Kombdi Vade Recipe in Marathi कोंबडी वडे रेसिपी कोंबडी वडा हा एक कोकणातील किंवा मालवणी पदार्थ आहे जो वेगवेगळ्या पीठ मिक्स करून किंवा वेगवेगळ्या प्रकारची भाजणी बनवून त्याचे चक्कीतून पीठ दळून आणून मग त्याचे कोंबडी वडे बनवले जातात. ह्या प्रकारचे हे वडे कोकणामध्ये तर आवडीने बनवले जातातच परंतु हे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या जवळील राज्यामध्ये देखील काही ठिकाणी बनवले जातात आणि हे वडे विशेषता मटन किंवा चिकन सोबत खाण्यासाठी खूप लोकप्रिय आहे आणि हि रेसिपी जर मटन बनवले तर आवर्जून बनवतात.
कोंबडी वाड्यांना मालवणी वडे म्हणून देखील ओळखले जाते. कोंबडी वडे हा एक नवखा पदार्थ जर आपण घरी बनवला तर तो लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडेल. हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनतो. चला तर आता आपण कोंबडी वडे कसे बनवायचे ते पाहूयात.
कोंबडी वडे रेसिपी – Kombdi Vade Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
पाककला | मालवणी किंवा कोकणी |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
आता आपण वेगवेगळ्या धान्यांच्या पासून कोंबडी वडे बनवण्यासाठी लागणारे भाजणीचे पीठ कसे बनवायचे ते पाहूयात.
भाजणी लागणारे साहित्य
- १/२ किलो जोंधळा.
- १/२ किलो तांदूळ.
- १/२ वाटी चणा डाळ.
- १ वाटीला कमी गहू.
- १/२ वाटी उडीद डाळ.
- २ चमचे जिरे.
- २ चमचे धणे पावडर.
- भाजणी बनवताना सर्वप्रथम सर्व धान्य स्वच्छ निवडून थोडे उन्हामध्ये तासभर वाळवून घ्य.
- मग आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये एक एक करून सर्व धान्य आणि डाळी चांगल्या खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या. हे सर्व वेगवेगळे भाजून घ्या म्हणजे सर्व धान्य चांगले भाजण्यास मदत होईल.
- भाजून झाले कि ते एका परातीमध्ये काढून घ्या आणि थोडे गार होऊ द्या.
- त्याचबरोबर जिरे आणि धने देखील कढईमध्ये थोडे गरम करून घ्या.
- मग हे सर्व एकत्र मिक्सकरून ते घरगुती चक्की मधून दळून आणा.
- तुमचे कोंबडी वडे बनवण्यासाठी लागणारे पीठ तयार झाले. हे पीठ आपण हवाबंद डब्यामध्ये घालून १५ ते २० किंवा त्याहून अधिक दिवस ठेवू शकतो आणि मग जेंव्हा आपल्याला कोंबडी वडे खावेसे वाटतात त्यावेळी आपण कोंबडी वडे बनवून खावू शकतो.
कोंबडी वडे रेसिपी – kombdi vade recipe marathi
कोंबडी वडे हि एक महाराष्ट्रीयन म्हणजेच मालवणी डिश आहे जी कोकण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बनवली जाते आणि खाल्ली देखील जाते. हि रेसिपी मुख्यता मटन किंवा चिकन रास्यासोबत खाल्ली जाते. कोंबडी वडे हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये बनते. चला तर आता आपण कोंबडी वडे कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
पाककला | मालवणी किंवा कोकणी |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
कोंबडी वडे हे आपण खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनतो. कोंबडी वडे बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असते परंतु जे भाजणी पीठ हे आपल्याला धान्यांच्या पासून अगोदर बनवून ठेवावे लागते. चला तर आता आपण कोंबडी वडे बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- २ वाटी भाजणी पीठ.
- १/२ चमचा तिखट ( लाल मिरची पावडर ).
- १/३ चमचा हळद.
- तेल ( तळण्यासाठी ).
- गरम पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- मीठ ( चवीनुसार .
चला तर आता आपण मालवण किंवा कोकणामध्ये प्रसिध्द असणारे कोंबडी वडे वर दिलेले साहित्य वापरून कसे बनवायचे ते पाहूयात.
- कोंबडी वडे बनवत असताना सर्वप्रथम भाजणीचे पीठ चाळणीने चाळून घ्या आणि मग ते एका परातीमध्ये काढून घ्या.
- आता अंदाजाने गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवा पाणी जास्त गरम करू नका ते कोमट असू द्या जेणेकरून आपल्या पीठ मळता येईल.
- मग त्या परातीमध्ये घेतलेल्या पिठामध्ये हळद, मीठ, तिखट घाला आणि मग त्यामध्ये लागेल तसे पाणी घालून घट्ट मळून घ्या जेणेकरून त्याचे थापते थापता येतील.
- हे मळलेले पीठ थोडा वेळ म्हणजेच १० मिनिटे झाकून ठेवा.
- १० मिनिटांनी त्या पीठाचे आपण पुरी बनवण्यासाठी जितक्या आकाराचे गोळे बनवतो तितक्या आकाराचे गोळे बनवून घ्या.
- मग गॅसवर मध्यम आचेवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
- आता एक गोळा घ्या आणि त्या गोळ्याला तेल लावा आणि तो प्लास्टिक पिशवीवर गोळा ठेवून तो थापून त्याचा पुरीच्या आकाराचा गोल बनवून घ्या आणि तो गोल हळुवार पणे तेलामध्ये सोडा आणि तांबूस रंगावर तळून घ्या.
- अश्या प्रकारे सर्व गोळे पुरीच्या आकाराच्या थापून घ्या आणि मग तळून घ्या.
- तुमचे कोंबडी वडे मटन सोबत खाण्यासाठी तयार झाले.
कोंबडी वडे कश्यासोबत खातात – serving suggestions
- कोंबडी वडे हि एक मालवणी किंवा कोकणी डिश आहे जी मटन किंवा चिकन सोबत खाल्ली जाते आणि आपण हे वडे चहा सोबत देखील खाल्ली जाते.
टिप्स (Tips)
- काही ठिकाणी हे वडे थापले कि त्याला मध्यभागी एक होल पाडले जाते.
- जर तुम्हाला कोंबडी वड्यामध्ये थोडासा देखील तिखटपणा नको असेल तर लाल मिरची पावडर घातली नाही तरी चालते.
- यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालू शकतो.
- कोंबडी वडे गरमागरम सर्व्ह करावेत.
आम्ही दिलेल्या kombdi vade recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर कोंबडी वडे रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kombdi vade pith recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि instant kombdi vade recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kombdi vade recipe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट