जॉन डाल्टन यांची माहिती John Dalton Information in Marathi

john dalton information in marathi जॉन डाल्टन यांची माहिती, जगामध्ये अनेक वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले आणि विज्ञान क्षेत्रामध्ये भर पाडली तसेच जॉन डाल्टन हे देखील एक वैज्ञानिक आहेत. ज्यांनी हवामानशास्त्रातील आणि भौतिकशास्त्रातील सिद्धांताच्या रचनेसाठी खास ओळखले जाते. जॉन डाल्टन यांचा जन्म युके (UK) मधील इंग्लंड मधील ईगल्सफिल्ड मध्ये ६ सप्टेंबर १७६६ मध्ये झाला आणि त्यांचे आई वडील दोघेही ख्रिश्चन होते परंतु इंग्लंडच्या स्थापित चर्चने त्यांना विरोधक म्हणून पहिले होते.

त्यांच्या वडिलांचे नाव जोसेफ डाल्टन आणि डेबोरा ग्रीनअप्स असे आहे. जॉन डाल्टन हे ११ वर्षाचे होईपर्यंत त्यांनी त्यांचे शिक्षण हे त्यांच्या गावामध्ये घेतले आणि त्यांनी त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी त्यांच्या भावाला क्वेकर बोर्डिंग स्कूल चालवण्यास मदत केली आणि या वेळेमध्ये ते गणित, लॅटिन, विज्ञान, फ्रेंच आणि ग्रीक शिकत राहिले.

त्यानंतर ते वयाच्या १९ व्या वर्षी शाळेचे मुख्याध्यापक बनले आणि ते २६ वर्षाचे होईपर्यंत हे पद सांभाळले. चला तर खाली आपण जॉन डाल्टन विषयी काही आणखीन माहिती घेवूया.

john dalton information in marathi
john dalton information in marathi

जॉन डाल्टन यांची माहिती – John Dalton Information in Marathi

नावजॉन डाल्टन
जन्म६ सप्टेंबर १७६६
जन्मठिकाणयुके (UK) मधील इंग्लंड मधील ईगल्सफिल्ड मध्ये झाला
ओळखवैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ
शोधअणु सिद्धांत, अंशिक दाबाचे नियंत्रण, रंगाआंधळेपणाचा सिद्धांत

डाल्टन यांची ओळख काय आहे ?

जॉन डाल्टन हे १८०० च्या मध्यात एक प्रसिध्द शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी त्यांचा संपूर्ण वेळ हा अणूंची संकल्पना आणि त्यांचे वर्तन यावर संशोधन करण्यात घालवले. डाल्टनच्या अणुसिध्दांताची निर्मिती करून विज्ञानात त्यांचे मोठे योगदान होते.

जॉन डाल्टन यांचे शोध – john dalton scientist information in marathi

जॉन डाल्टन यांनी सुरुवातीच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या विभागामध्ये संशोधन केले होते आणि त्यामधील काही मोजकी संशोधने आपण खाली पाहणार आहोत.

अंशिक दाबाचे नियंत्रण

हवामानशास्त्र आणि वातावरणातील वायूंच्यामध्ये डाल्टनच्या स्वारस्यमुळे वायूंच्या मिश्रणाचा एकूण दाब हा मिश्रणातील प्रत्येक वायूच्या वैयक्तिक दाबांच्याइतका असतो असा शोध लावला.

डाल्टनने अंशिक दाबाचा शोध लावताना हवामानाच्या नोंदी ह्या काळजीपूर्वक घेतल्या होत्या आणि त्यांचा असा विश्वास होता कि हवेमध्ये सुमारे ८० टक्के नायट्रोजन आणि २० टक्के ऑक्सिजन असते.

अनु सिद्धांत

डाल्टन यांचा अनु सिद्धांत हा त्यांच्या काही लोकप्रिय कार्यापैकी एक आहे आणि या कार्यामुळेच त्यांना रसायनशास्त्राचे जनक म्हणून ओळख मिळाली. डाल्टन यांनी अणु सिद्धांत हा त्यांच्या हवामानशास्त्राच्या संशोधनाच्या दरम्यान विकसित झालेला.

त्यांनी प्रयोगाद्वारे असे शोधून काढले कि हवा हे अँटोइन लॉरेंट लॅव्होइसियर आणि त्यांच्या अनुयायांनी विचार केल्याप्रमाणे एक विशाल रासायनिक विद्रावक नाही तर एक यांत्रिक प्रणाली आहे ज्या मध्ये मिश्रणातील प्रत्येक वायूचा दाब हा वायूच्या दाबापेक्षा स्वातंत्र्य असतात.

