money market information in marathi language मनी मार्केट म्हणजे काय?, मनी मार्केट हि एक प्रकारची बाजारपेठ आहे जी आर्थिक व्यवहार करते आणि या ठिकाणी कमी मुदतीच्या आर्थिक पर्यायाचा वापर करून स्टॉक एक्स्चेंजवर व्यवहार केले जातात आणि आज आपण अश्याच मनी मार्केट विषयी माहिती पाहणार आहोत. मनी मार्केट हे आपण वर पाहिल्याप्रमाणे एक आर्थिक बाजारपेठ आहे आणि हि एक खूप अल्पकालीन कर्ज गुंतवणुकीतील व्यापाराचा संबध देते.
आणि यामध्ये प्रकारामध्ये ती संबधित संस्था आणि गुंतवणूकदार म्हणजेच व्यापारी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार होतात आणि या सर्व गोष्टी करत असताना मात्र मनी मार्केट किंवा आर्थिक बाजारपेठ चांगल्या दर्जाची सुरक्षितता देते परंतु हे कमी परताव्याचा दर देते.
मनी मार्केटमध्ये ट्रेझरी बिल किंवा टी बिल, ठेवींचे प्रमाणपत्र आणि व्यावसायिक कागदपत्रे यांचा समावेश असतो आणि गुंतवणूकदार या साधनांचा वापर करून मनी मार्केटमध्ये अल्प काळासाठी आर्थिक मदत घेतात. मनी मार्केट हा एक अनौपचारिक बाजार आहे.
आणि भांडवली बाजाराप्रमाणे त्याची रचना नाही म्हणजेच ते भांडवली बाजारांपेक्षा वेगळे असतात कारण ते कमी कालावधी साठी असतात आणि भांडवली बाजार हे दीर्घ काळासाठी असतात आणि भांडवली बाजाराच्या तुलनेने मनी मार्केट मधून पैसे काढणे देखील खूप सोपे असते. चला तर खाली आपण मनी मार्केट विषयी सविस्तर माहिती पाहूया.
मनी मार्केट म्हणजे काय – Money Market Information in Marathi
मनी मार्केटची वैशिष्ठ्ये – features
- मनी मार्केट मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे हि एक सुरक्षित गुंतवणूक आहे आणि हि आर्थिक बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक गुंतवणूक पर्यायांपैकी एक सुरक्षित पर्याय आहे. यामध्ये क्रेडीट रेटिंग हे उच्च असल्यामुळे परतावा हा अगोदर निर्धारित केला जातो आणि यामुळे आपली गुंतवलेली रक्कम हि गमवण्याचा धोका कमी असतो.
- यामध्ये जी गुंतवणूक केली जाते ती कमी काळासाठी असते परंतु यामध्ये गुंतवणूक दारांच्यासाठी निश्चित उत्पन्न ठरवले जाते आणि अल्पकालीन पुर्नावस्था गुंतवणूकदारांना अतिशय तरल बनवते.
- मनी मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यानंतर निश्चित परतावा मिळण्याचा विश्वास आपल्याला मिळू शकतो.
मनी मार्केटची उदिष्ठ्ये – objectives
कोणतीही संस्था किंवा संकल्पना सुरु करताना डोळ्यासमोर काही हेतू किंवा उदिष्ठ्ये ठेवली जातात तसेच मनी मार्केटने देखील डोळ्यासमोर काही उदिष्ठ्ये ठेवली आहेत. ती कोणकोणती आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.
- मनी मार्केट हे छोट्या मोठ्या बँकांना, संस्थांना आणि कॉर्पोरेशन्स खूप कमी कालावधीवर पैसे घेण्याची एक चांगली संधी देतात.
- वैयक्तिक किंवा खाजगी गुंतवणूकदार, सरकार आणि इतर कर्जदारांना वाजवी किंमतीमध्ये अल्पकालीन वित्तपुरवठा करणे .
- मनी मार्केट हि आर्थिक बाजारपेठ आहे आणि या मध्ये अर्थ व्यवस्थेतील तरलता हे महत्वाचे काम आहे.
- आरबीआय (RBI) हि मध्यवर्ती बँक कमी काळाच्या सिक्युरिटीजचा वापर हा आवश्यक मर्यादेत बाजारामध्ये तरलता मिळवण्यासाठी करून घेते.
- एक विकसित मुद्रा बाजार आरबीआय (RBI) ला आर्थिक धोरणे हि जोमाने अंमलात आणण्यास मदत करते.
- देशामध्ये आणि देशाबाहेरील (परदेशी) व्यापारासाठी सरकारी निधीचा मनी मार्केट हा एक प्रमुख पर्याय आहे.
- मनी मार्केटचे आणखीन एक कार्य म्हणजे अल्प सूचनेवर निधी प्रधान करणे त्याचबरोबर संस्था अनेक बँकांच्याकडून कर्ज घेण्याऐवजी आर्थिक बाजारातून निधी घेणे चांगले कारण हे सुरक्षित आहे आणि याची प्रक्रिया देखील सुलभ आणि त्रासमुक्त करून दिली आहे.
- मनी मार्केट हे त्यांच्या गुंतवणूक दारांना अधिक निधीची विल्हेवाट लावणे, त्याचे द्रव स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यावर फायदा मिळवण्यासाठी सोपे बनवते.
- मनी अर्केत हे कर्जदारांना निष्क्रिय भांडवलाचे उत्पादक गुंतवणुकीत रुपांतर करण्यास सक्षम बनवते.
मनी मार्केट साधने – instruments
मनी मार्केट हे तीन प्रकारच्या साधनांच्यावर आधारित काम करते ते म्हणजे ट्रेझरी बिल, ठेवींचे प्रमाण पत्र आणि व्यावसायिक कागदपत्रे आणि या तीन साधनांच्या विषयी खाली आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.
व्यावसायिक कागदपत्रे
अनेक मोठे व्यवसाय किंवा कंपन्या ह्या कमी कालावधीच्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या व्यवसायासाठी भांडवल उभे करण्यासाठी वचन पत्र जारी करतात आणि ह्या वचन पत्रांना व्यावसायिक कागदपत्रे म्हणून ओळखले जाते. मनी मार्केटमध्ये इतर उपलब्ध गुंतवणूकिंच्यापेक्षा अधिक सुरक्षा असल्यामुळे व्यावसायिक कागदपत्रे देखील सुरक्षित राहण्यास मदत होते.
ठेवींचे प्रमाणपत्र
ठेवींचे प्रमाणपत्रे हे देखील एक महत्वाचे साधन आहे ज्याला आर्थिक मालमत्ता म्हटले जाते आणि हे प्रमाणपत्र अनेक बँकांच्यामार्फत किंवा वित्तीय संस्थांच्यामार्फत जारी केले जाते आणि यामध्ये गुंतवलेल्या रक्कमेवर निश्चित व्याजदर देतात आणि यामध्ये अगदी सोप्या पध्दतीमध्ये सांगायचे म्हटले तर पूर्वीचे पैसे मोठ्या रक्कमेसाठी जारी केले जातात.
ट्रेझरी बिले
ट्रेझरी बिलांना टी बिल म्हणून देखील ओळखले जाते आणि हे एक मनी मार्केटचे साधन आहे जे सरकार मार्फत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेद्वारे आर्थिक मदत उभारण्यासाठी जारी केले जाते आणि त्यांचा आर्थिक मुदतीचा पुर्नावास्थेचा काळ हा एक वर्षाचा असतो. ट्रेझरी बिले हि दर्शनी मूल्यावर सूट देऊन जारी केली जातात आणि पूर्णावस्थेच्यावेळी गुंतवणूक दाराला दर्शनी मुल्ल्याची रक्कम मिळते.
मनी मार्केट विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- मनी मार्केट मधील गुतावाणूक हि एक सुरक्षित गुंतवणूक आहे आणि हि तरलता द्वारे वैशिष्ट्यकृत केली आहे.
- कोणतीही व्यक्ती म्युच्युअल फंड खरेदी करून , कोणत्याही बँकेमध्ये मनी मार्केट खाते उघडून किंवा ट्रेझरी बिल खरेदी करून मनी मार्केटमध्ये अगदी सहजपणे गुंतवणूक करू शकतात.
- मनी मार्केटला आर्थिक व्यवस्थेचा जागतिक आधारस्थंभ म्हणून ओळखले जाते.
- जे गुंतवणुकदार मनी मार्केटमध्ये गुंतवणूक करून फायदा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी मनी मार्केट बँक खात्यातून किंवा मनी मार्केट म्युच्युअल फंड मार्फत गुंतवणूक करू शकतात.
- मनी मार्केटचे मुख्य उद्देश म्हणजे उद्योगांची वाढ करणे तसेच वित्तपुरवठ्याचा व्यापार करणे.
- मनी मार्केट म्युच्युअल फंड देखील बाजारातील चढउतारांच्या अधीन असतात.
- मनी मार्केट साधनान्च्यावरील परताव्यावरील दर हा बचत खात्यावरील परताव्याच्या दरापेक्षा किंचित प्रमाणात जास्त असतो.
आम्ही दिलेल्या money market information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मनी मार्केट म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या money market meaning in marathi या Money market information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि Money market information in marathi pdf download माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Money market information in marathi pdf download Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट