मुलगी झाली हो मराठी निबंध Mulgi Zali Ho Essay in Marathi

Mulgi Zali Ho Essay in Marathi मुलगी झाली हो मराठी निबंध असं म्हणतात, आत्ताच युग हे कलियुग आहे. कलयुग म्हणजे एक संपूर्ण नवीन युग जिथे आपला समाज संपूर्ण नवीन कल्पना, विचार आत्मसात करत आहे. पूर्वी अयोग्य चालीरीती, परंपरांना मान्यता दिली जायची. परंतु, आत्ताच्या कलियुगामध्ये समाजाने नविन जिवनशैली, नवीन परंपरा, नवीन संस्कृती तयार केली आहे. आज समाजातील लोकांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. परंतु, आजही बुरसटलेल्या विचारांचे असे अनेक लोक आपल्या समाजात वावरत आहेत. स्त्री हे त्या विधात्याने निर्माण केलेल्या प्रकृतीचे एक सुंदर उदाहरण आहे.

स्त्री जिच्या मध्ये सगळ्या संकटांवर मात करण्याची क्षमता आहे. स्त्री एक अशी अभिव्यक्ती आहे जी आपल्या सुखासाठी जगत नसून दुसऱ्याच्या सुखासाठी जगत असते. एक मुलगी म्हणून आपल्या आई-वडिलांच्या म्हातारपणाची काठी बनते, एक बायको म्हणून घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य कायम ठेवते, एक आई बनून सरस्वती सारखं आपल्या मुलांना शिकवते आपल्या मुलांना मायचं कवच देते, एक सून म्हणून आपल्या घरातील सगळी नाती जपून ठेवते जोडून ठेवते.

mulgi zali ho essay in marathi
mulgi zali ho essay in marathi

मुलगी झाली हो मराठी निबंध – Mulgi Zali Ho Essay in Marathi

Mulgi Zali Ho Marathi Nibandh

आपल्या घराला सांभाळते, आपल्या घराचे रक्षण करते, आपल्या घराला सगळ्या संकटांपासून लांब ठेवते. अशी स्त्री जी मुलगी, आई, पत्नी, सून, अशी अनेक नाती जपते परंतु तिच्या अस्तित्वाचा दुसऱ्यांना त्रास का होत असेल? आज जगाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. परंतु, आपल्या समाजाचे विचार बुरसटलेले का? आजही एखाद्य बाळ जन्माला आलं की मुलगा आहे की मुलगी? असा प्रश्‍न का उद्भवतो? आजही मुलगी झाली हो असं बोलल्यावर बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावरच हसू नाहीस का होतं?

ज्याने ही सृष्टी बनवली त्यानेच या सृष्टीचा व्यवस्थित कारभार चालावा म्हणून स्त्री‌ ही एक अद्भुत शक्ती निर्माण केली. स्त्री आपल्या अस्तित्वाची निशाणी आहे. अगदी जन्माला आल्यापासून स्त्रिया बऱ्याच गोष्टी सहन करतात म्हणूनच असं म्हटलं जातं स्त्रियांमध्ये दुःख सहन करण्याची अधिक ताकद असते.

अगदी जन्माला आल्यापासून भेदभाव सहन करतात मग, सासरी गेल्यावर हुंडा देत नाही म्हणून छळ, नवऱ्याकडून मारहाण, त्यात संपूर्ण घराच ओझं खांद्यावर घेऊन चालायचं, दिवस-रात्र घरात काम करायचं इतकं सगळं होऊन सुद्धा कोणाचा गोड सुखाचा शब्द तर नाहीच उलट स्त्रियांनीच सगळ्यांची मन राखायची.

मुलींच्या वागण्यावर, बोलण्यावर त्या कसे कपडे घालतात अशा प्रत्येक गोष्टीवर प्रश्न उठवला जातो. मोठ्यांच्या पुढे बोलायचं नाही.. ज्येष्ठां समोर चेहरा पदराच्या आत ठेवायचा.. संध्याकाळी सातच्या आधी घरात यायचं.. कुठल्याही मुलाशी बोलायचं नाही.. शिकून काय करणार आहेस शेवटी लग्न करून जायचं आहे तुला.. हे घालू नकोस, ते घालू नकोस.. असं बसू नकोस, तसं बसू नकोस.. हीकडे जाऊ नकोस,‌ तिकडे जाऊ नकोस.. असे सगळे नियम, रीती मुलींनीच का पाळायचे? स्त्री आहे म्हणूनच या विश्वामध्ये आपलं अस्तित्व आहे.

