पोपटा विषयी माहिती Parrot information in marathi

parrot information in marathi पोपट हा पक्षी जगातील सुंदर पक्षांपेकी एक आहे त्याचा हिरवा रंग आणि लाल चोच लोकांना आकर्षित करते आणि या रंगांच्या एकत्रीकरणामुळे पोपट (parrot in marathi) हा पक्षी सुंदर दिसतो. पोपटाच्या वेगवेगळ्या जाती आहेत आणि या वेगवेगळ्या जातींमध्ये वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे पक्षी असतात. पोपट (popat chi mahiti) हा असा पक्षी आहे ज्याला माणसांमध्ये राहायला खूप आवडते आणि तो माणसाची नक्कल हि चांगल्याप्रकारे करू शकतो त्याचबरोबर हे पक्षी दरवाज्याच्या बेल चा, फोनच्या रिंग चा, वैक्युम क्लीनरचा तसेच अनेक वेगवेगळे आवाज काढू शकतो आणि हा पक्षी त्याला शिकवले तर गाणे सुध्दा गाऊ शकतो . पोपटाला जर आपण पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवले तर त्याला पिंजर्याची सवय होते (popat information in marathi) आणि तो पिंजरा सोडून कुठेहि जात नाही आणि जर गेलाच तर परत फिरून येतो. या पक्षाची स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे पोपटाला  आपण जे सांगेल ते सर्व लक्षात राहते तसेच सर्वांची नावेही तो लक्षात ठेवू शकतो. त्याच्या मिठू मिठू बोलण्यामुळे तो सर्वांना हवा हवासा वाटतो आणि पोपटाला एक पाळीव पक्षी म्हणून पाळले हि जाते.  

parrot-information-in-marathi
parrot information in marathi/parrot in marathi/popat chi mahiti
अनुक्रमणिका hide
1 पोपटाची माहिती (parrot information in marathi)

पोपटाची माहिती (parrot information in marathi)

वैज्ञानिक नावलोरीक्युलास व्हरनॅलीस
रंगहिरवा
लांबी१५ सेंटी मीटर
वजन६४ ग्रॅम ते १.६ किलो
आयुष्य२५ ते ३० वर्ष

पोपट कुठे व कसे राहतात ( parrot habitat )

पोपट हा पक्षी उष्ण भागामध्ये किवा उष्ण कटिबंधात राहतात त्यांना जास्त थंड हवा सोसत नाही. हे पक्षी आपले घरटे उंच आणि दाट पाने असलेलेया झाडावर करतात किवा झाडामध्ये जर पोकळी असेल तर त्यामध्ये आपले घरटे बनवतो तसेच त्यांना माणसांजवळ हि राहायला खूप आवडते. पोपट हे पक्षी समूहाने राहतात आणि समूहानेच आकाशामध्ये उडतात.

चिमणी पक्षाबद्द्ल माहिती 

पोपटाचा आहार ( parrot diet ) (parrot in marathi)

पोपट या पक्ष्याचे पेरू आणि मिरची आवडता आहे त्याचबरोबर हे पक्षी फळे, धान्य, बियाणे, कीटक, कठीण फळे आणि शिजलेला भातही खातात.

पोपट या पक्ष्याचे प्रकार ( types of parrot in marathi)

पोपट हा एक सुंदर आणि रंगीबेरंगी पक्षी आहे जे पक्षी उष्ण कटीबंधात राहायला पसंत करतात. हे पक्षी वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे असतात आणि या पक्ष्यांचे रंग आणि आकार हे त्यांच्या जातिवा अवलंबून असतात. या पक्ष्याच्या ३५० जाती आहे आहेत आणि काही जातीमध्ये नर पोपट आणि मादी पोपट एकसारखे असतात.

कावळ्याची माहिती 

भारतीय पोपटांच्या जाती ( types of indian parrot in marathi )

भारतामध्ये सुध्दा वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या आकाराचे पोपट आढळतात या मधील काही प्रसिध्द जाती खाली दिल्या आहेत.

