आईस केक रेसिपी Ice Cake Recipe in Marathi

Ice Cake Recipe in Marathi आईस केक रेसिपी केक म्हंटल कि सर्वांच्या तोंडाला पाणी येते आणि त्यामध्ये आईस केक म्हणजे काय विषयच नाही कारण हा केक भरपूर क्रीम वापरून, केकला सुगर सिरप लावून आणि केकचे थर लावून बनवला जातो आणि जास्त क्रीम वापरल्यामुळे या प्रकारच्या केकला टेस्ट येते. आईस केक हा बहुतेक लोकांना खूप आवडतो आणि काही लोकांना फक्त केकचे नाव जरी ऐकले तरी त्यांना केक खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. आईस केक हा विशेषता आपण वाडदिवसांच्यासाठी, पार्टीसाठी आणि रिसेप्शन पार्टीसाठी बनवला जातो.

हा जर आपल्याला घरी बनवता आला तर वाढदिवसासाठी आपल्याला बेकरीत केक आणावा लागत नाही. चला तर आता आपण अगदी सोपा, झटपट बनणारा आणि खूप कमी साहित्यामध्ये बनणारा आईस केक कसा बनवायचा ते पाहूयात.

Ice Cake Recipe in Marathi
Ice Cake Recipe in Marathi

आईस केक रेसिपी – Ice Cake Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
भाजण्यासाठी लागणार वेळ३० मिनिटे
आयसिंगसाठी लागणारा वेळ२५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ१ तास १० मिनिटे

आईस केक रेसिपी – cake kasa banvaycha dakua

लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना केक आवडतो आणि अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे केक घरामध्ये बनवण्याचा प्रयत्न करतात आणि यशस्वी देखील होतात. त्यामधील एक सोपा केक म्हणजे आईस केक. आईस केक हा विशेषता क्रीम लावलेला असल्यामुळे तो बर्थडे साठी किंवा रिसेप्शन पार्टीसाठी कट करण्यासाठी एक परफेक्ट केक आहे. चला तर मग हा आईस केक वेगवेगळ्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहूयात.

प्रीमिक्स पासून बनवलेला आईस केक रेसिपी 

आता आपण केक प्रीमिक्स पासून केके कसा बनवायचा आणि त्याला आयसिंग कसे करायचे ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
भाजण्यासाठी लागणार वेळ३० मिनिटे
आयसिंगसाठी लागणारा वेळ२५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ१ तास १० मिनिटे

प्रीमिक्स पासून केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients 

केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य  

 • २ वाटी चॉकलेट प्रीमिक्स.
 • १ वाटी पाणी किंवा दुध.
 • ३ ते ४ चमचे लोणी किंवा बटर.
 • अर्धा किलो व्हीप क्रीम.
 • १ चमचा वेलची पावडर.

सजावटीसाठी लागणारे साहित्य 

 • १ वाटी शुगर सिरप.
 • १ पुडा ओरिओ बिस्कीट.

प्रीमिक्स पासून केक बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process 

 • सर्वप्रथम केक प्रीमिक्स एका बाऊलमध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये लागेल तसे पाणी घालून त्याचे बॅटर बनवून घ्या. ( टीप : बॅटर जास्त घट्ट हि बनवू नका आणि जास्त पातळ देखील बनवू नका )
 • आता त्यामध्ये बटर आणि वेलची पावडर घालून ते चांगले फेटून घ्या.
 • आता ज्या कुकरमध्ये तुम्ही केक भाजण्यासाठी ठेवणार आहात त्या कुकरची शिट्टी आणि रिंग काढा आणि त्यामध्ये एक वाटी किंवा प्लेट ठेवा.
 • त्यानंतर ज्या भांड्यामध्ये केकचे बॅटर घालणार आहात त्या संपूर्ण भांड्याला आतून लोणी लावा आणि त्यावर मैदा भुरभुरा म्हणजे आपला केक भांड्याला चिकटणार नाही किंवा भांड्यामध्ये बटर पेपर देखील वापरू शकता. आता त्या भांड्यामध्ये केकचे बॅटर ओता आणि ते भांडे २ ते ३ वेळा टॅप करा त्यामुळे त्या भांड्यामध्ये असणारी हवा निघून जाईल आणि बॅटर भांड्यामध्ये चांगले पसरेल.
 • आता हे केक बॅटर ओतलेले भांडे कुकरमध्ये ठेवलेल्या वाटीवर किंवा प्लेटवर ठेवा आणि कुकरचे झाकण लावून तो केक मंद आचेवर २५ ते ३० मिनिटे भाजा.
 • केक भाजला कि तो कुकरमधून काढा आणि त्याच्या कडा सैल करून घ्या आणि केक ५ मिनिटे गार झाला कि तो भांड्यातून काढून घ्या.
 • आता त्या केकचे गोल तीन भाग करा कारण आपण आता थर लावून आयसिंग करणार आहोत.
 • ३ ते ४ ओरिओ बिस्कीट घ्या आणि आणि त्यामधील क्रीम काढून त्याची पावडर करून घ्या आणि ती थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
 • आता तीन थर घ्या आणि तो ताटामध्ये ठेवा आणि त्या संपूर्ण थराला शुगर सिरप लावून घ्या आणि मग त्यावर एक क्रीम लावून घ्या आणि त्यावर थोडी बिस्किटची पावडर टाका आणि मग त्यावर केकचा दुसरा थर ठेवा आणि त्याला देखील सुगर सिरप लावून त्यावर क्रीम लावून त्यावर बिस्किटची पावडर टाका आणि त्यावर शेवटचा केकचा थर ठेवा आणि त्याला देखील शुगर सिरप लावा आणि मग त्याच्यावर क्रीम लावा आणि केकच्या साईडने देखील क्रीम लावून फिनिशिंग केकचे फिनिशिंग करा.
 • आता केकवर बाजूला ४ ठिकाणी चार बिस्किटे ठेवा आणि रिकाम्या ठिकाणी नोझलच्या सहाय्याने डिझाईन काढून घ्या आणि त्यावर थोडी बिस्कीट पावडर टाका आणि केकच्या मध्यभागी देखील पावडर टाका.
 • तसेच केकच्या साईड तुम्ही ओरिओ केकचे तुकडे लावून केकला अनखिन डेकोरेटीव्ह बनवू शकता.
 • आता हा आयसिंग केलेला केक १ तास फ्रीजमध्ये ठेवा आणि १ तासानंतर तो गार झाल्यानंतर तो सर्व्ह करू शकता.

ब्रेड पासून बनवला जाणारा आईस केक रेसिपी – ice cake recipe in marathi 

आता आपण ब्रेड पासून आईस केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. ब्रेंड पासून बनवला जाणारा आईस केक हा खूप झटपट बनतो आणि छान देखील लागतो.

ब्रेड पासून केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients 

 • १२ ब्रेड स्लाईसेस ( कडा काढलेल्या ).
 • अर्धा किलो व्हीप क्रीम.
 • १ वाटी शुगर सिरप.
 • सजावटीसाठी जेम्स, आणि कॅडबरी चॉकलेत आणि बिस्किटे.

ब्रेड पासून केक बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process 

 • सर्वप्रथम एक ताट किंवा केकचा बेस घ्या आणि त्याला खाली क्रीम लावून ब्रेडच्या ४ स्लाईस एकमेकाजवळ लावून घ्या आणि त्या ब्रेडच्या स्लाईसेसना केक सारखा गोल आकार द्या आणि मग त्याला शुगर सिरप लावून घ्या.
 • मग त्या थराला क्रीम लावून घ्या आणि परत ४ ब्रेडच्या स्लाईसेस ठेवा आणि त्या गोल कट करा आणि त्याला शुगर सिरप लावून क्रीमचा ठार लावा आता शेवटचा थर लावण्यासाठी त्या क्रीमवर ४ ब्रेडच्या स्लाईसेस ठेवा आणि त्या देखील गोलाकार कट करून त्याला सुगर सिरप लावा.
 • आता केकला वरून तसेच बाजूने क्रीम लावून त्याला चांगले फिनिशिंग करा आणि तुमच्या आवडीप्रमाणे त्याला गोळ्या, चॉकलेट, बिस्किटे किंवा नोझलने केकला तुम्हाला हवे तसे डिझाईन करून सजवा आणि तो केक १ तास फ्रीजमध्ये ठेवा.
 • १ तासानंतर केक सर्व्ह करू शकता.

टिप्स (Tips) 

 • जसे आपण चॉकलेट प्रीमिक्स वापरून आयसिंग केक बनवला तसा आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रीमिक्स वापरून देखील आयसिंग केक बनवू शकतो जसे कि बटर स्कॉच, व्हॅनिला.
 • केक भाजताना भांड्यामध्ये आपण लोणी लावून पिठी भुरभुरन्या ऐवजी ज्या भांड्यामध्ये केक भाजणार आहोत त्या भांड्यामध्ये बटर पेपर वापरू शकतो.
 • आयसिंग केकला तुम्हाला हवे तसे डेकोरेटीव्ह बनवू शकता.

आम्ही दिलेल्या ice cake recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आईस केक रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ice cake recipe in marathi video या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि cake icing recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ice cake recipe in marathi madhura Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!