आयएएस अधिकारी म्हणजे काय? IAS Full Form in Marathi

IAS Full Form in Marathi – IAS Meaning in Marathi आयएएस चे पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये आयएएस IAS चे पूर्ण स्वरूप आणि आयएएस IAS बद्दल माहिती घेणार आहोत. आयएएस IAS या पदाला मराठी मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा म्हटले जाते जाते आणि आयएएस IAS ह्याचे पूर्ण स्वरूप हे Indian Administrative Service असे आहे. आयएएस हे भारतातील सर्वोच्च आणि सन्माननीय पदांपैकी एक आहे. भारतात लाखो विद्यार्थ्यांना आयएएसची नोकरी मिळवायची आहे, पण हे स्वप्न काही मोजक्याच लोकांना पूर्ण होते. आयएएस IAS होण्यासाठी, एखाद्याला यूपीएससी (नागरी सेवा) परीक्षेचा मागोवा घ्यावा लागतो आणि यूपीएससीमध्ये सर्वोत्तम रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाच आयएएस पद मिळते.  

हे एक सरकारी आणि प्रशासकीय नोकरी म्हणून भारतातील सर्वोच्च पद आहे ज्याठिकाणी लोकांना खूप सन्मानासह चांगला पगार मिळतो तसेच जो व्यक्ती आयएएस IAS अधिकारी झाला आहे अश्या व्यक्तीला अनेक सुख सोयी देखील मिळतात.

आयएएस अधिकाऱ्याची काही वर्षांच्या सेवेनंतर जिल्ह्यात जिल्हा दंडाधिकारी किंवा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते आणि त्यांना वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या आणि कार्ये पार पदवी लागतात. चला तर आता आपण आयएएस विषयी आणखीन सविस्तर पणे माहिती घेवूयात.

 ias full form in marathi
ias full form in marathi

आयएएस अधिकारी म्हणजे काय – IAS Full Form in Marathi

आयएएस परीक्षा म्हणजे काय – IAS Meaning in Marathi

ias full form marathi भारतीय प्रशासकीय सेवा IAS या पदाला पूर्वी  इम्पीरियल सिव्हिल सर्व्हिस (ICS) म्हणून ओळखले जात होते.  ही नागरी सेवा परीक्षा आहे आणि भारतातील सर्वात कठीण स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक आहे. अखिल भारतीय प्रशासकीय नागरी सेवेसाठी अधिकार्‍यांच्या भरतीसाठी हे संघ लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केले जाते.

आयएएस चा इतिहास – history of IAS 

आयएएस  हे खूप पूर्वीच्या काळापासून म्हणजेच हे ब्रिटीशांच्या काळापासून सुरु झाले आहे. आयएएस  (IAS) चा इतिहास खूप जुना आहे आणि १८५८ मध्ये इंपीरियल सिव्हिल सर्व्हिस म्हणून ब्रिटिशांनी त्याची सुरुवात केली होती. मग भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्या नंतर १९५० पासून ते भारतीय प्रशासकीय सेवा म्हणून ओळखले जाऊ लागले.

आयएएस चे पूर्ण स्वरूप – IAS long form in marathi

आयएएस IAS या पदाला मराठी मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा म्हटले जाते जाते आणि आयएएस IAS ह्याचे पूर्ण स्वरूप हे indian administrative service असे आहे.

आयएएस बनण्यासाठी असणारे पात्रता निकष – Eiligibility for IAS officer 

आयएएस IAS बनण्यासाठी त्या संबधित उमेदवाराला काही अटी किंवा पात्रता निकष पूर्ण करावे लागतात ते पात्रता निकष खाली दिले आहेत.

 • आयएएस IAS परीक्षा देणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे.
 • कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेला कोणताही भारतीय विद्यार्थी आयएएस आणि इतर २४ पदांसाठी घेण्यात येणाऱ्या UPSC नागरी सेवा परीक्षेत बसू शकतो..
 • सामान्य श्रेणीतील विद्यार्थी जास्तीत जास्त ६ वेळा परीक्षेसाठी अर्ज करू शकतो.
 • विद्यार्थ्याचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ३२ वर्षे असावे, येथे विविध श्रेणीनुसार ३ ते ५ वर्षे वयाची कमाल सूट देण्यात आली आहे
 • समान ओबीसी विद्यार्थी ९ वेळा आणि एससी-एसटी विद्यार्थ्यांसाठी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.

आयएएस परीक्षेचे टप्पे – steps of IAS exam 

आयएएस IAS परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत ते आपण खाली पाहूयात.

 • प्राथमिक परीक्षा (preliminary).
 • मुख्य परीक्षा (mains).
 • मुलाखत (interview).

सर्व प्रथम इच्छुक व्यक्तीची उदिष्ट चाचणी घेतली जाते ज्याला आपण preliminery म्हणून ओळखतो आणि इच्छुक व्यक्तीला यामध्ये उतीर्ण व्हावे लागते कारण यामध्ये उतीर्ण झाल्या शिवाय तो व्यक्ती मुख्य परीक्षेसाठी पात्र होत नाही.

