लोहार काम माहिती मराठी Lohar Information in Marathi

lohar information in marathi लोहार काम माहिती मराठी, आपल्या भारतामध्ये अनेक असे लोक आहेत जे आपला छोटा व्यवसाय करून आपले घर चालवतात आणि हा व्यवसाय पारंपारिकपणे त्यांच्याकडे आलेला असतो म्हणजेच कुंभार मातीच्या वेगवेगळ्या वस्तू बनवून विकतात, शिंपी शिवान काम करून आपला व्यवसाय चालतात, सुतार लाकडाच्या वस्तू बनवून आपले काम चालवतात तसेच लोहार देखील त्यामधील आहेत. जे लोहकाम करून आपला व्यवसाय चालवतात आणि आज आपण या लेखामध्ये लोहार विषयी माहिती घेणार आहोत.

लोहार हा देखील एक १२ बलुतेदारांच्यापैकी एक समाज आहे जे लोखंडापासून किंवा लोहापासून वेगवेगळ्या वस्तू ह्या पूर्वी पासून बनवते होते आणि त्या बाजारामध्ये विकत होते तसेच ते देखील पूर्वी त्यांच्या व्यवसायासाठी बलुतेदार पध्दत वापरत होते आणि म्हणून हे बलुतेदारांच्या पैकी अकरावा समाज आहे.

म्हणजेच भारतातील एक प्रमुख व्यवसाय गटातील आहेत आणि हा समाज शेतासाठी लागणाऱ्या सर्व लोखंडाच्या वस्तू बनवतो. ते लोखंडाच्या वस्तू बनवताना ते लोखंड त्यांच्या विशिष्ट भट्टीमध्ये तापवून त्याला जसा हवा आहे तसा अकरा देऊन त्या पासून वेगवेगळ्या वस्तू बनवतात.

lohar information in marathi
lohar information in marathi

लोहार काम माहिती मराठी – Lohar Information in Marathi

लोहार कोण आहेत ?

 • लोहार हा एक समाज आहे जो लोखंडा पासून वेगवेगळ्या वस्तू बनवतो आणि त्या बाजारामध्ये विकते. लोहार खुरपी (विळे), कुऱ्हाडी, कुदळी, टिकाव, कोयते, लोखंडी धाव आणि पाण्याच्या मोटी या सारख्या लोखंडापासून इतर वस्तू देखील बनवतात.
 • लोहार हा असा व्यक्ती असतो जो लोखंड किंवा स्टील पासून विविध प्रकारच्या वस्तू बनवतो आणि या वस्तू बनवण्यासाठी तो चिमटे, अँव्हिल्स आणि हातोडा या साधनांचा वापर करतात.

लोहारकामाचा इतिहास – history

लोहारकाम हा एक खूप जुना व्यापार आहे जो अनेक हजारो वर्षापासून भारतामध्ये प्रचलित आहे आणि प्राचीन काळामध्ये लोहार हे मेसोपोटेमिया आणि इजिप्त संस्कृतीमध्ये राहत होते कारण त्या ठिकाणी त्यांच्या कौशल्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत होता आणि ते त्यांचे कौशल्य वेगवेगळ्या वस्तू आणि शास्त्रे बनवण्यासाठी करत होते.

तसेच पूर्वी शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती आणि त्या साठी लागणारी साधने जसे कि विळे, टिकाव, कोयते आणि कुऱ्हाड या सारख्या वस्तू बनवत होते. तसेच मध्ययुगीन काळामध्ये लोहारांनी शूरवीरांच्यासाठी आणि युध्दासाठी शस्त्रे आणि चिलखती बनवल्या आणि त्यांनी त्या काळामध्ये महत्वाची भूमिका बजावली. जस जशी जगामध्ये विकास होत गेला तसा लोहार कामामध्ये देखील विकास झाला.

लोहारकाम करण्यासाठी लागणारी साधने – equipment

लोहारकाम करण्यासाठी लोहाराला काही मुख्य साधने लागतात ती कोणकोणती आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

फोर्ज

लोहार काम करण्यासाठी महत्वाच्या साधनांच्यापैकी एक म्हणून फोर्ज हे साधन वापरले जाते आणि वस्तू बनवण्याच्या लोखंडाला चांगल्या प्रकारे तापवण्याचे काम फोर्ज या साधनाच्या मार्फत केले जाते.

