ICU Full Form in Marathi – ICU Meaning in Marathi आयसीयू चे पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये आयसीयू ICU याचे पूर्ण स्वरूप आणि या विषयाबद्दल माहिती म्हणजेच आयसीयू ICU म्हणजे काय आहे आणि ते कश्यासाठी वापरतात या सर्व गोष्टींच्या विषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग आयसीयू ICU विषयी माहिती घेवूयता. आयसीयू ICU ला मराठी मध्ये अतिदक्षता केंद्र म्हणून ओळखले जाते आणि आयसीयू ICU चे इंग्रजी मधील पूर्ण स्वरूप हे Intensive Care Unit (इंटेन्सिव्ह केअर युनिट) असे आहे. आयसीयू ICU हा हॉस्पिटल किंवा आरोग्य सेवा सुविधेचा एक विशेष विभाग आहे.
जो चांगले उपचार, गहन काळजी, वेगवेगळ्या थेरपी आणि आवश्यक आणि योग्य औषध प्रदान करतो त्याचबरोबर आयसीयू ICU गंभीर दुखापत, आजार किंवा आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची चांगल्या प्रकारे काळजी घेते तसेच औषधे आणि जीवन समर्थन प्रदान करते. अतिदक्षता विभाग अशा रूग्णांची काळजी घेतात ज्यांना विशेष डॉक्टर आणि परिचारिकांच्या टीमद्वारे सतत आणि जवळून देखरेखीची आवश्यकता असते. आयसीयू ICU हे विविध वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असते जसे की यांत्रिक व्हेंटिलेटर, बाह्य पेसमेकर आणि डायलिसिस मशीन इ.

आयसीयू म्हणजे नेमक काय – ICU Full Form in Marathi
प्रकार | हॉस्पिटल किंवा आरोग्य सेवा |
विभाग | आयसीयू ICU |
आयसीयू चे पूर्ण स्वरूप | अतिदक्षता केंद्र (Intensive Care Unit) (इंटेन्सिव्ह केअर युनिट) |
आयसीयू चे मुख्य उदिष्ठ | या विभागामध्ये अत्यंत गंभीर आणि जीवघेणा जखम किंवा आजार असलेल्या रूग्णांची काळजी घेतात ज्यांना विशेष डॉक्टर आणि परिचारिकांच्या टीमद्वारे सतत आणि बारकाईने देखरेखीची आवश्यकता असते. |
आयसीयू ICU मधील उपकरणे | यांत्रिक व्हेंटिलेटर, बाह्य पेसमेकर आणि डायलिसिस मशीन यासारखी उपकरणे असतात. |
आयसीयू म्हणजे काय – icu meaning in marathi
- अतिदक्षता विभाग आयसीयू ICU या विभागामध्ये अत्यंत गंभीर आणि जीवघेणा जखम किंवा आजार असलेल्या रूग्णांची काळजी घेतात ज्यांना विशेष डॉक्टर आणि परिचारिकांच्या टीमद्वारे सतत आणि बारकाईने देखरेखीची आवश्यकता असते. या टीमला गंभीर आजारी किंवा गंभीर जखमी झालेल्या रूग्णांची काळजी घेण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
- हा एक विशेष रूग्णालय विभाग आहे जो गंभीर अपघात किंवा आजाराने ग्रस्त रूग्णांची काळजी घेतली जाते तसेच औषधे प्रदान केली जातात.
आयसीयू ICU चे पूर्ण स्वरूप – icu full form marathi
आयसीयू ICU ला मराठी मध्ये अतिदक्षता केंद्र म्हणून ओळखले जाते आणि आयसीयू ICU चे इंग्रजी मधील पूर्ण स्वरूप हे intensive care unit ( इंटेन्सिव्ह केअर युनिट ) असे आहे.
आयसीयू ची वैशिष्ठ्ये
- या विभागामध्ये चांगले उपचार, गहन काळजी, वेगवेगळ्या थेरपी आणि आवश्यक आणि योग्य औषध प्रदान करतो.
- त्याचबरोबर आयसीयू ICU गंभीर दुखापत, आजार किंवा आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची चांगल्या प्रकारे काळजी घेते.
- २४ तास रुग्णांवर लक्ष ठेवले जाते.
- डॉक्टर, परिचारिका आणि विशेषज्ञ गंभीर काळजी प्रदान करण्यासाठी उच्च प्रशिक्षित आहेत.
- आयसीयूला भेट देणे हा आपल्यासाठी एक सामना करणारा अनुभव असू शकतो.
आयसीयू ICU मधील वेगवेगळी उपकरणे – equipments needed in ICU
आयसीयू ICU हे एक रुग्णांच्या साठी अतिदक्षता केंद्र आहे म्हणजेच या विभागामध्ये चांगले उपचार, गहन काळजी, वेगवेगळ्या थेरपी आणि आवश्यक आणि योग्य औषध प्रदान करतो त्याचबरोबर आयसीयू ICU गंभीर दुखापत, आजार किंवा आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची चांगल्या प्रकारे काळजी घेते तसेच औषधे आणि जीवन समर्थन प्रदान करते. रुग्णांचे चांगले उपचार आणि काळजी घेण्यासाठी आयसीयू ICU मध्ये वेगवेगळ्या उपचार देण्याची चांगली उपकरणे असणे गरजेचे असते आणि आता आपण खाली आयसीयू ICU मध्ये चांगल्या प्रकारे उपचार देण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची यादी पाहणार आहोत.
