बगळा पक्षाची माहिती Bagla Bird Information In Marathi

Bagla Bird Information In Marathi बगळा हा पक्षी bagala pakshi जगभरामध्ये सर्व देशामध्ये आढळणारा पक्षी असून बगळ्याचे वर्णन करायचे म्हंटले तर हा पक्षी पांढऱ्या शुभ्र रंगाचा असतो तसेच ह्या पक्ष्याचे पाय लांब आणि काळ्या रंगाचे असतात ते एका काठीसारखे दिसतात. मान लांब आणि सडपातळ असते आणि (S) आकाराची असते आणि चोच लांब आणि टोकदार असते. बगळा हा पक्षी जलाशयाच्या आसपास किवा दलदलीच्या ठिकाणी राहतात तसेच आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिका या देशांमध्ये बगळा हा पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. बगळा हा पक्षी आरडीईडी कुळातील आहे आणि या पक्ष्याच्या जवळ जवळ ६४ प्रजाती आहे आणि त्यामधील कमीत कमी २० ते २१ प्रजाती भारतामध्ये आढळतात.

bagla bird information in marathi
bagla bird information in marathi / bagala pakshi

बगळा पक्षाची माहिती – Bagla Bird Information In Marathi

नावबगळा
प्रकारपक्षी
बगळा इंग्रजी शब्दegret
वैज्ञानिक नावआरडीडाय ( ardeidae )
आकार१३० ते १४० सेंटी मीटर
वजनएक ते दीड किलो
रंगपांढरा

बगळा पक्ष्याचा आहार ( food )

बगळा हा सर्वभक्षी पक्षी आहे आणि बगळ्याचे मुख्य खाद्य म्हणजे मासे, बेडूक, अळ्या आणि किडे आणि काही पाण्यातील वनस्पती किवा शेवाळ या प्रकारचे अन्न खातात

बगळा हा पक्षी कुठे राहतो (habitat) 

आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिका या देशांमध्ये बगळा हा पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. हे पक्षी शक्यतो जलाशयाच्या आसपास किवा दलदलीच्या ठिकाणी राहतात. हे पक्षी आपले घरटे झाडाच्या डहाळ्या, पाने किवा बारीक आणि छोट्या लाकडांपासून बनवतात.

भारतामधील बगळ्यांचे 4 प्रकार (types of indian egret) 

जगभरामध्ये या पक्ष्याच्या जवळ जवळ ६४ प्रजाती आहे आणि त्यामधील कमीत कमी २० ते २१ प्रजाती भारतामध्ये आढळतात. यामधील भारतामध्ये अधाणारे काही प्रसिध्द बगळ्याचे प्रकार म्हणजे मोठा बगळा (great egret), लहान बगळा ( little egret ), मध्यम बगळा        (Intremediate egret ), गाय बगळा ( cattle बगळा )

1.गाय बगळा ( cattle बगळा )

गाय बगळा हा चरणाऱ्या प्राण्याच्या कळपामध्ये आपल्याला बघायला मिळतो. जेव्हा गायी, बकरी, मेंढ्या किवा म्हैसी चरत असतात त्यावेळी हे प्राणी जमिनीवरील गवत जोराने आपल्या तोंडाने ओढतात त्यामुळे जमिनीतील किडे बाहेर येतात. हे बाहेर आलेले किडे गायबगळा हा पक्षी शोधून खातो म्हणून या पक्ष्याला गाय बगळा हे नाव पडले आहे. गाय बगळा हा पक्षी गवताळ प्रदेशात, तांदळाच्या गवतावर किवा शेतात फिरताना दिसतात. गाय बगळे हे स्थलांतरित पक्षी आहेत आणि हे भारतामध्ये हेरोन्स च्या कळपासह उडताना दिसतात.

नावेगाय बगळा किवा ढोर बगळा ( cattle egret )
कुळबकाद्य
वैज्ञानिक नावब्युबल्कस आयबीस
रंगपांढरा आणि मानेपासून वरती पिवळसर शेड
आकार ९० ते ९५ सेंटी मीटर
वजन २०० ते ५०० ग्रॅम

2.लहान बगळा ( little egret )

लहान बगळा हा याच्या नावाप्रमानेच आकाराने लहान आहे. लहान बगळा हा पांढऱ्या रंगाचा असतो आणि साधारण नारंगी रंगाचे शेड असते त्याचबरोबर या पक्ष्याची चोच हि लांब लोकदार आणि गडद काळ्या रंगाची असते आणि पायाही लांब आणि गडद काळ्या रंगाचे असतात आणि खालाच पायाचा भाग पिवळ्या रंगाचा असतो. हे पक्षी लहान कळपामध्ये असतात आणि किनारपट्टी, तलाव किवा खारफुटीच्या किनाऱ्यावर आढळतात.

नावेलहान बगळा किवा मोर बगळा ( little egret )
कुळबकाद्य
वैज्ञानिक नावइग्रेटा गर्झेटा
रंगपांढरा आणि साधारण नारंगी रंगाचा शेड
आकार ५० ते ६५ सेंटी मीटर
वजन ३५० ते ५०० ग्रॅम

3.मध्यम बगळा ( Intremediate egret )

मध्यम आकाराचा हा बगळा दिसायला मोठ्या बगळ्या सारखा असतो. मध्यम बगळा हा एक भारतीय रहिवासी आहे आणि हा मध्यम आकाराचा, लांब आणि S आकाराची मान, पिवळ्या रंगाची चोच आणि पूर्णपणे पांढऱ्या रंगाचा असतो. ह्या प्रकारचे बगळे अंदमान, निकोबार आणि श्रीलंका मध्ये आढळतात. हे पक्षी दलदलीच्या प्रदेशात, भातशेतीच्या सरोवरा जवळ पाहायला मिळतात.

नावेमध्यम किवा मध्वा बगळा (Intremediate egret )
कुळबकाद्य
वैज्ञानिक नावआरडीया इंटरमेडिया
रंगपांढरा आणि साधारण नारंगी रंगाचा शेड
आकार ५५ ते ७० सेंटी मीटर
वजन ३५० ते ४०० ग्रॅम

4.मोठा बगळा ( great egret )

हा पक्षी पांढऱ्या शुभ्र रंगाचा असतो तसेच ह्या पक्ष्याचे पाय लांब आणि काळ्या रंगाचे असतात ते एका काठीसारखे दिसतात. मान लांब आणि सडपातळ असते आणि (S) आकाराची असते आणि चोच लांब आणि टोकदार असते आणि पंखांचा मोठा झुबका हा शेपटीच्या टोका एवढा वाढलेला असतो. हे पक्षी नद्या, खाणी, सरोवर, दलदलीचा प्रदेश, तलाव, तांदळाच्या गवतावर किवा शेतामध्ये पाहायला मिळतात. भारताबरोबर हे पक्षी आफ्रिका, अमेरिका युरोप मध्ये आढळतात. हे बगळे उष्ण किवा गरम वातावरणामध्ये राहायला आवडते.

नावेमोठा बगळा किवा मलंग बगळा किवा सामान्य बगळा ( great egret )
कुळबकाद्य
वैज्ञानिक नावआरडीया अल्बा
रंगपांढरा शुभ्र
आकार ७५ ते १०५  सेंटी मीटर
वजन ७०० ते १५०० ग्रॅम

 बगळा या पक्ष्याविषयी काही अनोखी आणि मनोरंजक तथ्ये ( facts about egret bird )

  • भारतामध्ये या पक्ष्यांचा विणीचा हंगाम काही ठिकाणी जून ते ऑगस्ट तर काही ठिकाणी नोव्हेंबर ते मार्च असा आहे.
  • बगळा मादा पक्षी एका वेळी ४ ते ५ अंडी घालते आणि या अंड्यांचा रंग पांढरा असतो.
  • अंडी उबवण्याचे काम नर आणि मादी दोघांचेही असते.
  • नर बगळा आणि मादा बगळा दिसायला जवळ जवळ एकसारखे असतात नर बगळ्याला बगळा म्हणतात आणि मादा बगळ्याला बगळी असे म्हणतात.
  • बगळा हा पक्षी ताशी ४८ किलो मीटर वेगाने उडू शकतात.
  • अन्न गोळा करण्याचे आणि पिलांना अन्न भरवण्याचे काम नर आणि मादी दोघांचे असते.
  • गाय बगळे एक मजेशीर गोष्ट म्हणजे हे जनावरांच्या अगावर बसतात आणि त्यांच्या अंगावरचे कीटक खातात म्हणून या बगळ्यांना गोचीखाऊ बगळे म्हणतात.
  • बगळ्याच्या काही प्रजाती कळपामध्ये राहणे पसंत करतात तर काही प्रजाती एकटे राहणे पसंत करतात.
  • हे पक्षी आपला जास्तीत जास्त वेग पाण्यामध्ये घालवतात.
  • बगळा या पक्ष्याचे आयुष्य सरासरी आयुष्य १५ ते २० वर्ष असते.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा बगळा पक्षी bagla bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. bagla bird information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about bagala bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही बगळा पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या bagala bird in english माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही  त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!