आणि इतर वायू आणि जेथे एकूण दाब ओरत्येक वायूच्या दाबाची बेरीज आहे. या संशोधनामुळे त्यांनी अशी समाज आली कि मिश्रणातील अणु खरोखरच वजन आणि जटिलता मध्ये भिन्न असतात. डाल्टनचे अणु विषयी सिद्धांत खाली दिलेले आहेत.

  • वेगवेगळ्या घटकांचे अणू हे एकमेकांच्यापासून भिन्न आकार आणि वस्तुमान असतात.
  • घटक हे लहान कणांच्यापासून बनलेले असतात म्हणजेच ते अणूंच्यापासून बनलेले असतात.
  • अणु साध्या, पूर्ण संखेच्या गुणोत्तरांमध्ये एकमेकांशी एकत्रित होऊन रासायनिक संयुगे तयार करतात.
  • रासायानिक अभिक्रीयेच्या कालावधीमध्ये अणु परत रचना करतात आणि ते एकनेकांच्यापासून वेगळे किंवा इतर अनुंसह एकत्र केले जाऊ शकतात.
  • अणु ए तयार किंवा नष्ट केले जाऊ शकत नाहीत आणि त्यांचे उपविभाजन देखील करता येत नाही.

गॅस कायद्याची मालिका

जॉन डाल्टन यांनी गॅस कायद्याचे वर्णन करणारी कागदपत्राची एक मालिका लिहिली आणि त्याचबरोबर अंशिक दाबावरील त्यांचा कायदा हा डाल्टनचा कायदा म्हणून ओळखला जाऊ लागला.

रंगाआंधळेपणाचा सिद्धांत

त्यांनी रंगीबेरंगी द्रवाविषयी त्यांचा सिद्धांत मांडला आणि हा सिद्धांत हा रंगाआंधळेपणाचा सिद्धांत म्हणून ओळखले जाते.

जॉन डाल्टन मृत्यू – death

जॉन डाल्टन यांनी अनेक क्षेत्रामध्ये संशोधन केले आणि त्यांनी त्यांच्या मृत्यू पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन सुरूच ठेवले होते. त्यांनी २६ जानेवारी १८४४ मध्ये हवामानशास्त्रीय मोजमाप नोंदवले आणि त्यांचा मृत्यू १८४४ मधेच झाला.

जॉन डाल्टन यांच्याविषयी काही मनोरंजक तथ्ये – facts

  • जॉन डाल्टन हे ब्रिटिशचे वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ होते.
  • जॉन डाल्टन हे वयाच्या ७७ व्या वर्षी मरण पावले होते.
  • ज्यावेळी जॉन डाल्टन हे केवळ १५ वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या भावाला क्वेकर बोर्डिंग स्कूल चालवण्यास मदत केली होती.
  • त्यांनी वयाच्या २७ व्या वर्षी मँचेस्टरमधील न्यू कॉलेजमध्ये गणित आणि नैसर्गिक तत्वज्ञानाचे शिक्षक म्हणून नियुक्ती झाले होते आणि त्यांनी शिक्षक म्हणून ३४ वर्ष काम केले.
  • जॉन डाल्टन यांचा अणु सिद्धांत हा अणुबद्दलचा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे.
  • जॉन डाल्टन हे ऑक्सफर्ड, डब्लिन, ब्रिस्टल, यॉर्क आणि ब्रिटीश असोसियेशनच्या बैठकाना उपस्थित राहत होते.
  • जॉन डाल्टन यांच्या अंतयात्रेसाठी चाळीस हजारपेक्षा जास्त लोक हजार होते.
  • जॉन डाल्टन हे ११ वर्षाचे होईपर्यंत त्यांनी त्यांचे शिक्षण हे त्यांच्या गावामध्ये घेतले आणि त्यांनी त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी त्यांच्या भावाला क्वेकर बोर्डिंग स्कूल चालवण्यास मदत केली.
  • एका चंद्राच्या विवरला डाल्टनचे नाव देण्यात आले आहे.

आम्ही दिलेल्या john dalton information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जॉन डाल्टन यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या john dalton scientist information in marathi या john dalton biography in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about john dalton in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!