jilha parishad information in marathi जिल्हा परिषद माहिती, ग्रामीण भागातील लोकांना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सुविधा पोहचवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत आणि तसेच जिल्हा परिषद हि देखील महाराष्ट्रातील एक महत्वाची संस्था आहे जी ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांना अनेक नागरी सुविधा पुरवते. ज्या प्रमाणे गरम पंचायत हि ग्रामीण स्तरावर किंवा गावावर आधारित काम करते तसेच जिल्हा परिषद हि जिल्हा स्तरावर काम करते आणि त्या संबधित जिल्ह्यामध्ये येणाऱ्या गावांच्या विकासाविषयी आणि अनेक सेवा पुरवण्यासंबधित काम करते.
पंचायत राजमधील जिल्हा परिषद हि एक महत्वाची संस्था आहे आणि हि ग्रामीण भागाचा विकास करणाऱ्या संस्थेमधील सर्वात महत्वाची संस्था म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार कलम ६ नुसार शहरी जिल्हे वगळता प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद स्थापन केले. चला तर खाली आपण जिल्हा परिषद संस्थेविषयी आणखीन आणि सविस्तर माहिती घेवूया.
जिल्हा परिषद माहिती – Jilha Parishad Information In Marathi
संस्था | जिल्हा परिषद संस्था |
स्थापना | १९६१ नु |
सदस्य | कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ७० ते ७५ |
कामकाज | जिल्ह्यातील ग्रामीण स्तर |
जिल्हा परिषद संस्था म्हणजे काय ?
राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यासाठी एक अध्यक्ष आणि काही सदस्य या सर्वांना मिळून एक गट तयार केला जातो आणि हा गट त्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या गावांचा विकास कसा होईल आणि त्यांना सरकारी सुविधा कासया पुरवल्या जातील या विषयी विचार केला जातो आणि या गटाला जिल्हा परिषद संस्था म्हणून ओळखले जाते.
जिल्हा परिषदेची रचना कशी केली जाते – structure
जिल्हा परिषदेची रचना हि निवडणूक पध्दतीने केली जाते आणि यामध्ये अध्यक्ष आणि इतर सभासद निवडले जातात. खाली आपण जिल्हा परिषदेची रचना कशी केली जाते या विषयी सविस्तर पाहूया.
- या परिषदेमध्ये सदस्यांची आणि अध्यक्ष पदाची निवड करत असताना त्यामध्ये प्रौढ मतदान पध्दती वापरून ५० ते ७० पर्यंत सभासदांची निवड केली जाते.
- जिल्हा परिषद संस्थेच्या सदस्यांची निवड करत असताना अनुसूचित जाती आणि जमातींचा देखील विचार केला जातो आणि यामध्ये मागासवर्गीय जाती जमातींच्यासाठी २७ टक्के आरक्षण दिलेले आहे.
- तसेच या जिल्हा परिषद संस्थेमध्ये महिलांना देखील तितकेच महत्व दिले जाते आणि या संस्थेच्या सदस्य निवडीमध्ये महिलांना देखील ५० टक्के आरक्षण आहे.
- त्याचबरोबर यामध्ये पंचायत सभापती हे देखील जिल्हा परिषद सदस्य समितीमध्ये सदस्य असतात.
- तसेच यामध्ये मुख्य आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी देखील नेमण्यात आलेले असतात जेणेकरून जिल्हा परिषद संस्थेचे कार्य सुरळीत चालेल.
जिल्हा परिषद संस्थेचे सदस्य बनण्यासाठी पात्रता निकष – eiligibility
कोणत्याही खाजगी किंवा सरकारी संस्थेमध्ये सदस्य बनण्यासाठी काही पात्रता निकष पार पडावे लागतात तसेच जिल्हा परिषद संस्थेमध्ये जर एखाद्या व्यक्तीला सदस्य बनायचे असेल तर त्याला काही पात्रता निकष पार पडावे लागतात आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.
