मी पाहिलेला अपघात मराठी निबंध Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi

Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन आज आपण या लेखामध्ये मी पाहिलेला अपघात या विषयावर निबंध लिहिणार आहे. अपघात म्हणजे कोणाच्या नजरचुकीमुळे, नियमांचे पालन न केल्यामुळे, त्या गोष्टीविषयी ज्ञान नसताना त्याचा वापर केल्यामुळे किंवा आपण वापरत असलेल्या यंत्रामध्ये काही बिघाड झाल्यानंतर त्यातून आर्थिक किंवा मानवाच्या जीवाचे नुकसान होते त्याला अपघात म्हणतात. अपघाताचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत ते म्हणजे औद्योगिक करणामध्ये मोठ मोठ्या मशिनरी वापरल्या जातात आणि तेथे देखील अनेक अपघातात होतात तसेच वाहनांची एकमेकाला धडक लागून तसेच गाडी चालवताना इतर काही चुकांच्यामुळे भीषण अपघात होतात आणि त्याला रस्ता अपघात म्हणतात.

सध्या बगायला गेले तर रोज कोठे ना कोठे अपघात झाला आहे असे आपल्याला ऐकायला मिळते किंवा आपण रस्त्यावरून जात असताना आपल्या समोरच अपघात होतो. अपघात हा बहुतेकदा माणसांच्या चुकीमुळेच होतात जर लोकांनी लक्ष देवून आणि सर्व नियमांचे पालन करून जर गाड्या चालवल्या तर अपघाताचे प्रमाण खूप कमी होयील आणि अपघातामुळे लोकांचे जीव जाणार नाहीत. अपघात होण्यासाठी अनेक कारणे आहेत आणि त्यामधील एक सामान्य कारण म्हणजे अतिवेग.

mi pahilela apghat short essay in marathi
mi pahilela apghat short essay in marathi

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध – Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi

Mi Pahilela Apghat Essay in Marathi

आपण कोठेही जाताना सरास पाहतो कि रस्त्यावरून गाडी चालवत जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा वेग हा खूप असतो आणि जर त्या व्यक्तीला अडचणीमध्ये त्याच्या गाडीचा वेग हाताळता आला नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर गाडी चालवत असताना जर चालकाचे मन विचलित झाले तर किंवा त्याची नजरचूक झाली तर मोठे अपघात होऊ शकतात म्हणून चालकाने आपले पूर्ण लक्ष गाडी चालवण्याकडे देवून गाडी चालवली पाहिजे त्यामुळे अपघात होणार नाहीत.

तसेच गाडी चालवणारा चालक मध्यपान करून जर गाडी चालवत असेल तर भीषण अपघात हिण्याची शक्यता असते तसेच चालकाने नियमाचे पालन न करता गाडी चालवत असेल तर देखील अपघात होतात. काहीजण मोबाईल वर बोलत गाडी चालवत असतात आणि या कारणामुळे एखील बरेचसे अपघात झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपण गाडी चालवताना सर्व नियमांचे पालन करून, तसेच आपले सर्व लक्ष गाडी चालवण्याकडे केंद्रित करून आणि थोडा वेग कमी करून गाडी चालवली तर ते खूप फायद्याचे ठरेल आणि रस्ता अपघात होणे खूप कमी होतील.  

भारतामध्ये तसेच आपण रोज येत जात असलेल्या भागामध्ये किंवा रस्त्यावर अनेक अपघात होता असतात आणि तसेच मी एक दिवस सकाळी लवकर आवरून ऑफिसला जात होते आणि मी रोज ऑफिसला बसने जात होतो पण त्या दिवशी मी माझी बाईक घेवून ऑफिसला जात होतो आणि माझे ऑफिस हे माझ्या घरापासून १० ते ११ किलो मीटर अंतरावर आहे मी बाईक मध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल घातले आणि ऑफिसला जाण्यासाठी निघालो.

मी गाडीवरून जाताना खूप कमी वेगामध्ये जात होतो आणि घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर म्हणजे मी घरापासून निम्म्यापेक्षा जास्त अंतर गाठले होते. मी ऑफिसला ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्यावर खूप वर्दळ असते त्यामुळे रस्त्यावर गाड्यांचा वेग कमीच असतो. परंतु त्या दिवशी एक दुचाकी अतिशय वेगाने समोरून येत होती आणि त्याच्या दुसऱ्या बाजूने एक बस जात होती म्हणजेच मी ज्या बाजूने जात होतो.

त्याच बाजूने बस जात होती पण बस खूप पुढे होती आणि बसचा देखील वेग होता आणि दुचाकीस्वार वळण घेवून वेगाने आला होता आणि त्याला बस दिसताच त्याच्या बाईकचा वेग कंट्रोल करता आला नाही, पंरतु बस चालकाने कसा बसा वेग कमी करून बस थांबवली होती पण बाईकवाल्याला गाडीचा वेग कमी करता न आल्यामुळे तो बसवर आदळली.

हे पाहता क्षणी मी गाडी थांबवली आणि रस्त्याच्या कडेला गाडी लावून तिकडे धाव घेतली आणि मी जाऊ पर्यंत तेथे रस्त्यावरून जाणारे खूप लोक जमले होते. गाडी वेगाने बसवर आदळल्यामुळे गाडीचा बुक्का उडाला होता आणि बाईक चालवणारा जागीच ठार झाला होता आणि पाठीमागे बसलेल्या व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाला होता तसेच त्याला डोक्याला थोडे लागले होते. तसेच हाताला देखील लागले होते आणि तो तडफडत होतातेथे असणाऱ्या काही धाडशी लोकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना बोलावले.

हे सर्व पाहायचे माझे धाडस होते नव्हते आणि मी पहिल्यांदाच प्रत्यक्ष डोळ्यांनी अपघात पहिला होता आणि त्यावेळी मला खूप भीती वाटत होती तरी देखील मी त्या तडफडणाऱ्या व्यक्तीच्या जीवनदानासाठी देवाकडे प्रार्थना कारण होतो. तितक्यात रुग्णवाहिका आली आणि बाईक स्वारांना रुग्णवाहीकेमध्ये घातले आणि दवाखान्यामध्ये नेले. बसला काही झाले नव्हते तसेच बस चालकाला किंवा बसमधील कोणत्याच प्रव्याष्याला काही झाले नव्हते.

रस्त्यावर पडलेले रक्त स्वच्छ केले तसेच गाडीच्या पडलेल्या काचा आणि इतर पडलेले समान काढून वाहतुकीसाठी रस्ता साफ करून दिला आणि वाहतूक सुरु झाली पण अपघात बघितल्यानंतर माझे मन खूप अस्वस्थ झाले होते त्यामुळे मी ऑफिसला न जाता घरी गेलो आणि त्यावेळी घरातल्यांनी विचारले का परत आलास म्हणून त्यावेळी मी घडलेले सर्व हकीकत सांगितली. घरी बसल्यानंतर सतत तेच आठवत होते आणि तो विचार डोक्यातून जातच नव्हता आणि मनामध्ये त्याला अपघात झालेल्या व्यक्तींचा विचार येत होता कि त्यांना हे ऐकल्यावर काय वाटत असेल त्यांना किती दुख झाले असेल तसेच पाय फ्रॅक्चर झालेला व्यक्ती बरा असेल का अशी अनेक प्रश्न मनामध्ये येत होते.

तसेच त्या दिवशी रात्री या सर्व विचाराने झोप देखील लागली नव्हती पण सकाळी ऑफिस ला जायचे होते कारण मी त्या दिवशी अपघात पाहिल्यामुळे मन अस्वस्थ झाल्यामुळे ऑफिस चुकवले होते. मी त्या जागेवरून जाताना मला त्या अपघाताची रोज आठवण होत होती असे १० ते १५ दिवस झाले आणि जस जसे दिवस सरत गेले तस तशी माझ्या मनातील भीती निघून गेली.

पण मला समजत नाही कि लोक येवढ्या वेगाने गाडी का चालवतात ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येईल आणि त्यामुळे आपल्या कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळतील. ज्यांना कुटुंबाची आणि आपल्या जीवाची काळजी आहे त्यांनी कृपाकरून गाडी चालवताना संपूर्ण लक्ष देवून, वेगावर नियंत्रण ठेवून आणि नियमांचे पालन करून चालवावी तसेच गाडी चालवणाऱ्या सर्व लोकांनी गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवून आणि नियमांचे पालन करून गाडी चालवली तर होणारे भीषण अपघात टळतील.

सरकार देखील रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच रस्ता सुरक्षा उपाय केले आहेत ते म्हणजे ट्रॅफिक पोलीस यंत्रणा, तसेच अरुण आणि नागमोडी वळणावर दिशादर्शवणारे किंवा पुढच्या धोक्याबद्दल माहिती देणारे बोर्ड, ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा, एकाच वेळी अगदी सहजपाने दोन वाहने जातील असा लांब रस्ता तसेच रस्ता उंच असेल तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला कठडे असावे. अश्या प्रकारे वेगवेगळे उपाय करून भारत सरकार रस्ता अपघात कमी करण्याचे प्रयत्न करत आहे त्याला लोकांनी देखील चांगला प्रतिसाद देवून अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत करावी.

आम्ही दिलेल्या mi pahilela apghat short essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mi pahilela apghat essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Mi pahilela apghat nibandh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mi pahilela apghat essay in marathi short Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!