अ.क्र | उपकरणे |
१. | यांत्रिक व्हेंटिलेटर |
२. | ऍनेस्थेसिया मशीन |
३. | डायलिसिस मशीन |
४. | ईसीजी (इलेक्ट्रोकार्डियोग्राम) |
५. | फीडिंग ट्यूब, सक्शन ट्यूब इ. |
६. | सिरिंज पंप |
७. | बाह्य पेसमेकर |
८. | पेशंट मॉनिटर |
९. | डिफिब्रिलेटर |
आयसीयू मधील वातावरण
आयसीयू ICU हे हॉस्पिटलमधील सर्वात गंभीरपणे कार्यरत ऑपरेशनल वातावरणांपैकी एक आहे. रुग्णालयातील प्रत्येक आयसीयूमध्ये वेगळे वातावरण असते जे ते करत असलेल्या तज्ञ वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया प्रक्रियेचे प्रतिबिंबित करतात. गंभीर आजारी रूग्णांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या विशेष तांत्रिक आणि देखरेख उपकरणांच्या उच्च एकाग्रतेसह बहुतेक आयसीयू ICU हे बऱ्यापैकी मोठे निर्जंतुकीकरण क्षेत्र आहेत म्हणजेच या ठिकाणी खूप काळजीपूर्वक स्वच्छता राखली जाते.
त्याचबरोबर आयसीयू ICU वातावरण काही रुग्णांसाठी आणि अभ्यागतांना भिडणारे असू शकते ज्यांना क्रियाकलाप, आवाज, मशीन, ट्यूब आणि मॉनिटर्स भीतीदायक वाटू शकतात. जेव्हा तुम्ही तुमच्या आयसीयू ICU मध्ये असलेल्या एखाद्या व्यक्तीला आयसीयू ICU मध्ये भेट देता तेव्हा तो एक अस्वस्थ अनुभव असू शकतो आणि तुम्हाला असहाय, भारावलेले, निराश आणि दुःखी वाटू शकते. सामान्यतः आयसीयूमध्ये डॉक्टर, नर्सेसचे आणि रुग्णांचे प्रमाण जास्त असते.
आयसीयू ICU घेतल्या जाणाऱ्या आजारांची काळजी
आयसीयू ICU म्हणजे अतिदक्षता केंद्र ज्या ठिकाणी गंभीर अपघात किंवा आजाराने ग्रस्त रूग्णांची काळजी घेतली जाते तसेच औषधे प्रदान केली जातात. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना नियोजित प्रवेश, अपघातानंतर अनपेक्षित प्रवेश किंवा त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे रुग्णांना आयसीयू ICU मध्ये दाखल केले जावू शकते. कारण याठिकाणी उच्च कुशल अतिदक्षता परिचारिका, डॉक्टर आणि विविध वैद्यकीय, शस्त्रक्रिया आणि आघात परिस्थिती असलेल्या रुग्णांसाठी गंभीर काळजी प्रदान करण्यासाठी प्रशिक्षित तज्ञ असतात. आता आपण आयसीयू ICU मध्ये कोणकोणत्या आजारावर दक्षता घेतली जाते ते पाहूयात.
- जर एखाद्या व्यक्तिला गंभीर किंवा मोठा आजार झाला असेल तर त्या व्यक्तीवर उपचार आणि त्या रुग्णाची काळजी हि आयसीयू ICU मध्ये घेतली जाते.
- जर एखाद्या रुग्णाची श्वसन संस्था निकामी झाली असेल तर त्याला आयसीयू ICU मध्ये ठेवले जाते.
- एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे भाजले असेल आणि त्याला गंभीर दुखापत झाली असेल तर अश्या व्यक्तीवर देखील आयसीयू ICU मधेच उपचार केले जातात.
- कोमामध्ये एखादा रुग्ण गेला असेल तर त्याला आयसीयू ICU मध्ये ठेवले जाते.
- तसेच एखाद्या व्यक्तीचा मोठा अपघात झाला असेल आणि त्याला देखील गंभीर दुखापत झाली असेल तर त्या व्यक्तीला देखील आयसीयू ICU मध्ये डॉक्टर आणि परिचारिका यांच्या देखरेखी खाली ठेवले जाते.
- पाठीचा कणा या विषयक शस्त्रक्रिया आणि कार्डिओथोरॅसिक शस्त्रक्रिया यासारखे उपचार सुरु असतील तर त्या संबधित रुग्णाला आयसीयू ICU मध्ये ठेवले जाते.
- त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असेल किंवा अत्यंत कमी रक्त दाब असेल अश्या रुग्णाला देखील आयसीयू ICU च्या देखरेखी खाली ठेवले जाते.
- एखाद्या रुग्णाला यकृत समस्या असेल किंवा मूत्रपिंड निकामी झाले असेल तर अश्या रुग्णांना डायलिसीस ची आवश्यकता आहे अश्या रुग्णांना आयसीयू ICU मध्ये ठेवले जाते.
- त्याचबरोबर रुग्णावर मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या असतील तर त्याला आयसीयू ICU मध्ये ठेवले जाते.
आम्ही दिलेल्या icu full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर आयसीयू म्हणजे नेमक काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या icu meaning in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि icu full form marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट