रायगड किल्ला माहिती Raigad Fort Information in Marathi

Raigad Fort Information in Marathi रायगड किल्ल्याची माहिती रायगड हा किल्ला महाराष्ट्रमधील रायगड जिल्ह्यातील महाड येथे दख्खनच्या डोंगरावर विस्तारलेला आहे. या किल्ल्याची खासियत म्हणजे या किल्ल्यावरील अनेक वास्तू आणि बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केली आहेत. रायगड हा किल्ला शिवाजी महाराजांचा किल्ला म्हणून ओळखला जातो आणि या किल्ल्याची समुद्रसपाटी पासूनची उंची २७०० फुट इतकी आहे. रायगड या किल्ल्याला पूर्वी रायरी या नावाने देखील ओळखल जायचं त्याचबरोबर इंग्रज लोक या गडाला पूर्वेकडील जिब्राल्टर या नावाने संबोधत होते. या गडावर दोन मार्गांनी जाता यायचं एक म्हणजे खुबलढा बुरुज आणि दुसरा नाना दरवाजा.

raigad fort information in marathi
raigad fort information in marathi
अनुक्रमणिका hide
1 रायगड किल्ला माहिती – Raigad Fort Information in Marathi

रायगड किल्ला माहिती – Raigad Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावरायगड किल्ला
जिल्हारायगड
जवळचे गावमहाड
समुद्रसपाटी पासूनची उंची२७०० फुट
स्थापनाइ. स १०३०
संस्थापकचंद्रराव मोरे
प्रकारगिरिदुर्ग
डोंगर रांगासह्याद्री
किल्ल्यावरील ठिकाणेमहादरवाजा, नाना दरवाजा, मेणा दरवाजा, बाले किल्ला, वाघ दरवाजा, नगारखाना दरवाजा, पालखी दरवाजा, जगदीश्वर मंदिर, शिरकाई मंदिर, पाचाड जिजाबाई वाडा, हत्ती तलाव, महाराजांची समाधी, राजसभा, राजभवन, टकमक टोक, राणीवसा, धान्याचे कोठार आणि बाजारपेठ

चंद्रराव मोरे यांचा वंशज यशवंतराव मोरे हा रायगड या किल्ल्यावर जावून राहिला होता, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ मध्ये रायगडला वेढा घातला आणि त्यानंतर मे महिन्यामध्ये शिवरायांना हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करण्यासाठी यश मिळाले आणि त्याच वेळी लुटण्यात आलेला जो खजिना होता रायगडावरील बांधकामासाठी करण्यात आला.

त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील रायगडावर झाला होता. त्याचबरोबर हा किल्ला अडचणीच्या ठिकाणी आहे आणि या किल्ल्यावर हल्ला देखील सहसा करता येत नाही त्यामुळे रायगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून निवड केली.

“महाराष्ट्रातील माणसाचा अभिमान

मराठी संस्कृतीचे प्रतिक

आणि

सह्याद्रीतील रत्न

म्हणजे

शिवरायांचा रायगड”

रायगड किल्ल्याचा इतिहास – Raigad Fort History in Marathi

“महाराष्ट्रातील माणसाचा अभिमान

मराठी संस्कृतीचे प्रतिक

आणि

सह्याद्रीतील रत्न

म्हणजे

शिवरायांचा रायगड”

या किल्ल्याची निर्मिती इ. स १०३० मध्ये चंद्रराव मोरे यांने केली होती त्यानंतर हा किल्ला यशवंतराव मोरे याच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्यावर अनेक महत्वाची बांधकामे करून घेतली जी आपण जास्तीत जास्त किल्ल्यावर जी बांधकाम पाहायला मिळतात ती शिवाजी महाराजांच्या काळातील आहेत आणि किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड आणि रायगडवाडी हि गावे देखील वसलेली आहेत.

त्यावेळी शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपली राजधानी बनवला तसेच याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक देखील झाला. संभाजी महाराजांचा तसेच राजाराम महाराजांचा राज्याभिषेक देखील या किल्ल्यावर झाला. पण सूर्याजी पिसाळ या फितूर झालेल्या किल्लेदारामुळे हा किल्ला मराठ्यांना गमवावा लागला.

तो ३ नोव्हेंबर १६८९ मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला त्यावेळी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेले रायगड हे नाव बदलून इस्लामगड असे ठेवण्यात आले. त्यानंतर हा किल्ला  ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी कडे देण्यात आला.

रायगड किल्ल्याची निर्मिती कोणी केली होती ?

रायगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील महाड गावामध्ये दख्खन डोंगरावर आहे. या किल्ल्याची निर्मिती इ. स १०३० मध्ये चंद्रराव मोरे यांनी केली होती.

रायगड किल्ल्याची वेगवेगळी नावे 

रायगड या किल्ल्याला इतिहासामध्ये वेगवेगळ्या नावांनी संबोधले गेले आणि ती नावे म्हणजे रायगड, रायरी, शिवलंका, भिवगडी, राजगिरी, रायगिरी, रेड्डी, राहीर, नंदादीप, तनस, बदेनुर, राशीवटा, इस्लामगड, पूर्वेकडील जिब्राल्टर अशी या किल्ल्याची अनेक नावे होती पण आज हा किल्ला रायगड म्हणून ओळखला जातो.

रायगड किल्ल्याविषयी माहिती – information about raigad fort in marathi

रायगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील महाड या गावामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये वसलेला आहे आणि हा किल्ला महाडपासून २५ किलो मीटर अंतरावर आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची निर्मिती फार पुरातन काळा मध्ये म्हणजेच इ. स १०३० मध्ये चंद्रराव मोरे यांनी केली त्यानंतर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि किल्ल्यामध्ये अनेक बांधकाम केली हा किल्ला खूप काळ मराठ्यांची राजधानी देखील होता.

या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून २७०० फुट होती. या किल्ल्यावर चढण्यासाठी जवळ जवळ १४०० पायऱ्या आहेत आणि या किल्ल्याला प्राचीन काळी रायरी म्हणून ओळखले जात होते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवरायांनी या किल्ल्याचा जीर्णोध्दार करून या किल्ल्याचे नाव रायरी बदलून रायगड ठेवले.

रायगड किल्ल्यावरील पाच दरवाजे

  • महा दरवाजा :

महा दरवाजा म्हणजे रायगड किल्ल्यामध्ये ज्या दरवाज्यामधून प्रवेश करावा लागतो जो आपल्याला गडावर गेल्यानंतर भव्य आणि मोठा दरवाजा दिसतो त्याला महा दरवाजा म्हणतात. हा दरवाजा ३५० वर्षापूर्वी बांधला आहे तसेच हा दरवाजा अश्याप्रकारे बनवला आहे जेथे शत्रू हत्तीच्या सहाय्याने हा दरवाजा तोडू शकत नाही. रायगडचा महादरवाजा सूर्योदय झाल्यानंतर उघडतात आणि सूर्यास्तानंतर बंद केले जातात.

  • नागर्चना दरवाजा :

नागर्चना दरवाजाला नगारखाना दरवाजा म्हणून ओळखले जाते. नगारखाना हे बाले किल्ल्यावर जाण्यासाठीचे एक मुख्य प्रवेशद्वार आहे जे आपल्याला सिंहासनाच्या समोर पाहायला मिळते.

  • पालखी दरवाजा :

रायगड किल्ल्यावर पालखी दरवाजा देखील आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी या दरवाजाचा देखील उपयोग केला जातो. हा दरवाजा गडावर स्तंभाच्या पश्चिमेकडे आहे जप आपल्याला ३१ पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर लागतो. असे म्हंटले जाते कि याच दरवाजातून छत्रपती शिवाजी महाराजांची, जीजामातांची तसेच सर्व राण्यांच्या पालख्या येथूनच जात होत्या म्हणून या दरवाजाला पालखी दरवाजा म्हणतले जाते.

  • मेणा दरवाजा :

मेणा दरवाजा हा आपल्यला जर आपण गडावर रोप वे ने गेलो तर तेथून काही पायऱ्या वरती चढून गेल्यानंतर जो दरवाजा लागतो त्या दरवाज्याला मेणा दरवाजा म्हणतात. ह्या दरवाजाने सरळ गेले कि पालखी दरवाजा लागतो हे दोन्ही दरवाजे सरळ रेषेमध्ये आहेत.

  • वाघ दरवाजा :

वाघ दरवाजा म्हणजे आपत्कालीन दरवाजा होय कारण या दरवाज्यातून किल्ल्यावर येणे तसे अशक्यच आहे. या दरवाज्याकडे जाण्यासाठी कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत जावे लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाला सहसा न दृष्टीस येणार आपत्कालीन दरवाजा गडावर बांधून घेतला होता.

रायगड किल्ल्यावरील शिवराज्याभिषेक:

“तो सोहळा आनंदाचा

तो सोहळा जल्लोषाचा

तो सोहळा विरतेचा

तो सोहळा शौर्याचा आणि धाडसाचा

तो सोहळा स्वप्नस्पुर्तीचा

तो सोहळा स्वातंत्र्याचा

तो सोहळा मराठेशाहीचा

तो सोहळा रयतेचा

तो सोहळा शिवरायांचा

शिवराज्याभिषेक”

शिव राज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला एक महत्वाचा क्षण होता आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाची घटना होती. आपला राजा सिंहासनावर विराजमान झाला तो दिवस म्हणजे ६ जून १६४७ होय . शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर चालू झाली होती तसेच शिव राज्याभिषेखासाठी देशामधील वेगवेगळय ठिकाणावरील ब्राह्मण लोकांना आमंत्रण दिले होते.

राज्याभिषेकाचे विधी २ प्रकारचे होते त्यामधील एक अभिषेकाचा यानंतर दुसरा विधी म्हणजे राजारोहण (सिंहासन रोहन). त्यानंतर शिवाजी महाराजांनी २४ सप्टेंबर १६७४ मध्ये आणखी एक राज्याभिषेक करून घेतला या राज्याभिषेकाचा मूळ हेतू हा अभिषेक जास्तीत जास्त लोकांना पाहता यावा कारण जो ६ जून १६७४ मध्ये अभिषेकाचा विधी झाला त्यामध्ये जास्त लोक सामील नव्हते (कारण तसे ठरले होते) पण सिंहासनरोहन च्या विधीला जास्त लोक उपस्थित होते.

किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे 

  • पाचाड जिजाबाई वाडा :

ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई जिजामाता यांना गडावरील थंड हवा आणि वातावरण सोसत नव्हते म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाड जवळ एक वाडा बांधला. तो वाडा आपल्याला आज देखील पाहायला मिळतो.

  • नाना दरवाजा :

रायगड किल्ल्यावर एक लहान दरवाजा आहे त्याला नाणे दरवाजा या नावाने देखील ओळखले जाते. या दरवाज्याला दोन कमानी आहेत आणि दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकारांच्या २ खोल्या देखील आहेत त्या खोल्यांना देवंडा म्हणून ओळखले जायचे.

  • जगदीश्वर मंदिर :

जगदीश्वर मंदिर हे महादेवाचे मंदिर आहे आणि या मंदिरा समोर नंदीची एक भव्य मूर्ती पाहायला मिळते आणि इतिहासकारांनी असे देखील म्हटले आहे कि शिवाजी महाराज या मंदिरात रोज दर्शन घेण्यासाठी येत होते.

  • महाराजांची समाधी :

मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस जो अष्ट कोणी चौथरा आहे तीच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे.

  • शिरकाई देऊळ :

पाचव्या शतकात शिर्के हे रायगडचे स्वामी होते आणि त्यांचीच आठवण करून देणारे हे शिरकाई देवीचे मंदिर आहे जे आपल्याला गडावर पाहायला मिळते.

  • हत्ती तलाव :

हत्ती तलावाचा उपयोग पूर्वीच्या काळी गजशाळेतील हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी केला जात होता

  • राजभवन :

राजभवन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुख्य वाडा जो लाकडापासून बनवला आहे. आता तेथे फक्त खांबाचे तळ पाहायला मिळतात.

  • राजसभा :

ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ते ठिकाण म्हणजे राजसभा. राजभवना समोर एक विस्तीर्ण अशी जागा आहे त्याला राजसभा म्हणतात. या खुल्या मैदानावर राजवटीतील महत्वाच्या घटना घडल्या जायच्या.

  • नगारखाना :

नगारखाना हे बाले किल्ल्यावर जाण्यासाठीचे एक मुख्य प्रवेशद्वार आहे जे आपल्याला सिंहासनाच्या समोर पाहायला मिळते.

  • टकमक टोक :

टकमक टोकाचा वापर पूर्वीच्या काळी गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी केला जायचा हे टोक २६०० फुट खोल आहे.

  • वाघ्या कुत्र्याची समाधी :

वाघ्या हा शिवाजी महाराजांचा प्रामाणिक कुत्रा होता ज्याने शिवाजी महाराजांच्या चितेच्या अग्नीमध्ये झेप घेवून महाराजांसोबत आपले देखील आयुष्य संपवून घेतले. या वाघ्या कुत्र्याची समाधी आपल्याला गडावर पाहायला मिळते.

  • खुबलढा बुरुज :

गड चढून गेल्यानंतर लगेच आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो तोच खुबलढा बुरुज. हा गडावरील सुप्रसिध्द दरवाजा आहे.

  • राणी वसा :

रायगड किल्ल्यावर आपल्याला राणी वसा देखील पाहायला मिळतो ज्यामध्ये प्रत्येक खोलीमध्ये संलग्न शयनगृह होते पण आता या राणी वश्याचे काही अवशेष पाहायला मिळतात.

  • होळी खेळण्याचे मैदान :

किल्ल्यावर पूर्वीच्या काळी ज्या ठिकाणी होळी खेळली जायची ते ठिकाण. हे मैदान नगारखाण्याच्या दरवाज्याच्या अगदी बाहेर आपल्याला पाहायला मिळते.

  • हिरकणी बुरुज :

रायगड किल्ल्याच्या आवारात एक प्रसिध्द भिंत पाहायला मिळतो त्याला हिरकणी बुरुज म्हणतात.

  • इतर ठिकाणे :

गडावर आपल्याला चोररदिंडी, महादरवाजा, गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, राण्यांचा महाल, बाजारपेठ, वाघदरवाजा अशी अनेक ठिकाणे पाहायला मिळतील.

रायगड किल्ल्याविषयी तथ्ये – facts of raigad fort 

  • सध्या हा किल्ला भारत सरकारच्या मालकीचा आहे.
  • शिवाजी महाराज्यांच्या काळामध्ये जे बांधकाम झाले ते हिरोजी इंदुलकर (अर्कीटेक्चर) यांनी केले.
  • या किल्ल्यावर मराठा, मोगल, ईस्ट इंडिया कंपनी तसेच ब्रिटीशांणी राज्य केले.
  • मराठा साम्राज्याने या किल्ल्यावर १७०७ ते १८१८ पर्यंत राज्य केले.
  • मोघल साम्राज्याने या किल्ल्यावर १६८९ ते १७०७ पर्यंत राज्य केले.
  • रायगड हा किल्ला बांधणीसाठी पाषाण आणि शिष्याचा वापर केला होता.
  • पूर्वीच्या काळी रायगड हा किल्ला मराठ्यांची राजधानी होता.
  • रायगड हा किल्ला भारतातील सर्वात लोकप्रिय किल्ल्यापैकी एक आहे.
  • राजा चंद्रराव मोरे यांच्या निधनानंतर हा किल्ला कमकुवत राजकर्त्यांच्या हाती गेला आणि त्याचाच फायदा घेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इ. स. १६५६ मध्ये आपल्या ताब्यात घेतला.
  • गंगा सागर या नावच एक प्रसिध्द तलाव किल्ल्याच्या काठावरून वाहतो ते दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते.
  • हा किल्ला भारतातील आश्चर्यकारक आणि उंच किल्ला आहे.
  • रायगड या किल्ल्यावर जाण्यासाठी जवळ जवळ १४०० पायऱ्या आहेत.
  • किल्ल्यामध्ये आत जाण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे महादरवाजा या महादरवाज्याच्या बाजूला एक बुरुज आहे त्याची उंची ६५ ते ७० फुट आहे.
  • रायगड किल्ल्यावरील टकमक टोक हा २६०० फुट उंच आहे.

रायगड किल्ला फोटो:

raigad fort information in marathi
raigad fort information in marathi

किल्ल्यामध्ये प्रवेश कसा करावा?

जर तुम्ही किल्ल्यावर किल्ल्याच्या संपूर्ण पायऱ्या (गडावर जाण्यासाठी जवळ जवळ १४०० पायऱ्या चढून जावे लागते) चढून जाणार असाल तर पाचाड गावाजवळ गडाच्या पायथ्याशी एक चीट दरवाजा आहे.

तेथून आपण पायऱ्या चढून महादारवाज्या पाशी येवू शकतो आणि गड चढण्यासाठी ३ तास लागतात. जर तुम्हाला पायऱ्या चढून जायचे नसेल तर तेथे एक रोपवे ची सुविधा आणि जर तुम्ही रोपवे ने गेला तर हे राणीवसात जाणाऱ्या मेणा दरवाज्याजवळ जाते.

रायगड किल्ल्यावर कसे जायचे ?

रेल्वेमार्गे : जर तुम्हाला रायगडला किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे माणगाव रेल्वे स्टेशन. आपण मुंबई, बेंगलोर, चेन्नई आणि दिल्ली येथी आपण माणगाव स्टेशनला रेल्वेने जावू शकतो आणि तेथून रायगड वर जाण्यासाठी बस किवा टॅक्सी पकडून जावू शकतो.

हवाई मार्ग : रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी थेट विमानसेवा नाही. जर तुम्हाला विमानाने यायचे असेल तर सर्वात जवळचे विमानतळ पुणे येथे आहे. पुण्यामध्ये येवून रायगड पर्यंत बस किवा टॅक्सी पकडू शकतो. पुण्याहून रायगडला जाण्यासाठी २ तास लागतात.

रस्तामार्गे : रस्त्यामार्गे आपण बसने जावू शकतो किवा आपल्या खाजगी कारणे देखील जावू शकतो. आपण पुण्याहून किवा मुंबईहून रायगडला जावू शकतो.

टीप

  • हा किल्ला पाहण्यासाठी आपण सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या मधल्या वेळेमध्ये आपण हा किल्ला केव्हा हि पाहू शकतो.
  • रायगड हा किल्ला पाहण्यासाठी कमीत कमी तीन तास लागतात.
  • हा किल्ला पाहण्यासाठी भारतीय पर्यटकांच्यासाठी १० रुपये प्रवेश शुल्क घेतला जातो आणि विदेशी पर्यटकांच्या कडून १०० प्रवेश शुल्क घेतला जातो.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, रायगड किल्ला raigad fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. raigad information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information of raigad fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही रायगड किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या raigad killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही raigad killa information in marathi त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “रायगड किल्ला माहिती Raigad Fort Information in Marathi”

  1. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!