- जर एखाद्या व्यक्तीला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे असल्या तो व्यक्ती त्या जिल्ह्यातील रहिवासी असला पाहिजे तसेच त्या जिल्ह्याच्या स्थानिक मतदार यादीमध्ये त्याचे नाव समाविष्ट असणे आवश्यक असते.
- या परिषदेचे सदस्य बनण्यास अशी देखील एक अट आहे ज्यामध्ये जो व्यक्ती जिल्हा परिषद संस्थेचा सदस्य बनण्यासाठी इच्छुक आहे त्याला दोनच मुले असावीत अशी अट आहे आणि त्यापेक्षा अधिक असल्यास त्याला सदस्यत्व मिळू शकत नाही.
- बहुतेकदा कोणत्याही संस्थेचे सदस्यत्व संबधित व्यक्तीला देताना त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही याची खात्री करून घेतली जाते त्याच प्रमाणे जिल्हा परिषद संस्थेमध्येदेखील सदस्यांची निवड करत असताना त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा कोणत्याही प्रकारची केस चालू नाही याची खात्री करून मग तो व्यक्ती जिल्हा परिषद संस्थेचा सदस्य बनण्यास पात्र असतो.
- जिल्हा परिषद संस्थेचे सदस्य बनण्यासाठी वयाची अट देखील महत्वाची आहे म्हणजेच त्या संबधित व्यक्तीचे वय हे २१ वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे.
- जर एखादा व्यक्ती राखीव मतदान संघातून सदस्य पदासाठी निवडणूक लढवत असेल तर त्याने त्याचे आर्थिकरेषा प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.
जिल्हा परिषद विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- जिल्हा परिषद हि जिल्हा स्तरावर काम करते आणि यामध्ये कमीत कमी ५० हून अधिक सदस्य असणे आवश्यक असते आणि जास्तीत जास्त यामध्ये ७० ते ७५ सदस्य असतात.
- महाराष्ट्रा राज्यामध्ये ग्रामीण सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा परिषद स्थापन केली आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ३० ते ३४ जिल्हा परिषद आहेत.
- जिल्हा परिषद सदस्यांची निवड हि काही जनतेकडून मतदान करून केली जाते.
- जर एखाद्या व्यक्तीला उपाध्यक्ष पद घ्यायचे असल्यास त्यासाठी कोणतेही आरक्षण लागू केले नाही त्यामुळे या संस्थेचे उपाध्यक्ष कोणीही होऊ शकतो.
- जर सदस्य पदासाठी इच्छुक असणारा व्यक्ती ग्राम पंचायत संस्थेचा सदस्य असल्यास त्याला जिल्हा परिषद संस्थेचा सदस्य बनता येत नाही.
जिल्हा परिषद संस्थेचे कार्य – functions
- ग्राम पंचायत कार्यावर नियंत्रण ठेवणे त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या अनेक गरम पंचायतींचे कार्य पाहणे.
- तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती विषयक महत्वाची आणि उपयोगपूर्ण माहिती पुरवणे तसेच शेतीमधील नवीन तंत्रज्ञान विषयी देखील माहिती देणे.
- तसेच राज्य सरकार कडून जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्यासाठी आलेली कामे चांगल्या प्रकारे आणि वेळेमध्ये करणे.
- तसेच जीळ्यातीला गावांच्यामध्ये विकास कामांची माहिती आणि विकास कामे घेऊन जाणे.
- ग्रामीण भागामध्ये अनेक लोक छोटे मोठे उद्योग करत असतात त्या उद्योगांना प्रोत्साहन देणे त्याचबरोबर त्यांना मदत करणे.
- ग्रामीण भागामध्ये अनेक नागरी सुविधा पुरवणे.
- ग्रामणी भागातील लोकांना आरोग्यविषयक माहिती आणि सुविधा पुरवणे.
- ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत तसेच जे मागासवर्गीय आहेत अश्या विद्यार्थ्याना शैक्षणिक सुविधा पुरवणे.
आम्ही दिलेल्या jilha parishad information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर जिल्हा परिषद माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या zilla parishad information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about jilha parishad in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट