Sir Jagdish Chandra Bose Information in Marathi जगदीश चंद्र बोस यांची माहिती वनस्पती सजीव असतात की निर्जीव? हा प्रश्न परिक्षांमध्ये नेहमी विचारला जायचा. आणि जसं आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे वनस्पती सजीव असतात. परंतु, हा शोध कोणी लावला याचे उत्तर फारच कमी लोकांना माहीत असेल. सर ही पदवी प्राप्त झालेले डॉक्टर जगदीश चंद्र बोस हे भारतीय असून एक जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पती शास्त्रज्ञ आणि पुरातत्त्वज्ञ आहेत. यांनीच सर्वप्रथम संपूर्ण जगाला अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली की वनस्पती हे सजीव असतात. वनस्पती संशोधनामध्ये त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
क्रेस्कॉग्रफ या यंत्राच्या साह्याने वनस्पतींची वाढ मोजली जाते या यंत्राचा शोध जगदीश चंद्र बोस यांनी लावला. ज्यामुळे इंग्रज सरकार ने त्यांना “सर” ही पदवी दिली. आजच्या ब्लॉगमध्ये आपण याच महान रत्नं विषयी माहिती जाणून घेणारा.
जगदीश चंद्र बोस यांची माहिती – Jagdish Chandra Bose Information in Marathi
पूर्ण नाव (Name) | जगदीश चंद्र बोस |
जन्म (Birthday) | ३० नोव्हेंबर १८५८ |
जन्म गाव (Birth Place) | पूर्व बंगालच्या डाक्का या जिल्ह्यातील राणीखल या खेड्यामध्ये |
राष्ट्रीयत्व (Citizenship) | भारतीय |
ओळख (Identity) | जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पती शास्त्रज्ञ |
मृत्यू | २३ नोव्हेंबर १९३७ |
जन्म व शिक्षण, वैयक्तिक आयुष्य
३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीश चंद्र बोस यांचा जन्म पूर्व बंगालच्या डाक्का या जिल्ह्यातील राणीखल या खेड्यामध्ये झाला. जगदीश चंद्र बोस यांचा जन्म एका घरंदाज घराण्यात झाला. वडील भगवान चन्द्र बसु हे सब डिव्हिजन मध्ये ऑफिसर होते. वडिलांची चांगली सरकारी नोकरी होती. आई एक गृहिणी होती. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात याची प्रचिती जगदीश चंद्र बोस यांच्या पालकांना ते लहान असतानाच आली होती. अगदी लहान वयापासून जगदीश बोस यांना निसर्गाविषयी आवड निर्माण झाली होती.
आजूबाजूच्या परिसरामध्ये अवतीभवती दिसणारी झाड त्यांना आकर्षित करायची. झाडांवरील प्रत्येक गोष्टीचे ते बारकाईने निरीक्षण करायचे. सर्व झाड एकत्र का वाढत नाहीत? सर्व झाडांना सारखी फुलं का येत नाही? एका झाडाचे पान हिरवे दुसऱ्या झाडाचे पान पिवळे असं का होतं? अशी अनेक प्रश्न लहान जगदीश चंद्र बोस यांना पडायची.
जगदीश चंद्र बोस यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या खेड्यातील शाळेमध्ये झालं. पुढील शिक्षणासाठी त्यांनी कोलकात्यामधील सेंट झेवियर या शाळेमध्ये दाखला नोंदवला. सेंट झेवियर या महाविद्यालयातून त्यांच कॉलेजमधील शिक्षण देखील पूर्ण झालं. पदव्युत्तर शिक्षणासाठी पुढे जगदीश चंद्र बोस यांनी इंग्लंड गाठलं. इंग्लंड मधील ख्राइस्ट चर्च या महाविद्यालयातून भौतिक, रसायन वनस्पतीशास्त्र व निसर्ग विज्ञानाचा अभ्यास केला. आणि पुन्हा भारतात परतले.
इंग्लंडमध्ये असताना त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचा मार्गदर्शन लाभलं होतं. जगदीश चंद्र बोस यांनी केंब्रिज विद्यापीठातून बी.ए. ची पदवी घेतली लंडन विद्यापीठातून बी.एस.सी तर युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून डि.एस.सी पदवी मिळवली. जगदीश चंद्र बोस यांचा विवाह प्रसिद्ध समाजसेवक अबला बोस यांच्याशी झाला.