रेनबोव पोपट ( rainbow parrot information in marathi )

हा पोपट वेगवेगळ्या रंगाचा असतो आणि हा पक्षी दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असतो. या प्रकारचा पोपट जंगलामध्ये आढळतो आणि या पक्ष्याला काही लोक पाळतात सुध्दा. हे पक्षी मध्यम आकाराचे असतात या पक्ष्याची लांबी २७ ते ३० सेंटी मीटर असते आणि या पक्ष्यांची शेपूट १० इंच असते.

रेनबोव पोपट कुठे आढळतात : ह्या जातीचे पोपट मुळचे ऑस्त्रोलियाचे आहेत आणि हे पक्षी  घनदाट जंगले किवा पाण्याच्या किनाऱ्यावर असणारे झाडांचे झुडूपांवर आपली घराती बनवतात.

रेनबोव पोपटाचा आहार : हे पक्षी अमृत फळे व इतर फळे आणि बिया खातात.

आयुष्य : या पक्ष्याचे आयुष्य १६ ते २० वर्ष असते.

आफ्रिकन ग्रे पोपट ( african grey parrot information in marathi )

आफ्रिकन ग्रे पोपटाला काँगो आफ्रिकन ग्रे पोपट ह्या नावानीही ओळखला जातो. हा पक्षी मुलाचा आफ्रिकेमधी आहे आणि तो भारतामध्ये हि आढळतो. या पक्ष्याचा रंग राखाडी असतो आणि डोळ्याच्या भोवती पांढरा गोल असतो आणि या पक्ष्याची चोच काळ्या रंगाची असते. या पक्ष्याची लांबी ३३ सेंटी मीटर असते आणि वजन ४०० ग्रॅम असते.

आफ्रिकन ग्रे पोपट कुठे आढळतात : हे पोपट आफ्रिकेमध्ये काँगो, गाबोन, घाना , उन्गडा आणि अंगोला मध्ये आढळतात. ह्या जातीचे पोपट रेन फॉरेस्टमध्ये राहणे पसंत करतात.

आफ्रिकन ग्रे पोपटाचा आहार : हे पोपट बेरी, बिया, धान्य आणि फळे खातात.

आयुष्य : या जातीच्या पोपटांचे आयुष्य जंगलामध्ये २१ ते २३ वर्ष असते आणि जर त्यांना पिंजऱ्या मध्ये ठेवले तर त्यांचे आयुष्य ४५ ते ५० वर्ष असते.

कैक पोपट ( caique parrot information in marathi )

कैक पोपट हा दिसायला खूप छान असतो या जातीच्या पक्ष्यामध्ये वेगवेगळे शेड असतात जसे कि काळा, पिवळा ,हिरवा, नारंगी आणि पांढरा आणि या जातीच्या पोपटाला पहिले कि आपल्याला भारताच्या तिरंग्याची आठवण होईल कारण त्यामध्ये जास्त हिरवा, पांढरा आणि नारंगी रंग असतो आणि ते रंग या पोपटावर उटून दिसतात. या पोपटाला ब्लॅक हेडेड पोपट हि म्हणतात कारण त्याच्या डोक्यावर फक्त काळा रंग असतो.

कैक पोपट कुठे आढळतात : हे पोपट मुळचे ब्राझील या देशातील आहेत आणि हे भारतामध्येही आढळतात. या प्रकारचे पक्षी सवाना किवा उष्ण कटीबंधात राहणे पासात करतात.

कैक पोपटाचा आहार : हे पोपट वनस्पतीची पाने तसेच फुले आणि बिया खातात.

आयुष्य : हे पोपट ४० वर्षापर्यंत जगू शकतात.

