि ते साजरे करण्यापाठीमागे काही ना काही धर्मी नाहीतर पारंपारी कारण असतेच आणि भारतामध्ये हे वेगवेगळे सन साजरे केल्यामुळे भारताची दृढ आणि जुनी परंपरा दिसून येते. तसेच भारतामध्ये कोणीही भेटले कि नमस्कार किंवा नमस्ते म्हणण्याची सवय आहे आणि हे एक पारंपारिक भारतीय अभिवादन आहे आणि या मुळे देखील भारतीय संस्कृती आणि परंपरा दिसून येते.

कोणत्याही राष्ट्राच्या विकासासाठी तेथील संस्कृती, परंपरा, लोक, लोकांचे राहणीमान यासारख्या अनेक गोष्टी महत्वाच्या असतात आणि चांगल्या संस्कृतीसाठी आणि जुन्या परंपरेसाठी भारतदेश हा खूप भाग्यवान आहे. भारतामध्ये अनेक जुन्या ऐतिहासिक इमारती आहेत तसेच खूप जुनी काव्य, महाकाव्य आणि ग्रंथ यासारखे जुने साहित्य भारतामध्ये आज देखील खूप प्रेमाने वाचले जाते.

भारतामध्ये हिंदू, ख्रिस्चन, मुस्लीम, बौद्ध, जैन, शीख यासारखे अनेक जातीचे आणि धर्माचे लोक राहतात तसेच भारतातील सर्व सन भारतातील सर्व जातीचे लोक अगदी गुण्या गोविंदाने आणि उत्साहात साजरे करतात तसेच भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात या सर्व गोष्टींच्यामुळे भारतातील विविधता दिसून येते आणि चांगल्या भारतीय संस्कृतीचे आणि दृढ आणि जुन्या परंपरेचे उत्तम उदाहरण म्हणून भारताला पहिले जाते.

आम्ही दिलेल्या essay on indian culture and tradition in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भारतीय संस्कृती आणि परंपरा निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या indian culture and tradition essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of indian culture and tradition in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!