निरण

निरण हे असे साधन आहे. ज्यामध्ये गरम केलेला धातू आणि इतर अनेक सामग्रींना आकार देण्यासाठी आणि सपाट करण्यासाठी मदत करते. 

हातोडा

लोहार कामातील हातोडा हे देखील महत्वाचे साधन आहे आणि हे लोहार हातोडा धातूचा आकार आणि निर्मिती प्रक्रीयेदरम्यान महत्वपूर्ण काम बजावते.

चिमटे

लोहार कामामध्ये चिमट्याचा वापर देखील होते आणि ज्यावेळी गरम झालेल्या धातूची सुरक्षितपणे वाहतूक करायची असते त्यावेळी चिमट्याचा वापर होतो.

लोहार आणि लोहारकामविषयक विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • लोहार या शब्दाला इंग्रजीमध्ये blacksmith म्हणून ओळखले जाते.
 • लोहार हे लोखंडाला आकार देण्यासाठी गरम लोखंडावर हातोड्याने जोरात मारतात आणि वस्तू आणि हत्यारे बनवतात.
 • लोहकाम हे प्राचीन काळापासून केले जाते आणि यापासून शेतीविषयक आणि युध्द विषयक वस्तू बनवल्या जातात.
 • अनेक आधुनिक खेळांच्याप्रमाणे लोहारांमध्ये जागतिक स्पर्धा असतात ज्याठिकाणी एकमेकांच्याविरुध्द स्पर्धा करतात आणि याला जागतिक चॅम्पीयनशिप लोहार स्पर्धा म्हटले जाते.
 • १५०० इसापूर्व अनातोलीयाच्या हिती लोकांच्याकडून लोहाराची सुरुवात झाली.
 • लोहार हि विविध प्रकारच्या वस्तू आणि संरचना तयार करण्यासाठी धातू विशेषता लोखंडासह काम करण्याची कला आणि हस्तकला आहे.
 • लोहार हे नैसर्गिक तंतू पासून बनलेले म्हणजेच कापूस आणि लोकर या पासून बनलेले शर्ट आणि पायघोळ घालतात जे त्यांना थंड ठेवण्यासाठी मदत करतात आणि आगी जवळ गेल्यानंतर ते त्वचेमध्ये विरघळत नाहीत.
 • लोखंडाला आकार देताना त्याला प्रथम आगीमध्ये मऊ केले जाते आणि मग त्यानंतर त्याला आकार दिला जातो.
 • जेंव्हा लोहारांच्याविषयी विचार करतात त्यावेळी तेंव्हा ते सामान्यता पुरुषांचे चित्रण करतात परंतु आधुनिक युगामध्ये स्त्रिया देखील लोहार आहेत आणि लोहारांच्या एकूण लोकसंखेमध्ये २० टक्के महिला लोहार आहेत आणि उरलेले ८० टक्के पुरुष लोहार आहेत.
 • लोहाराला लोहकाम करत असताना सतत जड लोखंड उचलणे तसेच त्यावर जोरात हातोडा मारणे या सारखे काम करावे लागते त्यामुळे या प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तीची ताकद हि चांगली असावी लागते म्हणजेच ते व्यक्ती शक्तिशाली असणे आवश्यक असते.
 • बेट्सी हेगर ( betsy hager ) हि तिच्या काळातील एक प्रसिध्द लोहार होती जी सैनिकांच्यासाठी प्राचीन मस्केट्सचे नुतनीकरण करण्यासाठी ओळखली जाते.
 • पौराणिक कथांच्यामध्ये एक व्यापकपणे ओळखला जाणारा लोहार म्हणजे हेफेस्टस, रोमन पौराणिक कथांच्यामध्ये व्हल्कन म्हणून ओळखला जातो आणि ग्रीक पौराणिक कथांमध्ये हेफेस्टस हा अग्नी, धातूकाम आणि कारागिरांचा देव होता.

आम्ही दिलेल्या lohar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लोहार काम माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या lohar information in marathi language या Lohar information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about lohar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Lohar information in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!