स्त्री आहे म्हणूनच प्रत्येक घरात कोणाला उपाशी झोपावे लागत नाही. स्त्री आहे म्हणूनच सगळी नाती टिकून आहेत आणि स्त्री आहे म्हणूनच प्रत्येक नात्यांमध्ये प्रेम आहे. स्त्री एक आणि नाती अनेक!! स्त्री एक आई आहे, ती एक ताई आहे. कधी मुलगी म्हणून तर कधी मैत्रिण म्हणून ती आपल्या नेहमीच सोबत असते. तर पत्नी म्हणून आपली अर्धांगिनी म्हणून आपल्या सर्व सुख दुःखात सहभागी होते.

एक सून म्हणून संपूर्ण घराला जोडून ठेवते संपूर्ण घराची रक्षा करते. स्त्री एक सासू आहे स्त्री एक आजी आहे. अशी अनेक नाती निभावणारी ती एक स्त्री आहे. जन्म बाईचा खूप घाईचा म्हणजेच बाईचा जन्म म्हणजे दिवसभर फक्त काम आणि काम. स्त्री आहे म्हणूनच घराला घरपण आहे स्त्री आहे म्हणूनच नात्यांमध्ये जिवंतपणा आहे. स्त्री म्हणजे आईच वात्सल्य, बहिणीचे प्रेम, मैत्रिणीचा विश्वास, बायकोचा खंबीर पाठिंबा.

एक स्त्री जी आपल्या आयुष्यात आपला अविभाज्य भाग आहे जिच्याशिवाय आपले अस्तित्व अशक्य आहे अशा स्त्रीला आपण हुंडा मिळत नाही म्हणून तिचा छळ करावा? आज जर मुलगी जन्माला आली तर त्यांना त्याच क्षणी नदीत किंवा कचरापेटीत फेकले जात. स्त्री-पुरुष हा भेदभाव का? स्त्री आणि पुरुष हा भेदभाव आपल्या समाजामध्ये फार वर्षांपासून चालत आला आहे.

स्त्री व पुरुष यांना लहानपणापासून वेगळी वागणूक देण्यात येते. जसे की स्त्रियांनी नम्रपणे बोलावं सगळ्यांना समजून घ्यावं सहनशील असावा आज्ञाधारक असाव तर, पुरुषांना कसंही वागण्याची बोलण्याची मुभा असते. जर एखादी स्त्री मोठ्याने आवाज चढवुन बोलली तर तिला पुरुषी समजल जात. पुरुषांनी कसं बसावं स्त्रियांनी कसं बसावं‌ यामध्ये देखील विविधता आहे.

शिवाय मुलींना खेळण्यासाठी भातुकली, भांडीकुंडी दिली जाते तर मुलांना खेळण्यासाठी कार, बंदूक दिली जाते. स्त्री व पुरुषांना जन्माला येताच त्यांना काम देखील वाटून दिली जातात स्त्रियांनी घरातली कामं बघायची व पुरुषांनी घराबाहेरची. परंतु आज स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेली आहे आज स्त्रिया फक्त घर आणि चुलं इतक्या पुरतंच मर्यादित राहिला नसून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आपलं वर्चस्व गाजवत आहे.

मग असं असताना देखील आजही स्त्रियांना तुच्छ वागणूक दिली जाते त्यांच्यावर वेगवेगळे नको ते नियम लादले जातात. आजही समाजामध्ये अनेक मुली आहेत ज्या आपल्या घरच्यांकडून तुच्छ वागणूक सहन करत आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे ती एक स्त्री आहे. प्रकृतीने स्त्री व पुरुष बनवलं आहे परंतु हा लिंग भेदभाव या समाजाने केला आहे.

महिलांना नेहमीच कमी दाखवण्यात येतं. स्त्रियांना आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेदभाव सहन करावा लागतो अगदी आपल्या घरच्यांपासून ते आपल्या कार्यालयातील लोकांपर्यंत. आपण स्त्री आहोत म्हणून घरचे आपल्या वागण्यावर बोललण्यावर बसण्यावर लक्ष ठेवतात आणि वेळोवेळी नको ते सल्ले देखील देतात. परंतु हेच पुरुषांच्या बाबतीत उलट असतं पुरुषांनी कसंही वागलं बोललं न

बसलं तरी चालतं. तसेच कार्यालयात देखील समान कामासाठी पुरुषांना जास्त पगार दिला जातो तर स्त्रियांना कमी पगार दिला जातो. आणि वेळ आल्यावर प्रत्येक स्त्रीने दाखवून दिलं आहे की प्रत्येक स्त्री पुरुषां पेक्षा प्रत्येक क्षेत्रामध्ये वरचढ ठरली आहे. प्रत्येक स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कुठल्याही क्षेत्रांमध्ये काम करू शकते.

इतकं सगळं असून देखील घराचा वारसा पुढे नेहासाठी वंशाचा दिवा गरजेचे आहे असं नाही तर वंशाची पणती देखील घराचा वारसा पुढे नेऊ शकते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तर स्त्रियांना शिक्षणाचा देखील अधिकार नव्हता परंतु जरी आता स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार असला तरी समाजामध्ये स्त्रियांना जो सन्मान मिळायला हवा तो मिळत नाही आहे. एक मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा ती संपूर्ण घराच नंदनवन करते.

आधी स्त्रियांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती परंतु आता जग पुढे गेलं आहे आज स्त्रिया घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. प्रत्येक स्त्रीला कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आपल्या गरजा पुरवण्यासाठी घराबाहेर पडून बाहेरच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. आज-काल स्त्रियांवर होणारे अत्याचार बलात्कार बरेच वाढले आहेत आणि हा देखील एक मुद्दा आहे ज्यामुळे मुलगी नको ही भावना वाढीस लागली आहे.

शिवाय मुलगी झाली तर आपल्या घराचा वारसा पुढे कोण नेणार असेदेखील अजूनही काही लोकांचे गैरसमज आहेत. मुली या फक्त चूल आणि मूल इथे पर्यंतच मर्यादित असतात त्या पुरुषासारखे काम करू शकत नाहीत अशी समज असल्याने मुलगी नको ही भावना वाढीस लागली आहे. परंतु स्त्रीयांनी समाजाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं आहे आणि आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिल आहे की जितका अधिकार व मोकळीकता पुरुषांना आहे तितकीच स्त्रियांना देखील दिली असावी.

आज स्त्रिया घराबाहेर पडून स्वतःचं रक्षण करायला शिकल्या आहेत. आजही समाजामध्ये स्त्रियांना घेऊन अनेक गैरसमज पाळले जातात जसे की मुलगी म्हणजे डोक्याला ताप, मुलगीची अब्रू म्हणजे काचेचा ग्लास, वंशाला दिवा हवा, मुलगी म्हणजे परक्याचे धन असे अनेक गोष्टी आपल्या कानी पडत असतात. असे नको नको ते समज लोकांच्या मनात असल्यामुळे मुली जन्माला येण्याच्या आधीच त्यांची हत्या केली जाते.

आणि हे सगळे दृश्य अजून कुठवर चालणार कधीतरी स्त्री-पुरुष समानता हा खेळ थांबायलाच हवा. मुलगी झाली हो या वाक्यातील दोन सूर म्हणजे एक सुखाचा आणि दुसरा निराशतेचा. परंतु जी स्त्री नऊ महिने आपल्या गर्भामध्ये एका दुसऱ्या जीवाला जपते त्याचा सांभाळ करते हे किती सर्वश्रेष्ठ आहे याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही.

मग जर याच स्त्रीचा आपण आदर नाही केला तिला योग्य तो मानसन्मान नाही दिला तर उद्या आपल्या अस्तित्वाचा देखील प्रश्न उद्भवेल. आपण जगन्माता देवीची उपासना करतो असं म्हणतात स्त्री देखील तिचाच एक जन्म आहे मग तिचाच अंश असणाऱ्या तिच्या जन्माच‌ आपण निखळ मनाने स्वागत करायला हवं.

आम्ही दिलेल्या mulgi zali ho essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मुलगी झाली हो मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mulgi zali ho marathi nibandh या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mulgi zali ho nibandh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!