रोज रीन्गड पोपट ( rose ringed parrot information in marathi )

रोज रीन्गड पोपट हे पोपट भारतामध्ये सगळी कडे आढळतात आपण जो फिकट हिरव्या रंगाचा आणि लाल चोच असलेला पोपट बघतो त्याला रोज रीन्गड पोपट म्हणतात . ह्या जातीचे पोपट आफ्रीकेमध्ये हि आढळतात. या पोपटाल रिंग नेक्ड पोपट या नावानेही ओळखले जाते कारण त्याच्या मानेभोवती काळ्या रंगाचे वर्तुळ असते.

रोज रीन्गड पोपट कुठे आढळतात : हे पक्षी मुळचे आशिया आणि आफ्रिकेमधील आहेत आणि हे पक्षी घनदाट जंगलामध्ये आढळतात.

रोज रीन्गड पोपटाचा आहार : हे पोपट बिया, धान्य, फळे आणि गवत खातात.

आयुष्य : रोज रीन्गड पोपट हे १५ ते २० वर्ष जगू शकतात.

ब्लू-यल्लो मकाव :(parrot information in marathi)

ब्लू-यल्लो मकाव या पोपटाला ब्लू-गोल्ड मकाव या नावानेही ओळखले जाते. हा पोपट दक्षिण अमेरिकेमध्ये आढळतो. हा पक्षी निळ्या, पिवळ्या आणि हिरव्या अश्या तीन रंगाचा असतो आणि तो आकाराने मोठा असतो. या पोपटाची लांबी ८५ सेंटी मीटर असते आणि वजन १.५ किलो असते.

ब्लू-यल्लो मकाव पोपट कुठे आढळतात : ब्लू-यल्लो मकाव पोपटाची मुल जात हि दक्षिण अमेरिकेतील आहे आणि ह्या पोपटाला घनदाट जंगलांमध्ये राहायला खूप आवडते.

ब्लू-यल्लो मकाव पोपटाचा आहार : हे पोपट फळे, धान्य आणि बिया खातात.

आयुष्य : या पोपटाचे आयुष्य ३१ ते ३५ वर्ष असते.

अमेझॉन पोपट (parrot information in marathi)

अमेझॉन पोपट हे आकाराने लहान असतात आणि त्यांची शेपूट हि लहान असते हे पोपट पुरपणे हिरव्या रंगाचे असतात आणि डोक्यावर थोडासा पोवाल्सार रंग असतो. हे पक्षी कळपामध्ये राहतात आणि ह्या जातीचे पोपट खूप कार्यक्षम असतात आणि ते दिसायलाही खूप सुंदर असतात. या पक्ष्याची लांबी १० ते १२ सेंटी मीटर असते.

अमेझॉन पोपट कुठे आढळतात : हे पोपट दक्षिण अमेरिका, मेक्सिको, कॅरीबेअन या देशामध्ये आढळतात तसेच या जातीच्या पोपटांना झुदुपांमध्ये राहायला आवडते.

अमेझॉन पोपटाचा आहार : हे पोपट फळे, बिया आणि वनस्पतीची कोवळी पाने खातात.

आयुष्य : या पोपटाचे आयुष्य ४० ते 50 वर्ष असते.

अलेक्झान्द्राइन पोपट ( alexandrain parrot information in marathi )

हे जातीचे पोपट भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात आणि ते भारतामध्ये सर्व ठिकाणी आढळतात. हे पक्षी हिरव्व्या रंगाचे असतात, चोच लाल असतात आणि पंख हिरवे असतात आणि पंखांवर लाल रंगाचे शेड असते. या पक्ष्याची शेपूट लांब असते.

अलेक्झान्द्राइन पोपट कुठे आढळतात : हे पोपट भारत, नेपाल आणि पाकीस्थान मध्ये आढळतात.

अलेक्झान्द्राइन पोपटाचा आहार : हे पोपट बिया, पीच फळे आणि फुले खातात.

आयुष्य : या पोपटाचे आयुष्य ३० ते ४० वर्ष असते.

