हिरकणी कथा मराठी Hirkani Story History in Marathi

hirkani story history in marathi – hirkani story in marathi हिरकणीची गोष्ट, हिरकणी विषयी इतिहास, आज आपण या लेखामध्ये हिरकणी विषय माहिती आणि हिरकणीचा इतिहास काय आहे ते पाहणार आहोत. हिरकणी हि एक शूर आणि धाडसी स्त्री जी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराष्ट्रातील रायगड किल्ल्याजवळ राहत होती. हिरकणी विषयी आपल्याला जाणून घ्यायचे असल्यास ती एक स्त्री होती आणि ती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हिरा म्हणून एक स्त्री रायगडाच्या पायथ्याशी राहत होते आणि त्याला एक छोटे बाळ होते आणि तिचा पती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात काम करत होता आणि त्यामुळे तो दिवसभर सैन्यात असत होता.

आणि हिरची एक वयस्कर सासू देखील होती जी त्या बाळाची काळजी दिवसभर घेत होती आणि हिरा हि गायी पाळत होती आणि त्याचे दुध काढून ते दुध किल्ल्यावर रोज विकण्यासाठी जात होती आणि अशीच एक दिवस ती किल्ल्यावर गेल्यानंतर एक घटना घडली ती काय आहे ते आपण खाली पाहणार आहोत.

hirkani story history in marathi
hirkani story history in marathi

हिरकणी कथा मराठी – Hirkani Story History in Marathi

हिरकणी विषयी इतिहास – hirkani history in marathi – hirkani full story in marathi

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये रायगडाच्या पायथ्याशी एक हिरा म्हणून स्त्री राहत होती आणि तिचा पती देखील शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये काम करत होता हीराला एक छोटेसे बळ होते आणि त्या बाळाची काळजी दिवसभर तिची वयस्कर सासू घेत होती कारण ती दिवसभर गडावर दुध ब्विकाण्यासाठी जात होती. ती आपले घर चालवण्यासाठी गाई पाळून त्याचे सकाळी दुध काढून ते दुध गडावरील लोकांना विकत होती आणि आपल्या घराचा खर्च चालवत होती.

एके दिवशी ती गडावर दुध घेवून विकायला गेली आणि त्या दिवशी एका मैत्रिणीला बाळाच्या जन्मासाठी मदत करायची होती कारण पूर्वी बाळाच्या जन्मासाठी प्रत्येक स्त्रिया एकमेकीना मदत करत होत्या. गडाचे दरवाजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाने सूर्योदय झाल्यानंतर उघडत होते आणि सूर्यास्तानंतर बंद होत होते. हिराबाई हिला त्या दिवशी खूप वेळ झाला होता आणि सूर्यास्ताला काही कमी वेळ बाकी होता ती धावत धावत दरवाज्याकडे जात असतानाच दरवाजे बंद झाले आणि दरवाज्याला कुलूप देखील घातले.

हीराला गडाबाहेर जाणे गरजेचे होते कारण तिचे छोटे बाळ हे घरामध्ये होते आणि तिच्या मनामध्ये आले कि त्याला भूक लागली असेल आणि ते रडत असेल आणि या विचाराने तिची घालमेल होत होती आणि म्हणून  ती दरवाजा बंद केलेल्या शिपायाजवळ जाऊन म्हणाली कि ओ दादा फक्त एकदा दार उघडा म्हणजे मी गड उतरून माझ्या घरामध्ये जावू शकेन कारण माझे छोटे बळ आहे आणि ते रडत असेल किंवा त्याला भूक लागली असेल पण शिपायाने दरवाजा उघडण्यास नकार दिला कारण तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश मोडू शकत नव्हता.

म्हणून त्याने दरवाजा उघडला नाही आणि त्याने हीराला गडावर कोणत्यातरी मैत्रिणीच्या घरी राहण्यास आणि सकाळी सूर्योदय झाल्यानंतर गड उतरण्यास सांगितले. आता हीराला काय करावे काहीच समजेना तिला आपल्या बाळाचा चेहरा दिसू लागला होता आणि तिला काहीही करून किल्ल्याच्या बाहेर जायचे होतेआणि ती आता किल्ल्यातून खाली जाण्यासाठी तटबंदीच्या भिंतीवरून चालू लागली आणि तिच्या लक्षात आले कि त्या ठिकाणी तटबंदीची भिंत नाही तर एक उंच डोंगर आहे आणि तो डोंगर खूप उंच होता पण तिने ठरवले कि या वाटेने गड उतरायचा.

ती त्या वाटेने असणाऱ्या झाडांचा आधार घेत खाली उतरू लागली आणि काही झुडूप हे काटेरी असल्यामुळे तिच्या हाताला अनेक काटे बोचले तसेच त्या वाटेला अनेक साप आपल्या शिकाराच्या शोधात होते पण तिला कसलेच भान नव्हते कारण तिला आपल्या बाळाचा चेहरा समोर दिसत होता ती तो डोंगर उतरत असताना तिला अनेक आवाज, तसेच सरपटणारे प्राणी, किडे, काटेरी झुडूपांचा सामना करावा लागला आणि तिला तो डोंगर उतरताना खूप जखमा देखील झाल्या होत्या आणि ती डोंगर उतरताना खूप अंधार देखील झाला होता पण तिला कोणतेच भान नव्हते.

तिला डोंगर उतरेपर्यंत शरीराला तसेच चेहऱ्याला अनेक जखमा झाल्या होत्या. ती शेवटी डोंगर उतरला आणि पायथ्याशी आली आणि तिने घर गाठले आणि आपल्या जखमा धुतल्या आणि मधुर आवाजात आपल्या बाळाला बोलावले आणि ते बाळ आपल्या आईचा आवाज ऐकल्यानंतर रडायचे देखील थांबले.

सकाळी ती उठून आपले रोजचे काम करू लागली आणि दुध काढून ते गडावर विकण्यास जात असताना दरवाज्याजवळ तोच शिपाई किंवा पहारेकरी अजून होता आणि त्याने हीराला पहिले आणि तो विचार करू लागला कि मी या स्त्रीला काल गडा बाहेर सोडले नाही आणि सकाळी देखील ह्या जाताना दिसल्या नाहीत तर या गडाच्या खाली कशा गेल्या म्हणून त्याने हिराला थांबवले आणि तिला विचारले कि मी तुम्हाला काळ देखील किल्ल्याबाहेर सोडले नाही आणि आज सकाळी देखील तुम्ही जाताना दिसल्या नाही तर हे कसे शक्य आहे.

त्यावेळी हिराने रात्री केलेल्या थरारक गोष्टीविषयी सांगितले प्रांती शिपायाला किंवा पहारेकराला मात्र याच्यावर विश्वास बसेना पण तिने तिच्या जखमा दाखवल्या मग त्याचा विश्वास बसला. पण जर हि गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना कळली तर तुम्हाला आता शिक्षा होणार हे ते बोलू लागला आणि त्याने हिराला शिवाजी महाराजांच्याकडे नेले.

त्यावेळी हिराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर सर्व हकीकत सांगितली आणि ती शांत राहीली त्यावेळी शिवाजी महाराजांनी तिला ह्या ठिकाणावरून ती गड उतरली त्या ठिकाणी नेले आणि उतरण्यासाठी सांगितले पण त्यावेळी तिला उतरणे कठीण वाटू लागले आणि मग तिने सांगितले कि मी माझ्यामध्ये असणाऱ्या ममतेपाई गड रात्री येथून उतरला पण आता उतरणे शक्य नाही.

शिवाजी महाराज विचार करू लागले कि हि अप्रशिक्षित स्त्री अश्या प्रकारे गड उतरू शकते तर प्रशिक्षित शत्रू अगदी सहजपणे हा गड चढू शकतात आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी एक ठेहाळणी बुरुज बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्या बुरुजाचे नाव हे हिरकणी असे ठेवण्यास सांगितले आणि हे ऐकून हीराला खूप आनंद झाला. रायगडावर हिरकणी नावाचा ठेहाळणी बुरुज आहे आणि हा हिरकणी बुरुज हिरकणीच्या धैर्याची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानतेची आठवण करून देणारा बुरुज आहे.

आम्ही दिलेल्या hirkani story history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर हिरकणी कथा मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या hirkani full story in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि hirkani story in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!