maharashtra gram panchayat act 2017 in marathi महाराष्ट्र ग्राम पंचायत कायदा माहिती, आज आपण या लेखामध्ये महराष्ट्र ग्राम पंचायत कायदा या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत म्हणजेच हा कायदा कधी सुरु झाले त्यांचे नियम काय आहेत, अशी सर्व माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहोत. ग्राम पंचायत म्हणजे जी संस्था गाव किंवा लहान शहर पातळीवर काम करते आणि याला स्थानिक स्वराज्य संस्थ म्हणून देखील ओळखले जाते. ग्राम पंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ही भारतीय उपखंडातील स्थानिक सरकारची सर्वात जुनी व्यवस्था आहे.
पंचायत’ शब्दाचा अर्थ पाच (पंच) ची विधानसभा आणि राज म्हणजे ‘नियम’. पारंपारिकरित्या पंचायतींमध्ये स्थानिक समाजाने निवडलेले वृद्ध आणि शहाणे लोक होते, जे व्यक्ती आणि गावांमधील वाद मिटवायचे. पंचायतीच्या नेत्याला मुखिया किंवा सरपंच म्हणून संबोधले जायचे. साधारणपणे सर्वात ज्येष्ठ व्यक्ती या पदावर निवडली जाईल.
ग्राम पंचायतीचे देशामध्ये कोठेही तीन स्तर असतात आणि ते महाराष्ट्रामध्ये देखील तसेच स्तर आहेत आणि ते म्हणजे गाव पातळीवरील पंचायत, तालुका पातळी वरील पंचायत आणि जिल्हा पातळी वरील पंचायत. संपूर्ण देशामध्ये गरम पंचायत कायदा १९५८ मध्ये लागू झाला आणि महाराष्ट्र राज्याला देखील हा कायदा लागू झाला.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम माहिती – Maharashtra Gram Panchayat Act 2017 in Marathi
ग्राम पंचायत म्हणजे काय ? – what is mean by gram panchayat
- स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्राम पंचायत हि ज्या गावामध्ये ६०० ते ७००० लोकसंख्या असणाऱ्या छोट्याश्या गावामध्ये किंवा शहरामध्ये असते आणि हि ग्राम पंचायत अश्या कमी लोकसंख्या असणाऱ्या छोट्याश्या गावामध्ये किंवा शहरामध्ये असली पाहिजे कारण या स्थानिक शासन संस्थेमुळे गावाचा विकास होतो तसेच गावामध्ये काही वादविवाद झाले तर प्रथम पंचायत सोडवण्याचे प्रयत्न करते, गावाची स्वच्छता राखली जाते तसेच ग्राम पंचायत गावासंबधित अनेक कामे करते.
- ग्राम पंचायत म्हणजे जी संस्था गाव किंवा लहान शहर पातळीवर काम करते आणि याला स्थानिक स्वराज्य संस्थ म्हणून देखील ओळखले जाते. पंचायत’ शब्दाचा अर्थ पाच (पंच) ची विधानसभा आणि राज म्हणजे ‘नियम’.
महाराष्ट्र ग्राम पंचायत संस्था – maharashtra gram panchayat
महाराष्ट्र ग्रामपंचायत संस्था हि गावातील लोकांच्यासाठी किंवा लहान शहरातील लोकांच्यासाठी चालवली जाते आणि हि संस्था पंच, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि ग्रामसेवक या लोकांच्या मार्फत चालवली जाते आणि महाराष्ट्रातील ग्राम पंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था हि मुंबई अधिनियम १८५७ कलम ५ अन्वये चालवली जाते.
महाराष्ट्र ग्राम पंचायतची रचना – structure
- ग्राम पंचायत हि ज्या गावामध्ये किंवा लहान शहरामध्ये ६०० ते ७००० लोक असतात अश्या ठिकाणी ग्राम पंचायत हि स्थापित असते आणि ती त्या गावाचे किंवा लहान शहराचे सर्व कामकाज पाहते.
- ज्या गावामध्ये किंवा लहान शहरामध्ये १५ ते २० लाख पेक्षा कमी लोकसंख्या आहे त्या गावामध्ये किंवा लहान शहरामध्ये तीन स्तरापैकी एका स्तरावर पंचायत स्टेपन केलेली असते. पंचायत स्टेपन करण्याचे तीन स्तर म्हणजे गाव पातळीवरील पंचायत, तालुका पातळीवरील पंचायत आणि जिल्हा पातळी वरील पंचायत.
