माझा आवडता लेखक साने गुरुजी My Favourite Writer Essay in Marathi

My Favourite Writer Essay in Marathi – Maza Avadta Lekhak Essay in Marathi Language माझा आवडता लेखक साने गुरुजी आज आपण या लेखामध्ये माझा आवडता लेखक या विषयावर निबंध लिहिणार आहोत. भारतीय लेखन साहित्यामध्ये अनेक असे साहित्यिक होवून गेले आणि त्यांनी अनेक प्रकारे भारतीय साहित्यामध्ये भर पाडली. आपले भारतीय साहित्य अनेक भाष्यामध्ये आहे आणि आपाल्या भारतीय साहित्यामध्ये कथा, काव्ये, ग्रंथ, कविता, वेगवेगळी पुस्तके, भूतकाळामध्ये झालेल्या सत्य घटनांच्यावर पुस्तके. पूर्वी घडलेल्या सत्य घटना, महान व्यक्तींनी लिहून ठेवलेल्या कविता, ग्रंथ हे सर्व आपल्याला पुस्तकाच्या स्वरूपामध्ये अनुभवायला मिळते.

पूर्वीच्या काळी अनेक संतांनी, कवींनी, लेखकांनी आपल्या लेखनाच्या आणि शब्दांची रचना करण्याची कला लक्षात घेवून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली जसे कि कविता संग्रह, वेगवेगळे नाटक, वेगवेगळे पौराणिक ग्रंथ, वेगवेगळ्या भूतकाळामध्ये होणाऱ्या सर्व घटना याच्यावर अनेक लेखकांनी पुस्तके लिहिली आणि म्हणूनच आपल्याला पूर्वीच्या काळी काय घडत होते, लोक कसे वागत होते आणि संस्कृती कशी होती हे समजते आणि फक्त आपल्याला पूर्वी होवून गेलेल्या लेखकांच्यामुळे किंवा आत्ता असणाऱ्या लेखाकांच्यामुळे समजते.

my favourite writer essay in marathi
my favourite writer essay in marathi

माझा आवडता लेखक साने गुरुजी – My Favourite Writer Essay in Marathi

Maza Avadta Lekhak Essay in Marathi Language

ज्या लोकांना वाचनाची आवड असते त्या लोकांचा एक आवडता लेखक देखील असतो म्हणजेच त्या लोकांना त्या लेखकाची सर्व पुस्तके वाचायला खूप आवडतात आणि माझा देखील एक आवडते लेखक आहेत ज्यांची पुस्तके मला वाचायला खूप आवडतात आणि ते म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजी हे एक प्रसिध्द साहित्यिक आहेत ज्यांनी त्यांच्या लेखक या पेशामध्ये असताना अनेक पुस्तके आणि कविता लिहून ठेवल्या आहेत.

मी यांचे सर्व लोकांच्या मध्ये लोकप्रिय असणारे पुस्तक श्यामची आई हे पुस्तक वाचले आणि मला ते पुस्तक खूप आवडले म्हणून मी त्यांची अनेक लेखणे वाचायला सुरुवात केली आणि अश्या प्रकारे मला त्यांच्या साहित्याच्या वाचनाचे वेढ लागले. साने गुरुजी यांना लेखनाची तर आवड होतीच परंतु त्यांनी समाज सुधारक म्हणून देखील काम केले.

साने गुरुजी हे कोणासाठी अनोळखी नाही तर हे सर्वांच्यासाठी ओळखीचे आहे कारण हे एक लोकप्रिय लेखक आणि समाजसुधारक होते. साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ मध्ये महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावामध्ये झाला होता. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पाडुरंग सदाशिव साने असे होते. साने गुरुजी यांच्या वडिलांचे नाव सदाशिव साने आणि आईचे नाव यशोदाबाई साने असे होते.

साने गुरुजी यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमळनेर या ठिकाणी असणाऱ्या प्रताप या हायस्कूल मध्ये ते एक शिक्षक म्हणून काम करू लागले आणि मग त्यांनतर त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आणि वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार कसा निर्माण करायचा तसेच या जगामध्ये सावाभिमानाने कसे जगायचे या बद्दल माहिती दिली किंवा मुलांना धडे दिले.

साने गुरुजी हे एक लोकप्रिय साहित्यिक तर होतेच परंतु यांना एक संवेदन शील स्वातंत्र्यसैनिक देखील होते आणि त्यांना देशाविषयी खूप अभिमान होता आणि ते एक महान देशभाकत देखील होते आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील अनेक चळवळींच्यामध्ये भाग घेतला होता. समाजातील कर्मकांड या गोष्टींच्या विरोधात होते आणि त्यांना हे सर्व मोडून काढायचे होते म्हणून त्यांनी १९४६ मध्ये त्यांनी पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आले. त्यांनी पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले होते आणि या प्रयत्नांना यश मिळाले त्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळाला.

साने गुरुजींनी त्यांच्या जीवनकाळामध्ये अनेक चळवळीच्या मध्ये सहभाग घेतला होता आणि त्यामुळे त्यांना ब्रिटिशांनी कारागृहामध्ये टाकले होते आणि म्हणून त्यांच्या आयुष्याचा बहुतेक काळ हा त्यांनी कारागृहामध्ये घालवला होता त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त लेखन हे कारागृहामध्ये केले होते. साने गुरुजी यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकूण ७३ पुस्तके लिहिली होती आणि ती निबंध कसे लिहायचे ( निबंध कला ), इस्लामी संस्कृती, अस्तिकतेच्या विषयावर, आपण सारे बांधव या विषयावर पुस्तके लिहिली होती.

त्यांनी अनेक पुस्तके लहिली असतील परंतु त्यामधील त्यांचे लोकप्रिय पुस्तक म्हणजे “श्यामची आई” हे आहे आणि हे पुस्तक ( कादंबरी ) आजही तितकेच लोकप्रिय आहे. श्यामची आई हे पुस्तक कोणी वाचले नाही असे नाही किंवा कोणाला माहित नाही असे नाहीत तर हे सर्वांना माहित आहे म्हणजेच हे पुस्तक खूप लोकप्रिय आहे. ज्यावेळी साने गुरुजी कारागृहामध्ये होते त्यावेळी विनोबा भावे यांनी सांगितलेला गीताई हा ग्रंथ देखील साने गुरुजींनी लिहिला आहे.

त्यांनी सुरु केलेले पहिले साप्ताहिक म्हणजे ‘विद्यार्थी’ साप्ताहिक होते त्यानंतर त्यांना ‘साधना’ हे साप्ताहिक सुरु केले मग त्यांनतर त्यांच्या अनेक कविता, लेख, पुस्तके, कादंबरी यासारखे आणि साहित्य पाहायला मिळाले. तसेच त्यांनी त्यांच्या अनेक पुस्तकांच्या सोबत अनेक प्रसिद्ध कविता देखील लिहिल्या आणि ह्या मधील काही कविता ह्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय देखील झाल्या आणि आजही त्या शाळेमध्ये शिकवल्या जातात.

साने गुरु यांना देशाबद्दल देखील खूप प्रेम होते आणि म्हणून त्यांनी “बलसागर भारत होवी विश्वात शोभूनी राहो” हि देशाशी संबधित असणारी कविता लिहिली आणि हि कविता शाळेमध्ये आजही शिकवली जाते आणि हि कविता साने गुरुजींची पहिली कविता होती तसेच त्यांनी लोहिलेली आणखीन एक कविता खूप लोकप्रिय आहे आणि ती देखील शाळेमध्ये अजून शिकवली जाते.

साने गुरुजी यांना असे वाटायचे कि ह्या जगामध्ये मानवता हाच खरा धर्म आहे म्हणून त्यांनी मानवतेवर देखील कविता लिहिल्या आहेत आणि त्यामधील एक लोकप्रिय कविता म्हणजे “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे “. अश्या प्रकारे साने गुरुजींनी मराठी लेखन साहित्यामध्ये भर पडली तसेच ते देशप्रेमी असल्यामुळे अनेक चळवळींच्या मध्ये सहभाग देखील घेतला. साने गुरुजी हे भारताला लाभलेले संवेदनशील स्वातंत्र्यसैनिक आणि एक चांगले साहित्यिक होते. साने गुरुजी ( पांडुरंग सदाशिव साने ) हे ११ जून १९५० मध्ये मरण पावले.

अश्या प्रकारे साने गुरुजींनी भारताच्या इतिहासामध्ये अनेक मोलाची कामगिरी केली. त्यांनी अनेक स्वातंत्र्य चळवळींच्या मध्ये भाग घेतला तसेच भारताच्या साहित्यामध्ये मोलाची भर पाडली आणि प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये भाग घेवून मोलाची कामगिरी केली तसेच त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनाला भुरळ पडणारे लेखन देखील केले आणि म्हणूनच साने गुरुजी हे माझे आवडते लेखक आहेत.

आम्ही दिलेल्या My Favourite Writer Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता लेखक साने गुरुजी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maza avadta lekhak essay in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on maza avadta lekhak in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये short essay on maza avadta lekhak in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!