Microsoft Excel Information in Marathi – Excel Meaning in Marathi एक्सेल विषयी माहिती आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी ऑफिसमध्ये किंवा आपल्या उद्योग धंद्यामध्ये काही हिशोब ठेवण्यासाठी किंवा ऑफिस मधील काही रेकॉर्ड ठेवण्यासाठी संगणकाची गरज असते आणि या संगणकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर असतात जसे कि मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड डॉक्युमेंट, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट प्रेसेंटेशन आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल इत्यादी. ऑफिस च्या कामामध्ये जास्तीत जास्त रेकॉर्डसाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल या सॉफ्टवेअर चा जास्त प्रमाणात उपयोग करतात. मायक्रोसॉफ्ट एक्सेल या सॉफ्टवेअरचा उपयोग माहिती विश्लेषण आणि दस्ताऐवज करण्यासाठी खूप महत्वाचे आहे.
हा एक स्पेडशीटचा एक प्रोग्रॅम आहे ज्यामध्ये असंख्य स्तंभ (columns) आणि पंक्ती (rows) असतात. या मध्ये आपण माहिती रेकॉर्ड करून ठेवून आपल्याला ज्यावेळी त्या माहितीची गरज आहे त्यावेळी आपण ती पाहू शकतो. हा एक असा प्रोग्रॅम आहे ज्यामध्ये आपण माहितीचे रेकॉर्ड अगदी सुटसुटीत पाने करू शकतो.
एक्सेल हा एक प्रोग्रॅम आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्य पार पडू शकतो जसे कि आकडेवारीचा गणना करण्यासाठी, माहितीचे विश्लेषण करण्यासाठी, मुख्य सारण्य तयार करण्यासाठी आणि माहिती चार्ट आणि आलेखच्या स्वरूपामध्ये भरण्यासाठी अश्या वेगवेगळ्या कारणांसाठी एक्सेल हा प्रोग्रॅम वापरला जातो.

मायक्रोसॉफ्ट एक्सेल मराठी माहिती – Microsoft Excel Information in Marathi
एक्सेल म्हणजे काय – Excel Meaning in Marathi
मायक्रोसॉफ्ट एक्सेल या सॉफ्टवेअरचा उपयोग माहिती विश्लेषण आणि दस्ताऐवज करण्यासाठी केलेला एक महत्वाचा, उपयुक्त आणि शक्तिशाली प्रोग्रॅम आहे. ऑफिस च्या कामामध्ये जास्तीत जास्त रेकॉर्डसाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल या सॉफ्टवेअर चा जास्त प्रमाणात उपयोग करतात. हा एक स्पेडशीटचा एक प्रोग्रॅम आहे.
ज्यामध्ये असंख्य स्तंभ (columns) आणि पंक्ती (rows) असतात. या मध्ये आपण माहिती रेकॉर्ड करून ठेवून आपल्याला ज्यावेळी त्या माहितीची गरज आहे त्यावेळी आपण ती पाहू शकतो.
- नक्की वाचा: मायक्रोसॉफ्ट ऑफिस परिचय
एक्सेलचा वापर का केला जातो ?
एक्सेल हा प्रोग्रॅम लोक वेगवेगळ्या कारणांसाठी वापरतात. काहीजण या प्रोग्रॅमचा वापर खर्चाचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी वापरतात, बहुतेकदा ऑफिसमध्ये या प्रोग्रॅमचा उपयोग अटेंडंस रेकॉर्ड ठेवण्यासाठी किंवा सॅलरी शीट ठेवण्यासाठी केला जातो. मायक्रोसॉफ्ट एक्सेल च वापर सामान्यता आकडेवारीचा गणना करण्यासाठी, माहितीचे विश्लेषण करण्यासाठी, मुख्य सारण्य तयार करण्यासाठी आणि माहिती चार्ट आणि आलेखच्या स्वरूपामध्ये भरण्यासाठी होते.
संगणकामध्ये मायक्रोसॉफ्ट एक्सेल कसे सुरु करावे ?
जर तुमच्या संगणकामध्ये जर मायक्रोसॉफ्ट एक्सेल आधीपासूनच इंस्टॉल केलेले असेल तर तुम्ही संगणकाच्या स्टार्ट या मेनूवर जाऊन हा प्रोग्रॅम उघडू शकता किंवा मग संगणकामध्ये किंवा तुमच्या लॅपटॉप वरील लेफ्ट क्लिक करा. लेफ्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही पर्याय दिसतील.
त्या पर्यायांवरील new या पर्यायावर गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे पर्याय दिसतील जसे कि मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड डॉक्युमेंट, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट प्रेसेंटेशन आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल इत्यादि, त्यामधील मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा पर्याय निवडा. त्यामध्ये तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये कोणत्याही माहितीचे रेकॉर्ड करू शकता.
- संगणकामध्ये किंवा तुमच्या लॅपटॉप वरील लेफ्ट क्लिक करा.
- लेफ्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही पर्याय दिसतील त्या पर्यायांवरील new या पर्यायावर जा.
- new या पर्यायावर गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे पर्याय दिसतील जसे कि मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड डॉक्युमेंट, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट प्रेसेंटेशन आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल.
- त्यामधील मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा पर्याय निवडा.
एक्सेलचे वापर कसा करता येतो ?
मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा वापर सामान्यता आकडेवारीचा गणना करण्यासाठी, माहितीचे विश्लेषण करण्यासाठी, मुख्य सारण्य तयार करण्यासाठी आणि माहिती चार्ट आणि आलेखच्या स्वरूपामध्ये भरण्यासाठी होते. मायक्रोसॉफ्ट एक्सेल या प्रोग्रॅम मध्ये प्रत्येक स्तंभ (columns) आणि पंक्ती (rows) वेगवेगळ्या प्रकारे बदलल्या जाऊ शकतात आणि आपल्याला हव्या तश्या adjust करू शकतो.
एक्सेल मध्ये जर आपण टेबल तयार केला असेल तर त्या टेबलला वेगवेगळ्या प्रकारचे रंग देऊ शकतो तसेच टेबलचे डिजाईन बदलू शकतो. तसेच यामध्ये संख्या आणि तारखेचे स्वरूप, मजकूर फॉन्ट, मांडणी आणि आकार या सारख्या सर्व गोष्टी आपण करू शकतो.
मायक्रोसॉफ्ट एक्सेल या प्रोग्रॅममधील घटक
मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे वापरण्याअगोदर या प्रोग्रॅमचे वेगवेगळे घटक कोणकोणते असतात आणि त्याचा एक्सेल शीट वापरताना कसा उपयोग होतो ते खाली पाहूयात.
स्तंभ (columns)
स्तंभ म्हणजे एक्सेलच्या वर्कशीट मध्ये एक उभा संच असतो त्याला स्तंभ (columns) म्हणतात म्हणजेच एकाच वर्कशीटमध्ये एकूण १६३८४ स्तंभ असतात.
सक्रिय सेल
सक्रीय सेल म्हणजे आपण ज्यावेळी एक्सेल मध्ये काम करत असतो त्यावेळी एक निवडलेला सेल असतो त्याला सक्रीय सेल म्हणतात. सक्रीय सेल हा आयताकृती बॉक्सद्वारे हायलाइट केले जातो आणि त्याचा पत्ता अॅड्रेस बारमध्ये दर्शविला जातो.
पंक्ती (rows)
पंक्ती म्हणजे एक्सेलच्या वर्कशीट मध्ये एक अडवा संच असतो त्याला स्तंभ (columns) म्हणतात. एक वर्कशीटमध्ये १०४८५७६ एकूण पंक्ती असतात आणि १ ते १०४८५७६ पर्यंत सुरू होणाऱ्या ओळीसाठी प्रत्येक पंक्तीचा स्वतःचा क्रमांक असतो.
अॅड्रेस बार (address bar)
अॅड्रेस बारचे काम हे सक्रीय सेलचा पत्ता दर्शवण्याचे असते आणि जर एक्सेल मध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त सेल निवडले असतील तर त्यामधी पहिल्या सेलचा पत्ता अॅड्रेस बार मध्ये दर्शविला जातो.
शीर्षक बार (title bar)
शीर्षक बाराचे काम कार्यपुस्तिकेचे नाव दर्शविणे हे असते.
फॉर्म्युला बार (formula bar)
फॉर्म्युला बार हे सक्रिय सेलची सामग्री दर्शवते आणि जर आपल्याला सेलमध्ये सूत्र घालायचे असल्यास देखील फॉर्म्युला बारचा वापर केला जातो.
फाइल मेनू मध्ये आपण सेव्ह, सेव्ह अॅज, एक्सेल ऑप्शन्स, न्यू, प्रिंट आणि शेअर यासारखे अनेक पर्याय फाइल मेनू मध्ये असतात आणि हा मेनू सर्व प्रोग्रॅमचा एक सामान्य मेनू आहे.
स्टेटस बार (status bar)
एक्सेल विंडोच्या खाली एक पातळ बार असतो त्याला एक्सेल बार म्हणतात आणि एकदा आपण एक्सेलमध्ये काम करणे सुरू केल्यास हा स्टेटस बार त्वरित मदत देईल.
Excel Formulas in Marathi Pdf
आम्ही दिलेल्या excel information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मायक्रोसॉफ्ट एक्सेल माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या computer excel information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि excel basic information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये excel in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
” हा डबल inverted comma का वापरला जातो l, त्याचा उपयोग का होतो
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ..!
You should right Rows instead of columns in Rows point.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ..!!