मच्छिंद्रगड किल्ला माहिती Machindragad Information in Marathi

machindragad information in marathi मच्छिंद्रगड किल्ला माहिती, महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ले आहेत आणि त्यामधील एक छोटासा किल्ला म्हणजे मच्छिंद्रगड किल्ला आणि आज आपण या लेखामध्ये मच्छिंद्रगड किल्ल्याविषयी माहिती घेणार आहोत. मच्छिंद्रगड हा किल्ला आकाराने छोटासा किला आहे आणि हा किल्ला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये वसलेला आहे. मच्छिंद्रगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स १६७६ मध्ये स्वराज्य बळकट बनवण्यासाठी बांधला होता. मच्छिंद्रगड हा काळभैरव या डोंगररांगेच्या लागत असणाऱ्या वाटोळ्या टेकडीवर उभा आहे आणि या गडाचा माथ्याचा आकार हा चांगला सपाट आहे.

तसेच या गडावर एक मंदिर आहे आणि हे मंदिर मच्छिंद्रनाथाचे आहे आणि या मंदिरामध्ये भक्तांची खूप गर्दी असते. हा किल्ला १८१० मध्ये पेशवा बापू गोखले यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि मग नंतर हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला.

machindragad information in marathi
machindragad information in marathi

मच्छिंद्रगड किल्ला माहिती – Machindragad Information in Marathi

किल्ल्याचे नावमच्छिंद्रगड
जवळचे गावकराड
ठिकाणसांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये वसलेला आहे.
प्रकारडोंगरी किल्ला
स्थापनाइ.स १६७६

मच्छिंद्रगड किल्ला हा कोठे वसलेला आहे ?

मच्छिंद्रगड हा किल्ला महाराष्ट्रातील एक छोटासा किल्ला आहे आणि हा किल्ला सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यामध्ये वसलेला आहे आणि कराड हे गाव किल्ल्याजवळील सर्वात जवळचे गाव आहे आणि हा किल्ला कालभैरव या डोंगररांगेच्या लागत असणाऱ्या वाटोळ्या टेकडीवर वसलेला आहे.

मच्छिंद्रगड किल्ल्याचा इतिहास – machindragad history in marathi

मच्छिंद्रगड या किल्ल्याचा इतिहास हा खूप जुना आहे म्हणजेच ह्या किल्ल्याचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरु झाला म्हणजेच या किल्ल्याची बांधणी हि १६७६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला बळकट बनवण्यासाठी केली ज्यावेळी औरंगजेब यांने महाराष्ट्रातील किल्ल्यांच्यावर हल्ला करून अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली त्यावेळी हा किल्ला देखील औरंगजेबाने आपल्या ताब्यात घेतला.

ज्यावेळी औरंजेब या किल्ल्याकडे येत होता त्यावेळी या किल्ल्याच्या किल्लेदाराने त्याचे स्वागत करण्यासाठी म्हणून गादुतर झाला तोपर्यंत तिकडे औरंगजेबाने या किल्ल्यावरील सर्व तोफा उडवल्या आणि किल्ला आपल्या ताब्यात घेतला. मच्छिंद्रगड हा किल्ला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर परत मराठ्यांच्या ताब्यात आला.

मच्छिंद्रगड किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणी – places 

मच्छिंद्रगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे आणि यामुळे हा किल्ला पर्यटकांचे खास आकर्षण आहे. मच्छिंद्रगड हा किल्ला कराड किंवा इस्लामपूर या गावांच्यापासून जवळ आहे आणि हा किल्ला चढण्यासाठी सुरक्षित अश्या पायऱ्या आहेत तसेच या किल्ल्याचे प्रवेशदार हे अर्धा तास पायऱ्या चढल्यानंतर येते.

किल्ल्याचा माथा हा आटोपशीर आहे तसेच किल्ल्यावर एक मंदिर आहे त्या मंदिरला मच्छिंद्रनाथाचे मंदिर असे नाव आहे आणि या मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी आणि भाविक गर्दी करतात. हे मंदिर प्रशस्त असल्यामुळे ज्यांना या ठिकाणी एक दिवसाचा मुक्काम करायचा आहे ते लोक या मंदिरामध्ये मुक्क करू शकतात त्याचबरोबर हे मच्छिंद्रनाथाचे मंदिर अनेक शिल्पांनी सजवलेले आहे. तसेच मंदिराजवळ एक कोरडी विहीर आहे तसेच या किल्ल्याला तटबंदी देखील आहे.

मच्छिंद्रगड या किल्ल्यावर पाण्याची काही कमी नाही म्हणजेच या किल्ल्यावर पाण्याचा मोठा साठा आहे आणि किल्ल्याच्या पूर्वेकडील भागामध्ये काही गुहा देखील आहेत त्याचबरोबर किल्ल्यामध्ये काही ठिकाणी ब्राह्मी लीपिमधील शिलालेख देखील सापडतात आणि किल्ल्यावर संत गोरखनाथ यांच्या समाधीच्या रुपात भक्तीचे असन आहे. अश्या प्रकारे हा सर्व किल्ला पाहण्यासाठी एक तास लागतो.

गडावर कसे पोहचायचे – How to reach 

मच्छिंद्रगड या किल्ल्यापासून कराड किंवा इस्लामपूर हे शहर जवळचे आहे आणि कराड हे शहर पुण्यापासून ४५ किलो मीटर अंतरावर आहे आणि कराड या शहरापासून हा किल्ला १८ किलो मीटर अंतरावर आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी गाव आहे आणि या पायथ्याच्या गावाच्या पूर्व दिशेला असणाऱ्या टेकडीवरून जर प्रवासाला सुरुवात केली तर आपला गड चढण्याचा मार्ग सुरु होतो.

ह्या मार्गावर गड चढण्यासाठी पायऱ्या आहेत आणि हा अतिशय सुरक्षित मार्ग आहे. अश्या किल्ल्याच्या संपूर्ण पायऱ्या चढून आपण प्रवेशदाराजवळ पोहचण्यासाठी अर्धा तास लागतो. त्यानंतर आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो आपल्याला सर्व किल्ला पाहण्यासाठी एक तास लागतो आणि हा किल्ला पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाहीत तसेच हा किल्ला पर्यटकांच्यासाठी आठवड्याचे सातही दिवस चालू असतो.

मच्छिंद्रगड किल्ल्याविषयी महत्वाची माहिती – information about machindragad in marathi

  • मच्छिंद्रगड या किल्ल्याचा माथा हा आटोपशीर आहे म्हणजेच या किल्ल्याच्या माथ्याचा आकार हा गोलाकार आहे.
  • किल्ल्यावर संत गोरखनाथ यांच्या समाधीच्या रुपात भक्तीचे असन आहे.
  • हा किल्ला सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यामध्ये वसलेला आहे आणि कराड हे गाव किल्ल्याजवळील सर्वात जवळचे गाव आहे.
  • मच्छिंद्रगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स १६७६ मध्ये स्वराज्य बळकट बनवण्यासाठी बांधला होता.
  • औरंगजेब यांने महाराष्ट्रातील किल्ल्यांच्यावर हल्ला करून अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली त्यावेळी हा किल्ला देखील औरंगजेबाने आपल्या ताब्यात घेतला.
  • मच्छिंद्रगड या किल्ल्यावर मच्छिंद्रनाथाचे मंदिर हे किल्ल्यावरील मुख्य आकर्षण आहे आणि किल्ल्यावर जर मुक्काम करायचा असेल तर या मंदिरमध्ये मुक्काम करता येतो.
  • किल्ल्यामध्ये काही ठिकाणी ब्राह्मी लीपिमधील शिलालेख देखील सापडतात.
  • मच्छिंद्रगड हा किल्ला कराड किंवा इस्लामपूर या गावांच्यापासून जवळ आहे.
  • मच्छिंद्रगड या किल्ल्यावर चढण्यासाठी चांगल्या आणि सुरक्षित पायऱ्या आहेत.
  • मच्छिंद्रगड हा किल्ला १८१० मध्ये परत मराठ्यांच्या ताब्यात आला.

आम्ही दिलेल्या machindragad information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मच्छिंद्रगड किल्ला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या machindragad history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!