आरोग्य हीच संपत्ती निबंध मराठी Health is Wealth Essay in Marathi

Arogya Hich Sampatti Essay in Marathi – Arogyam Dhansampada Marathi Nibandh – Health is Wealth Essay in Marathi आरोग्य हीच संपत्ती निबंध मराठी माणसाला मूलभूत गरजा मिळवण्यासाठी धडपड तर करावीच लागते आणि हीच धडपड करता – करता आपलं आपल्या आरोग्याकडे लक्ष राहात नाही. आज-काल महागाई वाढत चालली आहे आणि या महागाईच्या काळामध्ये आपलं वास्तव्य टिकवून ठेवण्यासाठी माणूस वेड्यासारखा पैसा कमवत आहे. पैसे असतील तरच आपण आपल्या सगळ्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो परंतु जर आपल आरोग्य चांगलं नसेल तर हा पैसा काय कामाचा? बरोबर ना? जेव्हा आपण तंदुरुस्त असू तेव्हा आपल्या मध्ये पैसे कमावण्याचं बळ येईल म्हणूनच आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं म्हटलं जातं.

परंतु आरोग्य फक्त आपली संपत्ती नाही आहे तर आरोग्य आपलं सर्वस्व आहे. आपल्याकडे आरोग्य असेल तरच आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. आरोग्यम् धनसंपदा ही म्हण तर आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. माणसाला त्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी माणसाचं शरीर सुदृढ असणे गरजेचे आहे आणि शरीर तेव्हा सुदृढ असेल जेव्हा मन निरोगी असेल.

health is wealth essay in marathi
health is wealth essay in marathi

आरोग्य हीच संपत्ती निबंध मराठी – Health is Wealth Essay in Marathi

Arogya Hich Sampatti Essay in Marathi

आजच्या काळामध्ये माणसाची जीवनपद्धती बदलली आहे. जी आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही आहे. आपल शरीर सुदृढ असेल तर आपल्या मध्ये काम करण्यासाठी आणखीन बळ येईल आणि जर आपण काम चांगलं केलं तरच आपल्याला त्या कामातून आनंद मिळेल आणि आपल्याला जीवनातील सगळी सुख उपभोगता येतील.

ते म्हणतात ना लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य भेटे म्हणजेच जर आपल्याला चांगल आरोग्य हव असेल, तर रात्री लवकर वेळेस झोपणं सकाळी वेळेत उठणं अतिशय गरजेचे आहे. लवकर उठल्यामुळे आपल्याला वेळेचे नियोजन करता येतं. जर आपल्याला उत्तम आरोग्य हवं असेल तर आपल्याला आळस बाजूला ठेवून नियमित सकाळी लवकर उठणं गरजेच आहे.

सकाळी उठल्यावर व्यायाम केल्यावर स्वास्थ्य चांगलं राहतं. स्वतःची काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपण स्वतःची काळजी नीट घेऊ शकत नाही तर आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून कमवलेले पैसे काय कामाचे. मान्य आहे आजच्या जमान्यामध्ये पैसे ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट बनली आहे.

सोबतच वाढती महागाई परंतु या सगळ्यांमध्ये जर आपल आरोग्य चांगल असेल तर आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करू शकतो आपल्या आवडत्या माणसांना वेळ देऊ शकतो आरोग्य चांगलं असणं ही देवाची देणगी आहे म्हणा. उत्तम आरोग्य आणि आळस यापैकी उत्तम आरोग्य निवडा आणि सकाळच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा जेणेकरून आपलं मन निरोगी राहील.

असं म्हणतात जर आपल्या शरीराला आरोग्य लाभ होत नसेल तर आपल्याजवळील पैसे काहीच कामाचे नाहीत. स्वतःला निरोगी ठेवणं म्हणजेच परमेश्वराची सेवा करणं होय. आपल्या सर्वांनाच आपल्या मूलभूत सोयीसुविधा भागवण्यासाठी काम करणं गरजेचं असतं पण पैशाच्या मागे लागून आपण जर आपल्या आरोग्याची हेळसांड करत असू तर आपल्या जवळील पैसे आपल्या काय उपयोगाचे.

