कांग्रा किल्ला माहिती Kangra Fort Information in Marathi

kangra fort information in marathi कांग्रा किल्ला माहिती, कांग्रा किल्ला हा भारतातील सर्वात जुना म्हणजे मुघल साम्राज्याचा अकबर याला देखील माहित नसलेला एक प्राचीन किल्ला आहे आणि आज आपण या लेखामध्ये कांग्रा या किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. अनेक आक्रमणांचा, युद्धांचा, राजवटींचा आणि संपतीचा साक्षीदार असणारा कांग्रा हा किल्ला भारतातील हिमाचल प्रदेश हा राज्यातील कांगडा या शहराजवळ वसलेला आहे आणि इतिहासकारांनी असे सांगितले आहे कि कांग्रा हा किल्ला ३५०० वर्षापुर्वीचा आहे.

आणि या किल्ल्याची निर्मिती कटोच घराण्यातील सुशर्मा चंद्र याने बांधला आणि या किल्ल्यावर कल्पना न करता येणारा खजिना होता आणि त्यामुळे हा किल्ला अनेक राजकर्त्यांचे आणि परीकीयांचे लक्ष बनला होता आणि म्हणून या किल्ल्याला खाजीनांचा किल्ला म्हणून ओळखले जात होते.

कांग्रा हा किल्ला कांगडा या गावापासून २० किलो मीटर अंतरावर आहे आणि हा किल्ला हिमाचल प्रदेश राज्यातील सर्वात जास्त भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. चला तर खाली आपण कांग्रा किल्ल्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

kangra fort information in marathi
kangra fort information in marathi

कांग्रा किल्ला माहिती – Kangra Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावकांग्रा किल्ला
ठिकाणभारतातील हिमाचल प्रदेश हा राज्यातील कांगडा या शहराजवळ
निर्मिती३५०० वर्षापूर्वी
निर्माताकटोच घराण्यातील सुशर्मा चंद्र
कश्यासाठी प्रसिध्दअकल्पनीय संपत्ती आणि खजिना
क्षेत्रफळ४५० एकर

कांग्रा किल्ल्याचा इतिहास

कांग्रा हा किल्ला ३५०० वर्षापूर्वीचा किल्ला आहे आणि हा किल्ला सुशर्मा चंद्र जो कटोच घराण्यातील होता त्याने बांधला होता आणि या किल्ल्यामध्ये अनेक चांगल्या भेटवस्तू आणि संपती म्हणजेच अकल्पनीय खजिना असल्यामुळे या किल्ल्यावर अनेक राजकर्त्यांचे लक्ष होते आणि हा किल्ला जिंकण्यासाठी अनेक जणांनी प्रयत्न केले.

या किल्ल्यावर शासक काश्मीरचा राजा याने ४७० मध्ये सर्वप्रथम हल्ला केला होता आणि तसेच १००९ मध्ये या किल्ल्यावर पहिले परकीय आक्रमण झाले होते आणि हे आक्रमण मुहम्मद गझनी याने केले होते आणि त्याने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर या किल्ल्यावर मुहम्मद बिन तुघलक आणि फिरोजशहा तुघलक यांनी देखील राज्य केले.

१६१५ मध्ये कांग्रा हा किल्ला तुर्कांच्याकडून घेण्यासाठी एकूण ५० पेक्षा अधिक प्रयत्न केले होते परंतु यामध्ये अकबर अयशस्वी ठरला होता. अश्या प्रकारे कांग्रा किल्ल्यावर असणाऱ्या अकल्पनीय संपत्तीच्या हव्यासापोटी या किल्ल्यावर अनेक राजकर्त्यांनी राज्य केले.

किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे

कांग्रा या किल्ल्यावर आपण अनेक ऐतिहासिक ठिकाणे पाहू शकतो आणि ती कोणकोणती आहेत ती आपण खाली पाहूया.

  • ताटवाणी झरा : ताटवाणी झरा हा एक किल्ल्यावर असणारा गरम पाण्याचा झरा आहे आणि हा झरा या किल्ल्यावरील मुख्य आकर्षणाचा भाग बनला आहे.
  • मसरूर मंदिर : मसरूर हे एक दगडी मंदिर आहे जे ८ व्या शतकामध्ये निर्माण केले आहे आणि हे मंदिर बियास नदीच्या खोऱ्यावर स्थित आहे.
  • बज्रेश्वर मंदिर : बज्रेश्वर मंदिर हे देखील या ठिकाणावर असणारे एक प्राचीन मंदिर आहे.
  • ग्युटो मठ : ग्युटो मठ हे देखील या किल्ल्यावरील एक पाहण्यासारखे आकर्षण आहे आणि ग्युटो मठाची स्थापना सोंगखापा या महान शिक्षकांच्यापैकी एकाच्या तांत्रिक शिकवनींचे जतन करण्यासाठी करण्यात आली होती.

कांग्रा किल्ल्याविषयी विशेष तथ्ये

  • कांग्रा हा किल्ला भारत देशातील सर्वात जुना आणि हिमाचल प्रदेशातील सर्वात मोठा किल्ला आहे.
  • कांग्रा या किल्ल्याचा उल्लेख हिंदू महाकाव्य महाभारतामध्ये देखील आहे.
  • कांग्रा या किल्ल्याजवळच्या डोंगरमाथ्यावर जयंती मातेच्या एक छोटेसे प्रसिध्द मंदिर आहे आणि त्या मंदिराजवळ कांग्रा किल्ल्याचा इतिहास सांगणारे एक संग्रहालय आहे.
  • कांग्रा हा किल्ला ३५०० वर्षापूर्वीचा किल्ला आहे आणि हा किल्ला सुशर्मा चंद्र जो कटोच घराण्यातील होता त्याने बांधला होता
  • कांग्रा ह्या किल्ल्याचे क्षेत्रफळ हे ४५० एकर पेक्षा अधिक आहे.
  • १६१५ मध्ये कांग्रा हा किल्ला तुर्कांच्याकडून घेण्यासाठी एकूण ५० पेक्षा अधिक प्रयत्न केले होते परंतु यामध्ये अकबर अयशस्वी ठरला होता.
  • मुहम्मद बिन तुघलक यांने हा किल्ला १३३७ मध्ये आपल्या ताब्यात घेतला होता.
  • कांगडा या किल्ल्यामध्ये २१ खजिन्याच्या विहिरी आहेत आणि ज्यामध्ये प्रत्येक विहिरी ह्या ४ मीटर खोल आणि सुमारे अडीच मीटर परिघाच्या आहेत.
  • ४ एप्रिल १९०५ मध्ये भूकंप झाला होता आणि या भुकंपामध्ये या किल्ल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

टिप्स

  • जर तुम्हाला कांग्रा या किल्ल्याला भेट द्यायचे असेल तर  या किल्ल्याला सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत तुम्ही कशीही भेट देऊ शकता.
  • कांग्रा हा एक प्राचीन आणि सर्वात जुना किल्ला असल्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात आणि हे भारतातील देखील असतात आणि ते भारताबाहेरील देखील असतात आणि अश्या पर्यटकांना किल्ला पाहण्यासाठी शुल्क आकाराला जातो. भारतीय पर्यटकांच्यासाठी हा प्रवेश शुल्क १५० रुपये प्रती व्यक्ती आहे तर विदेशी पर्यटकांच्यासाठी हा प्रवेश शुल्क ३०० रुपये प्रती व्यक्ती आहे.
  • कांग्रा हा संपूर्ण किल्ला फिरून पाहण्यासाठी आपल्याला जवळ जवळ दीड ते २ तास लागतात.
  • कांग्रा या किल्ल्याला तुम्ही वर्षातून कधीही भेट देऊ शकता परंतु कांग्रा ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम काळ हा मार्च ते एप्रिल हा आहे.

कसे पोहचायचे – how to reach

  • विमानाने : जर तुम्हाला ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी विमानाने यायचे असल्यास या किल्ल्याजवळ असणारे सर्वात जवळचे विमानतळ हे ११ किलोमीटर आहे आणि आपण कोणत्याही मुख्य शहरातून विमानाने गग्गल या ठिकाणी जाऊ शकतो आणि तेथून मग आपण बसने किंवा टॅक्सी जाऊ शकतो.
  • ट्रेनने : जर तुम्हाला ट्रेनने हा किल्ला पाहण्यासाठी जायचे असल्यास कांगडा या शहरामध्ये स्टेशन आहे तुम्ही या ठिकाणी ट्रेनने येऊ शकता .
  • बसने किंवा कारणे : जर तुम्हाला हा किल्ला पाहण्यासाठी बसने जायचे असल्यास तुम्ही बसने देखील जाऊ शकता कारण कांगडा या शहराला अनेक रस्त्यांनी चांगले जोडलेले आहे.

आम्ही दिलेल्या kangra fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कांग्रा किल्ला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kangra fort himachal pradesh information in marathi या kangra fort information in marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि information about kangra fort in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sajjangad satara information in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!