भारतीय शेतकरी मराठी निबंध shetkari nibandh in marathi

shetkari nibandh in marathi शेतकरी मराठी निबंध: आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. ऐंशी टक्के देश आपला कृषिप्रधान आहे. शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. आपले पूर्वज (आदिमानव) यांच्या विचारातून व युक्तीतून  या संकल्पनेचा उगम झाला व तो तसाच पुढे चालत राहिला. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या कालखंडात शेतकऱ्याला खूप महत्त्वाचे स्थान होते. दिवाळीच्या सणाला प्रत्येक घरात शेतकऱ्यासाठी (बळीराजा) प्रार्थना केली जायची. shetkari marathi nibandh भारतामध्ये मुख्य व्यवसाय हा शेती आहे. भरपूर लोक परंपरेने चालत राहिलेला हा शेती व्यवसाय  आहे. यावरच सगळ्यांचा उदरनिर्वाह होतो.

shetkari nibandh in marathi
shetkari nibandh in marathi/ farmer essay in marathi

भारतीय शेतकरी मराठी निबंध shetkari nibandh in marathi

shetkari essay in marathi जर आपल्या या शेतकरी बांधवाने काहीच पिकवले नाही तर आपण सगळे काय खाणार? आपण कसे जगणार? पण त्यांच्या त्या कष्टाला , रोज रोज उन्हातान्हात काम करण्याला , मेहनतीला म्हणजे शेतमालाला योग्य तो दर भेटत नाही . बऱ्याच नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. जसे की कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, वादळ यामुळे शेतीचे बरेच नुकसान होते. त्यामुळेच तर आपला शेतकरी बांधव आत्महत्या करायचा मार्ग अवलंबतो म्हणून आपण सर्वांनी मिळून काहीतरी केले पाहिजे. आपला हा शेतकरी बांधव रात्रंदिवस शेतात राबतो. 

म्हणून तर “मेरे देश की धरती सोना उगले-उगले हीरे मोती मेरे देश की धरती” यासारख्या ओळी सहज ओठावर येतात. शेतीच्या महताची अशी वचने आपण कायम ऐकतो, बोलतो व कौतुकाने लिहतो. परंतु शाळेतील परीक्षा मधील गुणवंताच्या तोंडून मी डॉक्टर मी इंजिनियर ,मी पायलट, मी पोलीस हे असे ऐकायला मिळते. पण कधी कोणी हे म्हणत नाही की मी एक प्रगतशील शेतकरी बनेन. हे असे विचार आपण बदलायला हवे.

23 डिसेंबर म्हणजे शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. “जय जवान जय किसान” असे लाल बहादूर शास्त्री यांनी म्हटले होते. पण आज त्याच शेतकऱ्याची व्यथा बघून मन दुःखी होते. आज जगाचा पोशिंद्याला आज आत्महत्या करायची वेळ का आली? स्वतः दिवस-रात्र शेतात राबणारे आपले शेतकरी प्रेमाने अगदी मनापासून संपूर्ण बळ पनाला लावून पीक घेतो. कधी दुष्काळ, कधी वादळ , कधी अतिवृष्टी या निसर्गनिर्मित संकट त्याच्यापुढे उभे राहतात. तरी शेतकरी डगमगत नाही या अशा अनेक संकटावर मात करून तो पिके घेत राहतो. पण अजून त्याची परीक्षा संपलेली नसते.

एक समस्या सुटली की दुसरी समस्या त्याच्यापुढे उभी राहते. शेतमालाला हमीभाव नाही. त्यांनी घेतलेल्या पिकाला योग्य तो दर मिळत नाही. या अवस्थेत शेतकरी काय करणार? शेतीची सुरुवात केली तेव्हा डोंगर टेकड्यावर लाकडाच्या सहाय्याने शेती करून त्यापासून धान्याची पैदास केली जायची, काही काळानंतर माणूस एक जागी स्थिर झाला. त्यानंतर त्याने अधिक प्रमाणात क्षेत्रावर शेती करण्यास सुरुवात केली.

कालांतराने भारत देशात हरित क्रांती झाल्यानंतर देशाच्या धान्य उत्पादन क्षमतेमध्ये खूप मोठी वाढ झाली,  परंतु त्याकाळी प्रश्न होता तोच की, उत्पादित केलेले सर्व धान्य साठवण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे तसेच वाटपाचे नियोजन नसल्यामुळे त्या उत्पादनापेक्षा जास्त प्रमाणात धान्याची नासाडी अधिक होत असे. देशातील गरिबांना हे धान्यही मिळत नव्हते. व्यवस्थित न साठवल्याने धान्याची नासाडी होत असायची.

आपल्या देशातील शेतकरी हा जास्तीत जास्त प्रमाणात खेड्यापाड्यात राहतो. हा शेतकरी शेती पूरक व्यवसाय म्हणून गायी, म्हशीचे संगोपन करतो. त्यापासून मिळणारे दूध यापासून तो दैनंदिन जीवन जगण्यासाठी काहीप्रमाणात उदरनिर्वाहासाठी दुधाची विक्री करून त्यातून पैसे मिळवतो. परंतु पूर्वी पासून उत्पादित करित आलेल्या फळभाज्या, पालेभाज्या, फळे यांना जास्तीत जास्त कसे टिकवता येईल या गोष्टी शेतकऱ्यांना माहीत नाहीत. धान्य हे काही दुधासारखे नाशवंत नसते, म्हणून धान्याची नासधूस दुधाच्या पेक्षा फार कमी होत असते. फळे, भाज्या आणि दूध नाशवंत असल्यामुळे त्याची साठवणूक करण्यासाठी आपल्याकडे तरी काही सुविधा नाहीत, कोणत्याही प्रकारची सोय किंवा व्यवस्था नसल्यामुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होतो.

काही संघटनेने याबाबत पाहणी केले असता असे आढळून आले आहे की, आपल्या देशात या तीन नाशवंत मालाचे जेवढे उत्पादन होते त्याच्या 40 ते 50 टक्के उत्पादन व्यर्थ जाते. भारताचा भाज्या व फळांच्या उत्पादनात दुसरा क्रमांक आहे. भारताने ठरवले तर जगाला दूध व भाज्या पुरवू शकतो. तेवढे उत्पादन आपल्याकडे घेतले जाते परंतु ते जगाला न पुरवता आपण त्यातला निम्मा माल नासवून, कुजवून फेकतो. त्यामुळे मालाची तर  नासाडी होतेच पण टाकल्याने त्याचा दुर्गंध सुटून रोगराई पसरते. निर्माण झालेला हा माल साठवण्याच्या सोयीसुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

आपले हे नुकसान मोजायचे झाले तर कितीतरी लाख कोटी रुपये इतके आहे. परंतु त्या मालाची नासाडी न करता त्या मालावर प्रक्रिया करू शकतो. दुधापासून दूध पावडर तयार करता येते आणि फळावर ही वेगळी प्रक्रिया करता येते त्यापासून वेगळे पदार्थ निर्माण करता येतात. त्यामुळे नासाडी तर टाळतेच पण प्रक्रिया केलेल्या मालाला जास्त भाव मिळून शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतात. अनेक अशा उपाययोजना असतात ज्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याचा विचार आणि कर्जबाजारी होण्यापासून थांबविले जाऊ शकते.

“शेतकरी” एक अशी व्यक्ती जी आपल्या कष्टाने, मेहनतीने आपल्या देशात राबते. वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी पिके घेऊन त्यातून उत्पादन मिळवते आणि बाजारपेठेत नेऊन व्यापाराला किंवा ग्राहकाला विकते अशी व्यक्ती म्हणजे शेतकरी. शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. प्रचंड लोकसंख्येच्या अन्नधान्याच्या गरजा भागवण्यासाठी शेतकरी सतत शेतात रात्रंदिवस राबत असतो. शेतकरी रोज कष्ट करतो म्हणून आपल्याला सर्वांना रोज अन्न पुरेस मिळत. म्हणूनच शेतकऱ्याला सर्वजण आदराने – “जगाचा पोशिंदा!” म्हणतात.

“शेतामध्ये माझी खोप

तिथे बोराटीची झाप

तिथे राबतो, कष्टतो

माझा शेतकरी बाप!”

या ओळीच आपल्याला खूप काही सांगून जातात. सगळ्या जगाला अन्नधान्य पुरवणारा शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगतो. दुष्काळ, पाऊस, खराब हवामान , रोगाचा फैलाव , वादळ व उत्पन्नाची अनियमितता यामुळे शेतकरी अनेक कारणांनी दुखी असतो. कधीकधी तर त्याने पिकविलेल्या शेतमालाला कवडी इतका भाव मिळतो. त्याला इच्छा असूनही आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देता येत नाही.

शेतकऱ्याला बागायत दार म्हणा किंवा जिरायत दार म्हणा त्याच्यासाठी दुःखाच धरण भरलेलंच. उन्हाळा असो किंवा पावसाळा त्याचे मरण ठरलेलच!!! आज महाराष्ट्रात असंख्य शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारी, कवडीमोल भाव यामुळे आत्महत्या करावी लागते. आज जगाचा पोशिंद्याला गरज आहे मालाच्या हमी भावाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची. आपणही माणूस म्हणून शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल करायला हवे. त्यांच्या श्रमाचा आदर करून त्यांचे जीवन सुसह्य होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत.

शेती व शेतकरी हे आपल्या जगण्याचा श्वास आहेत. शेतीतून धान्यांचे मोती पिकविण्याऱ्या शेतकऱ्यांनी जर आपल्याला भाज्या, फळे, दुध, अन्यधान्य आपल्याला पुरविले च नाही तर आपले काय होईल? याची संकल्पनाच अंगावर शहारे आणते. आज भारत व महाराष्ट्र सरकारने शेतीला व शेतमालाला चांगले दिवस येण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. भारत सरकारने शेतीविषयक तीन नवी विधेयके मंजूर करून शेतीला आणि शेतकऱ्याला पत, प्रतिष्ठा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अशा या जगाचा पोशिंद्याला आपण आदर केला पाहिजे.

दहा टक्के शेतकऱ्यांनाही हे माहीत नसते की 23 डिसेंबर हा दिवस “शेतकरी दिवस” म्हणून साजरा केला जातो. तरी त्यांच्या अपार कष्ट अन रात्रंदिवस मेहनतीची कदर करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

कितीही संकटास तोंड देत जातो तो म्हणजे शेतकरी, निस्वार्थ मनाने कष्ट करून सर्वांचे पोट भरवतो तो म्हणजे शेतकरी, मुलांचे शिक्षण करतो तो म्हणजे शेतकरी.

आम्ही दिलेल्या shetkari nibandh in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “माझी शाळा” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bharatiya shetkari nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि shetkari marathi nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण shetkari essay in marathi या लेखाचा वापर farmer essay in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!