लंगडी खेळाची माहिती Langdi Information in Marathi

Langdi Information in Marathi लंगडी विषयी माहिती भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळामधील एक खेळ म्हणजे लंगडी होय. हा खेळ प्राचीन काळा पासून ग्रामीण भागातील लहान मुली खेळत होत्या आणि आत्ताही हा खेळ ग्रामीण भागा मध्ये खेळला जातो आणि हा खेळ फक्त लहान मुली खेळतात. ६ ते ७ खेळाडू लंगडी हा खेळ खेळू शकतात या खेळामध्ये एकाने एका पायावर लंगडी घालून सर्वांच्या पाठीमागे लागून त्यांना हाताने स्पर्श करून खेळातून बाद करायचे असते तर राहिलेले खेळाडून लंगडी घालणाऱ्या खेळाडूला चुकवून पळत असतात. हा खेळ पूर्वी शाळेमध्ये मुलींचा तोल, चपळता, दमदारपणा तसेच शारीरिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी खेळला जायचा. हा खेळ खेळण्यासाठी अगदी छोटेशे मैदान लागते आणि साधारण हे १२ ते १४ मीटर असते.

या खेळामध्ये लंगडी करणाऱ्या खेळाडूला आपला हात किवा लंगडी घातलेले पाय जमिनीवर ठेवण्याची परवानगी नसते आणि जर त्याने हात किवा पाय जमिनीवर टेकला तर तो खेळाडू बाद होतो आणि त्या खेळाडूला परत खेळाची सुरुवात नवीन करावी लागते. हा खेळ खेळल्या मुले शरीराचा पूर्णपणे व्यायाम होतो तसेच या खेळामुळे शारीरिक आणि मानसिक बळही वाढते.

langdi information in marathi
langdi information in marathi / langdi game in english

लंगडी खेळाची माहिती – Langdi Information in Marathi

नावलंगडी (langdi game in english)
प्रकारमैदानी खेळ
खेळाडू६ ते ७ खेळाडू
मैदानाचा आकार१२ ते १४ मीटर
वय७ ते १४ वयोगटातील मुली

लंगडी खेळाबद्दल माहिती – infromation about langdi 

लंगडी खेळाचे मैदान – Langdi Ground information in Marathi

लंगडी हा खेळ मुख्यता ग्रामीण भागातील लहान मुली खेळत असतात म्हणून या खेळाला मुलींचा खेळ म्हणून देखील ओळखले जाते. हा खेळ ग्रामीण भागामधील ७ ते १३ वयोगटातील मुली खेळत होत्या त्याचबरोबर या खेळाची विशेषता म्हणजे हा खेळ खेळण्यासाठी जास्त मोठ्या मैदानाची गरज नसते या खेळासाठी लागणाऱ्या मैदानाचा आकार १२ ते १४ मीटर इतका असतो. या खेळामध्ये ६ ते ७ खेळाडू असतात. लंगडी खेळामध्ये १२ ते १४ मीटरचा एक चौरस असतो आणि त्याला एक प्रवेह रेषा असते आणि ज्याच्यावर डाव आहे त्या खेळाडूला लंगडी घालावी लागते आणि राहिलेले खेळाडू पळत असतात.

लंगडी घातलेल्या खेळाडूला पळणाऱ्या खेळाडूचा पाठलाग करून त्यांना हाताने स्पर्श करून बाद करावे लागते आणि पाळणाऱ्या खेळाडूला लंगडी घालणाऱ्या खेळाडूला चुकवून पळावे लागते. जर लगडी घालणाऱ्या खेळाडूने जमिनीवर हात किवा लंगडी घातलेला पाय टेकला तर तो खेळाडू बाद होते आणि त्याला परत नवीन डाव सुरु करावा लागतो.

भारतामध्ये लंगडी या खेळाची सुरुवात कोणी केली – who invented langdi game 

२००९ मध्ये लंगडी फेडरेशन ऑफ इंडिया या क्लबची स्थापना झाल्यानंतर हा खेळ पूर्ण भारतामध्ये लंगडी या नावाने प्रसिध्द झाला आणि या खेळाची तशी लोकप्रियताही वाढत गेली त्यामुळे लंगडी फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव श्री सुरेश गांधी यांनी लगडी या खेळाचा सखोल अभ्यास केला आणि २००९ मध्ये काही सामान्य नियम बनवले. नियम बनवण्याचा मुख्य उद्देश लंगडी या खेळाला संघटनात्मक संरचना मिळवणे हा होता. हा खेळ भारताच्या सर्व राज्यांमध्ये प्रसिध्द आहेच पण हे नियम लंगडी या खेळासाठी शाळेमध्ये वापरले जातात.

लंगडी खेळाचे नियम ( rules for langdi game ) 

हा खेळ ग्रामीण भागातील शाळेमध्ये मुलींची चपळता, प्राथमिक हालचाल, शारीरिक आणि मानसिक बळकट पणा वाढवण्यासाठी हा खेळ खेळला जायचा आणि आत्ताही हा खेळ काही ग्रामीण भागातील शाळेमध्ये खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी काही नियम आहेत ते आपण खाली पाहू.

  • हा खेळ २० मिनिटाचा असतो आणि यामध्ये ५ मिनिटाचे ४ डाव असतात.
  • खेळाडूंची संख्या ६ ते ७ इतकी असते आणि यामध्ये एका खेळाडूने डाव घेणे आवश्यक असते.
  • डाव घेतलेल्या खेळाडूला एका पायावर लंगडी घालून पाळणाऱ्या खेळाडूंना स्पर्श करावे लागते त्यासाठी या खेळाडूला १ गुण मिळतो.
  • लंगडी घातलेल्या खेळाडूने पाळणाऱ्या खेळाडूला हाताने स्पर्श केले तरच पाळणारा खेळाडू बाद होऊ शकतो आणि लंगडी घातलेल्या खेळाडूला गुण मिळू शकतात.
  • त्याबरोबर लंगडी घातलेल्या खेळाडूने जर जमिनीवर हात किवा लंगडी घातलेला पाय टेकला तर तो बाद होऊ शकतो आणि त्याला परत नवीन डावाची सुरुवात करावी लागते.
  • जर पाळणारा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला तर तो बाद होतो.
  • पाळणारा खेळाडू जर लंगडी घालणाऱ्या खेळाडूच्या हाताने स्पर्श होवून बाद झाला असेल किवा मैदानाच्या बाहेर जावून बाद झाला असेल तर त्या खेळाडूला परत नवीन डाव सुरु झाल्यानंतरच खेळामध्ये परत येता येते.
  • जर लगडी घातलेल्या खेळाडूने सर्व खेळाडूने सर्व खेळाडूंना बाद केले तर तो डाव घेण्यापासून मुक्त होतो.

लंगडी या खेळाविषयी काही तथ्ये ( facts about langdi game )

  • सध्या लंगडी हा खेळ क्लबमध्ये व्यवसायिक खेळ म्हणून खेळला जातो.
  • २००९ मध्ये लंगडी फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली.
  • चौथी राष्ट्रीय पुरुष आणि महिला चॅम्पियनशिप मे २०१३ मध्ये छत्तीसगड येथे झाली होती.
  • लंगडी या खेळाला मुलींचा खेळ म्हणून ओळखले जाते.
  • लंगडी हा खेळ २० मिनिटाचा खेळ असतो.
  • लंगडी हा खेळ गटामध्ये खेळला जातो.
  • लंगडी हा खेळ मैदानी खेळ आहे .

आम्ही दिलेल्या langdi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर लंगडी या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about langdi in marathi  या article मध्ये update करू, मित्रांनो हि langdi game information in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “लंगडी खेळाची माहिती Langdi Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!