जर आपल्या आयुष्यामध्ये अशी कोणतीही परिस्थिती उद्भवली जिथे आपल्याला इतर कोणाचीही मदत घ्यावी लागत असेल, पण आजकाल कोणीही कोणाचं नसतं अशा परिस्थिती मध्ये जर आपल शरीर सुदृढ असेल जर आपण निरोगी असू तर आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक अवघड परिस्थितीचा सामना आपण स्वतः करू शकतो.

चांगलं सुंदर व निरोगी आयुष्य जगण्यासाठी नेहमी सकाळी लवकर उठणे योग्य तो व्यायाम करणे योग्य तो आहार घेणे, वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, भाज्या, वेगवेगळी फळे याचा आपल्या आहारात समावेश करून घेणे, महिन्यातून एकदा तरी वैद्यकीय तपासणी करणे, योग्य ती झोप घेणे, पुरेशी विश्रांती घेणे या सगळ्या गोष्टी आपल्याला एक सुंदर आणि निरोगी आयुष्य देत.

जर आपण तंदुरुस्त आहात जर आपले शरीर सुदृढ आहे जर आपलं शरीर आपल्याला साथ देऊ शकतो. तर आपण आपल्या आयुष्यात आपल्याला हव्या त्या गोष्टी करू शकतो. आज असे बरेच लोक आहेत जे वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त झाले आहेत ते त्यांच्या आवडीच्या गोष्टी करू शकत नाहीत ते त्यांची स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत याचे एक कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आरोग्य चांगले असेल तर आपलं आयुष्य नेहमीच चांगलं सुरळीत चालत राहील.

आरोग्य या गोष्टीची किंमत पैशाशी होऊ शकत नाही आरोग्य अमूल्य आहे आरोग्य हे देवाने दिलेली देणगी आहे असं मानून चालले पाहिजे. संपत्ती, पैसे यातून मिळणारे पैसे आपल्याला फक्त खोटा आनंद देऊ शकतात जो आनंद फक्त काही काळापुरता मर्यादित असतो परंतु आपलं शरीर सुदृढ असेल जर आपलं मन निरोगी असेल जर आपण शारीरिक रीत्या तंदुरुस्त असू तर हे सुख आपल्याला आयुष्यभर‌ साथ देतं. आरोग्य चांगलं असणं म्हणजे व्यक्ती शारीरिक व मानसिक रित्या सुदृढ बळकट असणे गरजेचे आहे.

आरोग्य चांगलं असणं म्हणजे फक्त आपण शारीरिकरीत्या चांगलं असणं गरजेचे नाही तर आपलं मानसिक आरोग्य देखील तितकच गरजेच आहे. आपण सर्वजण आपल्या शरीरावर भरपूर खर्च करतो परंतु जर आपलं मन आजारी असेल तर आपण रोगीच आहोत. मानसिक आजार व्यक्तीच वैयक्तिक विकास थांबवू शकतं जेवढं व्यक्तीचा विकास होण्यासाठी शारीरिक बळ गरजेच आहे.

तितकच मानसिक बळ देखील गरजेचे आहे. त्यासाठी नियमित पणे मानसिक आरोग्याची तपासणी मनशास्त्रज्ञ किंवा मानसोपचार तज्ञ यांच्याकडे जाऊन केली पाहिजे. बऱ्याच वेळा आपण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो जे अतिशय चुकीचं आहे. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित योग्य तो व्यायाम, योगा करणे गरजेचे आहे.‌

शिवाय योग्य ती विश्रांती घेणे, सकारात्मक विचार करणे, दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करणे, नेहमी आपल्या जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात राहणे, आनंदी राहणे या सगळ्या गोष्टी करणे म्हणजे आपल्या मानसिक स्थितीची काळजी घेणे होय. आपल्या शरीरावर, आपल्या विचारांवर, आपल्या कृतीवर आपल्या मनाचा ताबा असतो जर आपलं मन आपण सकारात्मक ठेवले तर आपण सकारात्मक कृती करू सकारात्मक विचार करू.

