Ahilyabai Holkar information in Marathi अहिल्याबाई होळकर माहिती: पहिली स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करवून दिला, एक अतिशय योग्य शासक व संघटक, न्यायप्रियता, पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत धनुर्धर हे सर्व गोष्टींमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविणाऱ्या आणि होळकर घराण्याच्या ‘तत्वज्ञानी राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘महाराणी अहिल्याबाई होळकर’ahilyabai holkar in marathi.
“ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो”, असा संदेश देणाऱ्या अहिल्याबाई होळकर ahilyabai holkar yanchi mahiti यांचे व्यक्तिमत्व हे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे होते. एक अतिशय कर्तृत्ववान, दानशूर व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांची माहिती – Ahilyabai Holkar information in Marathi
अहिल्याबाई होळकर यांचा जीवन परिचय
नाव | अहिल्याबाई खंडेराव होळकर |
जन्म | ३१ मे १७२५, चौंडी, जामखेड, अहमदनगर, महाराष्ट्र |
मृत्यू | १३ ऑगस्ट १७९५ |
वडील | मानकोजी शिंदे |
आई | सुशीलाबाई शिंदे |
पती | खंडेराव होळकर |
अपत्ये | मालेराव आणि मुक्ताबाई |
कार्य | समाजसुधारक |
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याश्या गावात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. तत्कालीन काळात शिक्षणास फारसे मह्त्व नव्हते तरीही तिच्या विद्वान आणि दूरदृष्टी असलेल्या वडिलांनी शिक्षणाची साधने उपलब्ध नसताना देखील त्यांना लिहण्यावाचण्यास शिकवले होते.
वयाच्या ८ व्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह पेशव्यांचे सरदार मावळ प्रांताचे जहागीरदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याची झाला. त्यांना दोन अपत्ये झाली मालेराव आणि मुक्ताबाई.
अहिल्याबाईंच्या या हुशार, क्षमाशील आणि शांत स्वभावाच्या असल्यामुळे होत्या. त्यामुळे दूरदृष्टी ठेऊन मल्हाररावांनी देखील पुरुषप्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी मराठी लिहिणे-वाचणे, गणित इ. गोष्टी त्याचप्रमाणे घोड्यावर बसणे, दांडपट्टा फिरवणे, युद्धाचे व डावपेचाचे धडे, सैन्य, राजकारण या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण त्यांना दिले होते. आणि त्यांच्यावर असलेल्या विश्वासापोटी त्यांचा महत्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाई वर सोपवीत असतं.
- नक्की वाचा: सावित्रीबाई फुले यांची माहिती
जीवनातील अडचणी आणि संघर्ष
अहिल्याबाई यांच्या वयाच्या २८ व्या वर्षी पती खंडेराव इ.स १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्युनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाण्यास रोखले आणि त्यांना प्रजाहीतासाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर त्यांनी राज्यकारभार सांभाळण्यास सुरुवात केली. सासरे मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असतं, तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत.
१२ वर्षानंतर १७६६ मध्ये मल्हारराव यांचे निधन झाले. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. सर्व मावळ प्रांताची जबाबदारी त्यांच्यावर पडली. पण निराश न होता लहानपणापासूनच धाडसी असणाऱ्या अहिल्याबाई इ.स. १७६७ ला त्यांनी मावळ प्रांताचा कारभार हाती घेतला. लढायांमध्ये त्या स्वतः सैन्याचे प्रभावशाली नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी मल्हारराव यांचे सगळ्यात विश्वासू सुभेदार तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.
एका इंग्रजी लेखकाने अहिल्याबाई होळकर यांना भारताच्या “कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ, मार्गारेट” असे म्हटले आहे. त्यांची तुलना इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. त्यांना भारतातील, मावळ प्रांताच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या ‘तत्वज्ञानी राणी’ म्हणून ओळखल्या जातात.
शासक महाराणी अहिल्याबाई होळकर
मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तुत्वावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे राज्यकारभारामध्ये त्या तरबेज झाल्या होत्या त्यामुळे त्यांच्या मृत्युनंतर अहिल्याबाईनी मावळ प्रांताचा स्वतः उत्तराधिकारी होण्यासाठी पेशव्यांकडे विनंती केली. त्या काळात एका बाईने शासन करण्यास अनेकांचा विरोध होता. पण त्यांनी आपल्या कारकीर्दीतून अशी शंका घेणाऱ्याना सपशेल खोटे ठरविले.
अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात. अहिल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. त्यांनी जनतेच्या आणि रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. त्यांच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. त्यांच्या राजकारभारात त्यांनी कुविख्यात डाकुला फाशी दिली होती.
त्यांनी आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना जाहीर केले कि, जो कोणी चोर, लुटारू, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करेल, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लावला जाईल. त्यावेळी जातपात बगितली जाणार नाही. आणि त्यांनी तशी कृतीहि केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.
अहिल्याबाईंच्या राज्यात करागारांना, मूर्तीकारांना व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. राजकारणातील बारकावे व तत्व व्यावहारिक नीती नियम व सूत्रे आपल्या देशाची राजकीय, सामाजिक, भौगोलिक स्थिती, रणांगणावरील आखाडे व अडचणी आणि बारकावे समजून घेऊन मल्हारराव यांच्या गैरहजेरीत सर्व कारभार करण्यात त्या पारंगत झाल्या.
वास्तुशिल्प व बांधकाम केल्यामुळे कारागिरांची कला जोपासून संस्कृतीचा वारसा तर जपलाच पण त्याच बरोबर गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळवून दिले. त्यांच्या कामगिरीचा हा दुहेरी बाणा निश्चितच अभिमानास्पद आहे.
समाजसुधारक अहिल्याबाई व त्यांनी केलेली समाज कार्य
- शेती आणि शेतकऱ्यांच्या उद्धाराची कार्य- शेतकऱ्यांना जाचक करातून मुक्त केले. गोपालनाचे महत्त्व पटवून देऊन प्रजेला गाई देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले.
- विद्वान विध्यार्थ्यांसाठी अनमोल ग्रंथसंपदा निर्माण करून जतन केली. शाळा काढून विद्याप्रसाराचे काम केले.
- त्या काळातील सती जाण्याची अंधश्रध्दा निवारण करण्यासाठी प्रयत्न केले. समाजात सती गेल्याने पुण्य व न गेल्याने पाप असा असलेला गैरसमज दूर करण्यास प्रयत्न केला.
त्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व प्रजेची चोर दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत अशा लुटारू लोकांना गायी, म्हशी, जमिनी दिल्या व त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवला आणि चोर, दरोडेखोर यांचे मत परिवर्तन केले. त्यांची न्यायप्रियता सर्वदूर पसरली होती. सर्वांना समान न्याय हा त्यांचा बाणा होता.
राणी अहिल्याबाई यांनी सर्वधर्मसमभावाचा आदर्श मिरवीत भारतात अनेक हिंदू ज्यामध्ये अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, ऋषिकेश, जेजुरी, पंधरपूर, चौंडी या तीर्थक्षेत्री मंदिरे बांधली, शिवाय मशीदी, दर्गे व विहार बांधली. काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या.
वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंडी, नाशिक, इंदूर, त्र्यंबकेश्वर येथे विस्तीर्ण नदीघाट बांधले. शिवाय सप्तपुते-चार धामेया ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रीकांची सोय केली. महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्वर, भीमाशंकर या ठिकाणी अन्नछत्रे उघडली. उन्हाळ्यात राज्यांतून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या, धर्मशाळा, आश्रयशाळा बांधल्या. गरिबांना रोजगार मिळवून दिले.
अहिल्याबाईंना प्रजेच्या कल्याणार्थ काम करण्याची आवड होती. त्यांनी द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक, परळी वैजनाथ या तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. सणासुदीला गोरगरीबांसाठी अन्नदान, कपडे वाटप इत्यादी त्या करीत.
जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या. पशुपक्षांसाठी रुग्नोपचारांची व्यवस्था केली. सर्पदंशावर लगेच उपचार व्हावेत म्हणून हकीम-वैद्य नेमले. स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या. त्यांच्या कामातील बारकाई इतकी होती कि, मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता.
राजधानी महेश्वर हे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. अहिल्याबाईंनी वस्त्रोद्योगास चालना दिली, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली व उत्तम हातमागांची सनंगे तयार होतील अशी पेठ कायम केली.
इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे मोठ्या आणि सुंदर शहर बनविले हे त्यांनी केलेले फार मोठे काम होते. त्यांना मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव “देवी अहिल्याबाई” आणि विद्यापीठास “देवी अहिल्या विश्वविद्यालय” असे नाव देण्यात आले आहे.
अहिल्याबाई होळकर यांची वंशावळ
राजमाता अहिल्याबाई होळकर यांची वंशावळ याबद्दल महत्वपूर्ण माहिती आम्ही लवकरच येथे घेऊन येऊ.
मृत्यू
मध्यम उंची, सावळा वर्ण, डोईवर पदर घेतलेली भारतीय संस्कृतीचे दर्शन आपल्या पोशाखामधून करवून देणाऱ्या अहिल्याबाईंची वयाच्या ७० व्या वर्षी वृद्धापकाळाने प्राणज्योत मावळली. १३ ऑगस्ट १७९५ साली त्यांचे निधन झाले.
आम्ही दिलेल्या ahilyabai holkar information in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ahilyabai holkar information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि ahilyabai holkar marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनराठी.नेट