महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC Information in Marathi

midc information in marathi – midc meaning in marathi महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवते आणि एमआयडीसी हि एक प्रकारची योजना जी उद्योग क्षेत्राशी संबधित आहे. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योगासाठी किंवा औद्योगिक क्षेत्रासाठी जागा राखीव ठेवली जाते जेणे करून जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणी अनेक उद्योग सुरु करता येतील. एमआयडीसी चे पूर्ण स्वरूप महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ (maharshtra industrial development corporation) असे आहे.

या योजनेची सुरुवात १ ऑगस्ट १९६२ मध्ये औद्योगिक विकास महामंडळ म्हणून झाली होती नंतर त्याचे नाव बदलून महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ असे करण्यात आले. एमआयडीसी हा आपण वर सांगितल्याप्रमाणे एक सरकारी मालकीचा उपक्रम आहे.

आणि राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या उद्योग क्षेत्राला मदत करण्यासाठी आणि ते चांगल्या प्रकारे चालण्यासाठी त्याला चालना देण्यासाठी हा उपक्रम महाराष्ट्र सरकारने सुरु केला आहे.

यामध्ये या योजनेच्या मार्फत पायाभूत सुविधा, भूसंपादन, अनेक वेगवेगळ्या उद्योगांची स्थापना आणि व्यापार सुविधा या सारख्या अनेक आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देणाऱ्या सुविधा या ठिकाणी एकाच छताखाली पुरवल्या जातात त्यामुळे एखाद्या व्यक्तीला सुलभपणे उद्योग करण्यास मदत होते.

चला तर खाली आपण एमआयडीसी काय आहे, त्याचा इतिहास, ती सुरु करण्याचा हेतू आणि त्याचे फायदे काय आहेत या सर्व संकल्पनांच्या विषयी खाली आपण सविस्तरपणे माहिती घेवूया.

midc information in marathi
midc information in marathi

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ – MIDC Information in Marathi

क्षेत्राचे नावएमआयडीसी (MIDC)
स्थापना१ ऑगस्ट १९६२
MIDC Full Form Marathi – पूर्ण स्वरूपमहाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ (maharshtra industrial development corporation)

एमआयडीसीचा इतिहास – history

सुरुवातीला महाराष्ट्र राज्य स्थापणेनंतर १९६० मध्ये श्री यांच्या अध्याक्षते खाली औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. मग त्यानंतर उद्योग विकासाला प्राप्त झालेल्या समित्यांची शिफारस घेण्यात आली आणि बोरकर समितीने या मंडळाला अशी शिफारस केली कि उल्हास खोऱ्यामध्ये पाणी पुरवठा चांगल्या प्रकारे करण्याची जबाबदारी हि या मंडळाला दिली.

आणि त्यावेळी औद्योगिक विकास महामंडळाने एक कायदा बनवून तो राज्याच्या कायद्यासमोर मांडला आणि हा कायदा १९६२ मध्ये विकास कायदा म्हणून मंजूर झाला आणि त्यावेळी पासून महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाला एक वेगळी ओळख मिळाली.

पुढे महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने घेतलेल्या अनेक निर्णयामुळे राज्याच्या आर्थिक परीस्थीतीमध्ये देखील बदल पहायला मिळाला तसेच एमआयडीसीने नंतर एमआयडीसीने उद्योगांच्यासाठी अनेक सुविधा पुरवल्या आणि त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक उद्योग चालवण्यासाठी मदत झाली.

एमआयडीसी उदिष्टे किंवा हेतू – objectives

कोणत्याही संस्थेची स्थापना हि समोर काही हेतू ठेऊन सुरु केलेली असते आणि तसेच एमआयडीसीची स्थापना देखील काही हेतू ठेऊन स्थापन केली आहेत आणि खाली आपण एमआयडीसीची उदिष्टे काय आहेत ते पाहूया.

  • एमआयडीसीची हा एक महाराष्ट्र सरकारचा उपक्रम असून याचा मुख्य हेतू महाराष्ट्रातील उद्योगांना चालना देणे.
  • त्याचबरोबर महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ हे राज्यातील गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार करते.
  • त्याचबरोबर उद्योगाला चालना मिळाल्यानंतर उद्योगांच्या संधी देखील निर्माण होतात आणि हे उद्योगांच्या संधी निर्माण करणे हे देखील महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे एक महत्वाचे उदिष्ट आहे.
  • एमआयडीसी मध्ये कार्यरत असणाऱ्या उद्योगांना जर भांडवलाची गरज असेल तर त्यांना वित्तपुरवठा करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील उद्योग क्षेत्रांना चालना देऊन राज्याची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणे.

एमआयडीसीमध्ये समाविष्ट असणारी क्षेत्रे – covered areas

एमआयडीसी हि सर्वात मोठ्या विकास संस्थांपैकी एक असून महाराष्ट्र राज्यामध्ये १७ जिल्ह्यामध्ये १२०० हून अधिक एमआयडीसी प्रकल्प आहेत आणि खाली आपण एमआयडीसीमध्ये समाविष्ट असणारी काही क्षेत्रे पाहणार आहोत.

  • तोटा होत असलेल्या काही सार्वजनिक विभागामध्ये युनिट्सचे तर्कसंगतीकरण आणि परिवर्तन करणे तसेच मालमत्ता संपादन आणि विल्हेवाट करणे याचा देखील समावेश या योजनेमध्ये येतो.
  • कर्मचारी गटाचे तर्कसंगतीकरण आणि उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी लक्ष केंद्रित करून संरचेनेमध्ये सुधारणा करणे हे यामध्ये समाविष्ट आहे.
  • पायाभूत सुविधांचा विकास करणे तसेच नवीन उद्योगांना चालना आणि उद्योग चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि अश्या व्यवसायांना पाणी, रस्ते, वीज आणि दळणवळण या सारख्या सुविधा पुरवणे याचा समावेश या योजनेमध्ये आहे.
  • नवीन काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणाची तरतूद म्हणजेच यामध्ये व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांची तरतूद तसेच नोकरदारांच्यासाठी कौशल्य आणि प्रशिक्षण कार्यक्रम.
  • त्याचबरोबर यामध्ये लघुउद्योगासाठी अनेक पायाभूत सुविधा पुरवल्या जातात त्याचबरोबर वित्तपुरवठा सुलभ केला जातो आणि तांत्रिक साहाय्य देखील केले जाते.

एमआयडीसी क्षेत्रामध्ये औद्योगिक मालमत्तेची मालकी सिध्द करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – documents

एमआयडीसी क्षेत्रामध्ये जर आपली औद्योगिक मालमत्ता असेल तर ती आपलीच आहे. हे सिध्द करण्यासाठी आपल्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे आणि खाली आपण आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी पाहणार आहोत.

  • ना हरकत प्रमाण पत्र.
  • ताबा पावतीचे प्रत.
  • मूळ मालकीसाठी एमआयडीसी ऑर्डरची प्रत.
  • एमआयडीसी मूळ मालक आणि सध्याचे मालक यांच्यातील शेवटच्या लीज डीडची प्रत.
  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालन करण्यास मूळ संमती.
  • त्याचबरोबर सध्याच्या मालकाचे कायमस्वरूपी एसएसआय प्रमाणपत्र.
  • अंतिम इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र ज्यामध्ये बिल्डींग प्लॅन, इमारतीच्या आराखड्याला मान्यता, क्षेत्रफळाचे विवरण, भोगवटा प्रमाणपत्र, साईट प्लॅन, वार्षिक भाडेपट्टीची पावती इत्यादिक गोष्टींचा समावेश या प्रमानपत्रामध्ये असावा.

एमआयडीसी क्षेत्राचे फायदे – benefits

एमआयडीसी क्षेत्र हे एक महाराष्ट्र सरकारने सुरु केलेले एक क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामुळे औद्योगिक क्षेत्राला सुधारणा करण्यासाठी अनेक फायदे मिळाले आहेत आणि त्यामुळे क्षेत्र सुधारले आहे. खाली आपण एमआयडीसी क्षेत्राचे फायदे कोणकोणते आहेत ते पाहूया.

  • एमआयडीसी हे क्षेत्र हे उद्योगांच्या साठी पाणीपुरवठा, रस्ते, जमीन, ड्रेनेज सुविधा आणि पथदिवे या सारख्या अनेक पायाभूत सुविधा पुरवते.
  • एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी मदत करते आणि औद्योगिक घटकांच्या अधिक विकासामुळे राज्याचे अर्थव्यवस्थेमध्ये अधिक प्रमाणात वाढ होण्यास मदत झाली.
  • राज्यामध्ये अधिक प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आणि लोकांना काम मिळू लागले.
  • राज्याची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत झाली.
  • एमआयडीसीमुळे राज्याला औद्योगिक आणि व्यवसाय विकासासाठी अधिक अनुकूल बनवले त्याचबरोबर नवीन उद्योगांना आणि व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांना अधिक व्यवसायामुळे परकीयांच्याकडून गुंतवणूक आकर्षित होण्यास मदत झाली.
  • एमआयडीसीमुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग हे एकाच ठिकाणी सुरु करण्यासाठी मदत झाली आणि त्यामुळे सर्व पायाभूत सुविधा देखील एकाच ठिकाणी पुरवल्या जाऊ लागल्या.
  • त्याचबरोबर एमआयडीसी हे व्यावसायिक वातावरणासाठी अधिक अनुकूल ठरण्यास मदत झाली.

आम्ही दिलेल्या Midc information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या midc full form marathi या midc meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि maharashtra audyogik vikas mahamandal माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये midc information in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!