- नक्की वाचा: शास्त्रज्ञांची माहिती
कार्य
जगदीश चंद्र बोस यांच विज्ञानाच्या वर्तुळात मोलाचं योगदान भारतासाठी फारच फायद्याचं ठरलं. जगदीश चंद्र बोस यांनी विज्ञानाच्या आधारे लावलेले वेगवेगळे शोध संपूर्ण जगाला महत्त्वपूर्ण माहिती देऊन गेले. जगदीश चंद्र बोस यांनी विज्ञान जगात दिलेल्या योगदानामुळे भारताचे नाव देखील विज्ञान क्षेत्रात मोठं झालं.
जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पती विज्ञानामध्ये महत्वपूर्ण योगदान दिल आहे. जगदीश चंद्र बोस यांनी १८९७ मध्ये मायक्रोव्हेव उपकरणाची निर्मिती केली. त्याच्याआधी १८८५ मध्ये जगदीश चंद्र बोस यांनी रेडिओचा शोध लावला होता. त्यांनी लावलेल्या या महत्त्वपूर्ण शोधांमुळे आयईईई कडून त्यांना फादर ऑफ रेडिओ सायन्स असं संबोधलं जाऊ लागलं.
इसवीसन १८८५ ते १९१५ अशी एकूण तीस वर्ष जगदीश चंद्र बोस यांनी कोलकत्ता आणि इंग्लंड येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात भौतिकशास्त्र हा विषय शिकवण्याची सेवा दिली. या काळामध्ये जगदीश चंद्र बोस यांनी विद्युत शक्तीवर संशोधन केलं. या संशोधनामध्ये त्यांनी काही नवीन गोष्टी जगासमोर आणल्या.
विद्युत चुंबकीय अंतरंगाचा शोध घेत त्यांनी बॅटरी चा शोध लावला. वनस्पती हा जगदीश चंद्र बोस यांचा आवडता विषय होता. वनस्पतींवर विचार करणे, त्यांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवणे, वनस्पती बद्दल त्यांना जितकी माहिती घेता येईल तेवढी माहिती गोळा करणे हा त्यांचा छंद होता. वनस्पतींचा अगदी बारकाईने निरीक्षण करताना त्यांना अनेक प्रश्न देखील पडायचे. त्यांनी याच क्षेत्रामध्ये शिक्षण देखील केलं आणि वनस्पतीं साठी अनेक वेगवेगळ्या उपकरणांची निर्मिती केली.
जगदीश चंद्र बोस यांनी क्रेस्कॉग्रफ या यंत्राचा शोध लावला. हे यंत्र वनस्पतींची वाढ मोजण्यासाठी वापरले जात. जगदीश चंद्र बोस यांच्या मते वनस्पती देखील सजीव आहेत. त्यांना देखील वेदना होतात.
म्हणून त्यांनी वनस्पतींची प्रत्येक हालचाल रेकॉर्ड करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे निर्माण केली. डायामॅट्रिकल कंट्रक्शन ओपर्रेट्स आणि रेझोंनंट रेकॉर्ड्स या दोन यंत्रणांचा शोध जगदीश चंद्र बोस यांनी लावला. ही दोन यंत्रणेने जगदीश चंद्र बोस थंडी, प्रकाश, उष्णता, विद्युत या घटकांचा वनस्पती आणि प्राण्यांवर काय फरक पडतो हे जाणून घेण्यासाठी वापरायचे.
वनस्पती कसे श्वसन करतात, वनस्पतींचे रूधिराभिसरण पद्धतीने होणारी त्यांची कार्य, अन्नाची ने आण, निरुपयोगी वस्तूंचा नेसाराग ही सर्व जगदीश चंद्र बोस यांच्या संशोधनाचे विषय असायची. वनस्पतींमध्ये होणारी प्रत्येक हालचाल त्यांच्यामध्ये, नियमित होणारे बदल या सगळ्याची नोंद जगदीश चंद्र बोस यांनी करून ठेवली.
आणि यातूनच त्यांनी शोध लावला की वनस्पती सजीव असतात. रेझोनन्स रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाउंड लेव्हलर, बॅलेंसिंग ओपर्रेट्स इत्यादी उपकरणांचा शोध जगदीश चंद्र बोस यांनी लावला आणि या यंत्रांच्या साह्याने त्यांनी वनस्पतींवर संशोधन केलं. विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे जगदीश चंद्र बोस यांना बंगालच्या बंगाली विज्ञान कल्पकतेचे जनक मानले जाते.
जगदीश चंद्र बोस यांच्या नावावर समर्पित भारताच्या गुजरातमधील सुरत येथे जगदीश चंद्र बोस नावाचं मत्सालय आहे. हे मत्सालय भारतातील सर्वात पहिलं असं मत्सालय आहे जे पाण्याखाली स्थित आहे. या मत्सलया मध्ये १०० पेक्षा जास्त प्रकारच्या माशांच्या प्रजाती आहेत. जगदीश चंद्र बोस यांच्यामते मन ही खरी प्रयोगशाळा आहे जिथे आपण भ्रमहाच्या मागे सत्याचे नियम उघड करतो.
इसवी सन १९०२ मध्ये जगदीश चंद्र बोस यांनी द लिविंग अंड नाॅन लिविंग या पुस्तकाचे लेखन केलं. १९२६ मध्ये द नर्व्हस मेकांनिसम ऑफ प्लांट्स हे पुस्तक प्रकाशित केलं. इसवी सन १९१७ मध्ये जगदीश चंद्र बोस यांना नाईट हा किताब मिळाला आणि १९२० मध्ये रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
इसवी सन १९१७ मध्ये कलकत्ता येथे जगदीश चंद्र बोस यांनी बॉस रिसर्च युनिव्हर्सिटी नावाची संस्था स्थापन केली. आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी इथेच संचालक म्हणून सेवा दिली. जगदीश चंद्र बोस यांनी त्यांच्या उर्वरित आयुष्यात काही अजव पदार्थ विविध उद्दिपनांना देत असलेल्या प्रतिसादांचे जैव प्रतिसादांशी असलेला साम्य लक्षात घेऊन त्यांचं प्राणी आणि वनस्पती मधील असलेल्या समान कार्य व रचनांवर संशोधन करण्यात घालवला.
जगदीश चंद्र बोस यांनी लिहिलेली पुस्तके
एरीतेबिलिटी ऑफ प्लांट्स, इलेक्ट्रोफिजियॉलॉजी ऑफ प्लांट्स, ट्रापिक मोमेंट अंड ग्रोथ ऑफ प्लांट्स, द नर्व्हस मेकॅनिझम ऑफ प्लांट्स, प्लांट रिस्पॉन्स, द फिजिओलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस, दि मोटर मेकॅनिझम ऑफ प्लांट्स, लाईफ मोमेंट्स ऑफ प्लांट्स इत्यादी पुस्तकांचे लेखक जगदीश चंद्र बोस यांनी केल.
या सगळ्या पुस्तकांची नावं बघता आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की ही सगळी पुस्तक वनस्पतींवर माहिती देणारी आहेत. याचाच अर्थ डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पतींच्या अगदी नसानसांचा अभ्यास केला होता. याच्यावरून समजण्यात येतं की त्यांना वनस्पतीं बद्दल किती माहिती होती.
मृत्यू
जगदीश चंद्र बोस हे जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पती शास्त्रज्ञ व पुरातत्त्वज्ञ होते. अगदी लहानपणापासून त्यांना वनस्पती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची आवड होती. वनस्पती शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी अनेक विविध शोध लावले. वनस्पतींवर त्यांनी गाढा अभ्यास केला आहे. या बाबतीत त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही.
वनस्पती शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण शोध लावले. वनस्पतीं विषयी अतिशय बारकाईने अभ्यास करून वनस्पती सजीव आहेत त्यांना देखील संवेदना होतात याची जाणीव जगदीश चंद्र बोस यांनी मानव जातीला करून दिली. वयाच्या ७९ व्या वर्षी जगदीश चंद्र बोस यांचा निधन झालं. २३ नोव्हेंबर १९३७ मध्ये भारताच्या झारखंड मधील गिरिडिह येथे जगदीश चंद्र बोस यांचे निधन झाले.
आम्ही दिलेल्या sir jagdish chandra bose information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर जगदीश चंद्र बोस यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dr jagdish chandra bose information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of jagdish chandra bose in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये jagdish chandra bose invention in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट