पोलीस माझा अभिमान निबंध Police Nibandh in Marathi

Police Nibandh in Marathi पोलीस माझा अभिमान मी पोलीस झालो तर मराठी निबंध पोलिसांचे मनोगत निबंध मराठी पोलिस हे नाव घेतल्यावर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर काय उभ राहत? चित्रपट, मालिकांमध्ये दाखवलेला, राजकारणी लोकांच्या दारावरील पाळीव प्राणी / खाकीची भीती भाबड्या जनतेला दाखवून गुन्हेगारी लोकांना पाठीशी घालणारा सरकारी माणूस. पण, खऱ्याखुऱ्या आयुष्यात पोलिस कसा असतो, तो जनतेसाठी, आपल्या देशासाठी काय करतो, किती मेहनत घेतो हे आपण कधी पाहिलंय का ? की पोलिसांबद्दल आपण आपल्याच सोयीची मत बनवलेली आहेत ?  

पोलिसांना चांगलं म्हणावं अस कधीच कुणाला का वाटत नाही ? आपण नेहमी पोलिसांबद्दल अशी कठोर मत का तयार करतो ? कदाचित, आपल्यालाच पोलिसांचं जगणं काय असत हेच माहीत नाही किंवा काही वेळा आपल्याला आलेल्या कटु अनुभवातून आपण पोलिसांबद्दल ठाम मत निर्माण करतो. चला तर मग, आज आपण खाकितल्या देवमाणसाबद्दल जाणून घेऊया.

ऊन – वारा जाणत नाही,

थंडीस जुमानत नाही,

पाऊस – पुर, पाण्याला,

कसलाही मानत नाही,

करूनिया जीवाचे रान,

राबतो, पोलिस दादा ||||

police nibandh in marathi
police nibandh in marathi

पोलीस माझा अभिमान निबंध मराठी – Police Nibandh in Marathi

पोलीस निबंध मराठी – essay on police officer in marathi

देशात असलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांचे काम खूप कठीण असते. समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवणे, समाजातील सर्व नागरिकांची रक्षा करणे, अशी अनेक काम पोलिस करत असतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक आनंदाचे आणि उत्साहाचे मोठे उत्सव होत असतात.

अशा या उत्सवाच्या वेळी जातिभेद, धर्मभेद यावरून अनेक भांडणे, तंटे होताना दिसतात. त्यामुळे, विशेषतः अशा मोठ्या उत्सवांच्या,  मिरवणुकीच्या आणि मेळाव्याच्या वेळेस पोलिसांची आवश्यकता व सेवा खूप गरजेची ठरते. पोलिसांमुळे आपले जीवन अधिक शांत आणि सुरक्षित होते. पोलीस नसते तर समाजाला क्षणभर ही सुरक्षेची भावना आली नसती.

पोलिसांच्या भीतीमुळे आजकाल चोर हे चोरी करण्यासाठी घाबरु लागले आहेत. तसेच, पोलिसांच्या कडक नियमांमुळे चोरीचे प्रमाणही कमी झाले आहे. पोलिसांमुळे लोकांच्या मनातील असुरक्षिततेची भावना नष्ट होऊन सर्वजण आज मनसोक्तपणे वावरू लागले आहेत. पोलिसांमुळे सगळीकडच वातावरण शांत आणि आनंदी झालेल आपल्याला दिसून येत.

पोलिस हा एकमेव असा माणूस आहे, ज्याला सण – उत्सवांमध्ये आपल्या कुटुंबासोबत, नातेवाईकांसोबत आनंद साजरा करता येत नाही, उलट  दहशतवादी, धर्मवादी लोकांच्या बंदोबस्तासाठी ऊन, वारा, पाऊस यांना सामोरे जावं लागतं. गळ्यातल्या सोन्या – चांदीच्या साखळ्या चोरणाऱ्या भुरट्या चोरांपासून ते आंतरराज्य किडनीची तस्करी करणाऱ्यांपासून पोलीसच आपले संरक्षण करत असतात.

दारू पिऊन बायकोला मारहाण करणाऱ्या नवरोबापासून ते बॉम्बस्फोट घडवून आणून निष्पाप जीवांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांपर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या पोलिसांवरच असतात. फुटबॉल मैदानातील गोल किपर प्रमाणे पोलिसांची अवस्था आहे अस म्हणता येईल. समोर हजारो प्रश्न उभे आहेत, गोल अडवला तर कर्तव्यदक्ष आणि नाही अडवला तर निष्क्रिय अस एकाच नजरेतून त्यांच्याकडे पाहिलं जात.

अशा कित्येक जबाबदाऱ्या डोक्यावर असणाऱ्या पोलिसांना मिळणारा मोबदला किती असेल? पोलिसांना पुरेसा पगार नाही, राहण्याची पुरेशी सोय नाही आणि आदराची वागणूक तर नाहीच नाही. आपल्यातील कित्येक लोक त्यांच्यावर हात उगरताना, दगडफेक करताना दिसतात शिवाय, त्यांच्याबद्दलची मत वेगळीच !

पोलिसांचे वर्षातील बरेच दिवस राजकारणी नेत्यांच्या सभा, जनतेचे मोर्चे, आंदोलन, धार्मिक सण – उत्सव यांच्या बंदोबस्तात जातात. डोळ्यात तेल घालून जनतेच्या संरक्षणेची जबाबदारी त्यांना पेलावी लागते. कुटुंबापासून दूर राहून त्यांना त्यांची स्वतःची कामे पार पाडावी लागतात. आपली मुले काय शिकतात? त्यांचे मित्र – मैत्रिणी कोण?

त्यांना कोणत्या गोष्टीत आवड आहे, हे पाहण्यासाठी त्यांना वेळ तरी भेटतो का? आपल्या मुलाबाळांना, आईवडिलांना, बायकोला वेळ तरी देता येतो का? असे अनेक त्याग करून पोलिस आपल्या सेवेसाठी तत्पर उभे राहतात. कायद्याचे पालन काटेकोरपणे होण्यासाठी, आपली कर्तव्य व्यवस्थित पार पाडत असताना. खरंतर, त्यांच्याशी उद्धटपणा करणारे, वाद घालणारे, प्रसंगी पैशांचे आमिष दाखवणारे आपणच आहोत, याचाही आपण कुठंतरी विचार केला पाहिजे.

गुंडांना लोकशाही मार्गाने आपणच निवडून देतो आणि पोलिसांनी त्यांच्या जरा मागेपुढे केलं की, आपण पोलिसांना दोष देतो, त्यांच्यावर टिका करतो हा कुठला न्याय? निवडणूक जिंकण्यापूर्वी कंगाल असलेले काही नेते पुढच्या पाच वर्षात कोट्याधीश कसे होतात, याचा जाब तरी आपण त्यांना कधी विचारतो का? पण, पोलिसांनी शंभराची नोट खिशात घातल्याच मात्र आपण मोठ्या तावातावाने सांगतो.

आपण जेंव्हा आपल्या कुटुंबासोबत घराबाहेर पडतो, तेंव्हा एक माणूस आपल्या कुटुंबाला सोडून आपल्या संरक्षणासाठी धडपड करत असतो, अशा माणसाचे ऋण फेडण्यासाठी साधे प्रेमाचे चार शब्द ही आपल्याजवळ नसतात.

कोरोनासारख्या महामारीतसुद्धा कोरोनाला घाबरून सगळे घरी बसलेले असताना, पोलिस मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून आपली ड्युटी करत होते. कुणी विनाकारण बाहेर पडतंय का? दुकाने, हॉटेल बंद आहेत का? अशा अनेक जबाबदाऱ्या ते पार पाडत होते. आपलं संरक्षण करत असताना अनेक पोलिसांनी कोरोनामुळे आपला जीव ही गमवला, मात्र आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवली नाही.

कधीही सुट्टी ज्यांना मिळत नाही त्या पोलिसांना कोरोनाने मात्र सुट्टी दिली, खरंतर ही सुट्टी म्हणजे मौज – मज्जा करायची सुट्टी नाही तर, स्वतःचा जीव वाचवण्याची धडपड. या सुट्टीत पोलिसांना त्यांच्या साहेबाची ऑर्डर नाही, कुणाला शिक्षा देणे नाही, कुणाची सुनावणी नाही, दिवस – रात्र बाहेर राहणं नाही, की रस्त्यावर झोपणं नाही.

खरंतर, पोलिसांना एक किंवा दोन दिवसांची सुट्टी मिळणही कठिण. पण, या कोरोनामुळे त्यांची कायमची सुट्टी झाली. आज हॉस्पीटलमध्ये कितीतरी पोलिस आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस मोजताना दिसत आहेत. हॉस्पिटलमधल्या गादीवर लागणाऱ्या झोपेपेक्षा डांबरी रस्त्यावर लागणारी झोपच छान होती, दिवसभर वडापाववर राहणाऱ्या पोलिसांना आज हॉस्पिटलमध्ये मिळणार पूर्ण जेवण नको वाटतंय, सतत ऐकू येणाऱ्या अंबुलन्सच्या सायरनच्या आवाजापेक्षा, पोलिस व्हॅनचा सायरन त्यांच्यासाठी चांगला होता.

पूर्ण शहरभर राऊंड मारणाऱ्या पोलिसांना कधी स्वतःच्या घराभोवती राऊंड मारायला वेळच मिळाला नाही. तरीही, या पोलिसांना एकच खंत वाटते की अजून थोड आयुष्य मिळालं असत तर, त्यामध्ये त्यांना लोकांची काळजी घेता आली असती.

” सगळ्या जनतेचे करताना संरक्षण,

पोलिस स्वतःच नाही राहिले भक्कम.

अशावेळी कोण येईल का?

करायला त्यांचे रक्षण! “

आज आपण सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करायला हवी. रोज आपल्यासाठी खस्ता खाणारे कित्येक पोलिस आज मृत्यूच्या दारात उभे आहेत.  अशा अनेक जीवघेण्या प्रसंगात पोलिस पुढे असतात. पोलिस आपल्या देशाचा एक देवमाणूस आहे, जो देशभक्ती मनात ठेवून आपल्या देशाची सेवा करीत असतो. आज पोलिस आपल्या देशाची सेवा करतात म्हणून आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित आहोत.

ज्याप्रमाणे सैनिक सीमेवर राहून विदेशी शत्रूपासून आपल्या देशाचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे पोलिस राष्ट्रातील सर्व अडचणी सोडवण्यात आपली मदत करतात. पोलिस आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहेत. आपल्याला आपल्या देशातील पोलिसांचा सार्थ अभिमान वाटायला हवा. पोलिसांच्या योग्य व्यवस्थापनामुळे सर्वजण व्यवस्थित आणि सुरक्षित रस्ता ओलांडू शकतात आणि अपघातातून वाचतात.

पोलिस नसते तर मोठ्या शहरांमध्ये दिवसभरात कित्येक अपघात झालेल्या दुर्घटना ऐकायला आल्या असत्या. वाहतुकीचे नियंत्रण पोलिसांमार्फत योग्य ते होतेच, त्यासोबतच लोकांच्या जीवनाचे आणि संपत्तीचे संरक्षण पोलीस करतात.

आजकाल चोर, दरोडेखोर, व्यसन करणारे आणि जुगारी यांसारख्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, अशा लोकांपासून ओढवणाऱ्या संकटापासून आपली सुटका करण्याचे काम पोलीस करतात. देशाच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिस पकडतात. अशी अनेक काम ते नित्यमानाने करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे, आज प्रत्येकाने पोलिसांबद्दल मनात आदर आणि प्रेम निर्माण करायला हवे.

             –  तेजल तानाजी पाटील

                  बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या police nibandh in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “माझा आवडता मित्र निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on police officer in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि police essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण essay on police in marathi या लेखाचा वापर me police adhikari zalo tar essay in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “पोलीस माझा अभिमान निबंध Police Nibandh in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!