गलाह ( galah parrot information in marathi )

गलाह या पोपटाचा आश्चर्यकारक आणि वेगळा रंग नेत्रदीपक आहे. ह्या पोपटाला कळपात राहायला आवडते. या पोपटाचा रंग पांढरा, गुलाबी आणि राखाडी असतो. या पक्ष्याची लांबी ३५ सेंटी मीटर असते आणि या पक्ष्याला रोज ब्रिसटेड पोपट या नावानेही ओळखले जाते.

गलाह पोपट कुठे आढळतात : हे पोपट मुळचे ऑस्ट्रोलिया मधील आहे. हे पोपट आपली घरटी घनदाट जंगलांमध्ये किवा सवाना मध्ये बनवतात.

गलाह पोपटाचा आहार : बेरीज, इतर फळे आणि बिया खातात.

आयुष्य :  ह्या पोपटांचे आयुष्य ३५ ते ४० वर्ष असते.

बडगेरीगर पोपट ( budgerigar parrot information in marathi )

हा पोपट खूप सुंदर आणि आकर्षित असतो आणि हे पोपट आकाराने खूप लहान असतात ( या पोपटाची लांबी १८ सेंटी मीटर असते) तसेच या पोपटाला शेल पोपट हि म्हंटले जाते. हे पोपट पाळण्यासाठी उत्तम आहेत.

बडगेरीगर पोपट कुठे आढळतात : या पोपटाची जात हि मुळची ऑस्ट्रोलियाची आहेत.

बडगेरीगर पोपटाचा आहार : हे पोपट धान्य, बिया, फळे खातात.

आयुष्य : ह्या पोपटाचे आयुष्य खूप कमी असते हे पोपट ४ ते ८ वर्ष जगू शकतात.

ससाणा पक्षाची माहिती 

पोपटाच्या काही प्रसिध्द जाती ( some famous types of parrot in marathi )

पोपटाच्या काही जाती जगभरामध्ये प्रसिध्द आहेत यामधील काही प्रकार खाली संक्षिप्त स्पष्टीकरना सोबत दिले आहेत.

स्कारलेट मकाव पोपट ( scarlet macaw parrot information in marathi )

स्कारलेट मकाव पोपट हे खूप हुशार आणि उत्साही पक्षी आहे. जर ह्या जातीचे पोपट पिंजऱ्या मध्ये बंद असतील तर त्यांना रोज फिरणे आणि व्यायाम गरजेचा असतो. हे पक्षी लगेच कंटाळतात यांना लहान मुलांसाठी जसे खेळणे लागतात तसे या पोपटांना हि फिरणारे खेळणे लागते. या पोपटाची लांबी ३० ते ३९ इंच असते आणि वजन १.९ किलो इतके असते.

सल्फर-क्रेस्टेड कॉककाटो ( sulphur-crested cockatoo parrot)

या प्रकारच्या पोपटाला आपला वेळ लोक्कांच्या सोबत घालवायला खूप आवडतो. या पक्ष्यांची लांबी १५ इंच असते आणि या पक्षाचे वजन ३५० ते ८७० ग्रॅम असते. या पक्ष्याचे पंख पिवळे , चोच काळ्या रंगाची असते. नर पोपट हा गडद तपकिरी रंगाचा असतो आणि मादी पोपट हे लालसर रंगाचे असतात. या पक्ष्यांचा आयुष्य काळ खूप दिवस असतो हे पक्षी ७५ ते ८० वर्ष जगू शकतात.

अम्ब्रेला कॉककाटो ( umbrela cockatoo parrot)

 अम्ब्रेला कॉककाटो हे पोपट पिंजर्यामध्ये ठेवले तर ते ७० ते ७५ वर्ष जगू शकतात. हे पोपट खूप सभ्य आणि गोड आहेत. या पक्ष्यांचे वजन ४५० ते ७५० इतके असू शते आणि लांबी १८ इंच असते. या पक्ष्यांचे पंख पांढरे असतात आणि त्यांच्या शेपटीवर फिकट गुलाबी पिवळसर रंग असतो आणि काळ्या रंगाची चोच असते.

कोनुर्स पोपट ( conures parrot)

कोनुर्स पोपट हे मध्यम आकाराचे असतात आणि या पक्ष्यांचे आयुष्यमान १२ ते ३० वर्ष असते. हे जातीचे पोपट मुळचे दक्षिण अमेरिका आणि मेक्सिको मधील आहेत. या पोपटांना प्रशिक्षण देणे खूप सोपे आहे कारण ते आपण जे काही बोलायला शिकवू ते लगेच शिकतात तसेच हे पोपट खूप मनोरंजक असतात.

मोन्क पोपट ( monk parrot)

कोनुर्स पोपटाला क्वाकर पोपट या नावानेही ओळखले जाते. ह्या जातीचे पोपट आर्जेन्टीना या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात . हे पक्षी माणसांची उत्तम नक्कल करू शकतात. या पक्ष्याचे आयुष्य १५ ते २० वर्ष असते आणि या पक्ष्याची लांबी २९ ते ३० इंच असते.

एक्लेक्टस पोपट ( eclectus parrot)

एक्लेक्टस पोपट हे पूर्व किवा दक्षिण ऑस्ट्रोलिया, मोलुक्कास, सुम्बा या देशामध्ये आढळतात. नर पोपट हे फिकट हिरव्या रंगाचे आणि मादा पोपट हे लाल, जांभळ्या किवा निळ्या रंगाचे असतात. या पोपटाची लांबी १४ इंच असते आणि नर आणि मादा पोपट हे दिसायला वेगवेगळे असतात. हे पोपट खुप हुशार आणि प्रेमळ असतात.

पोपट या पक्ष्याबद्दल काही तथ्ये ( facts of parrot in marathi)

  • पोपट हा एकमेव पक्षी आहे जो आपल्या पायाने खातो.
  • काही पोपटांचे प्रकार ७५ ते ८० वर्ष जाऊ शकतात.
  • पोपटाची चोच खूप मजबूत असते म्हणून ते कोणतीही कठीण फळे किवा बिया अगदी सहजपणे फोडू शकतात.
  • इंग्रजीमध्ये पोपटाला पॅरॉट किवा लोरीकीट असे म्हंटले जाते.
  • अमेरिका आणि ऑस्ट्रोलिया मध्ये पोपटांच्या अनेक वेगवेगळ्या जाती आढळतात.
  • पोपटाची एक अनोखी गोष्ट म्हणजे लोक जसे आपल्या मुलांची नावे ठेवतात तशीच नावे पोपट आपल्या पिल्लांची हि ठेवतो.
  • जगातील सर्वात मोठ्या आकाराचा पोपट दक्षिण अमेरिकेमध्ये बघायला मिळतात.
  • भारतामध्ये १२ देशी पोपटाच्या जाती आहेत.
  • पोपट हा पक्षी सर्वात बुध्दिमान समजला जातो कारण हे वेगवेगळ्या आकृत्या तसेच गणितांची उत्तरेही सोडवू शकतो.

पोपटाचा उपयोग ( use of parrot in marathi)

  • पोपट हा बुध्दिमान आणि संवेदनशील पक्षी आहे त्यामुळे तो चांगला पाळीव पक्षी ठरू शकतो.
  • त्याच्या मोठ्या आवाजामुळे त्याचा उपयोग घराची राखण करणारा पक्षी म्हणून केला जातो.
  • पोपटाचा वापर भविष्य सांगण्यासाठी केला जातो.
  • काही पोपटांच्या जातीचा उपयोग गणिती क्षेत्रामध्ये हि केला जातो कारण ते कोणत्याही घानिताचे उत्तर सहजपणे शोधू शकतात.
  • पोपटांचा उपयोग सर्कस मध्येही केला जातो.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा पोपट (parrot information in marathi pdf) हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. parrot information in Marathi language  हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच parrot in Marathi हा लेख कसा वाटला व अजून काही पोपट या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या information about parrot in marathi/ parrot information in marathi for project माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!