लंडन विषयी माहिती Information About London in Marathi

information about london in marathi लंडन विषयी माहिती, लंडन या शहराविषयी कोणाला माहिती नाही असे नाही म्हणजेच सगळ्याच लोकांनी या ठिकाणाला भेट दिली नसली तरी लंडन हे नाव तरी ऐकून माहित आहे आणि ह्याच लंडन या शहराविषयी आज आपण या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत. जगामध्ये अनेक वेगवेगळे देश आहेत आणि या देशांच्यामध्ये अशी अनेक मोठ मोठी शहरे असतात आणि ती शहरे संपूर्ण जगामध्ये लोकप्रिय असतात तसेच लंडन देखील एक मोठे शहर आहे जे इंग्लंड आणि युनायटेड किंग्डमची राजधानी आहे.

आणि या शहराचे एकूण क्षेत्रफळ ६०७ चौरस मैल आहे आणि या शहराची लोकसंख्या हि २०१५ – २०१६ च्या दरम्यान ८७८७८९२ इतकी होती. लंडन हे शहर इंग्लंड मधील सर्वात मोठे शहर असून हे शहर इंग्लंडच्या दक्षिण पूर्व भागामध्ये थेम्स नदीच्या मुखावर वसलेले आहे.

लंडन हे संपूर्ण इतिहासातही अनेक महत्वाच्या घटनांचा आणि चळवळींचा भाग होते जसे कि औद्योगिक क्रांती आणि इंग्रजी पुनर्जागरण इत्यादी. लंडन या शहराला जगातील एक महत्वाच्या आणि अग्रगण्य अर्थीक, व्यवसाय, शिक्षण, मिडिया, मनोरंजन या सारख्या विभागांचे एक प्रमुख केंद्र आहे आणि या शहराला जगातील ३७ वे मोठे शहर म्हणून मान्यता मिळाली आहे. चला तर खाली आपण लंडन या शहराविषयी सविस्तर माहिती घेवूया.

information about london in marathi
Information about london in marathi

लंडन विषयी माहिती – Information About London in Marathi

शहराचे नावलंडन
देशइंग्लंड
ओळखइंग्लंडची राजधानी
क्षेत्रफळ६०७ चौरस मैल
लोकसंख्या८७८७८९२

लंडन या शहराविषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • लंडन हे जगप्रसिध्द शहर असण्याचे कारण म्हणजे हे शहर शिक्षण, कला, वाणिज्य, आर्थिक, करमणूक, फॅशन, मिडिया, व्यवसाय, विकास, आरोग्यसेवा, संशोधन, व्यवसाय, पर्यटन या सर्व क्षेत्रांच्यासाठी एक अग्रगण्य आणि आघाडीचे शहर आहे.
 • या शहरामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात आणि या शहरामध्ये अनेक प्रकारची संस्कृती देखील आहेत त्यामुळे या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा देखील बोलल्या जातात आणि आपल्याला हे ऐकताना आश्चर्य वाटेल कि लंडन या शहरामध्ये ३०० हून अधिक भाष्य बोलल्या जातात.
 • लंडन हे शहर १८६१ ते १९२५ या काळामध्ये जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर होते.
 • या शहरामध्ये केव गार्डन्स, वेस्टमिन्स्टर अॅबे आणि सेंट मागरीट, टॉवर ऑफ लंडन, वेस्टमिन्स्टर पॅलेस या सारख्या ऐतिहासिक जागतिक स्थळांचा वारसा या शहरामध्ये आहे.
 • लंडन या शहरामध्ये एकूण १६५ ते १७० हून अधिक संग्रहालये आहेत, या ठिकाणी सायन्स संग्रहालय, नॅशनल गॅलरी लंडन, ब्रिटीश संग्रहालय, रॉयल संग्रहालय, इम्पीरियल वॉर संग्रहालय, टेट मॉडर्ण आणि आर्ट गॅलरी हि संग्रहालये आहेत.
 • आपण वरच्या माहितीमध्ये पहिल्याप्रमाणे या शहरामध्ये ३०० हून अधिक भाषा बोलल्या जातात आणि या शहरामध्ये इंग्रजी, फ्रेंच, तुर्की, बंगाली, पोलिश आणि पंजाबी या प्रमुख भाषा बोलल्या जातात.
 • स्टीम इंजिनचा वापर करून सार्वजनी वाहतूक व्यवस्था करणारे हे पहिले शहर आहे तसेच मेट्रोपॉलिन क्रमांक २३ हे सर्वात जुने वाफेचे लोकोमोटिव्ह आहे आणि ते लंडन ट्रान्सपोर्ट संग्रहालयमध्ये प्रदर्शित केले होते.
 • लंडन या शहरामध्ये एकूण ११ राष्ट्रीय संग्रहालये आहेत आणि या महत्वाच्या संग्रहालयासोबत त्या ठिकाणी इतर १९० ते १९२ संग्रहालये आहेत.
 • युके मधील सर्व स्क्रीन्सपैकी पाचहून अधिक स्क्रीन्स ह्या लंडन या शहरामध्ये आहेत.
 • लंडन या शहरामध्ये असणारे विल्टन म्युझियम हॉल हे जगातील सर्वात जुने हॉल आहे जे १७४३ मध्ये तयार केले होते आणि आजही हे लंडनच्या संगीत क्षेत्राचा एक महत्वाचा भाग आहे.
 • लंडन या शहरामध्ये बहुतेक वाचनाला खूप महत्व असावे कारण या शहरामध्ये ८०० ते ८५० पेक्षा जास्त पुस्तकांची दुकाने आहेत.
 • चीजचा छोटा तुकडा खाणाऱ्या दोन उंदरांचा पुतळा ह्या शहरामध्ये तयार करण्यात आला आहे आणि हा पुतळा जगातील सर्वात लहान पुतळा आहे असे म्हटले जाते.
 • लंडन या शहराला अभिमान वाटत असलेल्या काही वास्तूंच्यापैकी एक असलेली एक असलेली म्हणजे संसदेची सभागृहे किंवा ज्याला पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर म्हणून देखील ओळखले जाते.
 • या शहरामध्ये ८० हून अधिक अब्जाधीश लोक राहतात आणि त्यामुळे हे शहर जगातील सर्वाधिक अब्जाधीश शहरांच्यापैकी एक आहे.
 • लंडन या शहरामध्ये १६६४ ते १६६६ या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्लेग या रोगाची साथ आली होती जो उंदरांच्यापासून होतो आणि या रोगामुळे अनेक लोक मृत्यूमुखी देखील पडले होते.
 • १९ व्या शतकात म्हणजेच राणी व्हिक्टोरियाच्या काळामध्ये किंवा कारकिर्दीत लंडन ह शहर जास्त रहिवासी असणारे जगातील सर्वात मोठे शहर बनले.
 • लंडन हे शहर जगातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांच्यापैकी एक महत्वाचे आणि प्रसिध्द ठिकाण आहे.
 • लंडन हे शहर अधिकृतपणे राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते कारण ग्रेटर लंडनचा ४५ टक्के पेक्षा अधिक भाग हा हिरवळीने व्यापला आहे त्यामुळे या शहराला जगातील सर्वात हिरव्या शहरांपैकी एक शहर म्हणून ओळखले जाते.  
 • या शहरातील हवामानाच्यापैकी पाहायचे म्हंटले तर या ठिकाणी सौम्य तापमान आणि हिवाळा असतो परंतु या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडतो म्हणजेच हे शहर १७० पावसाळी दिवासंच्यासाठी ओळखला जातो.
 • या शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी त्या संबधित व्यक्तीला काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात.
 • लंडन हे शहर महागडे शहर आहे आणि या ठिकाणी मिळणाऱ्या वस्तू देखील महागड्या असतात त्यामुळे तुम्ही जर या शहरामध्ये जात असाल तर तुमच्या जवळ पुरेसे पैसे घेवून जा.

आम्ही दिलेल्या information about london in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लंडन विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या london wikipedia in marathi या london information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about london in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Information about london in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!