महात्मा बसवेश्वर माहिती Mahatma Basaveshwar Information in Marathi

Sant Mahatma Basaveshwar Information in Marathi संत महात्मा बसवेश्वर महाराजांची माहिती भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष, महान तत्वज्ञानी, समाजप्रबोदक, प्रसिद्ध कवी, जन्माने ब्राम्ह्णत्व नाकारून लिंगायत धर्माला नवसंजीवनी प्रदान करणारे कर्नाटकातील ‘संत महात्मा बसवेश्वर’. म्हणूनच त्यांना १२ व्या शतकातील आदर्श प्रशासक आणि समतेचे प्रणेते म्हणून ओळखले जाते.

“माणूस हा त्याच्या जन्माने नव्हे तर त्याने समाजात केलेल्या कर्माने मोठा होत असतो” हा विचार मनाशी घट्ट धरून जात पात गाडत, धर्माच्या भिंती पाडून लिंगायत समाजाची मुहुर्तमेढ ‘संत महात्मा बसवेश्वर’ यांनी रोवली.

mahatma basaveshwar information in marathi
mahatma basaveshwar information in marathi

महात्मा बसवेश्वर माहिती – Mahatma Basaveshwar Information in Marathi

महात्मा बसवेश्वर जीवन परिचय

नाव महात्मा बसवेश्वर
जन्म इ.स. २५ एप्रिल ११०५
जन्मस्थळ बागेवाडी, मंगळवेढा, जिल्हा- विजापूर 
धर्म लिंगायत
आई मादलंबीका 
वडील मादिराज
भावंडे  देवराज आणि नागम्मा
समाज लिंगायत
कार्य समाजसुधारक, श्रेष्ठ कवी आणि लिंगायत धर्म संस्थापक  
निर्वाण इ.स. ११६७

संत महात्मा बसवेश्वर

संत बसवेश्वर यांचा जन्म तत्काली मंगळवेढा राज्यातील बागेवाडी या छोट्याश्या गावात मंडगी मादिराज आणि मादलांबिका या पाशुपत शैव कम्मे कुळातील दाम्पत्याच्या पोटी २५ एप्रिल ११०५, वैशाख शुद्ध तृतीया, अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला. मंगळवेढा राज्यावर कलचुर्य राजा बिज्जल राज्य करीत होता. बसवण्णा हे मादिराज आणि मादलांबिका यांचे तिसरे संतान होते. वडील मादिराज हे बागेवाडी आगाराचे भांडारप्रमुख होते. बसवेश्वरांच्या भावाचे नाव देवराज बहिणीचे नाव नागम्मा होते. मादिराज आणि मादलांबिका हे दोघेही परम शिवभक्त होत्या.

बसवेश्वर लहानपणापासूनच कर्मठ विधींना विरोध करत होते. त्यांनी वयाच्या ८ व्या वर्षी मुंजीची तयारी झाल्यावर ‘मला आधीच लीगदिक्षा मिळाली आहे’ असे म्हणून मुंज करून घ्यायचे नाकारले आणि घर सोडून ते कुंडलसंगम येथे निघून गेले. कृष्णा आणि मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुंडलसंगम येथे मोठे अध्ययन केंद्र होते. तेथे बसवेश्वरांनी १२ वर्षे वास्तव्य केले. येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला. तेव्हा त्यांनी सोलापुरातील मंगळवेढा येथ तब्बल ३१ वर्षे वास्तव्य केले. आणि तेथूनच त्यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली असे सांगितले जाते.

ते कुंडलसंगम येथील संगमेश्वरचे निष्ठावंत भक्त होते. तेथे त्यांनी ज्ञान, भक्ती, कर्म यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. ॐ नम शिवाय” हा षडक्षरी मंत्र त्यांना अत्यंत प्रिय होता.

समाजप्रबोधन आणि समाजकार्य  

 • बसवेश्वरांनी बिज्जल राजाकडे कारकुनाच्या नोकरीपासून सुरुवात केली आणि पुढे त्यांची राजाचा कोषाधिकारी म्हणून नेमणूक झाली. तत्कालीन राजवटीत मंगळवेढा हि राजधानी होती.
 • बसवेश्वर हे हुशार आणि चाणाक्ष तसेच वेदशास्त्रात, धनुर्विध्येत व इतर कलांत निपुण असल्याने राज्याचे प्रधान झाले. त्यांनी अनेक शिवमंदिरे बांधली. रेवणसिध्येश्वराच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून बारा ज्योतिर्लिंगांच्या बारा पिंडी एकाच शिवपिंडावर स्थापन केल्या.
 • संत बसवेश्वर यांनी शरण चळवळीची सुरुवात केली. त्या चळवळीत सहभागी झालेल्या पुरुषांना आणि स्त्रियांना अनुक्रमे शरण – शरणी अशी नावे मिळाली. आणि याच चळवळीचे रुपांतर लिंगायत धर्मामध्ये झाले.
 • समाजाच्या प्रत्येक थरातून स्त्री पुरुष बसवन्नांच्या लिंगायत चळवळीत सामील झाले, ते शरण झाले. शरण म्हणजे शरण परिवारात राहणारा, वचनांवर विश्वास ठेवणारा, नित्य,सत्य- शुद्ध दासोह करणारा, चर्चा- अनुभाव- अनुभव करणारा, लिंग जाती ण मानणारा, मुक्त व्यक्ती म्हणजे शरण शरणी.
 • पुढे मंगळवेढातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली व धर्म प्रसारासाठी श्रवणबेळगोळा, बसवकल्याण इत्यादी कर्नाटकातील प्रदेशात आले. तेथे त्यांचा लिंगायत धर्म बऱ्यापैकी रुजला होता.  
 • एकाच देवाची भक्ती करा, भूतदया बाळगा, प्रेमाने वागा, परोपकार करा, स्वकष्टावर जगा, अंधश्रद्धा सोडून द्या  अशी सहज साधी शिकवण त्यांनी जनसामान्यांना दिली.
 • संत बसवेश्वरांनी दया, अहिंसा, सत्य, सदाचार, नीती, शील इत्यादींचा प्रचार केला.
 • बसवेश्वरांनी वेगवेगळ्या जातीजमातीच्या लोकांमध्ये बंधुभाव आणि विचार स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली. त्यांनी कल्याण येथे निर्माण केलेली “शिवानुभवमंटप” म्हणजेच “अनुभवमंटप” हि संस्था जगाच्या धर्म इतिहासात अनन्यसाधारण संस्था आहे. वेगवेगळ्या जाती आणि व्यवसायातील शिवशरण भक्त तेथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत. त्यांच्या अनुभवमंटपातील चर्चेत पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियाही भाग घेत.
 • बसवेश्वराना पारंपारिक भारतीय समाजातील वर्णजाती उच्चनीचता व विषमता यांची प्रखर जाणीव झाली होती. म्हणूनच त्यांनी चातुर्वर्ण्याला आव्हान देऊन सर्व मानवांना समान मानले. त्यामुळे त्यांच्याजवळ सर्व वर्ण जाती मधील अनुयायी जमा झाले. त्यांनी आंतरजातीय रोटी आणि बेटी व्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले.
 • त्यांनी ब्राम्हण जातीच्या मधुवय्याच्या मुलीचे आणि चांभार जातीच्या हरळय्याच्या मुलाचे लग्न लावून दिले. त्यांनी शिवनागमय्या व ढोर काक्कय या अस्पृश्यांच्या घरी जाऊन भोजन केले होते.
 • बसवेश्वर यांनी बालविवाहाला विरोध केला तसेच विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता दिली.
 • सर्व मानव समान आहेत, याचा अर्थ स्त्री पुरुष हेही समान आहेत, असे त्यांचे मत होते. त्यामुळे स्त्रियांना धार्मिक स्वातंत्र्य मिळाले.
 • सदाचारी कायकनिष्ठ शरणांची तुकडी त्यांनी उभी केली. कष्टानेच शिवाची पूजा केली. कल्याणाच नव्हे तर कल्याणच्या आसपास, संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारतात, इराण-इराक अफगानिस्तान पर्यंत बसवेश्वराचा विचार जाऊन पोहोचला.  

संत बसवेश्वर यांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम

 • महात्मा बसवेश्वरांच्या शरण चळवळीमध्ये अतिशय शुद्र समजल्या जाणाऱ्या जातीतून लोक सहभागी झाले.
 • वेश्या बसवांच्या विचाराने प्रभावित होऊन शरणी झाल्या आणि पूर्वाश्रमीचा व्यवसाय आणि पूर्वाश्रम सोडून पुण्यांगना झाल्या.
 • चोर, लुटारू, दरोडेखोर यांनी सर्वांनी आपले दुष्कृत्य सोडून शरण बनले. सर्वजण दुष्कर्मे सोडून सदाचारी बनले.
 • दारू विकणारा हेडद मारय्या वाटसरुंच्या सेवेसाठी पाणी, दुध आणि ताक विकायला लागला.
 • काश्मीरहून बसवांना मारण्यासाठी आलेला चीक्कया नावाचा हत्यार्याने शरणांचा वर्तन पाहून हत्या करण्याचा व्यवसाय सोडून दिला.
 • राजवैभवात वाढलेली काश्मीरची राजकन्या शरणी होऊन कल्याणमध्ये गुहेत राहू लागली.

महात्मा बसवेश्वरांनी ऐतखाऊ लोकांना कष्टाचे महत्त्व समजावून सांगून त्यांचे मनपरिवर्तन केले. “कायकाकवे कैलास”, श्रम हाच ईश्वर (स्वर्ग) आहे हा मूलमंत्र भारतीय अर्थव्यवस्थेला दिला. श्रमाला, कायकाला मानाचे, सन्मानाचे स्थान प्राप्त करून दिले. त्यांनी १२ व्या शतकात श्रमजीवी समाजाची निर्मिती केली. त्यामुळे दिवसभर कष्ट करून शरण संध्याकाळी अनुभवमंटपात एकत्र येत. 

महात्मा बसवेश्वर वचन / बसवेश्वर महाराज वचन

सुंदर आचरण असणाऱ्या व्यक्तीची सुंदर वचने आहेत. वचने हे एक अनुभवजन्य साहित्य आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, पुरोहीतशाही, काल्पनिक धर्मग्रंथ, जातीभेद, स्त्रीदास्य, श्रम इ. अनेक विषयांवर प्रहार करणारे क्रांतिकारक विचार वचनात आहेत. त्यातील काही वचने खाली आहेत,

“भक्तांसाठी दहा बोटाची मेहनत, गणना महाभक्त होण्यासाठी, परी तुझे पोट भरणार नाही, भार होणार तू भूमंडळी, त्यात दोन्ही हाताने परिश्रम तू करी, मिळेल भाकरी सर्वालागी, मोलीगे मारय्या असुनी राजा थोर, श्रम भरपूर केले त्याने, कुडलसंगमदेवा कायक जो करील, त्याला तारील देव माझा.”

“हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा असे नच म्हणवावे | हा आमुचा, हा आमुचा, हा आमुचा असेचि वदवावे | कुडलसंगमदेवा तुमच्या घरचा पुत्र म्हणावे |”

“सदन बांधती देवालय, देवा गरिब मी काय करू || देहच माझे देवालय, देवळाचे खांब माझे पाय || मस्तक हे सुवर्णकलश, स्थावर पावे नाश || जंगम हे अविनाश, जाणा कुडलसंमेशा ||”

“लोकांचे दोष, तुम्ही का सुधारू पाहता? आपआपली तनु आधी शांत करा | आपापले मन आधी शांत करा | शेजाऱ्याशी पाहुनी रडता कशाला || कुडलसंगमदेव भाळणार नाही | अंशाचे केवळ रडणे पाहता |”

“दिसेल त्याला पति म्हणणाऱ्या कुलटेला, पतिव्रता, सज्जन कसे म्हणता येईल ? लिंगप्रसाद सेवन करुन अन्य देवतांची, स्तुती करणाऱ्या दांभिकासाठी आमच्या कुडलसंगमदेवाने नरक निर्माण केला आहे |”

“ज्याने आपल्या घामाने ही काळी माती भिजवली, कष्ट उपसलेत पोटासाठी आयुष्यभर, अखंड श्रमाने ज्याने आपला देह राबविला, ज्याने आपले तन, मन, श्रमपूर्वक झिजवले, श्रमाची पूजा

करुन ज्याने शिवाची पूजा केली, श्रमिकांच्या झोपडीला जो कैलास मानतो. ज्याची कथनी तशी करणी असे कूडलसंगमदेवा, तोची जगदगुरु झाला ||”

“मी विषारी सापाला घाबरत नाहि, मी अग्नीच्या धगधगत्या ज्वालांना घाबरत नाही, मी तलवारीच्या धारेला घाबरत नाही, पण मी परधन, परस्त्रीच्या स्पर्शाला घाबरतो कुडलसंगमदेवा|”

संत बसवेश्वर महाराज समाधी

बसवेश्वराना त्यांचे जीवितकार्य पूर्ण झाल्याची भावना निर्माण झाल्यावर, ज्या कुंडलसंगमामुळे आपण ईश्वरी इच्छाशक्तीचे साधन बनलो त्या कुंडलसंगमाकडे गे पाहिजे असे त्यांना वाटले. इ.स. ११६७ मध्ये वयाच्या ६६ व्या वर्षी संत महात्मा कुडलसंगम येथील संगमेश्वराशी एकरूप झाले. कर्नाटक सरकारने कृष्णा आणि मलप्रभा नदीच्या संगमावर संत महात्मा बसवेश्वरांची समाधीस्थळ उभारले आहे.

आम्ही दिलेल्या mahatma basaveshwar information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant mahatma basaveshwar information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about sant mahatma basaveshwar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर mahatma basaveshwar in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!