कैलाश सत्यार्थी माहिती Kailash Satyarthi Information in Marathi

kailash satyarthi information in marathi कैलाश सत्यार्थी माहिती, आपल्या भारत देशामध्ये अनेक समाजसुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले आणि कैलाश सत्यार्थी देखील त्यामधील एक आहेत आणि आज आपण या लेखामध्ये कैलाश सत्यार्थी यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. कैलाश सत्यार्थी हे एक भारतातील सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्यांना मानावाधिकारी कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये केलेली महत्वाची कामगिरी म्हणजे ते बालगुलामगिरी आणि बाल हक्कासाठी लढले आणि त्यांनी बालमुलांना चांगले जीवन देण्यासाठी बचपन बचावो हि चळवळ सुरु केली.

आणि या चळवळीच्या मार्फत ८० ते ८५ हजार बालमुलांना शोषणमुक्त केले आणि त्यांचे शिक्षण आणि पुनर्वसन करण्यास देखील मदत केली. कैलाश सत्यार्थी यांचा जन्म ११ जानेवारी १९५४ मध्ये विदिशा (मध्य प्रदेश) या ठिकाणी झाला आणि ते भारताचे एक चांगले नागरिक आहेत. ज्याची ओळख संपूर्ण भारतामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते किंवा समाजसुधारक म्हणून आहे.

kailash satyarthi information in marathi
kailash satyarthi information in marathi

कैलाश सत्यार्थी माहिती – Kailash Satyarthi Information in Marathi

नावकैलाश सत्यार्थी
जन्म११ जानेवारी १९५४
जन्म ठिकाणविदिशा (मध्य प्रदेश)
शिक्षणअभियांत्रिकी
ओळखसामाजिक कार्यकर्ते
मुख्य कामगिरीबालहक्कासाठी लढा.

कैलाश सत्यार्थी यांची कामगिरी – career

 • सत्यार्थी यानी बचपन बचावो चळवळ हि एक त्यांनी स्थापन केलेली संस्था होती आणि ह्या बचपन बचावो या संस्थेच्या मार्फत त्यांनी ८० ते ९० हजार पेक्षा अधिक मुलांना बाल मजुरी, बाल तस्करी, बाल गुलामगिरी, बाल अन्याय या गोष्टींच्यापासून मुक्त केले.
 • त्याचबरोबर त्यांनी ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर याचे नेतृत्व देखील केले आणि त्यांना यासाठी १०३ देशांच्यामधून पाठींबा देखील मिळाला.
 • त्याचबरोबर त्यांनी व्यवसायांना त्यांच्या पुरवठा साखळ्यांना बालमजुरीपासून मुक्त करण्यात मदत करण्यासाठी त्यांनी नैतिक व्यवसाय व्यवसाय पध्दतीचा वापर करण्यासाठी व्यवसायांना प्रोत्साहित केले त्यामुळे बालमजुरी कमी होण्यास मदत झाली.
 • त्याचबरोबर ते ग्लोबल कॅम्पेन फॉर एज्युकेशन या संस्थेचे संस्थापक देखील आहेत आणि हि संस्था जागतिक शिक्षण संकट संपवण्यासाठी काम करणारी एक चळवळ संस्था आहे.
 • २०१६ मध्ये कैलाश सत्यार्थी यांनी तरुणांचा हक्क आणि समवयस्कर हक्क या साठी उभे राहण्यासाठी आणि त्या साठी कृती करण्यासाठी एकत्रपणे १०० दशलक्षपेक्षा अधिक मोहीम सुरु केल्या.
 • कैलाश सत्यार्थी हे कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशनचे जागतिक अध्यक्ष देखील होते.
 • त्यांनी बचपन बचावो आंदोलन, ग्लोबल कॅम्पेन फोर एज्युकेशन, कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन, बाल आश्रम ट्रस्ट, ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर या सारख्या अनेक सामाजिक संस्थांची स्थापना केली.

कैलाश सत्यार्थी यांच्याविषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • कैलाश सत्यार्थी यांनी ३० ते ३५ वर्ष जगातील आणि भारतातील मुलांच्या हक्कासाठी लढले आणि समाजामधील एक महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
 • कैशाश सत्यार्थी यांनी अभियांत्रिकी (engineering) चे शिक्षण पूर्ण केले आहे.
 • त्यांनी १९९० पासून बालहक्कासाठी काम करण्यास किंवा आवाज उठवण्यास सुरुवात केली आणि या कामातून अनेक शोषित मुलांना मुक्त केले.
 • मध्य प्रदेश या राज्यामध्ये जन्मलेले कैलाश सत्यार्थी हे महात्मा गांधींचे चाहते आहेत आणि त्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन ते जागतिक प्रेरणास्थान बनले.
 • १९९८ मध्ये त्यांनी बालमजुरीविरुध्द जागतिक मोर्चाचे प्रतिनिधित्व केले ज्यामध्ये १०३ वेगवेगळे देश आणि ७  दशलक्ष पेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला होता.
 • युएनएच्या विकास अजेंडामध्ये बाल गुलामगिरीचा (बालमजुरी, बाल तस्कर, बाल अन्याय) समावेश करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
 • त्यांनी असे म्हटले आहे कि हे नोबेल पारितोषिक हे सर्व मुलांचा आणि त्यांच्या भारतीय सहकाऱ्यांचा सन्मान आहे.
 • त्यांनी त्यांच्या या कारकीर्दीच्या काही दिवसामध्ये बचपन बचावो या आंदोलन संस्थेची स्थापना केली जी संस्था मुलांना शिक्षण देण्याचे काम करते.
 • त्यांनी बचपन बचावो हि आंदोलन संस्था १९८० मध्ये सुरु केली आणि या संस्थेमार्फत अनेक मुलांना सुरक्षित केले.
 • ज्यावेळी कैलाश सत्यार्थी हे फक्त ११ वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या मित्रांच्यासोबत मध्य प्रदेशमधील विदिशा या ठिकाणावरील विद्यार्थ्यांनी वापरलेली पुस्तके गोळा केली आणि ज्या मुलांना त्या पुस्तकाची गरज आहे ह्या गरजू मुलांना ती पुस्तके वाटली.
 • त्यांनी त्यांच्या गावामध्ये म्हणजेच विदिशामध्ये शाळेमध्ये जाण्याचे वय असणारी मुले बालमजुरीसाठी जातात हे पहिले होते आणि त्यातूनच कैलाश सत्यार्थी यांना बालहक्काविरुध्द लढण्यासाठी प्रेरणा मिळाली.
 • कैलाश सत्यार्थी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी देखील त्यांच्या महत्वपूर्ण आणि चांगल्या कामगिरीसाठी सन्मानित केले आहे.
 • त्यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी अनेक वेगवेगळे पुरस्कार आणि नामांकने मिळाली आहेत.

कैलाश सत्यार्थी यांना मिळालेले पुरस्कार – awards

 • त्यांनी बालहक्कासाठी कार्य चांगले कार्य केले त्यामुळे त्यांचे नाव २०१७ मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नमूद करण्यात आले.
 • १९९४ मध्ये त्यांना आचेनर आंतरराष्ट्रीय शांतात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.  
 • त्याचबरोबर त्यांना २०१५ मध्ये हार्वर्ड मानवतावादी पुरस्कार मिळाला.
 • २०१६ मध्ये कैलाश सत्यार्थी यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.
 • त्याचबरोबर १९९५ मध्ये युएसए मध्ये त्यांना ट्रंम्पेटर हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
 • त्यांना इटालियन सिनेटचे रॉबर्ट एफ केनिडी मानवाधिकारी पुरस्कार पदक मिळाले आहे.   
 • २०१५ मध्ये कैलाश सत्यार्थी हे फॉर्च्युन मासिकाच्या जगातील महान नेत्यांच्यामध्ये देखील होते.

आम्ही दिलेल्या kailash satyarthi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कैलाश सत्यार्थी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kailash satyarthi information in marathi wikipedia या kailash satyarthi information in marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि information about kailash satyarthi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!