mlt course information in marathi एमएलटी कोर्स माहिती, सध्या विद्यार्थी आपले चांगले करिअर घडवण्यासाठी वेग एगल्या कोर्सच्या शोधात असतात आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी देखील वैद्यकीय क्षेत्राच्या संबधित कोर्स शोधत असतात आणि अश्याच विद्यार्थ्यांच्यासाठी एमएलटी हा कोर्स देखील एक उत्तम कोर्स आहे कारण हा कोर्स वैद्यकीय क्षेत्राशी संबधित आहे आणि आज आपण या लेखामध्ये एमएलटी (MLT) या कोर्सविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.
एमएलटी या कोर्सचे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप हे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नीशियन (medical laboratory technician) असे आहे आणि याला मराठीमध्ये वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून ओळखले जाते आणि हे तंत्रज्ञ हेल्थ प्रोफेशनल प्रयोगशाळा चाचण्या घेण्यामध्ये कुशल असतात आणि ते लक्षणे पाहून उपचार प्रक्रियेच्या सुरुवातीसाठी ते जबाबदार असतात आणि ते रोगाचे निदान करण्यासाठी, उपचार करण्यासाठी आणि त्या संबधित व्यक्तीचा आजार कमी करण्यासाठी ते जबाबदार असतात.
एमएलटी हा कोर्स झालेला व्यक्ती दवाखाने, डॉक्टरांची कार्यालये, खाजगी प्रयोगशाळा, आपत्कालीन केंद्रे आणि रक्तदाता केंद्रे अश्या वेगवेगळ्या ठिकाणी काम करू शकतात आणि अश्या व्यक्तींना महिन्याला १५ हजार ते २० हजार पर्यंत पगार मिळू शकतो.
एमएलटी हा एक डिप्लोमा प्रकारातील कोर्स आहे आणि या कोर्सचा कालावधी हा फक्त एक वर्षाचा आहे आणि हा कोर्स दोन सेमिस्टर मध्ये विभागलेला असून या दोन सेमिस्टरमध्ये वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. जर एखाद्या व्यक्तीला हा कोर्स करायचा असल्यास त्या व्यक्तीला प्रवेश प्रक्रिया द्यावी लागते आणि त्याची निवड हि गुणवत्तेच्या आधारावर देखील केली जाते.
एमएलटी कोर्स माहिती – MLT Course Information in Marathi
कोर्सचे नाव | एमएलटी कोर्स |
पूर्ण स्वरूप | वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ) |
कोर्सचा कालावधी | १ वर्ष (२ सेमिस्टर) |
कोर्सची फी | ५० हजार ते १ लाख पर्यंत |
एमएलटी कोर्सचे पूर्ण स्वरूप – mlt full form in marathi
एमएलटी याचे इंग्रजी मधील पूर्ण स्वरूप हे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नीशियन (medical laboratory technician) असे आहे आणि या कोर्सला मराठीमध्ये वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून ओळखले जाते.
एमएलटी कोर्स म्हणजे काय ?
एमएलटी कोर्स पूर्ण झालेले तंत्रज्ञ हे हेल्थ प्रोफेशनल प्रयोगशाळा चाचण्या घेण्यामध्ये कुशल असतात आणि ते संबधित व्यक्तीच्या रोगाचे निदान करणे, त्यावर योग्य तो उपचार करणे आणि त्या व्यक्तीचा रोगाचा धोका कमी करणे हे या एमएलटी तंत्रज्ञाचे काम असते.
एमएलटीसाठी पात्रता निकष – eligibility
कोणताही कोर्स करण्यासाठी त्या संबधित व्यक्तीला त्या सानास्थेने ठरवलेले काही पात्रता निकष असतात आणि ते त्या व्यक्तीला पूर्ण करावे लागतात तसेच जर एखाद्या व्यक्तीला एमएलटी हा कोर्स करायचा असेल तर त्या व्यक्तीने देखील योग्य ते पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत तरच त्या व्यक्तीला या कोर्ससाठी प्रवेश मिळू शकतो.
- जर एखाद्या व्यक्तीला हा कोर्स करायचा असेल तर त्या व्यक्तीने त्याचे १२ वीचे शिक्षण हे मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतून घेतले पाहिजे आणि त्याने हे शिक्षण भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, आणि इंग्रजी विषयांच्यासोबत घेतले पाहिजे आणि त्या व्यक्तीला यामध्ये कमीत कमी ५५ टक्के गुण तरी मिळालेले असले पाहिजेत.
- त्याचबरोबर राखीव वर्गासाठी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, आणि इंग्रजी विषयांच्यासोबत १२ वीचे शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे आणि त्या संबधित व्यक्तीला १२ वी मध्ये कमीत कमी ५० टक्के तरी गुण मिलालेले असले पाहिजेत.
एमएलटी कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे – documents
जर आपल्याला कोणत्याही संस्थेमध्ये कोणत्याही कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा असल्यास आपल्याला प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागते त्याचबरोबर त्या व्यक्तीला आवश्यक ती कागदपत्रे देखील जमा करावी लागतात आणि एमएलटी कोर्ससाठी प्रवेश घेताना देखील त्या संबधित व्यक्तीला काही कागदपत्रे सबमिट करावी लागतात आणि तो कोणकोणती कागदपत्रे आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.
- जर एखाद्या व्यक्तीला एमएलटी कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा असल्यास त्या व्यक्तीला त्याचे १२ वी चे मार्कशीट आणि उतीर्ण झालेले प्रमाणपत्रे सबमिट करावे लागते.
- त्याचबरोबर त्याला शाळा सोडलेला दाखला आणि जन्मतारखेचे प्रमाणपत्र देखील सबमिट करावे लागते.
- जर तो संबधित विद्यार्थी हा अनुसूचित जाती जमातीतील किंवा मागास वर्गातील असेल तर त्या विद्यार्थ्याला अनुसूचित जाती/ जमातीचे प्रमाणपत्र किंवा मागास जातीचे प्रमाणपत्र द्यावे लागते. एने आवश्यक असते.
- त्या व्यक्तीला निवासी पुरावा किंवा प्रमाणपत्र देखील
- हस्तांतरण प्रमाणपत्र तसेच स्थलांतर केले असल्या स्थलांतर प्रमाणपत्र अश्या वेगवेगळी कागदपत्रे जमा करावी लागतात.
एमएलटी कोर्सचा अभ्यासक्रम – syllabus
एमएलटी कोर्स हा एक कमी कालावधीचा म्हणजेह एक वर्षाचा कोर्स आहे आणि हा कोर्स दोन सेमिस्टर मध्ये विभागला आहे आणि या दोन सेमिस्टरचा अभ्यासक्रम हा खूप सोपा आणि सुटसुटीत आहे. चला तर खाली आपण एमएलटी कोर्सचा अभ्यासक्रम पाहूया.
- कम्युनिकेटिव्ह इंग्लिश आणि कॉम्प्यूटर फंडामेंटल्स.
- क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी आणि पॅरासीटोलॉजी.
- ब्लड बँकिंग आणि हिस्टो पॅथोलॉजी
- क्लिनिकल जैव रसायनशास्त्र.
- हेमेटोलॉजी.
एमएलटी कोर्स केलेल्या व्यक्तीला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम मिळू शकते ?
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ हा कोर्स केल्यानंतर त्या व्यक्तीला दवाखाने, डॉक्टरांची कार्यालये, खाजगी प्रयोगशाळा, आपत्कालीन केंद्रे, रक्तदाता केंद्रे, शैक्षणिक सल्लागार, आरोग्य सेवा प्रशासक, प्रयोगशाळा माहिती प्रणाली विश्लेषक आणि प्रयोगशाळा व्यवस्थापक अश्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम मिळू शकते.
आम्ही दिलेल्या mlt course information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर एमएलटी कोर्स माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mlt full form in marathi या mlt course details in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about mlt course in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट