कीटकांची माहिती मराठी Insects Information in Marathi Language

insects information in marathi langauge – insects meaning in marathi कीटकांची माहिती मराठी, आज आपण या लेखामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांच्या विषयी माहिती घेणार आहोत. कीटक हा पृथ्वीच्या परीसंस्थेतील महत्वाचा छोटासा प्राणी आहे आणि हा प्रत्येक परीसंस्थेमध्ये आवश्यक असणारा प्राणी आहे आणि जगामध्ये सध्या १० क्विंटीलियन कीटक आहेत आणि कीटक हा असा प्राणी आहे जो पृथ्वीवर ३०० दशलक्ष वर्षापासून अस्तित्वात आहेत म्हणजेच कीटक हे डायनासोर या प्राण्याच्या अगोदरचे आहेत.

कीटकांचे ९ ते १० लाख पेक्षा अधिक कीटकांचे प्रकार आहेत आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीमध्ये सर्वात जास्त असल्याचा मान आहे. कीटक या प्रकारामध्ये फुलपाखरे, माश्या, मुंग्या, डास, मध माश्या, सुरवंट, कोष्टी, बिटल या सारखे अनेक कीटक समविष्ट आहेत. चला तर खाली आपण कीटकांच्या विषयी सविस्तर माहिती घेवूया.

insects information in marathi language
insects information in marathi language

कीटकांची माहिती मराठी – Insects Information in Marathi Language

कीटक म्हणजे काय – insects meaning in marathi

कीटक हा अपृष्टवंशीमधील एक सामान्य प्रकारापैकी एक आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचा किंवा जातीचा कीटक हा दिसण्यामध्ये, रंगामध्ये आकारामध्ये वेगळा असला तरी सर्व प्रकारामध्ये त्यांच्या शरीरावर कठोर बाह्य आवरण असते आणि तीन विभागामध्ये विभागलेले असते म्हणजेच कीटकांचे शरीर हे डोके, छाती आणि उदर या मध्ये विभागलेले असते.

बहुतेक कीटकांना सहा पाय असतात आणि त्यांचेउदर हे मागच्या भागामध्ये असते आणि हे त्यांना अन्न पचवण्यासाठी आणि प्रजननासाठी मदत करते.

कीटक कोठे आढळतात किंवा राहतात ?

कीटक हा प्राणी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आढळतो म्हणजेच हा प्राणी सर्वत्र आढळतो आणि हे सामान्यता जमिनीवर राहतात तसेच हे जमिनीमध्ये, झाडावर, गोड्या पाण्यामध्ये तसेच महासागरामध्ये अश्या अनेक ठिकाणी आढळतात.

कीटकांचे काही वेगवेगळे प्रकार – insects name in marathi

जगभरामध्ये ९ ते १० लाख पेक्षा अधिक कीटक आहेत आणि त्यामधील काही सामान्य कीटक कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

मुंगी

जगभरात १०००० पेक्षा जास्त ज्ञात मुंगी प्रजाती आढळल्या आहेत आणि कीटकशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या सतत अभ्यासाचा विषय आहेत. मुंगी हा प्राणी मोठ्या वसाहती किंवा गटांमध्ये राहतात आणि हे त्यांच्या प्रजातींवर अवलंबून असते, मुंगी वसाहतींमध्ये कमीत कमी लाखो मुंग्या असू शकतात.

मुंग्या जगभरात आढळतात परंतु विशेषतः गरम हवामानात सामान्य असतात. त्यांचा आकार सुमारे २ ते २५ मिमी (सुमारे ०.०८  ते १ इंच) पर्यंत आहे आणि त्यांचा रंग सहसा पिवळा, तपकिरी, लाल किंवा काळा असतो.

बहुतेक मुंग्या घरट्यांमध्ये राहतात, जे जमिनीवर किंवा खडकाच्या खाली किंवा जमिनीच्या वर बांधलेले आणि डहाळ्या, वाळू किंवा रेवाने बनलेले असू शकतात.

माश्या

माश्या हा छोटासा प्राणी देखील कीटक गटामध्ये येतो आणि एक सामान्य कीटक आहे जो आपल्याला रोजच्या जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला पहायला मिळतात. माश्यांना दोन्ही बाजूला एक एक पंख असतो आणि हे पंख उडण्यासाठी मदत करतात.

टोळ

टोळ हा एक प्रकारचा कीटक आहे आणि हा कीटक अर्थोप्टेरा नावाच्या गटाशी संबधित आहे आणि ते मोठ्या आवाजासाठी प्रसिध्द आहेत. टोळ या किटकाचे पाय हे खूप शक्तिशाली असतात आणि इतर भक्षकांच्यापासून किंवा दुश्मनापासून वाचण्यासाठी हे दूर उडी मारतात आणि दूर उडी मारण्यासाठी ते त्यांच्या मागच्या पायाचा वापर करतात.

बीटल

बीटल हा कीटकांच्यामधील सामान्य विभाग आहे आणि हा किताकांच्यामधील सर्वात मोठा गट आहे याच्या जगभरामध्ये साडे तीन लाख पेक्षा अधिक प्रजाती आहेत. बीटल हा कीटक १० te ११ सेंटी मीटर लांब वाढणारा प्राणी आहे आणि हा कीटकांच्यामध्ये लांब वाढणारा सर्वात मोठा प्राणी आहे.

फुलपाखरू

फुलपाखरे एक कीटक आहेत जे २ दिवसांपासून ते ११ महिन्यांपर्यंत कुठेही जगू शकतात. ते मेटामोर्फोसिस नावाच्या चार चरण प्रक्रियेतून जन्म घेतात त्यामध्ये अंड्यापासून सुरवंट आणि मग क्रायसॅलिस ते फुलपांखरू अशी फुलपांखराच्या जन्माची प्रक्रिया असते. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार जगभरात फुलपाखरांच्या २८००० प्रजाती आहेत.

फुलपाखरू आणि पतंग मेटामोर्फोसिस नावाच्या प्रक्रियेद्वारे विकसित होतात. फुलपाखरे आणि पतंगांच्या कायापालनात चार अवस्था असतात अंडी, अळ्या (सूरवंट) , प्युपा आणि प्रौढ. फुलपाखरू आपले आयुष्य फुलांच्या आसपास घालवते आणि त्यांचे पराग चोखून स्वतःला खाऊ घालते.

कीटकांच्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • कीटकांची प्रजनना क्षमता हि मोठी असते म्हणजेच कीटक एका वेळी ३०००० हजार अंडी घालू शकतात आणि कीटकांच्यामधील राणी हि ९ ते १० वर्ष जगू शकते.
  • मेण, रेशीम आणि मध या प्रकारची वेगवेगळी उत्पादने तयार करण्यासाठी काही प्रकारचे कीटक मदत करतात.
  • काही कीटक हे महत्वाचे असतात कारण त्या तण वनस्पती आणि बिया खातात त्यामुळे तन वनस्पती कमी होण्यास मदत होते.
  • काही कीटक हे व्यावसायिक दृष्ट्या मनुष्याला महत्वाचे असतात कारण काही कीटकांच्या पासून मध, मेन, रंग आणि रेशीम या सारखी उत्पादने मिळतात.
  • काही कीटकांच्यामध्ये पंख नसतात तर काही कीटकांच्यामध्ये पंख असतात.
  • कीटक हा प्राणी प्रत्येक खंडामध्ये आढळतो.
  • आज पर्यंत ज्ञात असलेला सर्वात मोठा कीटक हा प्राचीन ड्रॅगनफ्लाय हा होता आणि हा २५० दशलक्ष वर्षापूर्वी होता.
  • सामान्यता कीटकांना दोन डोळे असतात परंतु काही कीटकांना त्यांच्या कपाळाच्या मध्यभागी एक साधा डोळा असतो.
  • बहुतेक कीटक हे प्रौढ पुनरुत्पादक म्हणून फक्त काही दिवसासाठी किंवा काही आढवड्यासाठी जगतात.  

आम्ही दिलेल्या insects information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कीटकांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या insects meaning in marathi या insects name in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information of insects in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये insect in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!