सारंग (हेरॉन) पक्षी माहिती Heron Bird Information in Marathi Language

Heron Bird Information in Marathi Language सारंग पक्षी माहिती बगळ्यासारख्या दिसणाऱ्या हेरॉन या पक्ष्याला मराठीमध्ये सारंग heron in marathi म्हणतात. हेरॉन हा पक्षी अर्डीडाय (ardeidae) या पक्षी कुळातील असून या पक्ष्याच्या ६० पेक्षा अधिक प्रजाती आहेत. हेरॉन हे पक्षी जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात वितरीत आहेत. पण हे पक्षी उष्ण कटिबंधात मोठ्या प्रमाणात आढळतात. हे पक्षी  दलदलीच्या प्रदेशात, तलाव किवा उथळ पाण्याच्या ठिकाणी राहणे पसंत करतात.

हेरॉन हा एक अतिशय हुशार पक्षी आहे. हे पक्षी मासे फार हुशारीने पकडतात हे पाण्यामध्ये न हलता उभे राहतात आणि ज्यावेळी शिंकर जवळ येते त्यावेळी ते त्यांच्या चोचीने शिकार करतात त्याचबरोबर हे पक्षी उडण्यासाठीही माहीर आहेत कारण हे ताशी ४८ किलोमीटरचे अंतर उडून पार करू शकतात. या पक्ष्यांचे वर्णन करायचे म्हंटले तर हे पक्षी मध्यम ते मोठ्या आकाराचे असतात साधारणता या पक्ष्याची लांबी २५ ते ३० सेंटी असते आणि या पक्ष्याची मान लांब आणि S आकाराची असते त्याचबरोबर या पक्ष्यांचे पायही बगळ्यासारखे लांब असतात.

heron bird information in marathi
heron bird information in marathi

सारंग (हेरॉन) पक्षी माहिती – Heron Bird Information in Marathi Language

सारंग पक्षी कुठे राहतात कसे राहतात (habitat)

हे पक्षी गोड्या किवा खाऱ्या पाण्याच्या ठिकाणी, नदी, तलाव, भातशेती, दलदलीचे प्रदेश या ठिकाणी राहतात आणि आपले घरटे झाडाची पाणे किवा डहाळे या पासून बनवतात आणि हे घरटे उंच झाडावर किवा उंच खडकावर बनवतात.

आहार (food) 

हेरॉन हे पक्षी सर्वाहारी आहेत त्यामुळे हे पक्षी मासे, बेडूक, लहान सस्तन प्राणी, उभयचर लहान प्राणी या प्रकारचा आहार खातात.

सारंग (हेरॉन) पक्ष्याचे प्रकार (types of heron bird)

हेरॉन हा पक्षी अर्डीडाय ( ardeidae ) कुटुंबातील आहे आणि या पक्ष्याच्या प्रजाती जगभरामध्ये आढळतात आणि या पक्ष्यच्या ६० ते ६४ प्रजाती आहे. वेगवेगळ्या जातीचे हेरॉन पक्षी वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या रंगाचे असतात. हेरॉन पक्ष्याचे काही प्रकार खाली दिले आहेत.

1.इंडियन पॉन्ड हेरॉन (indian pond heron)

इंडियन पॉन्ड हेरॉन हे पक्षी भारतामध्ये आढळणारी एक सामान्य जात आहे. आणि या पक्ष्याला भारतामध्ये ढोकरी या नावाने ओळखले जाते. हा पक्षी लहान आकाराचा असतो आणि याच तसेच हे पक्षी भारतामध्ये तर आढळतातच पण हे पक्षी इराण, म्यानमार, श्रीलंका या देशामध्येही आढळतो. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव अर्डीओला ग्रेयी असे आहे. हे प्रकारच्या हेरॉन पक्ष्याचा आकार ४० ते ५० सेंटी मीटर असतो आणि या पक्ष्याची पंख ७५ ते ९० सेंटी मीटर लांब पसरतात. या पक्ष्याचे पंख तपकिरी रंगाचे असतात, पाय लांब आणि पिवळसर हिरवट रंगाचे असतात, चोच थोडी लांब आणि सरळ असते. या पक्ष्याचे वजन २५० ते २८० ग्रॅम असतो.

नावइंडियन पॉन्ड हेरॉन
कुळअर्डीडाय
शास्त्रीय नावअर्डीओला ग्रेयी
आकार ४० ते ५० सेंटी मीटर
वजन२५० ते २८० ग्रॅम

2.ग्रे हेरॉन (grey heron)

ग्रे हेरॉन हा पक्षी भारतीय उपखंडामध्ये आढळणारा पक्षी आहे हे पक्षी तलाव, नद्या, धरणे, दलदलीच्या देशामध्ये तसेच पाण्याच्या ठिकाणी राहतात. हे पक्षी आकाराने मोठे असतात आणि या पक्ष्यांची चोचहि मोठी आणि मजबूत असते. हे पक्षी मासे, लहान सस्तन प्राणी आणि उभयचर प्राणी या सारखा आहार खातात. हे पक्षी स्थलांतरित पक्षी आहेत आणि हे जुलै ते ऑगस्ट हे पक्षी उत्तर भारतात आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्ये दक्षिण भारतात विन करतात.

