कृषी अधिकारी माहिती Krushi Adhikari Information in Marathi

krushi adhikari information in marathi कृषी अधिकारी माहिती, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपला भारत देश हा शेतीवर अवलंबून आहे कारण आपल्या भारत देशातील ७० ते ८० टक्के लोक हे शेतीवर अवलंबून आहे आणि तसेच आपल्या देशाच्या विकासामध्ये शेती व्यवसायाची महत्वाची भूमिका आहे. शेतीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात जसे कि गहू, ज्वारी, कडधान्य, भात, ऊस आणि अनेक इतर पिके आणि या पिकांच्यापासूनच आपण आपले रोजचे अन्न पदार्थ बनवतो आणि या अन्न पदार्थांची मागणी खूपच वाढली आहे आणि म्हणून शेतीचे खूप महत्व वाढले आहे.

त्यामुळे अनेक विद्यार्थी हे शेती विषयक क्षेत्रामध्ये करियर करण्यासाठी अनेक पर्याय निवडत आहेत आणि त्यामधील एक चांगला आणि उच्च दर्जाचा पर्याय म्हणजे शेती अधिकारी. जर एकःद्या व्यक्ती शेती अधिकारी म्हणून आपले करियर निवडले तर सध्या या साठी खूप मागणी देखील आहे आणि महत्व देखील आहे.

भारतामध्ये शेती विषयक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत आणि ज्यांना शेती विषयक शिक्षण घ्यायचे आहे. अश्या व्यक्तीं या संस्थेमध्ये शिक्षण घेऊ शकतात. आज आपण या लेखामध्ये कृषी अधिकारी या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.

krushi adhikari information in marathi
krushi adhikari information in marathi

कृषी अधिकारी माहिती – Krushi Adhikari Information in Marathi

कृषी अधिकारी

भारतामध्ये अनेक प्रतिष्ठित नोकऱ्या आहेत आणि त्यामधील एक प्रतिष्ठित आणि उच्च दर्जाची नोकरी म्हणजे कृषी अधिकारी. ज्या विद्यार्थ्यांना आपले चांगले करियर घडवायचे आहे त्यांनी कृषी विषयक शिक्षण घेऊन त्यामध्ये नोकरी संधी शोधून कृषी अधिकारी बनू शकतात कारण सध्या कृषी अधिकाऱ्याला खूप महत्व आहे.

कृषी अधिकारी झाल्यानंतर त्या व्यक्तीला कृषी विषयक अनेक कामे पार पदवी लागतात जसे कि शेतकऱ्यांच्यासाठी शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या कृषी विषयक योजनांची माहिती देणे, कृषी लागवड तपासणे, शेतकऱ्यांची भेट घेणे त्याचबरोबर जर एखाद्या शेतकऱ्याला बॅंकेतून कर्ज हवे असेल तर त्या शेतकऱ्याला मदत करणे, पिकांची तपासणी करणे, पिकांच्या विषयक माहिती शेतकऱ्यांना देणे या सारख्या आणि शेती विषयक गोष्टींची माहिती कृषी अधिकारी देत असतो आणि हि त्याची कर्तव्ये देखील असतात.

कृषी अधिकारी पात्रता निकष – eiligibility 

कोणतीही पदवी, नोकरी किंवा शिक्षण घेण्यासाठी आपल्या अनेक पात्रता निकष पार पडावे लागतात जे त्या संबधित संस्थेने घालून दिलेले असतात तसेच कृषी अधिकारी बनण्यासाठी देखील काही पात्रता निकष पार पडावे लागतात ते काय आहेत ते खाली पाहूया.  

 • ज्या विद्यार्थ्याला कृषी अधिकारी यांचे शिक्षण घ्यायचे आहे अश्या विद्यार्थ्याने आपले १२ वी चांगल्या मार्काने आणि मान्यता प्राप्त विद्यापिठातून पूर्ण केलेली असावी.
 • कृषी अधिकारी होण्यासाठी तो संबधित उमेदवार हा २० वर्षापेक्षा जास्त आणि ३० वर्षापेक्षा कमी वय असणारा असावा.
 • कृषी अधिकारी बनण्यासाठी त्या संबधित उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी विषयामध्ये पदवी चांगल्या गुणांनी पूर्ण केलेई असावी.
 • त्या संबधित उमेदवाराला शेती विषयक आणि पिकांच्याविषयक आवश्यक माहिती आणि ज्ञान असणे खूप महत्वाचे आहे.
 • तसेच राखीव वर्गातील उमेद्वारांच्यासाठी वयाची सूट दिली जाते.

कृषी अधिकाऱ्याची कार्ये – roles and rresponsibilities 

 • कृषी अधिकारी त्याच्या क्षेत्रातील पिकांची पाहणी करतो तसेच पिक चांगले कसे येईल या विषयी माहिती देतो.
 • कृषी अधिकार्याचे मुख्य काम बी विक्रेत्यांच्या बियांची चाचणी आणि परीक्षण करणे.
 • कृषी विषयक सरकार मार्फत राबवल्या जाणाऱ्या कृषी योजनांची माहिती देणे तसेच त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे.
 • किसान लोन विषयी शेतकऱ्यांना माहिती देणे.
 • तसेच हे पाहणे कि बिया विक्रेता राज्य आणि स्तानिक नियमांचे पालन करत आहे कि नाही.
 • जर एखाद्या शेतकऱ्याला बॅंकेतून कर्ज हवे असेल तर त्या शेतकऱ्याला मदत करणे.
 • कृषी लागवड तपासणे तसेच त्याच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना भेट देणे.

कृषी अधिकारी झाल्यानंतर नोकरीच्या संधी – Jobs 

कृषी अधिकारी झाल्यानंतर त्या संबधित व्यक्तीसाठी अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होतात आणि या सर्व संधी उच्च पदावरील असतात. खाली आपण कृषी अधिकारीसाठी कोणकोणत्या नोकरीच्या संधी असतात ते पाहूया.

शेती विभागामध्येकृषी अभियांत्रिकी
पशुवैद्यकीय विज्ञानसहकार आणि बँकिंग
अन्न तंत्रज्ञानकृषी व्यवसाय व्यवस्थापन
कृषी वनीकरणकृषी विषयक विद्यापीठांच्या मध्ये शिक्षक
पशुसंवर्धनडेअरी सायन्स
डायरी तंत्रज्ञानमत्स्य विज्ञान
अन्न विज्ञानकृषी जीव तंत्रज्ञान

कृषी अधिकारी बनण्यासाठी द्यावी लागणारी परीक्षा – exam 

कृषी अधिकारी परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत ते आपण खाली पाहूयात.

 • प्राथमिक परीक्षा (preliminary).
 • मुख्य परीक्षा (mains).
 • मुलाखत (interview).

प्राथमिक परीक्षा 

सर्व प्रथम इच्छुक व्यक्तीची उदिष्ट चाचणी घेतली जाते ज्याला आपण preliminary म्हणून ओळखतो आणि इच्छुक व्यक्तीला यामध्ये उतीर्ण व्हावे लागते कारण यामध्ये उतीर्ण झाल्या शिवाय तो व्यक्ती मुख्य परीक्षेसाठी पात्र होत नाही. या परीक्षेमध्ये तर्क, परीनात्मक दृष्टीकोन या सारखे प्रश्न असतात आणि हे इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये असतात. या परीक्षेमध्ये देखील नेगेटीव्ह मार्किंग असते आणि हि परीक्षा एकूण १५० मार्काची असते. 

मुख्य परीक्षा 

मग त्यानंतर त्या व्यक्तीची लेखी परीक्षा घेतली जाते. मग तो संबधित व्यक्ती त्या परीक्षेमध्ये उतीर्ण झाला कि तो पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरतो. या परीक्षेमध्ये तुम्हाला कृषी तंत्रज्ञानाविषयी माहिती, पशुसंवर्धन, कृषी विषयक चालू घडामोडी या सारखे अनेक प्रश्न विचारले जातात. हि परीक्षा ४५ मिनिटांची लेखी परीक्षा असते आणि हि परीक्षा एकूण ६० मार्काची असते.

मुलाखत 

मग मुख्य परीक्षेमध्ये पात्र झालेला व्यक्तीला मुलाखतीसाठी म्हणजेच त्याचा व्यक्तिमत्व चाचणी घेण्यासाठी बोलवले जाते. मुलाखतीचा उद्देश हा सक्षम आणि निपक्षपाती निरीक्षकांच्या मंडळाद्वारे सार्वजनिक सेवेतील करियरसाठी उमेदवाराच्या वैयक्तिक योग्यतेचे मुल्यांकन केले जाते आणि मग त्या संबधित व्यक्तीची त्या जागेसाठी निवड केली जाते.

यामध्ये उमेदवाराला शेती विषयक चालू घडामोडी तसेच इतर घडामोडी विषयी प्रश्न विचारले जातात तसेच सामान्य जागृतीविषयक प्रश्न विचारले जातात. कृषी अधिकारी निवडण्यासाठी घेतली जाणारी मुलाखत हि २० मिनिटे घेतली जाते.

तालुका कृषी अधिकारी पगार – krushi adhikari salary

आम्ही दिलेल्या krushi adhikari information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कृषी अधिकारी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about krushi adhikari in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!