हायड्रॉलिक विषयी माहिती Hydraulic Information in Marathi Language

Hydraulic information in Marathi language आपण जेसीबी पाहतो क्रेन पाहतो गाड्यांची गेअरिंग सिस्टम सुद्धा पहिली पण आपणाला माहित आहे का कि हे कशावर चालते ? तुम्हाला माहित आहे का कि यांच्यामध्ये इतकी शक्ती येते कुटून ? नाही माहित ना चला तर मग आपण या सदरात “हायड्रॉलिक” या विषयवार चर्चा करूयात.

hydraulics-information-marathi-language

हायड्रॉलिक म्हणजे काय? Hydraulic Information in Marathi language          

हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात म्हणजे हे आपल्याला चांगलेच समजेल, समजा आपल्याकडे एक मोटारसायकल आहे, ती हजारो किलोमीटरचा प्रवास करु शकते पण ते करताना तिची एकच अट असेल ती म्हणजे “पेट्रोल” यावरून आपल्याला हे समजते कि मोटारसायकल हि पेट्रोल शिवाय चालू शकत नाही. इंग्रजी भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर working medium of bike is petrol and without petrol bike will not start.

याचाच अर्थ असा कि कोणतीही अशी कार्य प्रणाली (system) सिस्टम जी तेलाच्या दाबावर (pressurized oil) वर काम करते त्याला आपण हायड्रॉलिक्स असे म्हणतो. जसे आपण वरील उदाहरणात पाहिलं तस हायड्रॉलिक्स मध्ये तेलाचा दाब हे कार्यरत मध्यम (working medium) आहे.

Artificial Intelligence Information In Marathi

हायड्रॉलिक्सचा इतिहास History Of Hydraulics

हायड्रॉलिक्स हा ग्रीक मधून आलेला “हायड्रॉलिकोस” HYDRAULIKOS हा शब्द आहे. त्याचा अर्थ पाण्याची पायीपलाईन चे काम (WATER PIPELINING) असे आहे. हिरो ऑफ अलेक्झांडरिया हा पहिल्या दशकातला एक रोमन अभियांत्रिकी तसेच गणितज्ञ होता. यांचा हायड्रॉलिक्सच्या शोधामध्ये खूपच मोलाचा वाटा आहे. यांनी आपल्या सिधान्तामधून अनेक विषयांवर माहिती दिली आहे जसे कि गणित (MATHS) भौतिकशास्त्र (PHYSICS) यांत्रिकी (MECHANICS) आणि न्यूमॅटिक्स (PNEUMATICS) म्हणून आपण यांना फादर ऑफ हायड्रॉलिक्स व न्यूमॅटिक्स असे म्हणू शकतो.

हायड्रॉलिक्सची कार्य प्रणाली/रचना Working Principle of Hydraulics

आता आपण ब्गुयात याची रचना मुख्यता हे 3 भागामध्ये विभागले गेले आहे. सगळ्यात पहिले म्हणजे इनपुट टूल्स दुसरे म्हणजे कंट्रोल आणि प्रोसेसिंग स्टेज आणि तिसरा आउटपुट स्टेज. इनपुट स्टेज मध्ये इनपुट डिव्हायसेस असतात जसे कि पुश बटण इ. दुसऱ्या स्टेज मध्ये खास व्हाल्व चा समावेश असतो कारण यामुळे तेलाचा जो दाब आहे तो कंट्रोल होतो. अतिंम स्टेज जे आहे आउटपुट स्टेज येथे सिलींडरचा वापर केला जातो.

हायड्रॉलिक्स यंत्रणेचा वापर होणारी उदाहरणे Applications of hydraulics systems

गिअर प्रणाली Hydraulic Gearing System information in marathi              

चार चाकी कोणतेही वाहन असो यामध्ये जे गेअरिंग सिस्टम असते त्यामध्ये हायड्रॉलिक्सचा वापर केला जातो.

जेसीबी Hydraulic JCB information in marathi       

जेसीबी किंवा बुलडोजर सारखी जड वाहने सुद्धा हायड्रॉलिक्स वरती काम करतात.

क्रेन Hydraulic crane information in marathi  

क्रेन जी वजन उचलण्याकरिता करतात त्यामध्ये सुद्धा हायड्रॉलिक्स चा वापर होतो.

लिफ्ट Hydraulic lift information in marathi       

लिफ्ट मध्ये आपण एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर येजा करतो ते सुद्धा या हायड्रॉलिक्स सिस्टमचा वापर केल्यामुळेच.

ब्रीज Hydraulic bridge information in marathi

ब्रीज यामुळे देखील हायड्रॉलिक्सचा वापर केला जात आहे. हे आपल्याला जास्तीत जास्त बाहेरच्या देशात पाहायला मिळते. यामध्ये ब्रीज मधील मधला भाग हा हायड्रॉलिक्स च्या मदतीने वरती उचलला जातो.

वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेल कि हायड्रॉलिक्स काय आहे त्याचा इतिहास काय आहे त्याच बरोबर त्याची उदाहरणे वकार्य प्रणाली कशी आहे. Hydraulic information in Marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही हायड्रॉलिक्स विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!