या पक्ष्यांचे प्राथमिक पंख राखाडी रंगाचे असतात आणि आतले पंख काळ्या रंगाचे असतात, मान पांढऱ्या रंगाची आणि लांब असते, चोच मजबूत आणि सरळ, पाय लांब आणि या पक्ष्याच्या डोक्यावर टोपी घातल्यासारखे काळ्या रंगाचे केस असतात. या पक्ष्याचे वजन १ ते २ किलो असते आणि आकार ८० ते १०२ सेंटी मीटर असते आणि या पक्ष्याचे पंख १५५ ते १७५ सेंटी मीटर लांब पसरतात. ग्रे हेरॉन हा पक्षी १५ ते २० वर्ष जगू शकतो.

नावग्रे हेरॉन
कुळअर्डीडाय
शास्त्रीय नावअर्डीया सीनिरिया
आकार ८० ते १०२  सेंटी मीटर
वजन१ ते २ किलो

3.ग्रेट ब्लु हेरॉन (great blue heron)

ग्रेट ब्लु हेरॉन हे पक्षी उत्तर अमेरिकेमध्ये आढळतात हा हेरॉन जातीतील सर्वात मोठा पक्षी आहे. हे पक्षी शक्यतो गोड्या पाण्यामध्ये किवा खाऱ्या पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या पक्ष्यांचे वर्णन करायचे म्हणातले तर हे पक्षी पूर्णपणे राखाडी रंगाचे असतात आणि मानेवर तपकिरी रंगाचे केस असतात, चोच सरळ आणि मजबूत असते आणि पाय लांब आणि राखाडी रंगाचे असतात. या पक्ष्याचा आकार ११० ते १४० सेंटी मीटर आहे तर या पक्ष्याचे पंख उडताना १६५ ते २००  सेंटी मीटर पसरतात. या पक्ष्याचे वजन १.५ ते ३.५ किलो असते. 

नावग्रेट ब्लु हेरॉन
कुळअर्डीडाय
शास्त्रीय नावअर्डीया हेरोडीयास
आकार ११० ते १४० सेंटी मीटर
वजन१.५ ते ३.५ किलो

4.ग्रीन हेरॉन (green heron)

ग्रीन हेरॉन हे पक्षी उत्तर आणि मध्य अमेरिकेमध्ये आढळतात आणि या पक्ष्याचे शास्त्रीय नाव बुटोरीड्स विरेसेन्स असे आहे. या पक्ष्याचा छातीपासून खालचा भाग हा हिरवट किवा निळसर रंगाचा असतो आणि वरती गालापर्यंत तपकिरी रंगाचा असतो आणि डोक्यावर काळा रंग असतो, या पक्ष्याची चोच लांब आणि सरळ असते आणि छातीवर आणि चोचीच्या खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. या पक्ष्याचा आकार ४१ ते ४५ सेंटी मीटर असतो आणि वजन २३५ ते २४० ग्रॅम असते.

नावग्रीन हेरॉन
कुळअर्डीडाय
शास्त्रीय नावबुटोरीड्स विरेसेन्स
आकार ४१ ते ४५ सेंटी मीटर
वजन२३५ ते २४० ग्रॅम

सारंग (हेरॉन) या पक्ष्याविषयी तथ्ये (facts about heron bird)

  • ह्या पक्ष्याच्या ६४ प्रजाती आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या आकाराचे हेरॉन पक्षी असतात.
  • अंटार्क्टिक हा भाग सोडला तर हे पक्षी सर्व भागामध्ये आढळतात.
  • हेरॉन या पक्ष्यांचे सरासरी आयुष्य १५ ते २० वर्ष असते.
  • या पक्ष्यांचे पिल्लू ५० ते ८० दिवसांनी स्वतंत्र्य फिरण्यासाठी सक्षम बनते.
  • हे पक्षी ताशी ४८ किलो मीटर अंतर पार करू शकतात.
  • हेरॉन हे पक्षी दिवसा आणि रात्री या दोन्ही वेळी सक्रीय असतात.
  • हेरॉन हे पक्षी दर वर्षी नवीन जोडी बनवतात.
  • मादी एका वेळी ३ ते ४ अंडी घालते.
  • अंडी उबवाने, घरटे बनवणे, पिल्लांचे संगोपन करणे, अन्न गोळा करणे हि कामे नर आणि मादी दोघे करतात.
  • हेरॉन च्या एका वसाहतीमध्ये ५०० घरटे असतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा सारंग पक्षी heron bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. heron bird information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information on heron bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही सारंग पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या heron bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “सारंग (हेरॉन) पक्षी माहिती Heron Bird Information in Marathi Language”

  1. धन्यवाद या माहितीचा उपयोग मी माझ्या पक्ष्यांच्या माहिती विषयक व्हिडीओत करतेय.तुमचा संदर्भ नक्की देते ,खरतर रितसर परवानगी घ्यायची असते पण प्रतिक्रीया मिळत नाहीत ,पण माहितीचा स्रोत वापरला कि धन्यवाद देण्याच माझ कर्तव्य इति….

    उत्तर
    • माहिती घेण्या अगोदर व इतर इंटरनेट सोर्स वरती वापरण्या अगोदर परवानगी घ्यावी लागते ती तुम्ही घेतली नाही त्यासाठी आमचे contact us चे पेज आपण वापरू शकता

      उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!