तळलेले व उकडीचे मोदक रेसिपी Modak Recipe in Marathi

Modak Recipe in Marathi – Different Types of Modak Recipe in Marathi तळलेले व उकडीचे मोदक रेसिपी मराठी मोदक म्हंटल कि डोळ्यासमोर येतो तो गणपती बाप्पा कारण गणपती बाप्पाला मोदक हा पदार्थ खूप आवडता आणि प्रिया आहे म्हणून सर्व लोक त्याला मोदकाचा नैवैद दाखवतात आणि जर तुम्हाला देखील गणपती बाप्पांना मोदकाचा नैवैद्य दाखवायचा असेल तर आज या लेखामध्ये आपण अगदी चवीष्ट आणि दिसायला सुंदर मोदक कसे बनवायचे हे आपण पाहणारा आहोत.

भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात आणि भारतीय सण हे कोणतीही गोड पदार्थाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. गणपती हा सण देशातील मोठ्या सणापैकी एक आणि गणपतीला मोदक प्रिय असल्यामुळे या सणामध्ये मोदक हा पदार्थ भोग म्हणून दाखवला जातो.

modak recipe in marathi
modak recipe in marathi
अनुक्रमणिका hide
1 तळलेले व उकडीचे मोदक रेसिपी मराठी – Modak Recipe in Marathi

तळलेले व उकडीचे मोदक रेसिपी मराठी – Modak Recipe in Marathi

तयारी करण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
उकडण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
वाढणी२० नग
पाककलाभारतीय

मोदक केव्हा बनवले जातात ?

मोदक हा पदार्थ बहुतेक गणपतीच्या सणामध्ये बनवला जातो तसेच हा पदार्थ अंगारकी संकष्टीला देखील बनवून गणपतीला नैवैद दाखवला जातो.

मोदक बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

मोदक बनवताना सगळीकडे हमखास  हे साहित्य वापरले जाते आणि हे साहित्य मोदक बनवण्यासाठी गरजेचे असते.

  • तांदळाचे किंवा गव्हाचे पीठ : तांदळाचे किंवा गव्हाचे पीठ हा मोदक ह्या पदार्थातील एक मुख्य घटक आहे कारण जे आपण सारण बनवतो ते या पिठाच्या पानांमध्ये भरले जाते आणि त्याला मोदकाचा आकार दिला जातो.
  • खोबरे : मोदकाच्या आतमध्ये जे सारण भरलेले असते ते आल्या खिसलेल्या खोबऱ्यापासून बनवलेले असते.
  • गुळ : गुळ हा घटक सारणामध्ये गोडपणा आणतो त्यामुळे हा घटक या पदार्थातील महत्वाचा घटक मनाला जातो.

मोदक हा पदार्थ बनवण्याच्या पध्दती

मोदक हा पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने बनवला जाऊ शकतो पण सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय असणारा प्रकार म्हणजे उकडीचे मोदक आणि या व्यतिरिक्त तळलेले मोदक देखील बनवले जातात. खाली आपण उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक हे दोन्हीही कसे बनवायचे ते पाहणार आहोत.

उकडीचे मोदक रेसिपी – Ukadiche Modak Recipe in Marathi  

तांदळाच्या पिठापासून बनवले जाणारे उकडीचे मोदक

तयारी करण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
उकडण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
वाढणी२० नग
पाककलाभारतीय

प्रथम आपण उकडीच्या मोदक बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याबद्दल माहिती घेवूया कारण त्यामुळे आपल्याला मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य अगोदर किराणा मधून घरामध्ये उपलब्ध करून ठेवता येवू शकेल.

मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make modak 

पिठाची उकड बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ वाटी तांदळाचे पीठ.
  • १ वाटी पाणी.
  • २ चमचे तेल.
  • मीठ (चवीनुसार).

सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • २ वाटी ओल खोबर ( खिसलेले).
  • १ वाटी गुळ (खिसलेला).
  • १ चमचा वेलची पूड.
  • १ चमचा तील किंवा खसखस.