मग त्यानंतर त्या व्यक्तीची लेखी परीक्षा घेतली जाते मग तो संबधित व्यक्ती त्या परीक्षेमध्ये उतीर्ण झाला कि तो पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरतो.

मग मुख्य परीक्षेमध्ये पात्र झालेला व्यक्तीला मुलाखतीसाठी म्हणजेच त्याचा व्यक्तिमत्व चाचणी घेण्यासाठी बोलवले जाते. मुलाखतीचा उद्देश हा सक्षम आणि निपक्षपाती निरीक्षकांच्या मंडळाद्वारे सार्वजनिक सेवेतील करियरसाठी उमेदवाराच्या वैयक्तिक योग्यतेचे मुल्यांकन केले जाते आणि मग त्या संबधित व्यक्तीची त्या जागेसाठी निवड केली जाते. 

आयएएस पदाचे कार्य काय असते किंवा जबाबदाऱ्या – roles of IAS officer 

हे एक सरकारी आणि प्रशासकीय नोकरी म्हणून भारतातील सर्वोच्च पद आहे आणि त्यांना या पदासाठी चांगला पगार देखील मिळतो परंतु आयएएस IAS अधिकाऱ्याला काही महत्वाच्या जबाबदाऱ्या देखील पार पाडाव्या लागतात त्या आता आपण खाली पाहूयात.

 • आयएएस IAS अधिकाऱ्याला सरकारी महसूल गोळा करण्याची महत्वाची जबाबदारी पार पदवी लागते कारण महसूल चांगले गोळा झाले तर देश चांगल्या प्रकारे चालू शकतो.
 • त्याचबरोबर आयएएस IAS अधिकाऱ्याला शासनाचे म्हणजेच सरकारचे सर्व दैनंदिन व्यवहार पाहणे आणि सांभाळणे.
 • त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणे खूप गरजेचे असते.
 • जिल्हा प्रशासनाची पाहणी व सांभाळ करणे.
 • केंद्रात, आयएएस अधिकारी विशिष्ट क्षेत्राशी संबंधित धोरणे तयार करण्यात आणि त्यांची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ( उदाहरणार्थ, वित्त, वाणिज्य इ. )
 • धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये वैयक्तिक पर्यवेक्षणाद्वारे निधीचे वितरण समाविष्ट आहे.
 • आयएएस IAS अधिकाऱ्याला वेगवेगळ्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी निधी गोळा करावा लागतो तसेच उपाय शोधून त्याचे वितरण देखील करावे लागते.
 • केंद्रात, IAS अधिकारी कॅबिनेट सचिव, सचिव / अतिरिक्त सचिव, सहसचिव, संचालक, उपसचिव आणि अंडर सेक्रेटरी या सर्वोच्च पदावर काम करतात.
 • ज्यावेळी सरकार जनतेच्या हितासाठी वेगवेगळी धोरणे ठरवत असते त्यावेळी सरकारला सल्ला देण्याची जबाबदारी देखील ते पार पडतात.
 • संबंधित मंत्र्यांशी सल्लामसलत करून धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी यांचा समावेश असलेल्या सरकारचे कामकाज हाताळणे.
 • सुरुवातीला, आयएएस अधिकारी उपविभागीय स्तरावर राज्य प्रशासनात सामील होतात, उपविभागीय दंडाधिकारी म्हणून त्यांची सेवा पुन्हा सुरू करतात आणि त्यांना नियुक्त केलेल्या क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था, सामान्य प्रशासन आणि विकास कामे पाहतात.
 • ते राज्यापासून केंद्रापर्यंत वेगवेगळ्या पदांवर आणि त्याउलट काम करू शकतात.

आयएएस अधिकाऱ्याला दिल्या जाणाऱ्या सुविधा

आयएएस IAS हे एक उच्च आणि मानांकित पद आहेच आणि या पदासाठी पगार तर चांगला दिलाच जातो परंतु  त्यांना काही इतर सोयी सुविधांची देखील पुरवणी केली जाते. चला तर मग पाहूया आयएएस IAS अधिकाऱ्याला कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात.

 • आयएएस IAS अधिकाऱ्याला मिळणारा महत्वाचा लाभ म्हणजे त्यांना निवृत्ती नंतर आजीवन पेन्शन लाभ मिळतो.
 • वाहतूक चालकांच्यासह सायरन ( लाल दिव्याचे ) असणारे वाहन देखील आयएएस IAS अधिकाऱ्याला पुरवले जाते.
 • आयएएस IAS अधिकाऱ्यांची सर्व बिले जसे कि पाणी, मोबाईल आणि वीज बिल देखील भरले जाते.
 • आयएएस IAS अधिकाऱ्याला भारतामध्ये कोठेही किंवा मग परदेशामध्ये कोठेही सहलीला जायचे असेल तर त्या अधिकाऱ्याला मोफत कुटुंब सहलीचा फायदा घेता येतो.
 • तसेच आयएएस IAS अधिकाऱ्याला सुरक्षित निवास्थान मिळते तसेच घरामध्ये नोकर चाकर देखील मोफत मिळतात.

आम्ही दिलेल्या ias full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आयएएस अधिकारी म्हणजे काय? माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ias officer full form in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि ias full form marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ias officer means in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!