- या संस्थेमध्ये असणारे सदस्य हे १८ वर्ष वयापेक्षा जास्त असले पाहिजेत आणि मुख्य म्हणजे ते भारताचे नागरिक असले पाहिजेत.
- गरम पंचायत सदस्य आणि पंच निवडण्यासाठी दर ५ वर्षांनी मतदान घेतले जाते.
- ग्राम पंचायत प्रतिनिधी किंवा प्रभाग पंच असलेल्या लहान भागात विभागलेली असते आणि त्यामध्ये सरपंच आणि इतर पंच असतात.
- जो पंच असतो तो गावाचा सर्व भर सांभाळतो म्हणजे गावाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करत असतो जसे कि गावातील रस्ता चांगला करण्यासाठी प्रयत्न, लोकांना चांगला आणि पुरेसा पाणीपुरवठा करणे, गावाची स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न या सारखे अनेक प्रयत्न तो गावासाठी करतो.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958
- ग्राम पंचायत कायदा १९५८ नुसार गरम पंचायत मधील एकूण जागांपैकी ५० टक्के जागा ह्या महिलांच्यासाठी राखीव राखून ठेवल्या जातात.
- या कायद्यानुसार किंवा ग्राम पंचायत नियमानुसार जो व्यक्ती ग्राम पंचायत सदस्य असतो तो त्याच गावातील असला पाहिजे जर तो गावातील रहिवासी नसेल तर तो सदस्य बनण्यास पात्र नसतो.
- ग्राम पंचायत नियमानुसार मागास वर्गीय लोकांच्यासाठी २७ टक्के जागा ह्या आरक्षित करून ठेवलेल्या असतात.
- तसेच जर एखादा व्यक्ती ग्राम पंचायत निवडणुकीसाठी उभा राहणार असेल किंवा सदस्य बनणार असेल तर त्या व्यक्तीचे नाव हे मतदान यादीमध्ये असले पाहिजे.
- नियमानुसार ग्राम पंचायत सदस्य हे तेथील लोक संखेवर आधारित असतात जसे कि जर एकाद्या गावामध्ये २००० ते ३००० संख्या असेल तर त्या गावातील गरम पंचायती मध्ये ९ सदस्य असतात.
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती करिता लोकसंखेच्या प्रमाणात राखीव जागा ठेवल्या जातात.
- जो व्यक्ती सदस्य बनण्यासाठी इच्छुक असेल त्या व्यक्तीचे वय हे २१ वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे.
महाराष्ट्र ग्राम पंचायतीला कायद्यानुसार कोणकोणती कामे करावी लागतात
महाराष्ट्र ग्राम पंचायत कायद्यानुसार महाराष्ट्रातील ग्राम पंचायत हि आपल्या गावासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकते आणि आपल्या गावाची सुधारणा करू शकते. गरम पंचायत सरपंचला आपल्या गावासाठी सरकार कडून अनेक कामे मंजूर करून आणावी लागतात आणि ते कामे करावी लागतात.
- महाराष्ट्र ग्राम पंचायतीचे मुख्य काम म्हणजे गावामध्ये स्वच्छता ठेवणे जेणेकरून गावामध्ये कोणत्याही प्रकारची रोगराई पसरणार नाही तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेला गावातील सार्वजनिक मालमत्तेचे देखील संरक्षण आणि देकभाल करावी लागते.
- गावामध्ये पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी खोदणे तसेच पाण्याच्या टाक्या तयार करणे आणि अनेक प्रकारे पाण्याची सोय करून गावाला पुरेसा पाणी पुरवठा करणे. तसेच गावाला शुध्द पाणी पुरवठा करणे हे पंचांचे उत्तर दायित्व आहे.
- गावातील शेतकऱ्यांच्यासाठी सरकार कडून वेगवेगळ्या सरकारी स्कीम उपलब्ध करून आणणे जेणेकरून गावातील शेतीमध्ये सुधारणा होईल.
- शेतीसाठी पाणीपुरवठ्याची सोय करून देणे.
- गावामध्ये दवाखाने आणि आरोग्य केंद्रे सुरु करण्यासाठी प्रयत्न करणे.
- दुग्ध व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालनाला प्रोत्साहन देणे.
आम्ही दिलेल्या maharashtra gram panchayat act 2017 in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट