होळकर वंशावळ Holkar Family History in Marathi

holkar family history in marathi – holkar family tree in marathi होळकर घराण्याचा इतिहास, होळकर वंशावळ, आज आपण या लेखामध्ये होळकर घराण्याविषयी आणि होळकर यांच्या कुटुंबाच्या इतिहासाविषयी माहिती पाहणार आहोत. होळकर हे १७२८ पासून माळव्यावर आणि इंदोर शहरावर राज्य करत होते आणि त्यांनी इंदोर हे शहर आपली राजधानी बनवली होती. ज्यावेळी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हि भूमी जिंकली आणि मग मराठा राज्य हे सर्वत्र पसरले.

ज्यावेळी होळकर हे इंदोर मध्ये आले त्यावेळी त्यांनी तेथील अनेक लोकांचे मन जिंकले आणि तेथे आपल्या राज्याचा विस्तार हा वाढवला. असे म्हटले जाते कि होळकर नावाचा उगम हा होळ किंवा हाल या गावामध्ये राहणाऱ्या लोकांच्यामधून झाला. होळकर घराण्याची स्थापना हि मल्हारराव होळकर यांनी केली आणि ते मराठी सैनिकामध्ये शिपाई म्हणून काम करत होते मग ते नंतर मराठा राज्याचे सुभेदार बनले.

मल्हारराव होळकर यांनी पेशवा बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली होळकर घराण्याची स्थापना १७२७ मध्ये केली. या घराण्यामध्ये मल्हारराव होळकर, देवी अहिल्याबाई होळकर, तुकोजी होळकर, मल्हारराव होळकर दुसरा, तुकोजी होळकर दुसरा असे प्रसिध्द राजे होऊन गेले. त्यांनी इंदोर आणि आजूबाजूच्या परिसरावर राज्य करून त्या प्रदेशावर आपले वर्चस्व गाजवले तसेच तेथे विकासकामे देखील केली आणि तसेच या प्रदेशासाठी काही नियम देखील त्यांनी बनवले. चला तर आता आपण त्याच्या कुटुंबाच्या इतिहासाविषयी काही माहिती खाली घेवूया.

holkar family history in marathi
holkar family history in marathi

होळकर वंशावळ – Holkar Family History in Marathi

घराण्याचे नावहोळकर घराणे
विभाग किंवा भागइंदोर
स्थापनहोळकर घराण्याची स्थापना १७२७ मध्ये झाली.
संस्थापनमल्हारराव होळकर

होळकर घराण्याची स्थापना कोणी व केंव्हा केली ?

होळकर घराण्याची स्थापना हि मल्हारराव होळकर यांनी केली आणि पेशवा बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली १७२७ मध्ये या घराण्याची स्थापना केली.

होळकर घराण्यातील प्रसिध्द राजे ?

या घराण्यामध्ये मल्हारराव होळकर, देवी अहिल्याबाई होळकर, तुकोजी होळकर, मल्हारराव होळकर दुसरा, तुकोजी होळकर दुसरा असे प्रसिध्द राजे होऊन गेले.

होळकर घराण्याचा इतिहास -holkar family tree in marathi

असे म्हटले जाते कि होळकर नावाचा उगम हा होळ किंवा हाल या गावामध्ये राहणाऱ्या लोकांच्यामधून झाला. मल्हारराव होळकर यांनी होळकर घराण्याची स्थापना हि १७२७ मध्ये केली आणि या घराण्यामध्ये मल्हारराव होळकर नंतर देवी अहिल्याबाई होळकर, तुकोजी होळकर, मल्हारराव होळकर दुसरा, तुकोजी होळकर दुसरा हे प्रतिष्ठित नेते होऊन गेले.

मल्हारराव होळकर 

होळकर घराण्याची स्थापना हि मल्हारराव होळकर यांनी केली आणि ते मराठी सैनिकामध्ये शिपाई म्हणून काम करत होते मग ते नंतर मराठा राज्याचे सुभेदार बनले. मल्हारराव होळकर यांनी पेशवा बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली होळकर घराण्याची स्थापना १७२७ मध्ये केली. मल्हारराव होळकर यांनी पेशवे बाजीराव यांना इंदूर जवळील प्रदेश मिळवून देण्यास मदत केली आणि पेशवा बाजीराव प्रथम यांनी त्या भागामध्ये चौथ आणि कर वसूल करण्यासाठी नेमले.

त्यांनी इंदोरे मध्ये १७४७ मध्ये आपला शाही वाडा बांधला. ज्यावेळी पानिपतची तिसरी लढाई झाली त्यावेळी अहमद शाह अब्दालीने पेशाव्यावर मात केली आणि त्यावेळी मल्हारराव होळकर यांनी होळकरांचे स्वातंत्र्य राज्य म्हणून राजवाडा आणि इंदूरची घोषणा केली. पहिले मल्हारराव होळकर यांचा मृत्यू १७६७ मध्ये झाला.

खंडेराव होळकर 

खंडेराव होळकर हे मल्हारराव होळकर म्हणजेच होळकर घराण्याचे संस्थापक यांचे पुत्र होते परंतु ते त्यांच्या लहान वयातच एका लढाई मध्ये त्यांचा मृत्यू झाला म्हणजेच ते मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर १२ वर्षाने मरण पावले.

नर राव होळकर 

होळकर घराण्याचा दुसरा शासक म्हणून मालेराव किंवा नर राव होळकर यांना ओळखले जाते. नर राव होळकर हे मल्हारराव होळकर यांचे नातू म्हणजेच हे अहिल्याबाई होळकर आणि खंडेराव होळकर यांचे पुत्र होते. नर राव होळकर हे १७६६ मध्ये हा होळकर घराण्याचा दुसरा शासक बनला परंतु १९६७ मध्ये त्याचा मृत्यू झाला.

अहिल्याबाई होळकर 

मालेराव होळकर या मुलाच्या मृत्युनंतर अहिल्याबाई होळकर यांनी पेशव्यांची परवानगी घेवून घराण्याच्या पुढच्या शासक झाल्या आणि त्यांचा १७६७ ते १७९५ पर्यंत होळकर घराण्यावर राज्य केले. ती एक आदर्श शासक बनली आणि तिला तुकोजीराव होळकर यांनी मदत केली जे होळकर सैन्याचे सेनापती होते. अहिल्याबाई होळकर ह्या लोकांच्यामध्ये खूप लोकप्रिय होत्या कारण त्या लोकांच्या अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायच्या.

ज्यावेळी त्या होळकर घराण्याच्या शासक होत्या त्यावेळी त्यांनी आपली राजधानी नर्मदेनदीच्या तीरावर असलेल्या महेश्वरीला हलवली. तिने भरतील वास्तुकला देखील विकसित करण्यासाठी मदत केली आणि तिने कशी विश्वेश्वर मंदिर आणि वाराणसी बांधले. तसेच तिने महेश्वरी शहरामध्ये कापड उद्योग देखील विकसित केला.

तुकोजीराव होळकर 

राणी अहिल्याबाई होळकर यांचे निधन झाल्यानंतर तुकोराव होळकर यांना १७९५ मध्ये पुढील होळकर शासन म्हणून निवडण्यात आले त्यांनी इंदुर्वर फक्त २ वर्ष राज्य केले आणि १७९५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

जसवंतराव होळकर 

तुकोजीराव होळकर यांच्या मृत्यूनंतर जसवंत राव होळकर हे १७९८ मध्ये होळकर घराण्याचे शासक बनले. जसवंत राव होळकर हे धाडसी तर होतेच परंतु ते गुरील्ला लढ्यामध्ये पारंगत देखील होते. त्यांनी दुसरे अॅग्लो – मराठा युध्द केले मुघल सम्राट शर आलम दुसरा ला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या शौर्याबद्दल जसवंत राव होळकर याला मुघल सम्राटाने महाराजाधिराज राजराजेश्वर अलिजा बहादूर अशी पदवी दिली होती.

मल्हारराव होळकर दुसरा आणि तुकोजीराव होळकर दुसरा 

जसवंत राव होळकर नंतर होळकर घराण्याचे शासक पद हे १८११ मध्ये मल्हारराव होळकर दुसरा यांचे कडे गेली आणि त्याच्या राजवटीमध्ये तिसरे इंग्रज मराठा युध्द महिद्पुराची लढाई लढली. पण ब्रिटीशांच्या राजवटीमध्ये त्यांचा पराव्हाव झाला. तुकोजीराव होळकर दुसरे हे १८४४ मध्ये होळकर घराण्याचे उत्तराधिकारीबनले आणि १८८६ पर्यंत त्यांनी राज्य केले.

होळकर घराण्याविषयी महत्वाची माहिती – important information about holkar family history 

  • होळकर हे १७२८ पासून माळव्यावर आणि इंदोर शहरावर राज्य करत होते आणि त्यांनी इंदोर हे शहर आपली राजधानी बनवली होती.
  • होळकर घराण्याची स्थापना हि मल्हारराव होळकर यांनी केली
  • या घराण्यामध्ये मल्हारराव होळकर, देवी अहिल्याबाई होळकर, तुकोजी होळकर, मल्हारराव होळकर दुसरा, तुकोजी होळकर दुसरा असे प्रसिध्द राजे होऊन गेले.
  • अहिल्याबाई होळकर या होळकर घराण्यातील प्रसिध्द शासक आणि लोकप्रिय नेत्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये अनेक सुधारित कामे केली.
  • होळकर घराण्याचा काळ हा १७२७ ते १८८६ पर्यंतचा होता आणि ब्रिटीश राजवटीमध्ये त्यांचा पराभव झाला.
  • तिने भारतातील वास्तुकला देखील विकसित करण्यासाठी मदत केली आणि तिने कशी विश्वेश्वर मंदिर आणि वाराणसी बांधले. तसेच तिने महेश्वरी शहरामध्ये कापड उद्योग देखील विकसित केल.
  • पहिले मल्हारराव होळकर यांचा मृत्यू १७६७ मध्ये झाला.

आम्ही दिलेल्या holkar family history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर होळकर घराण्याचा इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या holkar family tree in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!