Laxmanrao Kirloskar Biography in Marathi – Laxmanrao Kirloskar Information in Marathi लक्ष्मणराव किर्लोस्कर माहिती मराठी माणसाला व्यापार करता येत नाही हे एक वाक्य आपण गेल्या अनेक दशकं ऐकत आलो आहोत. परंतु अशोक खाडे, विठ्ठल कामत यांसारख्या मराठी उद्योजकांनी आपल्या व्यापाराची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवत मराठी माणसाने जर एखादी गोष्ट ठरवली तर सिद्ध करून दाखवू शकतो हे दाखवून दिल आहे. परंतु या सर्वांची सुरुवात अगदी शंभर वर्षापूर्वी लक्ष्मणराव किर्लोस्कर या एका मराठी माणसाने केली लक्ष्मणराव किर्लोस्कर हे एकोणिसाव्या शतकातले पहिले मराठी उद्योजक होते.
किर्लोस्कर ग्रुप हे नाव बऱ्याच लोकांना परिचयाचं आहे परंतु याची सुरुवात कुठून व कशी झाली हे आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. या ब्लॉगमध्ये आपण मराठी उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
लक्ष्मणराव किर्लोस्कर माहिती – Laxmanrao Kirloskar Biography in Marathi
पूर्ण नाव (Name) | लक्ष्मणराव किर्लोस्कर |
जन्म (Birthday) | २० जून १८६९ |
जन्म गाव (Birth Place) | गुर्लहोसुर या गावी |
राष्ट्रीयत्व (Citizenship) | भारतीय |
ओळख (Identity) | मराठी उद्योजक |
मृत्यू | २६ सप्टेंबर १९५६ |
जन्मा व वैयक्तिक आयुष्य – Laxmanrao Kirloskar Information in Marathi
२० जून १८६९ रोजी गुर्लहोसुर या गावी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण नाव लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर आहे. धारवाड आणि कलादगी येथून लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल. १८८५ मध्ये लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये दाखला नोंदवला. त्यांना चित्रकला यंत्रसामग्रीची आवड होती. चित्रकलेच दोन वर्षात त्यांनी शिक्षण घेतलं परंतु त्यांना रंग आंधळेपणाचा प्रकार होता म्हणून त्यांना त्यांची आवड अर्धवट सोडावी लागली.
परंतु लहानपणापासूनच त्यांना यंत्रसामग्री फार आवडायची आणि याच शाळेतून पुढे त्यांनी मेकॅनिकल ड्राफ्ट्समन मध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली. शिक्षणानंतर त्यांना विक्टोरिया जुबली टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली त्यांनी त्या काळी ४५ रुपये महिना पगारावर काम करण्यास सुरुवात केली.
कारकिर्दीस सुरुवात
ज्या वेळी लक्ष्मणराव किर्लोस्कर विक्टोरिया जुबली टेक्निकल इन्स्टिट्यूट प्राध्यापक म्हणून रुजू झाले त्या दरम्यान त्यांनी अमेरिकन मेकॅनिकल इंडस्ट्री विषयी वाचन करण्यास सुरुवात केली. या वाचनाच्या आवडीतून त्यांना इन्स्टिट्यूटमध्ये मशीन कसे हाताळावे, दुरुस्ती कशी करावी नव्याने मशीन कसे तयार करता येऊ शकतं या गोष्टींवर अभ्यास करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी मशीन दुरुस्तीची कामे करायला सुरुवात केली. आता ते प्रोफेसर किर्लोस्कर म्हणून ओळखले जायचे.
लक्ष्मण राव यांचे मोठे भाऊ रामन्ना यांचा बेळगाव येथे सायकल दुरुस्ती करण्याचा व्यवसाय होता लक्ष्मणराव देखील १८८७ पासून त्यांच्या भावाच्या या व्यवसायात सामील झाले. त्यांना सहकार्य करण्यासाठी मुंबईमधून ते सायकली बेळगावला विक्रीसाठी पाठवत असत. कालांतराने लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी आपली विक्टोरिया जुबली टेक्निकल इन्स्टिट्यूट मधली नोकरी सोडली आणि ते मुंबईहून बेळगावला आपल्या भावाच्या व्यवसायात त्याला मदत करण्यासाठी कायमचे निघून गेले.
भावाच्या सायकल विक्रीच्या उद्योगात सहभागी होण्याचा त्यांचा हा निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. हे त्यांचं उद्योग क्षेत्रातील पहिलं पाऊल होतं. सायकल विक्री सोबतच त्यांनी ज्यांना सायकल चालवायला जमत नसेल त्यांना सायकल कशी चालवायची याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. या कामासाठी ते लोकांकडून अल्प मोबदला देखील घेऊ लागले. कालांतराने त्यांचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि म्हणूनच लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला.
त्यांनी इंग्लंडच्या एका कंपनीशी करार केला आणि किर्लोस्कर ब्रदर्स या नावाची स्वतःची सायकल एजन्सी स्थापन केली. या दरम्यान त्यांनी पवनचक्कीची विक्री देखील चालू केली होती त्यांना पुढे सॅमसन कंपनीची डीलरशिप मिळाली वर्षभरात अनेक पवनचक्कीची विक्री त्यांनी करून दाखवली. सगळ व्यवस्थित सुरू होत परंतु तरीही लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच मन त्यांना शांत बसून देत नव्हतं त्यांना लहानपणापासून यांत्रिक क्षेत्रात आवड होती आणि फक्त सायकलची विक्री करणे त्यांना जमत नव्हतं व शेतकऱ्यांविषयी असणारा जिव्हाळा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर यश देऊन गेला.
त्यांनी शेतकऱ्यांच्या कामी येतील अशी यंत्र बनवण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी कापणी यंत्र बनवण्याचा निर्णय घेतला त्यांनी अमेरिकेतील एका मासिके मध्ये कापणी यंत्र पाहिलं होतं आणि आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी उपयोगाचे पडेल या विचारावर त्यांनी हे यंत्र बनवले. १९०१ मध्ये लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी मुंबईवरून यंत्रसामग्री मागवली आणि चारा कापणी यंत्र बनवलं त्यांनी बनवलेलं किर्लोस्करांचे हे पहिले उत्पादन होतं.
गावोगावी जाऊन त्यांनी हे यंत्र शेतकऱ्यांना चालवून दाखवलं. काही लोकांना ते पसंतीस देखील पडल जनावरांचा ही त्रास कमी झाला परंतु राना मध्ये चाऱ्याचा तुटवडा नव्हता आणि गुरांसाठी पैसे खर्च करणे इतकी मानसिकता त्यावेळी शेतकऱ्यांची नव्हती त्यामुळे चारा कापण्याचे यंत्र बनवण्याचा किर्लोस्कर यांचा हा निर्णय आणि प्रयोग चुकीचा ठरला हे त्यांचे पहिले अपयश होतं. परंतु त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात अतिशय आवश्यक असणारी वस्तू बनवली पाहिजे असा त्यांनी निर्णय घेतला आणि यावरून त्यांनी शेतकऱ्यांसाठी नांगर बनवण्याचं ठरवलं.
कारण पारंपारिक नांगर खोलवर शेत नांगरत नव्हते आणि त्यामुळे पीक चांगले जोम धरत नसायचे म्हणून किर्लोस्कर यांनी अधिक लोखंडाचे मजबूत नांगर बनवलं परंतु नांगर घ्यायचे म्हणजे खर्च तर आलाच आणि त्यावेळी नवा नांगर आपल्या जमिनीत घालावा ही शेतकऱ्यांची मानसिकता नव्हती पण यावेळी लक्ष्मण राव यांना आपण तयार केलेल्या उत्पादनावर अतिशय विश्वास होता. सुरुवातीला त्यांच्या नांगराला पसंती मिळाली नाही. शेतकरी खात्याने देखील त्यांच्या नांगरामध्ये अनेक चुका काढल्या होत्या परंतु लक्ष्मणराव यांनी हे आव्हान स्वीकारलं. त्यांनी त्यांच्या उत्पादनावर अधिक अभ्यास केला त्यातील चुका लक्षात घेतल्या व त्याच्यामध्ये सुधारणा केल्या.
कालांतराने काही खेड्यापाड्यांमध्ये त्यांचं नांगर विकलं जाऊ लागलं. नांगराची माहिती मिळाल्यावर शेतकरी देखील त्यांच्याकडे आले व त्यांनी मोठी ऑर्डर किर्लोस्कर यांना दिली. अशा प्रकारे किर्लोस्करांच नांगर हे उत्पादन हळूहळू प्रसिद्ध ठरू लागलं. पुढे सरकारने देखील किर्लोस्कर नांगराची दखल घेतली पुढे भरपूर व्यापारांनी मोठ्या प्रमाणावर किर्लोस्करांचे नांगर खरेदी केले. ते शेतकऱ्यांना भाड्याने देऊ लागले आणि या प्रकारे त्यांचा हा व्यवसाय वाढला. व्यवसाय चांगला सुरू होता परंतु जागा अपुरी पडल्यामुळे उत्पादन वाढत नव्हते.
त्यांच्या एका मित्राने औंध येथे लक्ष्मणराव यांना कारखाना उभा करण्यासाठी पडीक जमीन दिली जमिनीमध्ये बऱ्याच चुका होत्या परंतु अनेक अडचणी आल्या तरीही लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी त्या जमिनीवर कारखाना उभारला. १० मार्च १९१० रोजी बेळगावहून रेल्वेने यंत्रसामग्री मागवली गेली आणि औंध येथे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या उद्योगाची सुरुवात झाली. लक्ष्मण रावांना इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या औद्योगिक वसाहती बद्दल माहिती मिळाली होती आणि अशीच वसाहत आपल्या देशात देखील सुरू व्हावी ही त्यांची इच्छा होती.
त्यासाठी त्यांनी अजून जोमाने काम करण्यास सुरुवात केली सुनियोजित पद्धतीने कारखान्याची उभारणी केली, वेगवेगळे उपक्रम सुरू केले, निवासाची उत्तम व्यवस्था तयार केली, कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी शाळा सुरू केल्या. पुढे खेळण्यासाठी क्रीडांगण, मोठे रस्ते, स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू केले गेले. या कारखान्याची पुढे इतकी भरभराट झाली की त्यांनी ज्या जागी कारखाना सुरू केला ती जागा आता औद्योगिक वसाहत किर्लोस्कर वाडी या नावाने ओळखले जाऊ लागले.
लक्ष्मणराव स्वतः देखील तिथे राहायचे पुढे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी त्यांच्या उत्पादनांवर अधिक भर घातला. डिझेल व विजेवर चालणाऱ्या पंप्पान बरोबर यांत्रिक रांगर ट्रॅक्टर्स शेतीची उत्पादने तयार केली. उसाचा रस काढण्याचे यंत्र, छिद्र पडण्याचे यंत्र, हातपंप व अजुन वेगवेगळी लहान-मोठी चाळीस उत्पादने या कंपनीमार्फत बनवण्यास सुरुवात केली. इंग्लंडच्या ऑइल कंपनीसोबत करार करणारी किर्लोस्कर समूह पहिली कंपनी ठरली. ऑल इंजिनचे उत्पादन सुरू झाले किर्लोस्कर शेतकरी वर्गामध्ये आणि विशेषतः मराठी माणसाच्या हृदयामध्ये कोरले गेले आहे. १९३५ मध्ये त्यांना औंध संस्थानाचे दिवाण म्हणून नियुक्त करण्यात आले.
मृत्यू
लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा २६ सप्टेंबर १९५६ रोजी मृत्यू झाला. कोणतेही विशेष शिक्षण न घेता किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर समूहाची स्थापना केली. आज त्यांची उत्पादने सत्तरहून अधिक देशांमध्ये विकली जातात. एक मराठी माणूस इतके यश कमवत आहे हे बघून फार अभिमान वाटतो. त्यात लक्ष्मणराव किर्लोस्कर हे भारताचे पहिले मराठी उद्योजक ठरले ज्यांनी मेक इन इंडियाची प्रथा एकोणिसाव्या शतकामध्येच राबवली होती.
आम्ही दिलेल्या Laxmanrao Kirloskar Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर लक्ष्मणराव किर्लोस्कर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Laxmanrao Kirloskar information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Laxmanrao Kirloskar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट