मकाऊ पोपटाविषयी माहिती Macaw Bird Information in Marathi

Macaw Bird Information in Marathi मकाऊ हा एक जातीचा पोपट आहे जो खासकरून अमेरिकेमध्ये आढळतो. हा एक आकर्षक, सुंदर आणि रंगबिरंगी ( लाल, हिरवा, निळा आणि पिवळा) पोपट आहे. माकाऊ पोपट हा जगातील सर्वात रंगीत पोपटांपैकी एक आहे. तसेच मकाऊ पोपट macaw bird in marathi हा आत्ता आपल्याला जगाच्या सर्व भागामध्ये पाहायला मिळतो कारण त्यांना जगभरामध्ये लोक घरी पाळतात. मकाऊ पोपटाच्या एकूण १७ प्रजाती आहेत पण त्या सर्वच प्रजाती आता असुरक्षित आहेत.

macaw bird information in marathi
macaw bird information in marathi

मकाऊ पोपटाविषयी माहिती – Macaw Bird Information in Marathi

नावमकाऊ पोपट
प्रकारपक्षी
रंगलाल, हिरवा, निळा आणि पिवळा ( इन्द्रधनुष्य रंग )
लांबी९० ते १०० सेंटी मीटर
वजन१.५ ते २ किलो
आयुष्य४५ ते ५० वर्ष

मकाऊ हे पक्षी कुठे व कसे राहतात ? ( habitat )

मकाऊ पोपट पक्षी हे कळपामध्ये राहतात आणि कळपामधील एक पक्षी त्या कळपाचे नेतृत्व करतो. मकाऊ हे पोपट दक्षिण, मध्य आणि उत्तर अमेरिकेमध्ये सवाना, जंगले किवा जेथे जास्त झुडूप असलेली उंच झाडे आहेत त्या ठिकाणी राहतात.

मकाऊ पोपटाचा आहार ( food )

मकाऊ पोपट हा पक्षी शाकाहारी असल्यामुळे हा पक्षी बिया, फळे, फुले आणि पाणे या प्रकारचे अन्न खातात.

6 मकाऊ पोपटाचे प्रकार ( types of macaw parrot )

मकाऊ पोपट हे लांब शेपटीचे एक सुंदर पोपट आहेत ज्यांना खूप लोकांकडून पाळण्यासाठी मागणी आहे. या प्रकारचे पोपट उत्तर, दक्षिण आणि मध्य अमेरिकेमध्ये या प्रकारचे पोपट आढळतात. मकाऊ या पोपटाच्या एकूण १७ जाती आहे त्यामधील काही जाती खाली स्पष्ट केल्या आहेत.

  • स्कारलेट मकाऊ पोपट ( scarlet macaw parrot information in marathi )

स्कारलेट पोपट हा आकाराने मोठा असून त्याचा रंग लाल, पिवळा आणि निळ्या रंगाचा असतो आणि या पक्ष्याचे पंख शेंदरी रंगाचे असतात, या पोपटाच्या डोळ्याभोवती पांढरी शुभ्र त्वचा असते तसेच शेपूट निळ्या रंगाची असते. त्याचबरोबर या पक्ष्याची लांबी ३२ ते ३६ इंच असते आणि वजन १ किलो पर्यंत असते. स्कारलेट पोपट हे दक्षिण आणि मध्य अमेरिकेमध्ये सदाहरित जंगलांमध्ये आढळतात. हे पक्षी शक्यतो जोडीने किवा गटामध्ये राहणे आवडते. या प्रकारचे पक्षी ताशी ३५ मैलाच्या वेगाने उड्डाण करतात.

  • हायसिंथ मकाऊ पोपट ( hyacinth macaw parrot )

हायसिंथ मकाऊ हा पोपट पूर्णपणे निळ्या रंगाचा असतो आणि या पक्ष्याच्या डोळ्याभोवती आणि चोची जवळ एक चमकदार पिवळ्या रंगाचा गोल असतो. हायसिंथ मकाऊ पोपट हा दुसऱ्या मकाऊ प्रजातींपेक्षा आकाराने मोठा असतो. या प्रकारचे मकाऊ पोपट मध्य आणि दक्षिण अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या पक्ष्याची चोच खूप तीक्ष्ण असते आणि या चोचीचा उपयोग हे पोपट कठीण फळे फोडण्यासाठी किवा शिकार करण्यासाठी करतात.

  • मिल्लीटरी मकाऊ पोपट ( millitary macaw parrot )

मिल्लीटरी मकाऊ पोपट हा मध्यम आकाराचा पोपट आहे. या पक्ष्याचा पूर्ण रंग हिरवट असतो आणि चोचीच्या वरती लाल रंगाचे पॅच असते आणि हे सैन्यातील गणवेशासारखे दिसते. या प्रकारचे पक्षी अमेरिका तसेच मेक्सिको मध्ये आढळतात. या पक्ष्याची लांबी ७० सेंटी मीटर असते आणि हे पक्षी कळपात, कुटुंबात किवा जोडप्याने राहतात.

  • हायब्रीड मकाऊ पोपट ( hybrid macaw parrot )

हायब्रीड मकाऊ या पोपटांना बंदिवासात वाढवले जाते आणि या पोपटांचे प्रजनन हि बंदिवासात केले जाते. या पोपटाच्या बंदिवासात प्रजनन केलेली ३५ हून अधिक प्रकारच्या हायब्रीड मकाऊ पोपट आहेत. या पोपटांचे वेगवेगळ्या रंगाचे उपरीवर्तन झाले असले तरी हे पोपट मकाऊ ची एक शुध्द प्रजात आहे. हे पोपट दिसायला अधिक सुंदर आणि हुशार पक्षी आहे तसेच या पक्ष्याचे वेगवेगळे रंग असतात. हायब्रीड मकाऊ पोपटाच्या काही जाती आहेत त्या म्हणजे कॅप्री मकाऊ, रुबी मिलीगोल्ड, ट्रॉपिकाना, ज्यूबिली इत्यादी.

  • ब्लु गोल्ड मकाऊ पोपट ( blue gold macaw parrot )

ब्लु गोल्ड मकाऊ हा पोपट निळ्या आणि सोनेरी रंगाचा असतो आणि चोचीच्या वरचा थोडासा भाग हिरव्या रंगाचा असतो तसेच डोळ्याच्या भोवती आणि गाल पांढऱ्या रंगाचे असतात आणि डोळ्याच्या भोवती काळ्या रंगाच्या रेषा असतात. या पोपटाची लांबी ३५ ते ३६ इंच असते आणि पंखांची लांबी ४१ ते ४२ इंच असते. या पोपटांना ब्लु यल्लो मकाऊ पोपट या नावानेही ओळखले जाते. या प्रकारच्या पोपटाला पाळीव पक्षी म्हणून बाजारामध्ये खूप मागणी आहे.

  • इलीगर मकाऊ पोपट ( Illiger macaw parrot )

इलीगर मकाऊ या पोपटाला ब्लु विन्गड मकाऊ पोपट म्हणूनही ओळखले जाते. हे पोपट हायसिंथ मकाऊ पोपटाच्या तुलनेत आकाराने लहान असतात. ह्या पोपटांचा रंग हिरवा असतो, शेपूट निळ्या रंगाची असते आणि चेहरा काळ्या रंगाचा असतो. या पोपटाचा कॉलचा आवाज कावळ्याच्या आवाजासारखा असतो.

मकाऊ पोपटाविषयी काही मनोरंजक तथ्ये ( facts about macaw parrot )

  • मकाऊ पोपट आपल्या अन्नाच्या शोधात १५ ते २० किलो मीटर उड्डाण करू शकतात.
  • मकाऊ पोपट हे आयुष्यभरासाठी जोड्या बनवतात.
  • मकाऊ पोपटाचे वजन २ किलो पर्यंत असते.
  • आकाराने सर्वात मोठा पोपट म्हणजे हायसिंथ मकाऊ पोपट ज्याची आकार ३ फुट असतो आणि आकाराने सर्वात लहान पोपट म्हणजे मिनी मकाऊ ज्याचा आकार १२ इंच असतो.
  • अमेजॉन जंगलाजवळ राहणारे मकाऊ पोपट तेथील नदी जवळ असणारी आस पास ची माती खातात.
  • मकाऊ या पोपटांच्या कळपाची संख्या ३० इतकी असते.
  • स्कारलेट मकाऊ पोपट हा होण्डूरास देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे.

मकाऊ पोपटांची शास्त्रीय नावे ( scientific names of macaw parrot ) 

मकाऊ पोपटाचे नावशास्त्रीय नाव
स्कारलेट मकाऊ पोपटअरा मकाव ( ara macao )
ब्लु गोल्ड मकाऊ पोपटअरा अरारौन ( ara ararauna)
हायब्रीड मकाऊ पोपटअरिनी ( arini )
मिल्लीटरी मकाऊ पोपटअरा मिलीटरिज ( ara militaris )
हायसिंथ मकाऊ पोपटएनोडोरीन्चस हायसिंथीनस ( anodorhynchus hyacinthinus)
इलीगर मकाऊ पोपटप्रीमोलीअस माराकॅना ( primolius maracana )

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा मकाऊ पोपट macaw bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. kiwi bird information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about macaw bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही मकाऊ पोपट पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या macaw bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही Biography of Macaw Bird in Marathi  त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!