आरोग्य धनसंपदा निबंध मराठी – arogyam dhansampada marathi nibandh

आयुष्यात आपल्याकडे काही नसलं तरी चालेल पण आरोग्य आणि सकारात्मक विचार हवेत. एक शारीरिक व मानसिक रित्या तंदुरुस्त व्यक्ती अनेक लाखो लोकांना प्रेरणा देते. जर व्यक्तीचं शरीर आणि मन निरोगी असेल तर अधिक काम करण्यास आपल्यामध्ये उत्साह येईल आपला खेळकरपणा वाढेल‌. आपलं सुदृढ शरीर आपलं चांगलं व्यक्तिमत्व घडवतं चांगले व्यक्तिमत्व हे बऱ्याच लोकांना आकर्षित करत.

जर आपलं शरीर आपल्या सोबत असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट शक्य वाटते आपण प्रत्येक गोष्ट विश्वासाने करू शकतो सुदृढ शरीर सुदृढ मन आपल्यामध्ये आत्मविश्वास जागं करतं. आज बरीच लोकं वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जातात आणि आपली शारीरिक परिस्थिती बिघडून घेतात ज्यामुळे शारीरिक व मानसिक रित्या ते नकारात्मक बनतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतीही आशा राहत नाही.

म्हणूनच आपण कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये जेणेकरून आपल आरोग्य चांगले राहील आणि आपल्याला आयुष्यामध्ये जे हवं ते करता येईल. आज जग खूप पुढे चाललं आहे आणि या जगामध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळेला जीवघेण्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे लागतात जसे की आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र काम करावं लागतं. बरोबर आहे,

जर आपल्याला या जगात जगायचं असेल तर आपल्याला आपल्या उदरनिर्वाहासाठी हात-पाय तर हलवले पाहिजेत परंतु, या सगळ्यांमध्ये थोडासा उसंत काढून आपण आपल्या आरोग्याकडेहि तेवढेच लक्ष दिले पाहिजे. आरोग्य चांगलं नसेल तर आपल्या जीवनाचा काय फायदा एवढी मेहनत घेण्याचा काय फायदा. दिवसातील थोडासा जरी वेळ आपण आपल्या स्वतःवर घालवला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी घालवला तर आपण आपल येणारं पुढील आयुष्य अगदी सुखात निरोगी जगू शकतो.

आजकाल आपल्याला बर्‍याच गोष्टींचे टेन्शन असतं परंतु प्रत्येक परिस्थितीमध्ये तणाव निर्माण होणं अतिशय सहाजिक गोष्ट आहे. पण या तणावाला आपण सामोरं जाण्याच एकमेव उपाय म्हणजे उत्कृष्ट आरोग्य. तनावपूर्वक परिस्थितीला  सामोर जायचं असेल तर मानसिक आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. आपण मानसिक रित्या सकारात्मक असणे गरजेचे आहे तरच आपण तनावपूर्वक परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.

आज-काल वाहनांचा अतिरिक्त वापर त्या मुळे होणारे वायू प्रदूषण, वातावरणात होणारे बदल त्यात आपले वैयक्तिक प्रश्न व अडचणी, बाहेरील अन्न खाणं, वेगळी जीवनशैली या सगळ्यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर कुठेना कुठे होत असतो. यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होतात जे जीवघेणे ठरू शकतात त्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेळ प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे.

परंतु या सगळ्यांमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं आरोग्य जे आपल्याला नेहमी साथ देतं याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. शेवटी आपले उत्तम आरोग्य उत्तम आयुष्य घडवत. म्हणूनच आरोग्य ही आपली संपत्ती आहे आणि आपली हीच संपत्ती आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी बनवते. आपले हीच संपत्ती आपल्याला सुंदर व निरोगी आयुष्य देऊ शकते हे नेहमी लक्षात ठेवा.

आम्ही दिलेल्या Health is Wealth Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आरोग्य हीच संपत्ती निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या arogyam dhansampada marathi nibandh या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि aarogyam dhansampada kalpana vistar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये health is wealth in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!