मोदक बनवण्यासाठी केली जाणारी कृती – How to make modak recipe in marathi 

आता आपण पाहूयात मोदक कसे बनवायचे. त्यासाठी खाली ते कसे करायचे याची प्रक्रिया किंवा पध्दत दिली आहे.

कृती क्रमांक १ : सारण बनवण्याची कृती

  • सर्वप्रथम जाड भाडे किंवा कढई घेऊन त्यामध्ये खिसलेले खोबरे आणि खिसलेला गुळ टाका ते गॅसवर मध्यम आचेवर शिजवून घ्या. हे मिश्रण जोपर्यंत शिजवा कि त्यामधील गुळ पूर्णपणे विरघळून जाईल.
  • त्यानंतर त्यामध्ये खसखस किंवा तील टाका आणि ते चांगल्या प्रकारे हलवून घ्या आणि मग ते मंद आचेवर ५ ते ६ मिनिटांसाठी शिजवून घ्या.
  • त्यानंतर ते वेलची पूड टाकून ते चांगले एकत्र करून घ्या आणि मग ते गॅसवरून खाली उतरून त्यावर झाकण घालून ८ ते १० मिनिटे बाजूला ठेवा.

कृती क्रमांक २ : तांदळाच्या पिठाची उकड कशी बनवावी

  • एका भांड्यामध्ये गॅसवर मोठ्या आचेवर पाणी उकलण्यासाठी ठेवावे.
  • त्या पाण्यामध्ये मीठ ( चवीनुसार ) आणि तेल घालावे आणि मग पाणी उकले पर्यंत वाट पहा.
  • एकदा पाणी उकळले कि गॅसची आच मध्यम करून त्यामध्ये १ वाटी तांदळाचे घालावे आणि ते चांगल्या प्रकारे एकत्र करून त्यावर झाकण घालून ते मध्यम आचेवर चांगले वाफवून घ्यावे.
  • या पिठाला चांगली वाफ आली कि ते पीठ एका ताटामध्ये काढून घेवून आपल्या हाताला तेल लावून घेवून ते पीठ अगदी मऊ होऊ पर्यंत माळून घ्या.

कृती क्रमांक ३ : मोदक बनवण्याची पध्दत (मुख्य रेसिपी)

  • सर्व प्रथम उकडून घेतलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि त्या गोळ्यांना तेल लावून ते लाटून घ्या म्हणजेच त्याची लहान लहान गोलाकार पाने लाटून घ्या.
  • मग त्यामध्ये १ किंवा २ किंवा तुमच्या आवडीनुसार किंवा पानाच्या आकारावर त्यामध्ये आपण तयार करून ठेवलेले सारण भरून घ्या आणि त्या पानाला निऱ्या पडून त्याच्या पाकळ्या बनवा आणि ते मोदक मिटवा म्हणजेच त्यांना मोदकाचा अकरा द्या ( टीप : पानाला जितक्या जास्त निऱ्या पडतील तितकेच मोदक दिसायला सुंदर बनतील ).
  • या प्रकारे सर मोदक बनवून घ्या आणि मग ते उकडून घ्या.
  • मोदक उकडण्यासाठी इडली पात्र किंवा मोदक पात्राच्या चाळनीचा वापर करा.
  • जर तुंम्ही मोदक उकडण्यासाठी इडली पात्राचा वापर करत असाल तर इडली पात्रामध्ये थोडे पाणी घाला आणि इडलीच्या प्लेटला तेल लावून त्यावर मोदक ठेवून त्याला झाकण घालून ते उकडण्यासाठी ठेवा.
  • आणि जर तुम्ही मोदक उकडण्यासाठी मोदक पात्राच्या चाळणीचा वापर करत असाल तर चाळण वरती झाकणासाठी बसेल अशे भांडे घ्या आणि त्या भांड्यामध्ये २ ते ३ वाती पाणी घाला आणि ते उकळण्यासाठी ठेवा.
  • चाळणीला तेल लावून त्यामध्ये बनवलेले मोदक घालून ती चाळण त्या भांड्यावर ठेवा आणि त्यावर गच्च झाकण घाला आणि ते ७ ते ८ मिनिटे उकडून घ्या.
  • ७ ते ८ मिनिटांनी किंवा मोदक पूर्णपणे उकडल्यानंतर गॅस बंद करून घ्या आणि थोड्या वेळाने ते मोदक बाजूला काढून घ्या. उकडीचे मोदक खाण्यासाठी तयार आहेत.

तळलेल मोदक रेसिपी – Fried Modak Recipe in Marathi

( मैद्यापासूनबनवले जाणारे मोदक )

तळलेले मोदक हे मैद्यापासून बनवले जातात त्याला कोणकोणत्या प्रकारचे साहित्य लागते ते आपण पाहूयात.

तळलेले मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients 

पीठाची पाने बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • १ वाटी मैदा.
  • १ पळी तूप ( कडक केलेले ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • कोमट पाणी ( गरजेनुसार ).

सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • २ वाटी वाळलेले खोबरे ( खिसलेले ).
  • १ वाटी गुळ ( खिसलेला ).
  • १ चमचा वेलची पूड.
  • १ चमचा खसखस.
  • १ मोठा चमचा काजू, बदाम आणि बेदाणे.

तळलेले मोदक बनवण्यासाठी केली जाणारी कृती – How to make fried modak recipe in marathi

  • आता आपण पाहूयात मोदक कसे बनवायचे. त्यासाठी खाली ते कसे करायचे याची प्रक्रिया किंवा पध्दत दिली आहे.
  • सर्व प्रथम एका मोठ्या बाऊल मध्ये पीठ घ्या आणि त्यामध्ये गॅसवर एकदम कडक केलेले ( कडवलेले ) तूप घालाअ नि मग ते तूप पिठाला चांगले लावून घ्या आणि त्यामध्ये मीठ ( चवीनुसार ) घालून ते मिश्रण एकत्र करून घ्या.
  • त्यानंतर हे पीठ थोडे थोडे कोमात पाणी वापरून चांगले मऊ मळून घ्या.
  • सारण तयार करण्यासाठी भाडे किंवा कढई घेऊन त्यामध्ये खिसलेले सुखे खोबरे आणि खिसलेला गुळ टाका ते गॅसवर मध्यम आचेवर शिजवून घ्या. हे मिश्रण जोपर्यंत शिजवा कि त्यामधील गुळ पूर्णपणे विरघळून जाईल.
  • त्यानंतर त्यामध्ये खसखस, काजू व बदामाचे तुकडे, बेदाणे आणि वेलची पूड टाकून ते मंद आचेवर तीन ते चार मिनिटे शिजवून घ्या
  • मग पीठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि त्याची लहान आकाराची पाने लाटून त्यामध्ये सारण भरून त्याचा मोदक तयार करा.
  • मोदक तयार करता करता मोदक तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल घाला आणि ते तेल चांगले तापू पर्यंत वाट पहा.
  • एकदा तेल चांगले तापले कि त्यामध्ये एक एक करून मोदक सोडा आणि ते मध्यम आचेवर सोनेरी किंवा तपकिरी रंग येवू पर्यंत तळा आणि मग ते प्लेटमध्ये काढून घ्या.

उकडीचे मोदक कश्यासोबत खावे – serving suggestion 

उकडीचे मोदक हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा असतो आणि हा पदार्थ तुपासोबत खाल्ला जातो तसेच हा पदार्थ जेवणामध्ये एक गोड पदार्थ म्हणून देखील सर्व्ह केला जातो.

टीप :

  • गव्हाच्या पीठाचे मोदक हे तांदळाच्या उकडीच्या मोदकाच्या पध्दतीने बनवले जाते आणि पण यामध्ये जे पीठ बनवले जाते ते तेल, मीठ आणि गार पाण्याने मळून घेतले जाते.
  • तळलेल मोदक हे २ ते ३ दिवस चांगले राहू शकतात.

आम्ही दिलेल्या modak recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर तळलेले व उकडीचे मोदक रेसिपी मराठी modak in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ukadiche modak recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि fried modak recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये different types of modak recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!