जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान Jim Corbett National Park Information in Marathi

jim corbett national park information in marathi जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, आपल्या भारतामध्ये अनेक राष्ट्रीय उद्याने आहेत आणि त्यामधील एक जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे आहे जे भारतामधील उत्तराखंड राज्यामध्ये नैनिताल जिल्ह्यामध्ये आहे आणि आज आपण या लेखामध्ये जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान विषयी संपूरणे माहिती पाहणार आहोत. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाची स्थापना हि ब्रिटीशांच्या काळामध्ये म्हणजेच ब्रिटीश ज्यावेळी भारतामध्ये राज्य करत होते त्यावेळी १९३६ मध्ये झाली आहे.

आणि या उद्यानाचे नाव स्थापनेच्या वेळी हेली नॅशणल पार्क असे होते आणि पुढे या उद्यानाचे नाव १९५४ – १९५५ च्या काळामध्ये याचे नाव रामगंगा नॅशणल पार्क असे ठेवण्यात आले होते आणि नंतर १९५५ – १९५६ च्या काळामध्ये याचे नाव जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान असे ठेवले जे वन्यजीव संरक्षक जिम कॉर्बेट यांच्या नावावरून ठेवण्यात आले.

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ हे ५२०.८० किमी इतके असून या उद्यानामध्ये डोंगर, नदी, गवताळ प्रदेश, दलदलीचा प्रदेश या सर्व नैसर्गिक गोष्टीचे दर्शन मिळते तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव देखील पहायला मिळतात. या उद्यानामध्ये उद्यानाचा एकूण क्षेत्रफळा पैकी ७३ टक्के भाग हा जंगलाने व्यापला आहे तर १० टक्के भाग हा गवताल प्रदेश आहे.

jim corbett national park information in marathi
jim corbett national park information in marathi

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान – Jim Corbett National Park Information in Marathi

उद्यानाचे नावजिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
ठिकाणउतराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यामध्ये
स्थापना१९३६
क्षेत्रफळ५२०.८० किमी

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानमधील वनस्पती आणि वन्यजीव प्रजाती

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे वेगवेगळ्या वनस्पती आणि प्राण्याच्या प्रजातींनी समृध्द आहे आणि या ठिकाणी पन्नास हून अधिक सस्तन प्राणी ५७० पेक्षा अधिक वेगवेगळ्या पक्ष्यांचे प्रकार, २५ ते ३० सरपटनाऱ्या प्राण्यांचे प्रकार तसेच १०० ते ११० वेगवेगळ्या झाडांच्या प्रजाती आहेत आणि यामध्ये पिपळ, रोहिणी, साल आणि अंबा या सारखी झाडे आहेत.

जिम कॉर्बेटउद्यानातील झोन – zones

जिम कॉर्बेट हे उद्यान ५ विभागामध्ये विभागलेले आहे ते म्हणजे ढिकला झोन, बिजरानी झोन, झेला झोन, झीरना झोन, दुर्गादेवी झोने.

  • ढिकला झोन : ढिकला झोनला जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानमधील इको टुरिझम झोन म्हणून ओळखला जातो आणि हा झोन सर्वात नयनरम्य झोन आहे. या ठिकाणी सुंदर दऱ्या, साल झाडांचे जंगल आणि रामगंगा या नदीचे नैसर्गिक दृष्य पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी एशियाटीक हत्ती, मगरी, बेंगाल वाघ, सांभर हरण या सारखे प्राणी देखील पाहायला मिळतात.
  • झेला झोन : झेला झोन ही वाघांचे आवडते शिकार झोन आहे जे आपल्याला देखील पाहायला मिळते आणि हे या संपूर्ण सफारीमधील सुंदर सफारी आहे.
  • बिजरानी झोन : बिजरानी झोनमध्ये देखील वाघ पाहण्यास मिळतात तसेच या ठिकाणी हत्ती, हरण, काळे अस्वल आणि बिबट्या या सारखे प्राणी देखील पाहायला मिळतात.
  • झीरना झोन : झीरना झोन हे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानमधील सर्वात लोकप्रिय झोन आहे आणि हा झोन पावसाळ्यामध्ये देखील पाहण्यासाठी खुला असतो. या ठिकाणी नीलगाय, चितळ, हत्ती आणि हरीण या सारखे प्राणी पाहायला मिळतात.
  • दुर्गा देवी झोन : दुर्गा देवी झोन हा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानमधील डोंगराळ प्रदेश आहे आणि या ठिकाणी बेंगाल टायगर, माकड, चितळ, हरीण आणि सांबर हरीण पाहायला मिळतात.

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानविषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे सर्वात जुन्या उद्यानापैकी एक मानले जाते आणि हे धोक्यामध्ये असलेल्या बंगाल वाघांचे निवास्थान म्हणून ओळखले जाते कारण हे उद्यान कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे.
  • जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानमधील सर्वात लोकप्रिय आणि आकर्षक गोष्ट म्हणजे ढिकल आणि पाटील डून व्हॅलीच्या सीमेवर स्थित असलेले फॉरेस्ट लॉज.
  • जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानामध्ये दिवसभरामध्ये फक्त १८० वाहनांना प्रवेश दिला जातो त्यापेक्षा अधिक वाहने त्यामध्ये सोडली जात नाहीत.
  • हे उद्यान नैनिताल जिल्ह्यामध्ये असून हे हिमालयाच्या पायथ्याशी आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्या नैसर्गिक सुंदरता खूप पाहायला मिळते.
  • जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान ही उद्यान २५० पेक्षा अधिक वाघांचे घर आहे आणि हे त्यांच्यासाठी एक राखीव क्षेत्र आहे आणि पहिले व्याघ्र प्रकल्प क्षेत्र आहे.
  • या ठिकाणी पक्षी निरीक्षण, जंगल सफारी, ढिकला रात्रीचा मुक्काम, मासेमारी आणि कॉर्बेट संग्रहालय या लोकप्रिय पर्यटन गोष्टींचा आनंद आपण या ठिकाणी घेऊ शकतो.
  • या ठिकाणी असणारा व्याघ्र प्रकल्प हा १२८० चौरस किलो मीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळ व्यापतो.
  • सेमल, कचरण, ढाका, फॉरेस्ट फायर या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानमधील काही महत्वाच्या वनस्पती आहेत.
  • जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाला भेट द्यायची असल्यास या ठिकाणी असणारा उद्यान विभाग पर्यटकांना १५ नोव्हेंबर ते जून पर्यत भेट देण्यासाठी परवानगी देते.
  • जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे सध्याचे क्षेत्रफळ हे ५२०.८० किमी इतके आहे परंतु हे १९६६ च्या काळामध्ये ३२४ किमी इतके होते ते पुढे वाढवण्यात आले आणि सध्या ते ५०० किमी पेक्षा अधिक आहे.
  • या उद्यानामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत आणि हे निसर्गप्रेमिन्च्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे कारण या ठिकाणी ६०० पेक्षा अधिक वानासापती आहेत आणि यामध्ये मोठ्या वनस्पती, छोट्या वनस्पती, बांबूची झाडे, झुडपे, गवताळ वनस्पती, औषधी वनस्पती, फर्न आणि सुंदर अल्पाईन वनस्पती याचा समावेश आहे.
  • जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे पक्षी प्रेमींच्यासाठी देखील एक चांगले ठिकाण आहे कारण या ठिकाणी ५७० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत आणि या ठिकाणी मोर, गोल्डन ओरीओ, सी ईगल, गिधाड, उल्लू कबुतर या सारखे अनेक पक्षी पहायला मिळतात.

आम्ही दिलेल्या jim corbett national park information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या jim corbett national park information in marathi wikipedia या jim corbett national park information in marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि information about jim corbett national park in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!