Khidrapur Temple Information in Marathi खिद्रापूर कोपेश्वर मंदिर आज आपण इतिहासातल्या अनोख्या मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला खिद्रापूर ह्या प्रसिद्ध मंदिरा बद्दल सांगणार आहे. खिद्रापूर मधील कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आढळून येतं. खिद्रापूर हे बाराव्या शतकात शिलाहार राजवटीतील एका राजाने बांधलं होतं. खिद्रापूर हे प्राचीन काळात कोप्पम या नावाने ओळखलं जायचं. हे मंदिर कुठे, आहे ह्याचे वैशिष्ट्य, त्याचे सौंदर्य, याचा इतिहास, मंदिरातील रहस्य, मंदिरात घडणारे उत्सव, जत्रा या सगळ्या बद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे.

खिद्रापूर कोपेश्वर मंदिराची माहिती – Khidrapur Temple Information in Marathi
खिद्रापूर मंदिर माहिती
खिद्रापूर मंदिर (Khidrapur Mandir) | माहिती |
मंदिराचे नाव | कोपेश्वर मंदिर |
उत्सव, यात्रा | प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला |
मंदिर कोठे आहे | खिद्रापूर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात येत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कोपेश्वर मंदिर आहे |
मंदिर कोणी बांधले | खिद्रापूर हे बाराव्या शतकात शिलाहार राजवटीतील एका राजाने बांधलं |
मंदिराचे दुसरे नाव | कोप्पम |
इतिहास:
खिद्रापूर मधील कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आढळून येतं. खिद्रापूर हे बाराव्या शतकात शिलाहार राजवटीतील एका राजाने बांधलं होतं. खिद्रापूर हे प्राचीन काळात कोप्पम या नावाने ओळखलं जायचं. प्रसिद्ध युद्धभूमी म्हणून हे स्थळ ओळखले जायचे. खिद्रापूर मधील कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आढळून येतं. खिद्रापूर हे बाराव्या शतकात शिलाहार राजवटीतील एका राजाने बांधलं होतं. खिद्रापूर हे प्राचीन काळात कोप्पम या नावाने ओळखलं जायचं. प्रसिद्ध युद्धभूमी म्हणून हे स्थळ ओळखले जायचे. सातव्या शतकात हे मंदिर बांधलेलं असून बाराव्या शतकात शिलाहार राजवटीततील एका राजाने त्याचे नूतनीकरण केले.
तसे हे मंदिर कोल्हापूर व कर्नाटक यांच्या सीमेवर आढळून येते. त्यामुळे या मंदिराची स्थापत्यशैली बेरूळ व हळेबीडशी मध्ये साम्य दाखवणारी आहे. या मंदिराला २ जानेवारी इ.स १९५४ रोजी भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले.
मंदिराची वैषिष्ट:
कृष्णा नदीच्या काठी वसलेले हे मंदिर सुंदरता व कलाकृतींनी समृद्ध आहे. स्थापत्यशैलीच उत्तम उदाहरण म्हणजे खिद्रापूर मंदिर. प्रमुख मंडपापासुन जरा लांब असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप गर्भगृह, अंतराळ असा या मंदिराचा तलविन्यास आहे. प्रमुख मंडपापासून जरा लांब असलेला खुला मंडप स्वर्गमंडप म्हणून देखील ओळखला जातो. गर्भगृहात मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे खिद्रापूर मंदिराचे मुख हे पूर्वेच्या दिशेने असल्यामुळे सर्वात पुढच्या बाजूस प्रमुखमंडपा ऐवजी त्रिरथ पूर्णमंडप आहे.
मंडपाच्या मध्यभागी बाजूला वर्तुळ आकाराची रंग शिळा असून तिच्या बाजूला अर्धवट घुमटाकार छताचा तोल पेलवणारे १२ स्तंभ आहेत. या स्तंभांच्या आतील बाजूस कार्तिकेय व अष्टदिक्पाल वाहनां सोबत दर्शवले आहेत. या बारा स्तंभांच्या मागे रुंदी ने कमी असलेले नऊ स्तंभ आहेत. स्वर्ग मंडपाच्या आत मध्ये सभामंडप आहे. आणि या सभामंडपाची प्रवेश द्वार उत्तर आणि दक्षिण दिशेस आहे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला एक एक स्तंभ आहे. स्वर्ग मंडपाच्या आत मध्ये सभामंडप आहे आणि या सभामंडपाची प्रवेश द्वार उत्तर आणि दक्षिण दिशेस आहे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला एक एक स्तंभ आहे.
सभामंडपाच्या मधल्या भागाच्या बाजूस २० चौकोनी आकाराचे स्तंभ आहेत. सभा मंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाश येण्यासाठी खिडक्या आहेत. मंडपाच्या आतल्या भागात जाताना प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत. सभामंडपातील नक्षीदार दरवाजे आणि त्या जाळ्यांवर कोरलेले हत्ती अधिकच सुंदर आहेत. मंदिरावर केलेले शिल्पकला कृती, उंच उंच खांब, अगदी बारीक कोरलेली सुंदर नक्षी हे सगळं खुप बघण्यासारखं आहे.
देवळा बाहेर ४८ खांबांवर बांधलेला एक मंडप आहे. या मंडपाचे छत अर्धे खुले आहे. ती जागा वर्तुळाकार असून ती जाणून बुजून रिकामी ठेवण्यात आली आहे. मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असल्याने होम-हवन मध्ये होणारा धूर त्या मार्गे बाहेर जातो. कोपेश्वर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला जंगाभाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानावर वेगवेगळी शिल्पे आहेत. मंदिरातील सुरसुंदरी शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत. गजथरावर मोठ्यामोठ्या प्रकाराचे हत्ती असून हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देवतांचे शिल्पे वरील आहेत.
मंडोरावर विष्णूचा अवतार, चामुंडा, गणेश यांचे शिल्पे आहेत. केवळ आतूनच नाही तर बाहेरून देखील ही वास्तू कोरीव कामांनी समृद्ध आहे. मंदिराच्या पायथ्याजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या सुमारे पाच ते सहा फूट उंचीच्या आखीव-रेखीव मानवी आकृती मंदिराच्या संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर आहेत. विविध वैशिष्ट्ये तसेच आधुनिक इतिहास, उत्तम कलाकृती आणि कोरीव कामांनी पूर्ण असलेल्या तसेच गमतीदार रहस्य व शिल्प कलाकृतीनी समृद्ध असलेल्या खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात ला नक्की भेट द्या.
मंदिराचा फोटो:

मंदिराचे रहस्य:
या मंदिराचे अधुनिक असे रहस्य आहे. खिद्रापूर हे कोपेश्वर महादेवाच मंदिर असून मंदिरात शिवलिंग आहे. पण प्रत्येक शिवमंदिरात जशी नंदीची मूर्ती असते तशी इथे नंदीची मूर्ती नाही आहे. ती काळाच्याओघात किंवा आक्रमणांमुळे या नदीचं स्थलांतर झाले असावे जसे मी तुम्हाला आधीच सांगितले की हे स्थान प्रसिद्ध युद्धभूमी म्हणून ओळखले जात होते. असे मानले जाते की दक्ष राजाला त्याची कन्या सती व महादेव शंकर यांचा विवाह मान्य नव्हता. एकदा दक्ष राजाने येडूर येथे भव्य असा यज्ञहवन कार्यक्रम आखला आणि त्यांनी जाणून बुजून महादेव शंकर आणि सती यांना निमंत्रण पाठवले नाही.
तरीही देखील सती नंदी सोबत यज्ञ समारंभात पोचली राजा दक्ष हे बघून रागवले म्हणून त्यांनी सती व शंकर महादेव यांचा सगळ्या पाहुण्यांसमोर अपमान केला. तिचा व तिच्या नवऱ्याचा म्हणजेच शंकर महादेव यांचा झालेला अपमान सहन झाला नाही म्हणून कन्या सतिने समोर चालू असलेल्या भव्य यज्ञात स्वताला झोकून दिले. जेव्हा महादेव शंकर यांना ही बातमी कळाली तेव्हा त्यांना राग सहन झाला नाही आणि ते लगेच खिद्रापूर वरून येडूरला निघून आले आणि त्यांनी दक्ष राजाला शिरच्छेद करण्याची शिक्षा दिली.
त्यानंतर श्रीविष्णू देवाने बकऱ्याचा शिरच्छेद करून तो शिर दक्ष राजाला जोडून त्यांना पुनर्जन्म दिला. श्री विष्णू यांनी महादेवाचा राग शांत करण्यासाठी त्यांना येडूर वरून खैद्रपुरात आणले म्हणूनच शिवलिंगे सोबत खैद्रपूरच्या मंदिरात श्रीविष्णू यांची मूर्ती देखील आहे. म्हणूनच तिथे नंदी दिसत नाही किंवा नंदीची मूर्ती नाही. खिद्रापूर कोल्हापूर व कर्नाटकाच्या सीमेवर येत असल्याने हा नंदी कर्नाटकातील येडूर या गावात आहे. तिथे फक्त नंदीचे मंदिर आहे. आणि या गावातील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिम दिशेला तोंड करून बसला आहे. जे कि खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिर हे पूर्वभिमुख आहे.
उत्सव, यात्रा:
महाशिवरात्री हा आपल्या भारतातील सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो तर खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर हे महादेवाचे मंदिर आहे कोपेश्वर म्हणजे राग येऊन येथे घेऊन बसलेला देव. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहात कोपलेला असा महादेव कोपेश्वर आहे. त्यांची समजूत काढणारे देव म्हणजे श्रीविष्णु म्हणजेच धोपेश्वर. प्रत्येक वर्षी येथे महाशिवरात्रीला जत्रा व खूप मोठा उत्सव असतो. प्रत्येक वर्षी महाशिवरात्री अनेक शिवभक्त कोपेश्वराचे दर्शन घेण्यासाठी खिद्रापूरला भेट देतात. खिद्रापूर हे प्राचीन काळातील मंदिर असून ते प्रेक्षणीय व धार्मिक स्थान म्हणून खूप प्रसिद्ध आहे.
मंदिर कोठे आहे? कसे जायचे?:
खिद्रापूर हे महाराष्ट्राला लाभलेलं एक ऐतिहासिक वैभव आहे. खिद्रापूर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात येत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कोपेश्वर मंदिर आहे. गावाला कृष्णा नदीचा सहवास लाभला असल्यामुळे हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावरच वसले आहे. खिद्रापूर सारख्या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी कोल्हापूर वरुन बस गाडी सुटतात. हे मंदिर कोल्हापूर पासून जवळपास ८० किलोमीटर तर नरसोबाच्या वाडी पासून २४ किलोमीटर दूर आहे. तसेच जयसिंगपूर पासून हे मंदिर सगळ्यात जवळ आहे. खिद्रापूर साठी कोल्हापूर व आग्र्या बसस्थानकावरून अनेक गाड्या सुटतात.
कट्यार काळजात घुसली:
कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण कोपेश्वराचे च्या मंदिरात केले गेले होते. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी असल्यामुळे चित्रीकरणासाठी ते उत्तम आहे. “भोला भंडारी” या गाण्याचे चित्रीकरण येथे झाले होते.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा खिद्रापूर कोपेश्वर मंदिर khidrapur temple information in marathi language हे मंदिर कुठे आहे? ह्याचे वैशिष्ट्य, त्याचे सौंदर्य, याचा इतिहास, मंदिरातील रहस्य, मंदिरात घडणारे उत्सव, जत्रा याची थोडक्यात माहिती दिली आहे. khidrapur temple information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about khidrapur temple in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही खिद्रापूर कोपेश्वर मंदिर विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या khidrapur temple in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट